मकर संक्रांति निबंध मराठी Makar Sankranti Essay in Marathi

Makar Sankranti Essay in Marathi – Makar Sankranti Nibandh in Marathi मकर संक्रांति निबंध मराठी मकर संक्रांतीचे महत्त्व “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला!” असे उदगार तोंडातून निघाले की आपल्या लक्षात येत की आज मकर संक्रांती आहे. असा हा सर्व नात्यांमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये आणि परिवारामध्ये गोडवा आणणारा गोड सण! मित्रहो, आपल्या देशामध्ये मकर संक्रांतीला जरी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी या सणाची एक प्रथा अशी आहे जी सर्व प्रदेशांमध्ये समान आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही समान प्रथा कोणती? तर मित्रांनो, ही समान प्रथा म्हणजे आपल्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी एकमेकांना तिळगुळ वाटण्याची प्रथा होय.

भारतातील प्रत्येक प्रदेशात यादिवशी तीळ आणि गूळ या दोहोंपासून प्रसाद बनवला जातो आणि हा गोड प्रसाद कुटूंबातील सदस्यांना, शेजाऱ्यांना, आप्तेष्ठ मंडळींना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना वाटला जातो. खरंतर, तिळगुळ हे विविध आकाराचे तसेच, वेगवेगळ्या रंगांचे असतात, तरीदेखील तिळगुळाला  शांततेमध्ये आणि आनंदामध्ये एकत्रितपणे राहण्याचे प्रतिक मानले जाते.

makar sankranti essay in marathi
makar sankranti essay in marathi

मकर संक्रांति निबंध मराठी – Makar Sankranti Essay in Marathi

Makar Sankranti Nibandh Marathi

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेकांना तिळगुळ वाटताना ”तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असे बोलण्याची एक प्रथा आहे. खरंतर, मकर संक्रांती हा सण सूर्य देवतेला समर्पित केला जातो. शिवाय, हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाचे बहुमोल असे महत्त्व आहे आणि याचे वर्णन आपल्याला गायत्री मंत्राच्या स्वरूपात वेदांमध्ये देखील असल्याचे दिसून येते.

याखेरीज, मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण चालू होते आणि हा उत्तरायणचा सहा महिन्याचा काळ हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो. त्याचबरोबर, मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्व देखील भरपूर आहे. त्यामुळे, सगळे लोक यादिवशी पवित्र नद्या असलेल्या ठिकाणी उदाहरणार्थ; गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांमध्ये पवित्र अंघोळ करतात.

कारण, या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्या पापांचा सर्वनाश होतो; असे मानले जाते. भारतातील अनेक प्रदेशांमध्ये स्त्रिया संक्रांतीच्या पवित्र दिवशी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवतात.

खरंतर, ही प्रथा विशेष करून महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. हळदीकुंकू समारंभात गावातील सर्व स्त्रिया एका ठिकाणी जमा होतात आणि या कार्यक्रमासाठी त्या महाराष्ट्रीयन पेहरावात अगदी नटून-थटून सहभागी होतात. शिवाय, त्या एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि प्रत्येकीला एखादं फळ किंवा वस्तू भेट म्हणून देतात.

अशा पद्धतीने, हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या देशाच्या खूप साऱ्या प्रांतांमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी रब्बी पिकाची सुरुवात केली जाते. खासकरून या कालावधीमध्ये शेतातील पेरणी झालेली असते आणि सर्व अवघड कामे संपलेली असतात.  त्यामुळे, जास्तीत जास्त लोक यादिवशी एकत्र येतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, गाईगुरांची काळजी घेतात. शिवाय, एकत्र येऊन पतंग उडवणे असे विविध प्रकारचे सामूहिक कार्यक्रम देखील साजरे करतात.

मित्रांनो, मकर संक्रांत हा पौष महिन्यामध्ये येणारा खूप महत्वाचा सण आहे. तसेच, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी यादिवशी संक्रांत येते. मकर संक्रांत या सणाबद्दल एक आख्यायिका प्रचलित आहे. या आख्यायिकेनुसार, “फार पूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता. हा राक्षस लोकांना खूप त्रास देत होता आणि त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करत होता.

त्यामुळे, या अमानुष राक्षसाला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि संक्रांतीदेवीने संकारसुराचा वध केला. अशा प्रकारे, संकारसुर राक्षसाचा वध झाल्याने लोक सुखाने आपला संसार करू लागली.” मित्रहो, यादिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये  प्रवेश करतो आणि त्याचदिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.

आपल्याला माहीत आहे की, मकर संक्रांती हा भारतातील पौष महिन्यात येणारा शेतीशी संबंधित असा सण आहे. शिवाय, आपली भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे, ग्रामीण भागांतील शेतकरी बांधवांमध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये शेतामध्ये आणि मळ्यांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांच्या घरी वाटतात आणि हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी व तीळ अशा अनेक गोष्टी बोळक्यात भरून मनोभावे देवाला अर्पण करतात.

मकर संक्रांत साजरी करण्याची पद्धत

आपल्याला माहीत आहे की, भारतामध्ये विविध प्रकारचे सण अतिशय आनंदाने, मनापासून आणि उत्साहाने साजरे केले जातात. अशाच एका सणांपैकी पवित्र सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण होय. एकंदरीत मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मित्रहो, मकर संक्रात हा एक सामुदायिक सण आहे. यादिवशी बहुसंख्य लोक रंगीबेरंगी कपडे घालतात आणि घराची सजावट देखील करतात.

