महालक्ष्मी मंदिर मुंबई माहिती Mahalaxmi Temple Mumbai Information in Marathi

Mahalaxmi Temple Mumbai Information in Marathi श्री महालक्ष्मी मंदिर मुंबई आजच्या ब्लॉग मध्ये आपण मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक आपण मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेलं मुंबई महालक्ष्मी मंदिर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या सोबतच मंदिराच्या स्थापनेची एक अद्भुत कथा देखील जाणून घेणार आहोत. महालक्ष्मी मंदिर मुंबई मधील एक सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अरब सागरा जवळचा किनाऱ्यालगत भुलाबाई देसाई मार्गावरती स्थित आहे. हे मंदिर लाखो लोकांचं विश्वासाचं आणि प्रार्थनेचे स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या अगदी जवळच आहे. या मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत. गर्भगृहामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन देवींच्या प्रतिमा एक साथ विराजमान आहेत.

mahalaxmi temple mumbai information in marathi
mahalaxmi temple mumbai information in marathi

महालक्ष्मी मंदिर मुंबई माहिती – Mahalaxmi Temple Mumbai Information in Marathi

श्री महालक्ष्मी मंदिरमाहिती
मंदिराचे नावश्री महालक्ष्मी मंदिर
उत्सव, यात्रानवरात्र
मंदिर कोठे आहेमहाराष्ट्रातील मुंबईमधील भुलाबाई देसाई परिसरात आहे
मंदिर स्थापना कोणी केली?व्यापारी धाकजी दादाची
पाहण्यासारखी ठिकाणेहाजी आली दर्गा, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, गिरगाव चौपाटी, हँगिंग गार्डन, धोबी घाट, कमला नेहरू पार्क, तर भाऊ दाजी लाड म्युझियम, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई नेहरू सायन्स सेंटर, मानी भवन, मरीन ड्राईव्ह, बांद्रा वरळी सी लिंक, कान्हेरी गुफा, विपॅसाना पागोडा, श्रीसिद्धिविनायक, नरिमन पॉईंट, एलिफंटा केव्हज.

मंदिराचा इतिहास:

मुंबई मधील वरळी आणि मलबार हिल ज्याला आपण आता कॅंडी ब्रिज असं म्हणतो, या ब्रिजला जोडणारी भिंत बनवण्याच्या वेळी एक अदभूत घटना घडले असं म्हटलं जातं. मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर जाॅन हॉर्नबी ने मुंबई आणि वरळी ही दोन बेटे समुद्रात भरणी करून बांधण्याचा विचार केला. व्यापारी असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीनचा हा प्रयोग मंजूर नव्हता. मुंबई बेटाचा दक्षिण टोक जे सध्या महालक्ष्मी मंदिर म्हणून ओळखला जात आणि समोरच वरळी गाव म्हणजेच मुंबई महानगरपालिकेच लव्ह ग्रोव्ह उंदचन केंद्र किंवा अत्रीया माॅल आहे.

तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरले होते. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी संपूर्ण भायखळा पर्यंत पोहोचायचं. त्यामुळे मुंबई बेटावरून वरळी कडे जायला होडी शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी जिथुन आत घुसायचे त्या भागाला द ग्रेट ब्रिच असं नाव दिलं होतं. म्हणूनच जॉन ने हि खाडी भरून काढण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई बेटावरून थेट वरळी ला जाण्यासाठी एक गाडी मार्गा ब्रिज बनवायचं ठरवलं. ह्या प्रकल्पाची सुरुवात त्याने इंग्लंड कार्यालयाच्या परवानगी शिवायच केली‌. तेव्हां या बांधकामाचं नाव वरळी बांध असं होतं. तेव्हा या कामाची सगळी सूत्रे रामजी शिवाजी यांच्या हाती होती. हे एक तरुण इंजिनियर होते.

बांधकाम सुरू झालं आणि दगडांच्या राशीच्या राशी पाण्यात भरल्या गेल्या. पण थोडं बांधकाम चांगलं झालं की हा बांध समुद्राच्या रेट्याने घसरून पडत असे. असं बरेच महिने चालू राहील, परंतु रामजी आणि जॉन या दोघांनी हिम्मत नाही हरली. आणि त्यांनी हे काम चालूच ठेवलं तसं बघायला गेलं तर त्या वेळेच तंत्रज्ञान बघता हे काम थोडं अवघडच होतं. तेव्हा बांधकाम करणाऱ्यांना खूप काही संकट आली. ब्रिटिश इंजिनियरसचे पण खूप सारे प्रयत्न वाया गेले. तेव्हा प्रोजेक्टचे चीफ  इंजिनियर म्हणजे रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात महालक्ष्मी देवीने दर्शन दिले. आणि ती म्हणाली वरळीच्या जवळच्या समुद्रामध्ये माझी एक मूर्ती आहे.

