महाराणा प्रताप यांची माहिती Maharana Pratap Information in Marathi

Maharana Pratap Information in Marathi महाराणा प्रताप यांची माहिती मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण थेट पंधराव्या शतकात जाणार आहोत. महाराणा प्रताप यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी. महाराणा प्रताप हे शूर साहसी आणि पराक्रमी राजे होते. महाराणा प्रताप हे उत्तर पश्चिम भारतातल्या राजस्थान येथील मेवाडचे तेरावे राजे होते. परराष्ट्रीय आणि भारतामध्ये येऊन भारतावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. आदिलशाही, निजामशाही, मोगल, ब्रिटीश, पोर्तुगीज हक्काने भारतामध्ये आपले स्वतःचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराणा प्रताप यांनी मोगलांच्या साम्राज्यविस्तार विरुद्ध लष्करी प्रतिउत्तर दिलं.

महाराणा प्रताप यांच्या यशोगाथा तर आपण ऐकल्या असतील याशिवाय दूरदर्शनवर येणाऱ्या महाराणा प्रताप यांची जीवनगाथा दर्शवणाऱ्या मालिका देखील पाहिल्या असतील. परंतु आजच्या लेखामध्ये आपण महाराणा प्रताप यांच्या विषयी अधिक व अपरिचित माहिती जाणून घेणार आहोत.

maharana pratap information in marathi
maharana pratap information in marathi

महाराणा प्रताप यांची माहिती – Maharana Pratap Information in Marathi

जन्म

महाराणा प्रताप यांच्या जन्मा बद्दल अनेक वेगवेगळे मुद्दे आणि प्रश्न उभे राहिले आहेत. महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ कोणते या प्रश्नावर बर्याच इतिहास संशोधक क्षेत्रातील लोकांनी आपली मते मांडली आहेत. या प्रश्नावर दोन गृहितके आहेत त्यातील पहिलं म्हणजे महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड किल्ल्यामध्ये झाला असावा याचं कारण म्हणजे वडील उदाईसिंग आणि आई जयवंताबाई यांचं लग्न कुंभलगड या राजवाड्या मध्ये झालं होतं.

आणि हिंदू सूर्य महाराणा प्रताप या पुस्तकाचे लेखक विजय नाहर यांनी या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे महाराणा प्रताप यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील उदयसिंग यांना युद्ध व असुरक्षिततेने घेरलं होतं.‌ आणि कुंभलगड हा सुरक्षित किल्ला नव्हता. या गृहितका वरून असा समज आहे की महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड किल्ल्यात झाला असावा.

अन्य गृहीतके असं सांगतात की महाराणा प्रताप यांचा जन्म मारवाड येथील पालीच्या वाड्यामध्ये झाला असावा कारण महाराणा प्रताप यांच्या आई जयवंताबाई यांचे माहेर पाली होतं. आणि त्या काळी जोधापुर चा राजा मालदेव हा सर्वात शक्तिशाली राजा होता. महाराणा प्रताप यांच्या आईचे वडील आणि मालदेव यांच्यात चांगलीच युती होती.

त्यामुळे महाराणा प्रताप यांचा जन्म १५९७ रोजी पाली मारवाड येथे झाला असावा. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिताना देवेंद्रसिंग शक्तीवर हे लेखक असे सांगतात की महाराणा प्रताप यांचा जन्म जुना कचरी पाळीचे अवशेष असलेल्या जुन्नर किल्ल्यावर झाला असावा‌.

हा किल्ला महाराणा प्रताप यांच्या आईचे माहेर घर होतं. जुन्या परंपरेनुसार मुलीच पहिलं बाळंतपण तिच्या माहेरी केलं जातं. महाराजांनी त्यांचे बालपण भिल्ल समुदायास सोबत घालवल. या भिल्ल समुदायाकडून महाराणा प्रताप यांनी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील घेतलं भिल्ल समुदाय आपल्या मुलांना कीक असं संबोधतात म्हणूनच महाराणा प्रताप यांना देखील या नावाने हाक मारल जायचं.