पूर्वीच्या काळामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रामीण भागांत लहान मुले-मुली गाणी गात, एकमेकांच्या घरोघरी जात असत आणि घरोघरी जाऊन मिठाई मागत असत. याखेरीज, संक्रांतीच्या दिवशी गावांकडील भागांमध्ये जत्रा भरत असत. तसेच, यादिवशी घरोघरी मेजवानी असायची आणि सार्वत्रिक ठिकाणी लोक एकत्र जमून पतंग उडवत असत.

परंतू, काळातील परिवर्तनानुसार आजकाल या सणाचे रूप बदलत चालले आहे. त्यामुळे, मकर संक्रांती हा सण केवळ स्त्रियांचा सण बनून राहिला आहे. मित्रहो, याखेरीज प्रत्येकी बारा वर्षांनी मकर संक्रांतीच्या दिवशी कुंभमेळा भरला जातो. या कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक पवित्र नदीमध्ये स्नान करून, सूर्याला नमन करून, आपले पाप पाण्यासोबत धुवून टाकतात.

खरंतर, कुंभमेळ्याची प्रथा सर्वप्रथम शंकराचार्य यांनी सुरू केली होती. मकर संक्रांतीच्या  आदल्या दिवशी महाराष्ट्र राज्यात तसेच, इतर काही राज्यांमध्ये भोगी हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो.

तिळगुळाचे महत्त्व

मित्रहो, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे फार महत्व असते. कारण, हा काळ खूप थंडीचा असतो. त्यामुळे, आपल्या शरीरात उब अथवा उष्णता निर्माण करण्यासाठी तीळापासून बनवलेले पदार्थ  तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटा, गाजर अशा इतर विविध शक्तिवर्धक पदार्थांचा समावेश जेवणामध्ये केला जातो.

त्याचबरोबर, तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ म्हणजे त्यामधील स्निग्धता होय. कारण, स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री आणि या स्नेहाचे गुळासोबत मिश्रण झाले की नात्यांमधील गोडवा देखील आपोआप वाढतो. त्यामुळे, स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातील मुख्य हेतू असतो. म्हणूनच मित्रहो, मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी एकमेकांना तीळगूळ देऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि तिळगुळ एकमेकांना देताना “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असे म्हटले जाते.

या सणाच्या निमित्ताने आपापसांतील स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे असे अनेक उद्देश जपले जातात. शिवाय, संक्रांतीच्या दिवशी तिळाची वडी किंवा लाडू यांसारखे पदार्थ केले जातात आणि ते एकमेकांना वाटून यांचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. त्याचबरोबर, तीळगुळाची पोळी मकर संक्रांतीला आवर्जून केली जाते.

अनेक भागांमध्ये आध्यात्मिकरित्या संक्रांतीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या मंदिरामध्ये अगदी सकाळपासूनच विशेष करून महिला भाविकांची गर्दीच गर्दी असलेली आपल्याला दिसून येते. रुक्मिणी मातेच्या मंदिरात अनेक महिला एकमेकींना वाण वसा मोठ्या मनाने आणि श्रद्धेने देतात. अशाप्रकारे, मकर संक्रांतीचा हा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण भारतात साजरा होतो.

मित्रांनो, मकर संक्रांती हा सण आपल्या भारतीय उपखंडातील बर्‍याच भागांमध्ये विविध प्रकारच्या प्रादेशिक भिन्नतेने साजरा केला जातो. शिवाय, हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. 

महाराष्ट्रीयन मकर संक्रांती

अनेक परंपरांनी, प्रथांनी आणि समृद्धीने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या दिवशी हलवा आणि पुरण पोळी हा रुचकर पदार्थ बनवला जातो. त्याचबरोबर, या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर एकमेकांना तीळगूळ देऊन “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हटले जाते. मित्रहो, याठिकाणी एकमेकांना तिळगूळ देण्याचा मूळ विचार असा आहे, कि भूतकाळातील आपापसांतील वाईट भावना किंवा शत्रुत्व विसरून गोड बोलण्याचा आणि मित्रत्व तयार करण्याचा संकल्प करणे.

याखेरीज, विवाहित महिला, मुली, मैत्रिणी अथवा कुटुंबातील स्त्रिया एकमेकींना आपापल्या घरी आमंत्रित करतात आणि हळदी-कुंकूचा पवित्र कार्यक्रम उत्साहाने साजरा करतात. शिवाय, विधीचा भाग म्हणून अतिथींना तिळगुळ आणि आठवण म्हणून एखादी भेटवस्तू दिली जाते. मकर संक्रांतीच्या यादिवशी स्त्रिया विशेष करून काळ्या रंगाच्या साड्या नेसतात.

आपल्याला माहीत आहे की मकर संक्रांत हिवाळ्यात असते आणि काळ्या रंगाचा पोशाख परिधान केल्याने आपल्या शरीरातील उब वाढते. त्यामुळे, काळा रंग परिधान करण्यामागील हे मूळ कारण आहे. तसं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, बाकी कुठल्याही अन्य सणांमध्ये काळया रंगाचे कपडे परिधान केले जात नाहीत.

                     तेजल तानाजी पाटील

                        बागिलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या makar sankranti essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मकर संक्रांति निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay On Makar Sankranti In Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि makar sankranti festival essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये short essay on makar sankranti in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!