महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना Mahatma Jyotiba Phule Yojana Information in Marathi

mahatma jyotiba phule yojana information in marathi महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती आज आपण या लेखामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना या विषयावर माहिती लिहिणार आहोत. महाराष्ट्र सरकारने लोकांच्या मदतीसाठी आणि कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या आणि त्यामधील हि एक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले योजना ज्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणून ओळखले जाते आणि या योजनेला पूर्वी राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ओळखले जाते. सध्या आपण जगामध्ये पहिले तर सगळीकडे रोगराई पसरत आहे आणि लोकांना अनेक प्रकारचे रोग होत आहेत.

तसेच आपल्या भारत देशामध्ये देखील रोगराई पसरत आहे आणि लोक रोगाने मरण पावत आहेत उदाहरणार्थ कोविड – १९ ह्या रोगामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जगामध्ये तसेच आपल्या भारत देशामध्ये देखील बिकट परिस्थिती आली होती. अश्याच काही रोगांच्यासाठी मदत आणि आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून पात्र व्यक्तीला महाराष्ट्र सरकार या योजनेमधून आर्थिक लाभ देते. महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत ९७० प्रकारच्या शस्त्रक्रिया, रोग आणि उपचारांच्यासाठी सरकारी पॅनेलमधील ४८० दवाखाने लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील लोकांच्यासाठी सुरु केली आहे आणि हि योजना राज्यामध्ये प्रथम २०१२ मध्ये ८ जिल्ह्यांच्यामध्ये सुरु केली होती मग त्यानंतर हि योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये हि योजना एकूण ३५ जिल्ह्यांच्यामध्ये सुरु करण्यात आली. या योजनेमार्फत पात्र कुटुंबाला वर्षाला दीड लाख रुपये दिले जातात आणि मूत्रपिंड प्रत्यारोपनासाठी २५०००० रुपये दिले जातात.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत ज्या लोकांनी विमा उतरला आहे अशा लोकांना कोविड – १९ च्या उपचारासाठी देखील कव्हर मिळाला होता. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने मार्फत सुमारे ११ लाख हून अधिक प्रक्रिया केल्या गेल्या आहेत आणि या प्रक्रीयांच्यासाठी सुमारे १८२७ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

 mahatma jyotiba phule yojana information in marathi
mahatma jyotiba phule yojana information in marathi

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना – Mahatma Jyotiba Phule Yojana Information in Marathi

योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / महात्मा ज्योतिबा फुले योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार
केंव्हा सुरु केली२०१२
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील लोक
लाभदर वर्षाला दीड लाख रुपये आणि मूत्रपिंड प्रत्यारोपनासाठी २५००००

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे ?

हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे आणि रोगांच्यासाठी मदत आणि आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून पात्र व्यक्तीला महाराष्ट्र सरकार या योजनेमधून आर्थिक लाभ देते. महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत ९७० प्रकारच्या शस्त्रक्रिया, रोग आणि उपचारांच्यासाठी सरकारी पॅनेलमधील ४८० दवाखाने लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना केंव्हा व कोणी सुरु केली आहे ?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्रातील लोकांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून महारष्ट्र सरकारने सुरु केली आहे आणि हि योजना २०१२ मध्ये सुरु करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी मिळणारे फायदे – benefits of MJPJAY 

सरकारने जनतेसाठी सुरु केलेल्या सर्व योजनेमध्ये जनतेचे हितच पहिले जाते आणि तसेच या योजनेचे देखील काही फायदे आहे ते आपण या लेखामध्ये पाहूयात.

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमुळे पात्र व्यक्तीला निदान, उपचार, औषधे आणि सल्लामसलत ह्या सर्व आरोग्य सेवा विनामूल्य मिळतात.
  • या योजनेमध्ये विम्याचा प्रीमियान आणि उपचार शुल्क हे राज्य सरकार उचलते.
  • शासकीय रुग्णालयांच्यामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांच्यामध्ये या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या किंवा या योजना विमा धारकांना मोफत प्रवेश दिला जातो.
  • या योजनेअंतर्गत रुग्ण खाजगी किंवा सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेवू शकतो.
  • या योजनेमार्फत पात्र कुटुंबाला वर्षाला दीड लाख रुपयापर्यंतची आरोग्य सेवा दिली जाते आणि मूत्रपिंड प्रत्यारोपनासाठी २५०००० रुपये दिले जातात.
  • या योजनेमुळे कोणत्याही व्यक्तीची आरोग्य सेवा तटत नाही किंवा एकाद्या व्यक्तीला उपचारांच्याशिवाय राहावे लागत नाही.
  • या योजनेच्या अंतर्गत ९७० प्रकारच्या शस्त्रक्रिया, रोग आणि उपचारांच्यासाठी सरकारी पॅनेलमधील ४८० दवाखाने लोकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देते.
  • आपल्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर १० दिवसांच्यानंतर लगेच खर्च कव्हर मिळतो.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी पात्रता निकष – eilgibility 

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी पात्र होण्यासाठी व्यक्ती भारताचा आणि भारतातील महाराष्ट्र राज्यातील नागरिक असला पाहिजे.
  • जर एखादा जिल्हा हा कृषी संकटामध्ये सापडला असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरतो.
  • ज्या व्यक्तीकडे पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, अन्नपूर्णा कार्ड, पांढरे कार्ड असणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
  • या योजनेसाठी वयाची अट नाही.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी कशी करावी

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी (MJPJAY) नोंदणी करणे खूप सोपे आहे आणि आपल्या कडे पांढरे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास आपण या योजनेसाठी नोंदणी सहजपणे करू शकतो. चला तर मग नोंदणी कशी करायची ते पाहूयात.

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी नोंदणी करताना प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखाण्यामध्ये जाऊन तेथील आरोग्य मित्राला भेटले पाहिजे.
  • तेथे गेल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला तेथे हेल्थ रेफरल कार्ड दिले जाईल हे अश्या दवाखान्यांना जोडलेले असेल ज्या दवाखान्यांच्या मध्ये या योजनेमार्फत वैद्यकीय सेवा दिल्या जातात.
  • मग त्या रेफरल कार्डसोबत त्या व्यक्तीला त्याचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जोडावे लागते आणि जर हि कार्ड नसल्या अन्न पूर्णा कार्ड जोडावे लागते.
  • पडताळणीनंतर दवाखाण्यामध्ये उपचार सुरु करण्यासाठी भरती करून घेतले जाईल.
  • विमा कंपनीकडून ई – ऑथरायझेशन विनंती पाठवली जाईल आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे मग त्याची पुन्हा पडताळणी केली पाहिजे.
  • विनंती मंजूर झाल्यानंतर उपचार सुरु होतील.
  • आता ह्या विम्याच्या कव्हर मिळण्यासाठी दवाखाना बिले, कागदपत्रे विमा कंपनीला पाठवला जातो आणि मग त्या विमा कंपनी कडून परत कागदपत्रांची तपासणी होते आणि मग मंजुरी देऊन दवाखान्याला पैसे देते.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – documents 

  • ओळख पत्र पुरावा ( मतदान कार्ड, आधार कार्ड ).
  • अर्जदाराच्या छायाचित्रावर तहसिलदाराचा शिक्का.
  • पत्याचा पुरावा. केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने जरी केलेले कोणताही फोटो आयडी पुरावा.
  • पासपोर्ट (असल्यास).

आम्ही दिलेल्या mahatma jyotiba phule yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mahatma jyotiba phule jan arogya yojana information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!