ती काढून तुम्ही तिथे माझं मंदिर बनवा आणि पुढचे सगळे संकट दूर होतील. तेव्हा त्यांनी लक्ष्मीच्या आदेशानुसार शोध काम करायला सुरुवात केली. आणि त्यांना त्याच ठिकाणी महालक्ष्मी देवीची मूर्ती देखील सापडली. आणि या घटनेनंतर चीफ इंजिनियरने त्याच जागी एक छोटेसे मंदिर बांधले. नंतर ब्रिज निर्माण संबंधित कार्य देखील त्वरित पार पडलं गेलं. आज त्याच ठिकाणाला आपण मुंबईचे महालक्ष्मी मंदिर असं म्हणतो. अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भुलाबाई देसाई मार्गावर समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित आहे. मंदिरात चे निर्माते एक व्यापारी धाकजी दादाची होते. ज्यांनी १८३१ मध्ये या मंदिराची स्थापना केली.

मंदिर वास्तुकला :

महालक्ष्मी मंदिर मुंबई मधील एक सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अरब सागरा जवळचा किनाऱ्यालगत भुलाबाई देसाई मार्गावरती स्थित आहे. हे मंदिर लाखो लोकांचं विश्वासाचं आणि प्रार्थनेचे स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या अगदी जवळच आहे. या मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत.

गर्भगृहामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन देवींच्या प्रतिमा एक साथ विराजमान आहेत. तिन्ही प्रतिमांना सोन्याची नथ, सोन्याच्या बांगड्या आणि मोत्याच्या हारांनी अतिशय सुंदर सजवलं गेलं आहे. मंदिराच्या मुख्य द्वारावर देखील सुंदर नक्षी कोरली गेली आहे. हे मंदिर हाजीअली दर्गाच्या इथे एकदम जवळच्या समुद्र तटावर स्थित आहे. हाजीअली मधून महालक्ष्मी मंदिर देखील दिसते. समुद्रकिनारी असल्यामुळे ह्या मंदिराची सुंदरता आणि आकर्षकता अजूनच वाढली आहे‌.

महालक्ष्मी मातेची मूर्ती वाघावर स्वार होऊन महिषासुराचा वध करताना दिसते. मंदिर परिसरात विविध देवी-देवतांचे आकर्षक प्रतिमा पण स्थापित केल्या गेल्या आहेत. मंदिराच्या परिसरात अन्य देवदेवतांचे देखील मंदिर आहे. या मंदिरामध्ये श्री हनुमान यांचं एक पातळी हनुमान नावाचं मंदिर आहे. जिथे मंदिराच्या आत मध्ये हनुमान जी यांची मूर्ती चांदीच्या आवरणामध्ये आहे. महालक्ष्मी मंदिराच्या जवळच एक धाकलेश्वर महादेव मंदिर देखील आहे. हे मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

मंदिराची वैषिष्ट:

मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. मंदिरात देवीच्या तीन मुर्त्या आहेत आणि या तिन्ही मुर्त्या अतिशय सुंदर पद्धतीने सजवल्या केल्या आहेत. नेहमी मुर्त्या मुख्य गाभार्यात एक साथ स्थित आहेत. तीनही मूर्तींचे खरे स्वरूप सोन्याच्या आवरणाने झाकून ठेवले‌ आहे. खूपच कमी लोक आहेत ज्यांनी या मंदिरामधील विराजमान देवी महालक्ष्मी ची मूर्ती स्वयंभू आहे आणि ज्यांनी देवीच वास्तविक मूर्ती बघितली असेल. अशी अतिशय कमी लोक आहेत सहा वाजता मंदिर उघडल्यावर देवीवर अभिषेक केला जातो ती त्याच्या नंतर पुन्हा मूर्तीवर आवरण चढवला जातो. मंदिर सकाळी सहा वाजता खुलतं आणि रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं.

मंदिराचे रहस्य:

लक्ष्मी मंदिर हे मुंबईतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी लाखो भाविक इथे गर्दी करतात. दिवसांमध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भक्त महालक्ष्मीची वास्तविक प्रतिमा नाही बघू शकत. असं म्हणतात ही वास्तविक प्रतिमा पूर्ण दिवसभर एका आवरणाने झाकली जाते. प्रतिमा बघायची असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे. रात्री जवळपास साडे नऊ वाजल्यानंतर ह्या प्रतिमे वरून आवरण थोड्यावेळासाठी काढलं जातं. इथे रात्री उशिरापर्यंत श्रद्धाळूंची मोठ्या प्रमाणावर संख्या बघायला मिळते. मंदिराच्या गाभार्‍यात एक भिंत आहे.

