माझी शाळा निबंध मराठी Majhi Shala Nibandh In Marathi

majhi shala nibandh in marathi माझ्या शाळेचे नाव ”श्री रामलिंग हायस्कूल तुडिये” आहे. माझी शाळा एक छोट्याश्या गावामध्ये आहे. आमच्या तालुक्यातील खूप सुंदर आणि आदर्श अशी ही माझी शाळा my school essay in marathi आहे. शाळेची इमारत दोन मजली आहे. येथे पहिली ते दहावी पर्यंत वर्ग भरवले जातात . प्रत्येक वर्गात 2 तुकड्या असतात. जवळपास 10 ते 12 खोल्या आहेत . अकरावी आणि बारावीचे देखील वर्ग भरवले जातात. सगळे शिक्षक, शिक्षिका खूप चांगले आणि समजून घेणारे आहेत. सर्व वर्ग आणि ऑफिस सुसज्ज आहे.

majhi shala nibandh marathi त्याचबरोबर फर्निचर, पंखे इत्यादी अगदी सर्व सोयी आहेत. प्राचार्यांचे कक्ष एकदम नीट आणि स्वछ असते. तसेच स्टाफ रूम, हॉल, संगणक कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, वाचनालय क्रीडांगण इत्यादी सर्व प्रकारच्या चांगल्या प्रकारचे व्यवस्थेंने सुसज्ज आहेत. शाळेत पिण्याचे पाणी यांचे योग्य व्यवस्थापन आहे. आणि ते खूप स्वछ सुद्धा असते. माझ्या शाळेचा परिसर सदैव स्वच्छ असतो.

majhi-shala-information-in-marathi
majhi shala nibandh in marathi/my school essay in marathi

माझी शाळा निबंध मराठी majhi shala nibandh in marathi

माझी शाळा व शाळेभोवतालचा परिसर स्वछ व सुंदर आहे. माझ्या शाळेतील विद्यार्थी शाळा व शाळेसमोरील अंगण स्वछ व नीटनेटके ठेवतात. शाळेमध्ये मुलामुलींना खेळण्यासाठी क्रीडांगण आहे. या क्रीडांगणावर शिक्षक मुलामुलींचे नवनवीन खेळ घेतात.यामुळेच खेळाबरोबरच खेळ खेळण्याचे कौशल्य आत्मसात करता येते. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे खेळातील गुण आणि प्राविण्य ओळखता येते.    खेळातील गुणवंत विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय या स्तरावर खेळण्यासाठी त्यांना शाळेमार्फत आर्थिक साहाय्य केले जाते .

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याचे ध्वजारोहण करून सकाळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली जाते. आणि त्यादिवशी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. निबंध स्पर्धा, हस्ताक्षर लेखन, कथाकथन इत्यादीचे आयोजन केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळतो. माझ्या शाळेतील शिक्षक, शिक्षिका खूप छान पद्धतीने शिकवण्याचे काम करतात. यामुळे माझ्या शाळेतील विध्यार्थ्यांना अभ्यासाची भीती वाटत नाही . सर्व विध्यार्थी नियमित शाळेत येतात व नियमित अभ्यास करतात. एखाद्या विद्यार्थ्यांची चूक झाली तर त्याला शिक्षा न करता तीच चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला सांगतात .

एखाद्या विद्यार्थ्याला न समजलेला प्रश्न परत समजून संगण्याचे काम शिक्षक करतात. माझ्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे बौद्धिक (बुद्धिमत्ता) क्षमता वाढावी, विध्यार्थी अप्रगत राहू नयेत यासाठी शिक्षक सुलभ पध्दतीने शिकवायचा प्रयत्न करतात. उजळणी, पाढे , पाठांतर, इंग्रजी वाचन, निबंध लेखन इत्यादि उपक्रम नेहमी राबविले जातात. माझ्या शाळेमध्ये आम्हा सर्व विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय आहे. मुलामुलींना वेगवेगळे स्वच्छता गृह आहेत. तसेच शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत दिला जातो. त्यामुळे माझ्या गावातील एकही मुलंमुली शाळेपासून वंचित नाही.

माझी शाळा ज्ञानाचे मंदिर आहे. आपल्याला घडवण्यात शाळेचा खूप मोठा वाटा असतो. शाळेतील शिक्षक आपल्याला शिक्षण तर देतातच सोबत आपल्याला शिस्त पण लावतात. आपल्या बालमनावर चांगले संस्कार घडवत असतात. आपल्या शाळेवर आपली खूप मोठी जबाबदारी असते . शाळा देशासाठी चांगले नागरिक घडवण्याचे महत्वाचे कार्य करत असते .

ऑनलाईन शाळा online my school essay in marathi

कधी कधी जीवनामध्ये काही गोष्टी या फक्त काळाची अपरिहार्यता म्हणून स्वीकाराव्या लागतात. एखाद्या गोष्टीचा संबंध हा थेट आपल्या जगण्याशी म्हणजेच जीवन मृत्यूशी येतो, तेव्हा तर आपण काहीही करायला तयार होतो. आज covid-19 च्या संसर्गाच्या भेटीमुळे 1 वर्ष पेक्षा जास्त काळपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद ठेवणे हेच मुलांच्या सुरक्षितितेच्या दृष्टीने पालक, शिक्षक, शाळा व शासनाला योग्य वाटत आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षण व जीवनक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे. म्हणून आम्हा मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणे क्रमप्राप्त ठरलेले आहे. 

कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतातच , तसेच ऑनलाईन शिक्षणाला  देखील दोन बाजू आहेत. वर्गाच्या चार भिंतीत मित्र-मैत्रिणीसोबत शिकणे , प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव घेणे सर्वानाच आवडते पण आजच्या या कठीण काळात ऑनलाईन शिक्षण घेणे सुद्धा आपल्याला आनंदाने स्वीकारावेच लागेल. ऑनलाईन शिक्षण देखील दर्जेदार शिक्षणाची पद्धत होऊ शकते.आज माझ्या शाळेतील शिक्षक गूगल मीट वरून मिटिंग तसेच टारगेट पीक सारखे अप्रतिम अँप वापरून आम्हाला शिक्षणाचा अनुभव देत आहेत. इंटरनेटच्या  जगात शिक्षणाच्या सर्वच घटकांचे अत्यंत दर्जेदार विडिओ उपलब्ध आहेत. अनेक नामवंत शिक्षकांनी दर्जेदार स्वयंअध्यायन मालिका, स्वाध्याय पुस्तिका तयार करून ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीवली आहे.

रोज दहा दहा किलोमीटर प्रवास करून जावा लागतो. यात बराचसा वेळ शाळेत जाण्यायेण्यात खर्च होत असल्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर खूप थकल्यासारखे होते . अश्यावेळी हा ऑनलाईन शिक्षणात विनाकारण वाया जाणारा हा वेळ  सत्कारणी लावता येत असल्याने, ऑनलाईन शिक्षण आवडते. शाळेतील मौज्ज ऑनलाईन शिक्षणात येत नसली तरी ऑनलाईन शिक्षणात अनेक दर्जेदार ई लर्निंग साहित्य उपलब्ध झाले आहे फक्त शिकणार्याने यात जाणीवपूर्वकपणे आणि संजपूर्वकपणे सहभागी व्हायला हवे . शाळेतील मौज, मैदानावरचे खेळ, मित्रांशी दंगा मस्ती करता येत नसल्याने शिक्षण कंटाळवाणे वाटते.

पण आजच्या या covid 19  च्या परिस्तिथी मध्ये शिक्षण बंद न ठेवता ते जाणीवपूर्वक पणे चालू ठेवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धत योग्य आहे. ऑनलाईन शिक्षणात देखील प्रत्यभरण, स्वाध्याय,  स्वयंध्ययन यांच्या माध्यमातून एखाद्या घटकांचे दृढीकरण करण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. आमच्या शाळेने असा प्रयत्न यशस्वी करून दाखवला आहे. या कोविड-19 च्या काळात ऑनलाईन शाळेची खूप मदत होत आहे. परंतु नियमित शाळेत जाणे हे जास्त आवडत. नियमित शाळेत गेल्यावर मित्र-मैत्रिणी ना भेटू शकतोय, मज्जा, खेळ खेळू शकतोय, शिक्षकांना भेटू अभ्यासातील प्रश्न विचारून अभ्यास होऊ शकतो.

नियमित शाळेत शिक्षकांनी शिकवलेले जास्त समजते आणि अभ्यास ही नियमित होतो. तसेच ऑनलाईन वर्ग सुरू असतात आणि समस्या जाणवतात पण नियमित शाळेत गेल्यावर या समस्या जाणवत नाहीत.  असे असले तरी आपल्या आरोग्याच्या सोईसाठी ऑनलाईन वर्ग केले पाहिजेत. ऑनलाईन शिक्षणाचे काही फायदेही आहेत, जसे कमी खर्चात शिक्षण ही होते व नियमित शाळेत जाण्याची प्रवासात लागणाऱ्या वेळेची बचत ही होते. ऑनलाईन शिक्षणामुळे शारीरिक हालचाल कमी होत जाते, तसेच सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. दोन्ही ऑनलाईन आणि नियमित शाळेत जाऊन शिक्षणाचे स्वतःचे असे फायदे व तोटे आहेत, म्हणूनच आपण दोन्ही प्रणालीचा लाभ घेतला पाहिजे. आणि त्यादरम्यान आपण संतुलन राखून कार्य केले पाहिजे .

ही आवडते मज मानापासुनी शाळा

लावते लळा जशी माऊली बाळा”

कधी नसावी सुट्टी मजला, न यावा कधी उन्हाळा.

अशी असावी माझी शाळा , कधी न यावा कंटाळा.”

वरील उक्तीप्रमाणे माझी शाळा मला खूप खूप आवडते.

आम्ही दिलेल्या majhi shala nibandh in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझी शाळा” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या majhi shala nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhi shala nibandh marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण majhi shala essay in marathi या लेखाचा वापर marathi nibandh majhi shala असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “माझी शाळा निबंध मराठी Majhi Shala Nibandh In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!