मेरी क्युरी माहिती मराठी Marie Curie Biography in Marathi

Marie Curie Biography in Marathi – Marie Curie Information in Marathi मेरी क्युरी माहिती मराठी मेरी क्युरी या पोलीश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी होत्या. त्यांनी किरणोत्सर्गीतेवर संशोधन केलं होतं. याव्यतिरिक्त नोबल पारितोषिक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांची कीर्ती व ख्याती दूरवर पसरलेली आहे. पॅरिस विद्यापीठातील त्या पहिल्या महिला प्राध्यापक होत्या आणि दोन नोबेल पारितोषिक जिंकण्याचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच होत्या. त्यांना त्यांच्या भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले होते. या ब्लॉग मध्ये आपण मेरी क्युरी यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

marie curie biography in marathi
marie curie biography in marathi

मेरी क्युरी माहिती मराठी – Marie Curie Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)मेरी क्युरी
जन्म (Birthday)७ नोव्हेंबर १८६८
जन्म गाव (Birth Place)पोलांड येथील वाॅर्सा
राष्ट्रीयत्व (Citizenship)पोलीश
ओळख (Identity)पोलीश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी
मृत्यू४ जुलै १९३४

Marie Curie Information in Marathi

जन्म व वैयक्तिक आयुष्य

पोलांड येथील वाॅर्सा मध्ये मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६८ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव मारिया आहे. त्यांचे संपूर्ण नाव मारिया सलोमिया स्कोडोव्सका आहे. ती तिच्या पाच भावंडांपैकी एक आहे. वयाच्या २२ वर्षापर्यंत मेरी क्युरी पोलंड येथेच राहिली. मेरी क्युरी लहान होती जेव्हा तिच्या बहिणी चा मृत्यू झाला कालांतराने तिची आई देखील मरण पावली. मेरी क्युरीच तिच्या आईवर भरपूर प्रेम होतं तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिला तिच्या जीवनात निराशतेशी लढा द्यावा लागला.‌

मेरी क्युरीचे वडील गणिताचे शिक्षक होते लहानपणापासूनच मेरीला भौतिकशास्त्रात आवड होती. मेरी क्युरी यांना लहानपणापासूनच अफाट स्मरणशक्ती लाभलेली होती. ती अतिशय हुशार विद्यार्थिनी होती शाळेमध्ये तिने नेहमी पहिल्या क्रमांक पटकावला. मेरी क्युरी यांनी रशियन लाइसी येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना सुवर्णपदक मिळालं.

पंधराव्या वर्षी तिने पदवी शिक्षण पूर्ण केले. तिला शिकून मोठे व्हायचे होते ती एक शिक्षिका बनली. तिला फ्रान्स येथे जायचं होतं पॅरिस मध्ये गेल्यावर तिने उच्च पदव्या संपादन केल्या आणि ती वैज्ञानिक क्षेत्रात शिरली. मेरीने पॅरिस आणि वाॅर्सा येथे क्युरी संस्था स्थापन केल्या आहेत. पॅरिस मध्ये असताना मेरी क्युरी यांच्या एका प्राध्यापकाने त्यांना स्टीलचे चुंबकीय गुणधर्म आणि रासायनिक रचना यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन अनुदानाची व्यवस्था करून दिली होती त्या दरम्यान त्यांचा संबंध पिएरे क्युरी यांच्याशी झाला ते एक उत्तम संशोधक होते १८९५ मध्ये या दोघांनी विवाह केला.

कारकीर्द

मेरी क्युरी व तीच्या मोठ्या बहिणीला उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती परंतु वार्सा विद्यापीठाने महिलांचा स्वीकार केला नाही आणि परिणामी त्यांना पोलांड सोडून जावं लागलं. त्यांचा मूळ नाव मारिया होतं म्हणून मेरी या नावाचा वापर करून १८९१ मध्ये पॅरिसला गेल्या .तिथे गेल्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञांना भेट दिली. त्यांच्या व्याख्यानांना उपस्थिती लावली. तिथे त्यांचे सुरुवातीचे दिवस कठीण होते त्यांनी फक्त ब्रेड खाऊन दिवस काढले.