जिथे भक्तजन आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी एक सिक्का भिंतीवर चिटकवतात. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हा सिक्का भिंतीवर चिपकला  देखील जातो. लक्ष्मी मंदिर हे जागृत स्थान आहे इथे येणार्‍या सर्व भक्तांची इच्छा पूर्ण होते. मुंबई शहर हे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस मार्गांनी चांगल्या स्थितीत जोडलं गेलं आहे. बेस्टच्या बसेस तसेच खाजगी मुंबई दर्शनासाठी च्या बससेवा या मार्गावरून दररोज चालू असतात.

महालक्ष्मी मंदिर मुंबई फोटो:

mahalaxmi temple mumbai information in marathi
mahalaxmi temple mumbai information in marathi

उत्सव, यात्रा :

लक्ष्मी मंदिर मुंबईतील भाविकांचं श्रद्धेचे स्थान आहे.‌ नवरात्री हा सण इथे खूप मोठ्या धामधुमीत साजरा होतो. नवरात्रीमध्ये हे मंदिर खूप आकर्षित पणे सजवले जाते‌. भाविकांच्या गर्भ भाविक भाविक इथे इतकी गर्दी करतात की मंदिरात उभ राहायला देखील जागा नसते. मंदिराच्या कंपाऊंडमध्ये हार, फुल ,चुनर प्रसाद, मिठाई, इत्यादी ची दुकाने आहेत. हे सामग्री भक्तजन खरेदी करून देवीला अर्पण करतात. फक्त मुंबईच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येऊन देवीसमोर माथा टेकवतात. नवरात्री मध्ये मंदिरांमध्ये अतिशय लांब अशी रान लागते जेणेकरून इतकेच नव्हे तर भक्तांना दर्शन साठी तासन् तास वाट बघावी लागते‌.

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

श्री महालक्ष्मी देवीच मंदिर मुंबईमधील भुलाबाई देसाई परिसरात स्थित आहे.

मंदीर हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. म्हणून हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. फक्त हिंदू धर्माचेच नाही तर इतर धर्मीय देखील या मंदिरात येतात. फक्त मुंबईतूनच नाही तर भारताच्या अनेक ठिकाणावरून पर्यटक लांबून लांबून या मंदिराला भेट द्यायला येतात. या मंदिराला भेट देण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मुंबई मध्ये पोहोचावं लागेल. मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे भारतातील सर्व प्रमुख शहरे मुंबईला रस्ता, रेल्वे आणि वायू मार्गाद्वारे जोडले गेले आहेत.‌ जसं की दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, इत्यादी.

या सर्व शहरातून मुंबई कडे येण्यासाठी विमानसेवा सुरू असतात. छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दोन विमानतळ मंदिराच्या परिसरा पासून वीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे. विमानतळावर उतरून पुढे रिक्षा किंवा बसने मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. मुंबईतील महालक्ष्मी स्थानकावरून हे मंदिर जवळपास एक किलोमीटर अंतरावर स्थित आहेत या स्थानकाजवळ पोहोचण्यासाठी दादर वरून नियमित रेल्वेसेवा उपलब्ध आहेत.

पाहाण्यासारखी ठिकाणे:

मुंबई म्हंटलं की विविध स्थळ ,विविध खाण्यापिण्याचे पदार्थ, मौजमजा आली‌च. संपूर्ण मुंबई मध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. श्री श्री महालक्ष्मी देवी मंदिरा जवळ काही सुंदर ठिकाणे आहेत. हाजी आली दर्गा, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, गिरगाव चौपाटी, हँगिंग गार्डन, धोबी घाट, कमला नेहरू पार्क, तर भाऊ दाजी लाड म्युझियम, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई नेहरू सायन्स सेंटर, मानी भवन, मरीन ड्राईव्ह, बांद्रा वरळी सी लिंक, कान्हेरी गुफा, विपॅसाना पागोडा, श्रीसिद्धिविनायक, नरिमन पॉईंट, एलिफंटा केव्हज.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा श्री महालक्ष्मी मंदिर मुंबई mahalaxmi temple mumbai information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती दिली आहे. mumbai mahalaxmi temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about mumbai mahalaxmi temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही श्री महालक्ष्मी मंदिर मुंबई विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या mumbai mahalaxmi temple माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!