माझी मुंबई निबंध मराठी Majhi Mumbai Essay in Marathi

Majhi Mumbai Essay in Marathi – Essay On My City Mumbai in Marathi माझी मुंबई निबंध मराठी मुंबई एक अस शहर जे कधीच झोपत नाही. मुंबई हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाची जागा आहे. मुंबईने लाखो लोकांच्या डोक्यावर सुखाचे छप्पर दिलं. मुंबई एक असं शहर जिथे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, वेगळ्या समूहाचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात अशी ही आपल्या सर्वांची लाडकी मुंबई. मुंबई माझे शहर आहे आणि माझ्या अस्तित्वाचा पुरावा मुंबई ही माझी ओळख आहे. मुंबई हे माझे आवडते शहर आहे कारण या शहरा सोबत माझ्या अधिक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. शिवाय या शहरामध्येच माझं बालपण गेलं.

मुंबई शहराशी माझी वेगळीच नाळ जोडली गेली आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी तर महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे वेगवेगळ्या देशातून पर्यटक खास मुंबई फिरायला येतात. परंतु या मुंबई शहराची खरी सुरुवात झाली ते इसवी सन १९९५ पासून मुंबईला अधिकृत रीत्या मुंबई असं नाव देण्यात आलं.

त्या आधी आणि आत्ताही मुंबईला बॉम्बे, बंबई, मुंबापुरी अशी वेगवेगळी नावं मुंबईला पडली आहेत. मुंबईला कोणतीही जात किंवा धर्म नाही आहे. मुंबई ही सगळ्यांनाची आहे. परंतु मुंबई ही खरी कोळी बांधवांची. आणि त्याचे आराध्य दैवत माझे मुंबादेवी आणि याच कारणास्तव मुंबईला मुंबई असं नाव पडलं मुंबईला सागर किनारा लाभला आहे.

majhi mumbai essay in marathi
majhi mumbai essay in marathi

माझी मुंबई निबंध मराठी – Majhi Mumbai Essay in Marathi

आमची मुंबई – Essay On My City Mumbai in Marathi

Aamchi Mumbai Essay In Marathi जो पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतो. मुंबईला लाभलेला अथांग सागर या शहराचे खरे रहिवासी कोळी बांधव यांच जीवन आहे. समुद्र किनार यामुळेच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. धारावी, मांडवी, शिवडी, वेसावे, वडाळा, कुलाबा, माहीम, शिव, वरळी, खार, गोराई, चिंबई, मालाड अशी अनेक कोळीवाडे मुंबईमध्ये आहेत. मुंबई हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे शहर मानलं जातं. मुंबई हे सात बेटांचा समूह आहे म्हणून मुंबईची आयलंड सिटी अशी देखील ओळख आहे.

मुंबईची मुख्य भाषा म्हणजे मराठी परंतु मराठी सोबतच कोळी, कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. भारतामध्ये बघायला गेलं तर मुंबई शहराची लोकसंख्या सर्वात मोठी आहे. जवळपास मुंबई शहराची लोकसंख्या तीन कोटी २९ लाख इतकी आहे. संपूर्ण जगात उपनगरांसह मुंबई हे जगातील सर्वात विशाल शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर येतं.

इसवी सन १९९५ मध्ये मुंबईवर शिवसेना पक्षाची सत्ता होती. याच साली मुंबईला अधिकृत रीत्या मुंबई असं नाव देण्यात आलं. मुंबई हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे कारण आहे मुंबईमध्ये कामासाठी नोकरीसाठी बऱ्याच संधी उपलब्ध असतात. मुंबईमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. इसवी सन १९४२ साली महात्मा गांधीजींची चले जाव चळवळ मुंबईत सुरु झाली. मुं

बई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे म्हणूनच मुंबईमध्ये रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार अशा मुख्य शाखा आहेत. मुंबईचं जितक कौतुक करावं तितकं कमीच आहे. मुंबई हे करोडो लोकांचं आवडीच शहर आहे. मुंबईच मुख्य आकर्षण म्हणजे मुंबईला लाभलेला समुद्रकिनारा आणि वेगवेगळ्या ऐतिहासिक जागा बरेच पर्यटक दरवर्षी अतिशय उत्साहाने मुंबईचा इतिहास, मुंबईचा समुद्र किनारा, मुंबईची गुलाबी थंडी बघण्यासाठी विशेष मुंबईला भेट देतात.

