Malpua Recipe in Marathi मालपुवा रेसिपी मराठी मालपुवा हा एक उत्तर भारतीय गोड पदार्थ जरी असला तरी हा पदार्थ भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बनवला जातो आणि काही लोक तर या पदार्थाचे वेडे असतात. जसे वेगवेगळ्या सणांना महाराष्ट्रामध्ये पुरण पोळी, गणपतीच्या सणाला मोदक आणि खीर, गुढीपाडव्याला श्रीखंड असे पदार्थ बनवले जातात तसेच उत्तर भारतामध्ये मालपुवा हा पदार्थ विशेष सणासाठी किंवा समारभांसाठी बनवला जातो. हा पदार्थ मैदा, रवा आणि खवा वापरून बॅटर बनवले जाते आणि ते तुपामध्ये तळून ते पाकमधून बुडवून काढले जाते.
मालपुवा हा पदार्थ पॅन केक सारखा दिसतो आणि हा पदार्थ आपण जेवणामधील एक गोड पदार्थ किंवा रात्री जेवणानंतर डेझर्ट म्हणून खातो. मालपुवा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी मोजक्या साहित्यामध्ये ३५ ते ४० मिनिटामध्ये बनणारी एक गोड आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. चला तर आता आपण मालपुवा कसा बनवायचा ते पाहूयात.
मालपुवा रेसिपी मराठी – Malpua Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ ते ४५ मिनिटे |
पाककला | उत्तर भारतीय |
मालपुवा म्हणजे काय ?
मालपुवा म्हणजे हा पदार्थ मैदा, रवा आणि खवा वापरून बॅटर बनवले जाते आणि ते तुपामध्ये तळून ते पाकमधून बुडवून काढले जाते.
- नक्की वाचा: बालुशाही रेसिपी मराठी
- रवा, मैदा आणि खवा : रवा, मैदा आणि खवा हे तीन घटक मालपुवा बनवण्यासाठी लागणाऱ्या मुक्या साहित्यापैकी एक आहेत. रवा, मैदा आणि खवा यांचे बॅटर बनवून ते तुपामध्ये सोडून तळून ते पाकामधून बुडवून काढले जाते.
- तूप : तूप देखील मालपुवा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे कारण मालपुवा तुपामध्ये तळला जातो.
- साखर : मालपुवा बनवताना साखरेचा पाक बनवला जातो आणि मग त्यामध्ये तळलेले मालपुवा त्यामध्ये घालून ते २ मिनिटांनी बाहेर काढले जातात. मालपुवा पाकामध्ये बुडवल्या मुळे ते गोड बनतात.
मालपुवा रेसिपी – malpua in marathi
मालपुवा हा एक गोड पदार्थ आहे जो उत्तर भारतामध्ये खास सणांच्यासाठी किंवा खास कार्यक्रमांच्यासाठी बनवला जाणारा पदार्थ आहे. मालपुवा हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि रेसिपी मोजक्या साहित्यामध्ये ३५ ते ४० मिनिटामध्ये बनणारी एक गोड आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. चला तर आता आपण मालपुवा रेसिपी घरी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ ते ४५ मिनिटे |
पाककला | उत्तर भारतीय |
मालपुवा रेसिपी बनवण्यासाठी रवा, मैदा, खवा, तूप आणि साखर हे मुख्य साहित्य आहे. रवा, तूप आणि साखर घरामध्ये आधीपासून उपलब्ध जरी असले तरी खवा आणि मैदा घरामध्ये उपलब्ध असू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही मालपुवा घरी बनवणार असाल तर तुम्हाला खवा, मैदा तसेच काही इतर साहित्य देखील बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण मालपुवा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी मैदा.
- ४ तव ५ चमचे खवा.
- २ ते ३ चमचे रवा.
- २ चमचे बडीशेप.
- १ चमचा वेलची पावडर ( बॅटर मध्ये वापरण्यासाठी ).
- १ ते दीड वाटी दुध.
- दीड वाटी साखर ( पाकासाठी ).
- १ वाटी पाणी ( पाकासाठी ).
- १/२ वेलची पावडर ( पाकसाठी ).
- २ ते ३ धागे केसर.
- नक्की वाचा: रसमलाई रेसिपी मराठी
- आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मालपुवा कसा बनवायचा ते पाहूयात.
- मालपुवा बनवताना सर्वप्रथम एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये मैदा आणि रवा मिक्स करा आणि मग त्यामध्ये खवा कुसकरून किंवा किसून टाका तसेच त्यामध्ये थोडेसे चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करा.
- आता ह्या मिश्रणामध्ये लागेल तसे दुध घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या. या मिश्रणामध्ये गुठळ्या होणारा नाहीत याची काळजी घ्या आणि हे मिश्रण जास्त घट्ट पण बनवू नका आणि जास्त पातळ देखील बनवू नका. जसे आपण केकचे बॅटर बनवतो तसेच बनवा.
- आणि याला झाकण लावून ते १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.
- या वेळेमध्ये एका भांड्यामध्ये १ वाटी पाणी आणि दीड वाटी साखर घाला आणि ते मध्यम आचेवर सतत हलवत राहून वितळवून घ्या आणि ते मिश्रण उकळू द्या. उकळ्यानंतर लगेच त्यामध्ये वेलची पावडर आणि केसर घाला आणि ते २ मिनिटे हलवत राहून शिजवून घ्या त्यामुळे केसरचा रंग पाकामध्ये उतरेल. ( टीप : पाक थोडा चिकट झाला कि लगेच गॅसवरून काढा कारण आपल्याला एक तारी पाक होऊ द्यायचा नाही आहे ).
- आता आपण बनवून ठेवलेल्या बॅटरमध्ये बडीशेप आणि वेलची पावडर घाला आणि मिक्स करा.
- मग गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये एक खोलगट पळीच्या सहाय्याने बॅटर चांगले मिक्स करून हळुवार हाताने थोडे थोडे तुपामध्ये सोडा.
- हे बॅटर तुपामध्ये सोडल्यानंतर ते तळाशी जावून ते पसरून त्याचे गोल बनतील. असे २ ते ३ गोल तुपामध्ये एकावेळी तळून घ्या. आणि हे लालसर रंगावर तळून घ्या.
- आता पाक थोडा गरम करून घ्या आणि तुपामध्ये तळलेले मालपुवे २ मिनिटे पाकामध्ये टाकून बाहेर काढा ( टीप : जर तुम्ही तळलेले मालपुवे गार पाकामध्ये टाकले तर ते पाक शोषून घेत नाहीत ).
- तुमचे मालपूवे सर्व करण्यासाठी तयार झाले.
मालपुवा कश्यासोबत सर्व्ह केले जातात – serving suggestion
- मालपुवा आपण तसाच त्यावर बदाम आणि पिस्ता तुकडे टाकून सर्व्ह करू शकतो किंवा त्यावर रबडी घालून मालपुव्याचा आनंद घेवू शकतो.
आम्ही दिलेल्या malpua recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर मालपुवा रेसिपी मराठी माहिती atta malpua recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या wheat flour malpua recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि easy malpua recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये malpua recipe by madhura in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट