मालविका बनसोड माहिती मराठी Malvika Bansod Information in Marathi

Malvika Bansod Information in Marathi मालविका बनसोड मराठी माहिती मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की अवघ्या वीस वर्षाच्या मुलीने सायना नेहवालला बॅडमिंटनच्या सामन्यांमध्ये पराभूत केलं जिने गेले एक दशक भारताच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं. तर तुम्हाला विश्वास नाही बसणार ना? होय नागपूरच्या मालविका बनसोड हिने ओपन इंडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सायना नेहवालचा पराभव केला. सायना नेहवालचा पराभव करणारी ही मालविका बनसोड आहे तरी कोण? मालविका बनसोड हिची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Malvika Bansod Information in Marathi
Malvika Bansod Information in Marathi

मालविका बनसोड मराठी माहिती – Malvika Bansod Information in Marathi

पूर्ण नाव (Name)मालविका बनसोड
जन्म (Birthday)१२ सप्टेंबर २००१
जन्म गाव (Birth Place)नागपूर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)बॅडमिंटनपटू

जन्म

१२ सप्टेंबर २००१ रोजी मालविका बनसोडे यांचा जन्म झाला. मालविका बनसोडे ही आपल्या महाराष्ट्राच्या माती मध्ये जन्माला आलेली नागपूरची मराठमोळी मुलगी आहे. मालविका एक अत्यंत हुशार, प्रामाणिक व खेळाची बरीच आवड असणारी मुलगी आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये मालविकाला ९५ टक्के गुण मिळाले होते. मालविकाचे वडील प्रबोधन बनसोड आणि आई तृप्ती बनसोड हे दोघेही डेंटिस्ट आहेत. घरामध्ये नेहमी शांती, शिस्तीचे वातावरण असतं.

मालविकाला वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळाची आवड निर्माण झाली. तिने लहानपणापासून सायना नेहवाल यांचा खेळ बघितला आहे आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मालविका ने बॅडमिंटन खेळामध्ये करियर बनवण्याचा निर्णय घेतला. सायना नेहवाल ही मालविकाची आदर्श आहे. मालविका सायना नेहवाल यांना गुरुस्थानी मानते.

क्रीडा करियर

नागपूरची मूळची रहिवासी असलेली मालविका बनसोड आज सर्वत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. त्याचं कारण म्हणजे तिने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया नेहवाल यांचा पराभव केला आहे. मालविका बनसोडे ही वीस वर्षांची आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून मालविकाला बॅडमिंटन खेळाची आवड लागली आणि तेही सायना नेहवाल यांच्यामुळेच.

सायना नेहवाल हे मालविका च प्रेरणास्थान आहे. मालविका रायपूर मध्ये संजय मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली बॅडमिंटनचा सराव करते. मालविका ने वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली आणि तिच्या मध्ये असणार गुण व कौशल्य तिचे कोच संजय मिश्रा यांनी जाणले आणि तिला अधिक सराव करण्यास परिश्रम करण्यास सांगितले.

पुढे मालविका तेरा व १७ वयोगटातील राज्य विजेती ठरली. मालविका बनसोड हिच्या मध्ये असणारी गुण व कौशल्य तिला प्रत्येक सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून द्यायचे. वयाच्या आठव्या वर्षापासून ती सातत्याने बॅडमिंटन खेळाचा सराव करत आहे. पुढे २०१८ मध्ये मालविका बनसोड हिने आशियाई कनिष्ठ चॅम्पियनशीप स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

पात्रता फेरी मध्ये तिला अपयश आलं परंतु पुढील दोन स्पर्धा जिंकत तिने कॅनडामध्ये आयोजित केलेल्या वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं देशाचं प्रतिनिधित्व करताना तिला फारच अभिमान वाटत होता. पुढे डिसेंबर महिन्यात मालविकाला काठमांडू नेपाळ येथे आयोजित केलेल्या दक्षिण आशियाई प्रादेशिक अंडर-२१ स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि वैयक्तिक आणि सांघिक गटामध्ये मालविका ने विजेतेपद मिळविले.

मालविकाला खूप कमी वयामध्ये भरपूर यश मिळायला सुरुवात झाली परंतु हे यश तिच्या कष्टातून आलं होतं. २०१९ मध्ये मालविका ने अखिल भारतीय सीनियर रॅंकिंग आणि अखिल भारतीय ज्युनियर रॅंकिंग स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केला. मालविकाच्या यशाबद्दल जितक सांगायचं तितक कमी आहे. तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे मालविका डावखूरी खेळाडू आहे. इतकच नव्हे तर २०१९ मध्ये मालदीव आंतरराष्ट्रीय फ्युचर सिरीज स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केला. हैदराबाद सीनियर रॅंकिंग स्पर्धेमध्ये‌ विजेतेपद मिळवलं.

मालविका ने नेपाळची अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय सीरिज जिंकली. ऑक्टोंबर २०१९ मध्ये बहारीन आंतरराष्ट्रीय मालिकेत मालविका ने कांस्यपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत मालविका १११ व्या क्रमांकावर आहे. ही मालविका बनसोड हिची आत्तापर्यंत ची बॅडमिंटन खेळाडू म्हणून कारकीर्द राहिली आहे. परंतु गेल्या गुरुवारी मालविका ने एक वेगळाच विक्रम केला.

तो म्हणजे तिने चक्क सायना नेहवालचा पराभव केला. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सानिया नेहवाल सोबत झालेल्या सामन्यांमध्ये ३४ मिनिटात सरळ गेममध्ये २१-१७, २१-१० अशा डिफरेन्स ने विजय मिळवला. या विजयानंतर मालविका स्वतः आश्चर्यचकित झाली होती. कारण मालविका नेहमी सांगते की सायना नेहवाल तिची आदर्श आहे. मालविका ने बॅडमिंटन खेळाची सुरुवात सायनाचा खेळ बघूनच केली होती त्यामुळे मालविका च्या खेळावर सायना नेहवाल यांचा जास्त प्रभाव आहे.