मुंबईची जान म्हणजे मुंबईची लोकल जी लाखो चाकरमानी यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. दरवर्षी ग्रामीण भागातून बऱ्याच प्रमाणात लोक मुंबईमध्ये नोकरीसाठी स्थलांतर करतात. मुंबईची दुसरी ओळख म्हणजे सिनेसृष्टी मुंबई शहर जिते लाखो कलाकार घडले. बॉलीवुड हे सर्वत्र जग प्रसिद्ध आहे परंतु या बॉलीवूड ची सुरुवात जिथून झाली ते म्हणजे मुंबई.

मुंबई या शहरांमध्ये अनेक मोठमोठे स्टुडिओ आहेत. इथे अनेक वेगवेगळ्या चित्रपटांच, मालिकांचे चित्रीकरण केले जात. पर्यटकांना आकर्षित करणारी अजून एक चांगली जागा म्हणजे ही सिनेसृष्टी. मुंबईमध्ये बऱ्याच नामवंत कलावंतांचे घर आहे जे देखील प्रेक्षकांचं पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतं.‌ नाट्य सृष्टीसाठी देखील मुंबई प्रसिद्ध आहे.

मुंबईमध्ये वेगवेगळी मोठी मोठी नाटकं तयार होतात व त्या सोबतच सादर देखील केली जातात. मुंबई मध्ये फिरण्यासाठी सुद्धा ठिकाणं आहेत यामध्ये धार्मिक स्थळ, सागरकिनारा, ऐतिहासिक स्थळ यांचा समावेश होतो. मुंबईमध्ये मुंबई दर्शन ही बस संपूर्ण मुंबई दाखवते. मुंबईतील समुद्र किनारा जो मुंबईला अधिक खास आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवतो व वायू मार्गाने येणारे युरोप, अमेरिका, आफ्रिका अशा देशातले नागरिक आधी मुंबईमध्ये उतरतात त्यामुळे मुंबईला भारताचे प्रवेशद्वार देखील संबोधले जाते.

मुंबईचा सागर किणारा मुंबईतील एक महत्त्वाचा भाग आहे. बांद्रा सी लिंक हा मुंबईतील महत्त्वाचा रस्ता मानला जातो. हा रस्ता संपूर्ण समुद्रावरती बांधला गेला आहे. हा रस्ता बांधण्यासाठी जवळपास दहा वर्षाचा कालावधी लागला. मुंबईला लाभलेल्या या सागरी बंदरातून जवळपास भारतातून ५०% मालवाहतूक होते. मुंबई हे एक सुरक्षित शहर आहे म्हणूनच अगदी रात्री दोन वाजता देखील मुंबईमध्ये मनोसक्त फिरता येत.

मुंबई एक असे शहर आहे जिथे आपण कुठल्याही माध्यमातून वाहतूक करू शकतो. मुंबईतील प्रत्येक रस्ता प्रत्येक शहराला जोडला गेला आहे त्यामुळे मुंबईतून प्रवास करणे अतिशय सोपं ठरतं. मुंबईमध्ये अतिशय उत्साहाने व आनंदाने  सर्व धर्मांचे सण साजरे केले जातात मुंबई एक असे शहर आहे जिथे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात आणि ते अतिशय उत्साहात सण साजरे करतात. अगदी  ईद पासून ते गणेश चतुर्थी, ख्रिसमस पर्यंतचे असे सगळेच सण थाटामाटात साजरे केले जातात.

मुंबईमध्ये विशेषतः गणेश चतुर्थी, होळी, दहीहंडी हे सण खूपच उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात दरवर्षी गणपतीत बघायला मिळणार्या गणपती बाप्पाच्या मोठ्या मोठ्या अगदी गगनाला भिडणाऱ्या मूर्तींचे दर्शन होतं. तर होळीला, रंगपंचमीला संपूर्ण मुंबई वेगवेगळ्या रंगांनी भरून जाते आणि दहीहंडीला हंडी फोडण्यासाठी मोठमोठे थर थर लागतात हे सर्व अतिशय आकर्षक आहे या सणांना मुंबईत फार गर्दी असते.

मुंबईत अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत ज्यामध्ये मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला होता. दरवर्षी मुंबई मध्ये दोन हजार मि.मी इतका पाऊस पडतो परंतु २६ जुलै २००५ रोजी एकाच दिवशी ९४४ मि.मी पाऊस नोंदवण्यात आलायं. या दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती. सर्वत्र पाणी साचलं होतं. नदी-नाले तुडुंब भरले होते.

बऱ्याच लोकांच्या घरात पाणी साचलं होतं. वाहतूक कोंडी झाली होती बऱ्याच जणांना आपला जीवही गमवावा लागला. गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच, हाजीअली, मरीन ड्राईव्ह, एलिफंट केव्हस्, पवई तलाव, हँगिंग गार्डन, एस्सेल्वर्ल्ड, संजय गांधी नॅशनल पार्क, सिद्धिविनायक मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय, माउंट मेरी चर्च, हॉटेल ताज, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, हुतात्मा चौक, आझाद मैदान, शिवाजी पार्क, मुंबादेवी मंदिर, वाळकेश्वर मंदिर, अशी अनेक मुंबई मध्ये फिरण्यासाठी ठिकाणे आहेत.

मुंबई ची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी वेगळी आहे कोणासाठी मुंबई स्वप्ननगरी आहे तर, कोणासाठी मुंबई हक्काचं घर, कोणासाठी मुंबई म्हणजे समुद्रकिनारा तर काहींसाठी मुंबई म्हणजे चित्रनगरी. मुंबई या शहरांमध्ये वेगवेगळी अद्भुत मंदिर रहस्यमय ठिकाण वेगवेगळे बाजार पायाला मिळतात.

पायाला हळूच स्पर्श करणारा सागर किनारा मुंबईचं हे दृश्य जगभरातील पर्यटकांना मुंबई कडे आकर्षित करत. मुंबईत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्या दरम्यान हिवाळा असतो. मुंबईतील हिवाळा म्हणजे सर्वांच्या आवडीचा रुतु आहे मुंबईतील हिवाळ्यातील तापमान जवळपास दहा अंश सेल्सिअस इतकं असतं. मार्च ते मे दरम्यान मुंबईमध्ये कडाक्याचा उन्हाळा पडतो. मुंबईतील उन्हाळ्याचा तापमान ४० अंश सेल्सिअस इतकं असतं.

जून ते ऑक्टोबर मध्ये मुंबईतील वातावरण अतिशय मनमोहक बनत. या महिन्यात मध्ये मुंबईत पावसाळा सुरू होतो. मुंबईमध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळतात परंतु मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध खाद्य पदार्थ म्हणजे वडापाव. मुंबई आता एक आंतरराष्ट्रीय शहर देखील बनल आहे. मुंबईतील प्रसिद्ध खेळ म्हणजे क्रिकेट मुंबईतील प्रत्येक गल्ली मध्ये क्रिकेट खेळला जातो मुंबईत क्रिकेटचे अनेक चाहते आहेत.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा जन्म देखील मुंबईतलाच आहे. रोहित शर्मा, अजिंक्य राहणे, रवी शास्त्री, अजित वाडेकर, विनोद कांबळे, सुनील गावस्कर, हे नामवंत खेळाडू मुंबईतले आहेत. क्रिकेट नंतर मुंबईमध्ये सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. दररोज आपल्याला मुंबई मध्ये बदल पाहायला मिळतात. मुं

बईमध्ये वाढती लोकसंख्या आता सध्या चिंतेची बाब बनत चालली आहे. मुंबईमध्ये अनेक कारखाने असल्यामुळे आता प्रदूषणामध्ये देखील वाढ होत चालली आहे मुंबईतील वातावरण प्रदूषित होत चालले आहे. मुंबई आपल्या सर्वांच्या आवडीचे शहर आहे आणि आपल्या मुंबईची काळजी घेण आपल्या हातात आहे.

आम्ही दिलेल्या majhi mumbai essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझी मुंबई निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my city mumbai in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay of mumbai in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये majhi mumbai essay in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!