मन करा रे प्रसन्न मराठी निबंध Man Kara Re Prasanna Essay in Marathi

Man Kara Re Prasanna Essay in Marathi मन करा रे प्रसन्न मराठी निबंध ‘जर स्वयंपाक मन लावून केला तर तो चविष्ट बनतो’ असं आई नेहमी म्हणते आणि या वाक्याचा अर्थ मला प्रौढ वयामध्ये समजला. जेव्हा आपलं मन निरोगी असतं आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असतात जर आपलं मन प्रसन्न असेल तरच आपण एखादं कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो. आपल्या वागण्याचा, बोलण्याचा आपल्या कार्यावर परिणाम दिसतो. तसंच आपल्या मनात जे विचार चालू असतात त्यांचा परिणाम देखील आपल्या कार्यावर दिसतो. आपलं मन निरोगी प्रसन्न असेल तर कार्य उत्तमरित्या पार पडतो. परंतु जर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार घर करून बसले असतील किंवा मनामध्ये हजार प्रश्न सुरू असतील तर आपलं कोणत्याही कामामध्ये लक्ष लागणार नाही आणि परिणामी आपल्याला कोणतेही काम उत्तमरीत्या करता येणार नाही.

man kara re prasanna essay in marathi
man kara re prasanna essay in marathi

मन करा रे प्रसन्न मराठी निबंध – Man Kara Re Prasanna Essay in Marathi

आपलं आयुष्य कितीही सुरळीत चालू असलं आपल्याकडे किती संपत्ती असली किंवा आपलं शरीर सुदृढ असलं तरी आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ऐवज म्हणजे आपलं मन.‌ जर आपला आपल्या मनावर ताबा असेल तर आपलं आयुष्य अगदी निरोगी राहील. आणि म्हणूनच आपल मन नेहमी प्रसन्न असणं गरजेचं आहे. मन प्रसन्न ठेवणे म्हणजे मनामध्ये सकारात्मक विचारांचं रोपटं लावणं.

जर आपण नेहमी सकारात्मक विचार केला तर आपल्या सोबत नेहमी सकारात्मक गोष्टीच घडतील किंवा आपला वाईट गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. इच्छाशक्ती असली की कठीणातून कठीण गोष्ट देखील आत्मसात करता येतात असं म्हटलं जातं. पण हेच जर आपण मनातून ठरवलं की ‘ही गोष्ट मी करू शकतो किंवा मी करू शकते’ तर आपल्यासाठी अशक्य गोष्ट देखील कठीण वाटणार नाही.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये चढ-उतार असतात परंतु आयुष्यामध्ये एक पायरी वरती जाताना जर चुकून पाय सरकला आणि आपण खाली पडलो तर रडत न बसता न हार मानता पुन्हा नव्याने आयुष्याचा हा जिना चढायला सुरुवात केली पाहिजे. आणि आपण आयुष्यामध्ये आपल्याला हवी ती गोष्ट तेव्हाच आत्मसात करू शकतो जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असेल जेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा आपण कोणतीही गोष्ट सहज आत्मसात करू शकतो.

आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतके हरवून गेलो आहोत की आपल्या आत्म्याला काय हवे? किंवा आपल्या मनात काय आहे? आपण काय बोलतोय? याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बहुतेक वेळा आपलं मन एखादी गोष्ट करण्यासाठी तयार नसतं आणि तरीही आपण ती गोष्ट करतो आणि परिणामी आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो म्हणूनच नेहमी आपल्या मनाचं ऐकावं.

घर, ऑफिस, मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःपासूनच दूर गेले आहोत म्हणून कधी तरी स्वतःला प्रश्न विचारून बघा की मला नक्की काय हवं आहे? मी शेवटचा कधी बरं मन मोकळं होऊन हसलो होतो? मी जे करतो आहे ते योग्य आहे का? माझं वागणं योग्य आहे का? जेव्हा आपण स्वतः शी बोलून स्वतःच्या अडचणी जाणून घेऊ तेव्हा आपला वैयक्तिक विकास होईल.

आपल्याला नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो ही सगळी दुःख सगळे संकटं नेहमी आपल्याच वाटेला का? हा संघर्ष आपल्याच वाटेला का? तर असं नसतं. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करत असतो परंतु आपल्या समोर येणाऱ्या अडचणींकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो हे देखील अतिशय महत्त्वाच आहे.

आयुष्यामध्ये अडचणी आहेत म्हणून रडत न बसता डोळ्याचे आश्रू पुसून या अडचणींवर मनापासून कशी मात करता येईल याचा विचार करायला हवा. मनावर सत्ता मिळवणे म्हणजे जग जिंकल्यासारख आहे मनाची ताकद फार मोठी असते म्हणूनच जर मनातून एखादी गोष्ट ठरवली तर ती नक्कीच पूर्ण होते. आपल्या मनाची मानसिकता आपल्याला प्रत्येक संकटाशी लढण्यासाठी एक सकारात्मक शक्ती देते. बरीच लोक मोठमोठ्या संकटांवर मात करून सुखी जीवन जगतात कारण त्यांची मानसिकता चांगली असते. काही लोकं वेगवेगळ्या आजारांशी झुंज देतात परंतु मानसिकता चांगली असल्यामुळे ते त्या आजारावर मात करू शकतात.

म्हणून तर अनेक महान संत महात्म्यांनी मन प्रसन्न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या मनाची प्रसन्नता आपल्या सर्व सिद्धीचे कारण असते म्हणूनच महान संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की “मन करारे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण“. हल्लीचे यूग माणसाला कृत्रिम जगाशी जोडून ठेवतं आहे ज्यामुळे माणूस आपलं स्वतःचे आयुष्य जगायला विसरला आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मोबाईल मध्ये माणूस इतका गुंतत चालला आहे की माणसाला नक्की काय हवंय तेच कळत नाही आहे.

आजकाल कोणालाही कोणाशी बोलायला सुद्धा वेळ नाही ना कोण कोणाची विचारपूस करत. परंतु हे स्पर्धेचे युग आहे तंत्रज्ञानाचे युग आहे म्हणून प्रत्येक जण फक्त एकमेकांच्या पुढे जायला बघत आहे. माणसाला फक्त स्पर्धा आणि पैसे दिसत आहेत आणि त्यामुळेच आपण स्वतः अपयशी ठरलो तर मनस्ताप होतो आणि आपल्यापेक्षा जर समोरचा यशस्वी ठरला तर त्याचा देखील मनस्ताप होतो. म्हणजे नक्की करावं तरी काय? या सगळ्याला फक्त एकच गोष्ट जबाबदार आहे ते म्हणजे आपलं मन.

आपलं मन जर निस्वार्थी असेल समाधानी असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही मिळाल आहे ते कधीच कमी पडणार नाही किंवा दुसऱ्याच सुख बघून आपल्याला दुःख कधीच होणार नाही दुसऱ्याच्या दुःखावर हसणं ही गोष्ट फक्त त्यांनाच जमते ज्यांच्या मनाला आतून गंज लागलेला असतो. कधी ऑफिसच्या कामाचा टेन्शन तर कधी घराचे हप्ते फेडण्यासाठी टेन्शन तर कधी मिळालेल्या पगारात घर कसं चालवायचं ह्याचा टेन्शन अशा ताणतणावाने ग्रासलेल्या जीवनामुळे कित्येकांचे मानसिक आरोग्य ढासळल आहे.

आरोग्य म्हटलं तरं त्या सोबत शारीरिक आणि मानसिक आरोग्य आलं आणि मानसिक आरोग्य हे देखील फार महत्त्वाचं असतं. एकवेळ शरीराला झालेला आजार बरा होऊ शकतो पण मनाचा आजार बरा व्हायला बराच वेळ लागतो. मन शुद्ध आणि प्रसन्न ठेवायचं असेल तर सकाळी पाच वाजता उठून जरा निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे सकाळची हवा अगदी ताजीतवानी असते सकाळी बाहेर हवेमध्ये एक फेरफटका मारून आल्यावर तंदुरुस्त वाटतं व मनामध्ये सकारात्मक विचार विकसित व्हायला सुरुवात होते त्यामुळे दिवस सुद्धा सकारात्मक जातो.

आज कित्येक जण मानसिक आजारांना तोंड देत आहेत आणि ह्याच मानसिक आजारामुळे बऱ्याच लोकांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे. म्हणूनच मानसिक आरोग्य देखील अतिशय महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमी मनस्ताप कमी करावा, आपल्या मनाशी प्रश्न विचारावे, इतरांशी आपली तुलना करू नये, इतरां बद्दल वाईट विचार करण्यापेक्षा नेहमी दुसऱ्यांचे चांगलं होऊदे असा विचार करा, नेहमी मदतीत अडकलेल्या लोकांना मदत, करा ज्ञान नसलेल्या लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवा.

आपल्या जीवनामध्ये दररोज वेगवेगळ्या नवीन घटना घडत असतात परंतु बाह्य घटनांकडे लक्ष न देता आंतरिक सुखाकडे लक्ष दिले पाहिजे. रोजच्या ताणतणावामुळे नैराश्य येणं ही अगदी सहाजिक गोष्ट आहे परंतु या गोष्टीकडे आता अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. कारण नैराश्यग्रस्त स्त्रियांच्या व पुरुषांच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली आहे. नैराश्याचे प्रमाण जास्त झाल्यावर व्यक्तीकडून चुकीचा निर्णय घेतला जातो किंवा चुकीचं पाऊल पडतं. म्हणून आपलं मन प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे.

प्रौढ अवस्थेमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढू लागतं कारण आज जग इतकं पुढे गेला आहे की‌ तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बालपण अगदी सुखदायी व आरामदायक झालं आहे. आणि त्यामुळे मौजमजे पेक्षा जबाबदारी अशा भूमिके मध्ये जाताना शरीरावर व मनावर ताण निर्माण होण्यास सुरुवात होते. घर व नोकरी अशा दोन जबाबदारी पार पाडताना ही तारेवरची कसरत करत असताना बहुतेक वेळा आपलं आपल्या मनाकडे व शरीराकडे लक्ष नसतं.

स्त्री असो किंवा पुरुष आज प्रत्येकामध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत चालला आहे. सुरुवातीला स्त्रिया जास्त नैराश्य असायच्या परंतु हल्ली पुरुषांमध्ये देखील नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे या धर्तीवर आपली उपजीविका भागवण्यासाठी चाललेले कष्ट. कामाच्या व घरच्या जबाबदारीमुळे शरीरात आणि मनामध्ये पुरेशी ऊर्जा शक्ति उरतच नाही. पैसे कमावण्याच्या नादामध्ये अनेकदा आपलं आपल्या तब्येतीकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि परिणामी आपल्याला डॉक्टर कडे जाऊन गोळ्या औषधांचा भरमसाठ खर्च करावा लागतो.

परंतु बाह्य आजार तर उपचार घेऊन बरे करता येतात पण जर माणसाच्या मानसिकतेमध्ये बिघाड झाला असेल तर कोणत्याही गोळ्या कोणताही डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. आपण स्वतः आपलं मन नेहमी आनंददायी व प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्या वाढत्या वयात सोबत शरीराची व मनाची काळजी घेणं अतिशय गरजेचं झालं आहे.

आम्ही दिलेल्या man kara re prasanna essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मन करा रे प्रसन्न मराठी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Man Kara Re Prasanna Essay in Marathi Wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!