मेरी क्युरी यांना प्रतिभेची ओळख म्हणून परदेशात शिकणाऱ्या पोलीस विद्यार्थ्यांसाठी अलेक्झांडो्विच् शिष्यवृत्ती मिळाली या शिष्यवृत्ती मुळे त्यांना भौतिकशास्त्रज्ञ किंवा गणितीय विज्ञान या विषयातील परवाना किंवा पदवी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पैसे भरण्यास मदत मिळाली. १८९३ मध्ये मेरी क्युरी यांनी लीप्पमंन संशोधन प्रयोगशाळेत काम करायला सुरुवात केली. ती एक उत्तम भौतिकशास्त्रज्ञ, रसायन शास्त्रज्ञ आणि रेडिएशनचे अभ्यासात अग्रणी होती.

तिने व तिच्या पतीने एकत्र मिळून पोलोनियम आणि रेडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध लावला. मेरी क्युरी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रेडियम वर काम करण्यात घालवलं त्यांनी रेडियम च्या वेगवेगळ्या गुणधर्मांचे वैशिष्ट्य शोधले त्याच्या उपचारात्मक क्षमतेची तपासणी केली. मेरी क्युरी यांचे पती पिएरे क्युरी यांनी चुंबकीय क्षेत्र आणि वीज मोजण्यासाठी अनेक उपकरणांचे शोध लावले.

मेरी क्युरी यांनी दोन धातूच्या प्लेट्स पैकी एकाला युरेनियम क्षारांचा पातळ थर लावला व आपल्या पतीने तयार केलेल्या उपकरणांचा वापर करून युरेनियमने तयार केलेल्या किरणांची ताकद मोजली या उपकरणांच्या द्वारे दोन मेटल प्लेट्स मधील हवेवर युरेनियम किरणांचा भडीमार होताना निर्माण होणारे क्षीण विद्युत प्रवाहाचा शोध तिने लावला त्या वेळी तिला समजले कि युरेनियम संयुगे देखील समान किरण उत्सर्जित करतात. संयुगे व्यवस्थित असली तरीही किरणोत्सर्गी करण्याची ताकद समान असते.

पुढे काही काळ मेरी क्युरी यांनी युरेनियम संयुगाची चाचणी व त्याच्यावर संशोधन सुरूच ठेवलं आणि कालांतराने त्यांना असे आढळून आले की किरणोत्सर्गीतचे मोजमाप केल्यास नवीन घटक शोधला जाऊ शकतो किरणोत्सर्गीता हा अनुचा गुणधर्म आहे.  मेरी क्युरी त्यांच्या संशोधनावरती रात्री उशिरापर्यंत काम करायच्या त्यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी च्या लक्षणांसाठी अनेक पदार्थ आणि खनिजे तपासून पाहिली. त्यांना असे आढळून आले की दोन रासायनिक घटक एक म्हणजे बीस्मथ आणि दुसरा म्हणजे बेरियम सारखा जो किरणोत्सर्गी होतो.

त्यांचा हा निष्कर्ष त्यांनी प्रकाशित केला बिस्मत सारख्या कंपाउंडमध्ये पूर्वी कधीही न आढळलेला किरणोत्सर्गी घटक आढळून आला ज्याला मेरी क्युरी यांच्या मूळ देश पोलांड याच्यावरून पोलोनियम असे नाव देण्यात आले. कालांतराने त्यांनी दुसरा किरणोत्सर्गी घटक शोधून काढला ज्याला त्यांनी रेडियम असं नाव दिलं. सन १९०३ मध्ये त्यांना रेडिएशन घटना समजून घेण्यात त्यांच्या योगदानाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार देण्यात आलं.