या विजयानंतर मालविका ने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्यामध्ये ती असं म्हणाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आहे. ती म्हणाली मला आत्तापर्यंत विश्वास होत नाही आहे की मी सायना नेहवाल यांना हरविले आहे. हा सामना एक शानदार अनुभव ठरला आहे मी या विजयानंतर खूपच आनंदी आहे कारण सायना माझी आदर्श खेळाडू आहे. सायना नेहवाल गेले एक दशक भारताचे नेतृत्व करत आहे आणि मी माझ्या खेळाची सुरुवात सायनाला बघूनच केली.

सायनाच्या खेळाची शैली मला आवडते. सायनाच्या फटाक्यांमध्ये सर्वात जास्त ताकद असते त्यामुळे मला तिचा खेळ अत्यंत आवडतो. अशी प्रतिक्रिया मालविका बनसोड हिने दिली आहे. या सामन्या मुळे मालविकाला पुढील सामन्यांसाठी अधिक प्रेरणा मिळाली पुढील येणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ती आता अधिक कष्ट करून पुन्हा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.

मालविका च्या या विजयाची माहिती समजताच नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मालविकाला स्वतःहून फोन करून तिचं भरपूर कौतुक केलं व तिला भरभरून आशीर्वाद दिले. मालविका ने मिळवलेला हा विजय खरंच खूप मोठा आहे. पी व्ही सिंधू यांच्यानंतर सायना नेवाल यांना हरवणारी मालविका ही दुसरी भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे.

पुरस्कार

मालविका बनसोड हीच जितके कौतुक करावं तितकं कमी आहे कारण तिने कार्यच असं केल आहे. अगदी वीस वर्षाची असणारी मालविका हिने सायना नेहवाल हिचा पराभव केला आणि हे मालविका साठी खरच खूप मोठे यश आहे. शिवाय आपल्या भारताला एक अत्यंत हुशार व कौशल्यपूर्ण खेळाडू मालविकाच्या रूपातून लाभला आहे.

मालविका ने आतापर्यंत अनेक सामने जिंकले आहेत आणि तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मालविका बनसोड हिला महाराष्ट्रातील एका न नफा या संस्थेतर्फे दिला जाणारा नागपुर भूषण पुरस्कार मिळाला आहे. मालविकाला खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट ॲथलिट पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. त्यासोबतच टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम ॲथलिट अवॉर्ड मिळाला आहे. मालविकाला मिळालेले हे सर्व पुरस्कार तिने केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ आहेत.

मालविका ने मिळवलेली पदकं

मालविका बनसोड ही वीस वर्षीय बॅडमिंटन खेळाडू असून तिच्यामध्ये भरपूर कलागुण कौशल्य आहेत‌. तिची खेळण्याची शैली उत्तम आहे. मालविका ने सायना नेहवालचा पराभव केला सायना नेहवाल ही आपल्या भारतातील एक उत्तम खेळाडू आहे. जर मालविका तिचा पराभव करु शकते तर त्याचा अर्थ मालविका एक खरा हिरा आहे. जो पुढे जाऊन भारताचे नाव अधिक रोशन करेल.

मार्च २०२१ मध्ये झालेल्या युगांडा इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये मालविकाला सुवर्णपदक मिळालं. २०२१ ची मालदीव अंतरराष्ट्रीय फ्युचर सिरीज मध्ये मालविका बनसोड हिने सुवर्णपदक मिळवलं. २०२१ ची नेपाळ मध्ये झालेली अन्नपूर्णा पोस्ट आंतरराष्ट्रीय मालिका या स्पर्धेत मालविकाला सुवर्णपदक मिळालं. २०१९ च्या बहरीन अंतरराष्ट्रीय मालिकेत मालविका बनसोड हिने कांस्यपदक पटकावल.

२०१९ मध्ये बल्गेरियन ज्युनियर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मालविकाला कांस्य पदक मिळालं. २०२८ च्या दक्षिण आशियाई प्रादेशिक २१ वर्षाखाली स्पर्धा जी काठमांडू नेपाळ येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मालविका बनसोड हिने सुवर्णपदक पटकावलं. मालविका ची ही कारकीर्द खूप कौतुकास्पद आहे. मालविका बनसोड हिचा हा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे.

अतिशय लहान वयामध्ये तिने इतक मोठे यश प्राप्त केल आहे. ही तिच्यासाठी, तिच्या घरच्यांसाठी व आपल्या सर्व भारतीयांसाठी खूप कौतुकास्पद बाब आहे. स्वतःच्या देशासाठी खेळताना मालविका सांगते की तिला खरंच खूप अभिमान वाटतो की तिला आपल्या देशाचं नाव रोशन करण्याचं भाग्य लाभलं. बॅडमिंटन क्षेत्रातील तरुणांसाठी मालविका बनसोड एक नवा आदर्श ठरली आहे.

येणाऱ्या युवा पिढीसाठी मालविका एक उत्तम उदाहरण बनली आहे. मालविकाच संपूर्ण भारतभर कौतुक होत आहे. इतकेच नव्हे तर तिला आता वेगळी ओळख देखील मिळाली आहे ती म्हणजे नागपूरची बेटी! नागपुरची शान मालविका बनसोड.

आम्ही दिलेल्या Malvika Bansod Information in Marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मालविका बनसोड मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about Malvika Bansod in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Malvika Bansod in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये malvika bansod biography in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!