महाराणा प्रताप यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजेच उदय सिंग यांनी मोर्चा करून मावली च्या युद्धात बनवीर विरुद्ध विजय प्राप्त केला आणि चित्तोडच्या गादीवर हक्क मिळवला.

महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक सोहळा

महाराणा प्रताप इतिहासातल एक धगधगते पर्व. खरतर महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक होताना काही अडथळे आले. चितोड राज्यावर राज्य उदयसिंह रणवीर अनोसे दुसरे यांचं होतं. या राज्यावर मुगल सम्राट अकबर इसवी सन १५६८ मध्ये चाल करून आला. युद्ध परिस्थिती उद्भवली युद्धामध्ये राजे उदयसिंह आणि मेवाडचा राजघराणं हे शत्रूला किल्ल्याचा ताबा मिळवू नये म्हणून युद्धभूमी सोडून गेले.

१५५९ मध्ये उदय सिंह यांनी आपला स्वतंत्र शहर स्थापित केला ज्याला उदयपूर असं नाव दिलं उदयसिंह महाराज यांची इच्छा होती की त्यांच्या राज्याचा कारभार त्यांचं सर्वात जास्त प्रेम असलेल्या त्यांची प्रिय राणी भातीयानी यांच्यापासून झालेला मुलगा जगमल यांनी राज्याची देखभाल करावी.

परंतु महाराजांच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार महाराजांचा पहिला मुलगा गादी वर बसण आवश्यक होतं महाराजांचा पहिला मुलगा होता राजे महाराणा प्रताप. याशिवाय दरबारातील वरिष्ठांना देखील जगमल राजे सिंहासनावर बसणं योग्य वाटत नव्हतं. ते राज्याचा कारभार पाहण्यास असमर्थ होते.

म्हणून महाराणा प्रताप यांना गादीवर बसवण्यात येऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला तर महाराणा प्रताप यांना आपल्या वडिलांच्या इच्छेविरुध्द जाण्याची इच्छा नव्हती परंतु राज्याच्या भल्यासाठी जनकल्याणासाठी त्यांना हे करावं लागलं पुढे जाऊन त्यांनी आपल्या साहसी वृत्तीने अगदी कुशलतेने राज्यकारभार चालवला याशिवाय एक पराक्रमी कुशल योद्धा संघटक व एक महान राजा म्हणून त्यांनी आपला लौकिक निर्माण केला.

महाराणा प्रताप त्यांच्या शौर्याची गाथा

महाराणा राजा प्रताप यांना मोगलांच्या गुलामगिरीतून आपल्या राज्याला मुक्त करायचं होतं. शिवाय मोगलांसाठी काम करणं त्यांना पसंत नव्हतं त्यांनी नेहमीच मोगलांना आपल्या राज्यात येऊन साम्राज्यविस्तार करण्यास विरोध केला होता. मेवाडचा सुपीक पुर्व पट्टा मोगलांच्या हाती गेला होता. परंतु उरलेला भाग अजूनही महाराणा प्रताप यांच्याकडे होता.

मेवाडचा ताबा महाराणा प्रताप यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या इतर भावंडांमध्ये गादीवरून वाद-विवाद होऊ लागले होते. हीच संधी साधून अकबर महाराणा प्रताप यांना आपल्या दूता मार्फत आपलं राज्य माझ्या ताब्यात करा असा उल्लेख असलेले संदेश पाठवायचा. मेवाड राज्य अकबराच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव अकबराने महाराणा प्रताप यांच्या समोर ठेवला होता.

बऱ्याच वेळेला महाराणा प्रताप यांनी ह्या गोष्टीला विरोध केल्यामुळे. अकबराकडे युद्ध सोडल्यास दुसरा पर्याय उरला नव्हता. अखेरीस १ जून १५७६ रोजी हळदीघाटी येथे मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रताप सिंह आणि अकबर यांच्यामध्ये लढाईला सुरुवात झाली. मोगलांचा विजय झाला. मोगलांच्या विजयामुळे मेवाडचा राज्य मोगलांच्या हाती गेलं.

युद्धामध्ये दोन्ही सैन्यांमध्ये बरंच नुकसान झालं. परंतु अकबर महाराणा प्रताप यांना पकडण्यात शेवटी अपयशी ठरला. या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांनी तीन हजार घोडदळ तर ४०० भिल्ल तिरंदाजी फौजेची तयारी ठेवली होती तर मोगलांकडून सुमारे दहा हजार जवान तयार होतं. ही लढाई जवळपास आठ तास चालू होती. या रक्तरंजित लढाईत महाराणा प्रताप जखमी झाले आणि मोगलांच्या हातून निसटले.

हळदीघाटी मध्ये मोगलांचा विजय झाला महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्यवटीतील पश्चिमेकडील प्रदेश परत ताब्यात घेतला. त्यानंतर १५८२ मध्ये महाराणा प्रताप यांनी मोगलांच्या देवर येथील चौकीवर हल्ला केला आणि ते आपल्या ताब्यात घेतल्या या गोष्टीमुळे मुगलांच्या ३६ चौक्या महाराणा प्रताप यांच्या ताब्यात आल्या याचा अर्थ मेवाड ची खरी लढाई महाराणा प्रताप यांनी जिंकली.

या लढाईनंतर अकबराने महाराणा प्रताप यांच्या वाटेला जायचं नाही असा निर्णय घेतला. याच गोष्टीचा फायदा घेत महाराणा प्रताप यांनी कुंभलगड, उदयपूर, गोंगुरा सह पश्चिमे वाढदेखील आपल्या ताब्यात मिळवून घेतलं इतकेच नव्हे तर आता आधुनिक डूंगरपुर जवळील चवंद हि राजधानी देखील महाराणा प्रताप यांनी बांधली आहे.

महाराणा प्रताप यांचा लाडका अश्व चेतक

महाराणा प्रताप युद्धात ज्या अश्वाचा वापर करायचे तो म्हणजे चेतक नावाचा घोडा. महाराणा प्रताप यांचा अत्यंत प्राणप्रिय सेवक होता. चेतक हा एक अतिशय मजबूत आणि निर्भिड घोडा होता प्रत्येक युद्धामध्ये त्याने महाराणा प्रताप यांना संकटातून वाचवलं. त्यांच्या प्रत्येक यशस्वी लढाईमध्ये चेतक याचा देखील तितकाच वाटा आहे.

इतकच नव्हे तर हळदी घाटी च्या लढाईमध्ये महाराणा प्रताप हे मुघलांच्या हाती न लागता तिथून यशस्वीरीत्या बाहेर पडण्यात सफल झाले. याचं कारण म्हणजे त्यांचा प्रिय घोडा चेतक हा हळदीघाटी च्या मार्गातील २६ फूट खोल इतका खड्डा पार करून महाराजांना सुरक्षित रित्या बाहेर काढलं.

महाराजांचा संरक्षण करता करता चेतकला या लढाईमध्ये वीरमरण आलं परंतु आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मालकाचा प्रामाणिकपणे रक्षण केलं.

इतिहासात आपल्या अलौकिक निर्माण करणाऱ्या साहसी व परम स्वाभिमानी वीर राजा महाराणा प्रताप यांचा मृत्यू राजस्थानातील चवण येथे जानेवारी १५९७ साली‌ झाला. महाराणा प्रताप हे इतिहासात एक शूर वीर राजे म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या लष्करी पराक्रमाची नोंद इतिहासाच्या सुवर्णपाना‌वर कोरून ठेवली आहे. महाराणा प्रताप यांच्या सारखा एक शूर योद्धा भारताला लाभला हे आपलं भाग्यच म्हणायला हवे.

आम्ही दिलेल्या maharana pratap information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महाराणा प्रताप यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maharana pratap mahiti in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about maharana pratap in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharana pratap singh information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!