पुढील काळामध्ये मेरी क्युरी यांनी भौतिक शास्त्रज्ञाची प्राध्यापिका म्हणून काम केलं हे काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. त्यांना आढळून आले की पिचंब्लेड हे खनिज युरेनियम पेक्षा जास्त किरणोत्सर्गी आहे आणि त्यामध्ये इतर किरणोत्सर्गी पदार्थ असणं शक्य आहे. या निष्कर्षावरून मेरी क्युरी या पोलोनियम आणि रेडियम दोन अज्ञात घटक शोधून काढण्यात यशस्वी ठरल्या. पुढे त्यांनी या दोन किरणोत्सर्गी मूलद्रव्य व संशोधन करणे सुरूच ठेवलं सन १९१० मध्ये त्यांना शुद्ध धातू म्हणून रेडियमची यशस्वीपणे निर्मिती केली.

मेरी क्युरी यांनी किरणोत्सर्गी घटकांचे गुणधर्म आणि त्यांच्या संयुगांचे ही दस्तऐवजीकरण केले. किरणोत्सर्गी संयुगे वैज्ञानिक प्रयोग आणि वैद्यक क्षेत्रात आढळून येतात जिथे यांचा उपयोग ट्युमर वर उपचार करण्यासाठी केला जातो. १९११ मध्ये मेरी क्युरी यांना पोलेनियम आणि रेडियम या घटकांच्या शोधासाठी रसायनशास्त्रातील दुसरे नोबेल पारितोषिक पुरस्कार देण्यात आलं.

मेरी क्युरी यांनी किरणोत्सर्गीतिचे संशोधन पुढे चालू ठेवले जसे जसे त्यांचे संशोधन वाढत गेले तसे त्यांना प्रयोगशाळा अपुऱ्या पडू लागल्या ऑस्ट्रियन सरकारने मेरी क्युरी यांना एक अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करून दिली. जुलै १९१४ पर्यंत रेडियम इन्स्टिट्यूट पूर्ण झालं होते परंतु त्याच वेळी पहिल महायुद्ध सुरू झाले आणि त्या मुळे मेरी क्युरी यांना त्यांचे संशोधन स्थगित कराव लागलं.

त्यानंतर युद्ध समाप्त झाल्यावर मेरी क्युरी यांना त्यांच्या रेडियम संस्थेसाठी पैसे उभारण्यासाठी बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या अतिशय कठोर परिश्रम करावे लागले परंतु तोपर्यंत त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. १९२० पर्यंत मेरी क्युरी यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या या समस्यांचे मूळ कारण होतं त्या जास्तीत जास्त किरणोत्सर्गी सामग्रीच्या संपर्कात असायच्या.

मृत्यू

त्याकाळी महिलांना जास्त प्राधान्य दिलं जायचं नाही परंतु मेरी क्युरी यांनी पोलोनियम आणि रेडियम या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा शोध लावून भौतिकशास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ क्षेत्रातील नोबल पारितोषिक मिळवलं हे पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे संशोधन सुरूच ठेवल परंतु १९२० पर्यंत त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या व ४ जुलै १९३४ रोजी मेरी क्युरी यांचा अप्लास्टिक आणि ॲनिमियामुळे मृत्यू झाला वयाच्या ६६ व्या वर्षी मेरी क्युरी यांचा मृत्यू झाला.

हा एक असा रोग आहे जो अस्थिमज्जा नवीन रक्तपेशी तयार करतो. हा रोग मेरी क्युरी यांना जास्तीत जास्त काळ किरणोत्सर्गी घटकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे झाला होता. दक्षिण पॅरिसमधील स्केऑक्स येथे मेरी क्युरी यांना त्यांच्या पतीच्या शेजारी दफन करण्यात आले. परंतु १९९५ मध्ये त्यांचे अवशेष हलवून ते फ्रान्स च्या महान पॅरिसमधील पॅथिऑन मध्ये दफन करण्यात आले. कर्करोगावरील उपचार शोधण्यामध्ये मेरी क्युरी यांनी खूप मोठे योगदान दिलं आहे. विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मेरी क्युरी या पहिल्या महिला होत्या.

आम्ही दिलेल्या Marie Curie Biography in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेरी क्युरी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Marie Curie information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Marie Curie in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!