मतदान जागृती निबंध मराठी Matdan Jagruti Essay in Marathi

Matdan Jagruti Essay in Marathi मतदान जागृती निबंध मराठी आपण आज या लेखामध्ये मतदान जागृती या विषयावर निबंध लिहिणार आहोत. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना मतदानाचे महत्व माहित नाही आणि ते आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत. मतदान हा एक आपल्याला भारतीय लोकशाहीने दिलेला अधिकार आहे जो आपण बजावला पाहिजे आणि देशाच्या विकासासठी योग्य  नेता निवडल पाहिजे. भारतामध्ये असे अनेक लोक आहेत जे मतदान करून आम्हाला काय मिळते, त्यामध्ये आपला काय फायदा, आम्ही का कोणाला आपले मत द्यायचे, का मतदानासाठी आपला एक दिवस वेळ घालवायचा.

अश्या प्रकारे वेगवेगळी कारणे देऊन मतदान करण्यासाठी जाने टाळतात अश्या लोकांच्यासाठी आणि मतदान जागृतीसाठी काही मोहिमा राबवल्या आहेत आणि हे सर्व आपण आता खाली निबंधामध्ये पाहणार आहोत. चला तर मग मतदान जागृतीवर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.

‘लोकशाहीचा जागर आणि संविधानाचा आदर

करून उठा जागे व्हा

आणि

लोकाशी बळकट करण्यासाठी

हक्काने मतदान करा.’

matdan jagruti essay in marathi
matdan jagruti essay in marathi

मतदान जागृती निबंध मराठी – Matdan Jagruti Essay in Marathi

मतदाता जागरूकता निबंध – Matdan Jagrukta Essay in Marathi

भारत हा देश लोकशाही प्रधान देश आहे म्हणजेच लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही आणि तसेच भारतामध्ये आपल्या देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे आणि तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आपल्याला एक उत्तम नेता किंवा व्यक्ती निवडण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकारालाच मतदान म्हणतात.

आपला भारत देश तास बघायला गेला तर स्वातंत्र्य देश आहे आणि आपल्या लोकशाहीच्या व्यवस्थापनामध्ये आपल्या अनेक असे हक्क किंवा अधिकार दिले आहेत आणि त्यामधील एक अधिकार म्हणजे मतदानाचा हक्क. भारतीय संविधानातील घटनेमुळे आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे आणि म्हणून आपण आपल्या भागासाठी एक चांगला आणि योग्य व्यक्ती निवडण्याचा अधिकार आहे.

जो तुमच्या भागाची चांगल्या प्रकारे प्रगती करू शकेल तसेच भागातील अनेक मोठ मोठ्या समस्या सोडवू शकेल. तुमच्या एका मतदानाला खूप किमत आहे कारण तुमचे एक मत एखाद्या उमेदवाराला जिंकवू शकते किंवा मग हरवू शकते पण आपण मतदान करताना चांगला विचार करून मतदान केले पाहिजे.

कारण जो उमेदवार निवडून येईल त्याच्यावर आपल्या भागाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास अवलंबून असतो. भारतामध्ये लोकशाही कारभार आहे हे खूप चांगले आहे करा लोकशाहीमध्ये लोकांच्या हितासाठी लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी देशाची किंवा संबधित भागाची सर्व व्यवस्था पाहतो आणि लोकांच्यासाठी काम करतो. जर आपल्याला देशाचा विकास व्हावा किंवा आपल्या भागाचा विकास व्हावा.

असे जर लोकांना वाटत असेल तर सर्वांनी न चुकता मतदानाचा हक्क बजावला पाहिजे कारण तुम्ही मतदान प्रक्रियेतील राजा किंवा नायक असता कारण तुमच्या मतदानामुळेच कोणता उमेदवार निवडून येणार आणि आपण जार योग्य उमेदवार निवडून दिला तर आपला देश विकासाच्या मार्गावर येईल म्हणूनच आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.

काही लोक असे म्हणतात कि मतदान करून आम्हाला काय मिळते त्यामध्ये आपला काय फायदा, आम्ही का कोणाला आपले मत द्यायचे, का मतदानासाठी आपला एक दिवस वेळ घालवायचा अश्या प्रकारे वेगवेगळी कारणे देऊन मतदान करण्यासाठी जाने टाळतात आणि भारतीय लोकशाहीने दिलेला हक्क बजावण्यापासून ते दूर लोटले जातात.

पण त्यांना हे माहित नाही कि मतदान हा एक आपला महत्वाचा हक्क आहे जो आपण न चुकता आणि आनंदाने बजावला पाहिजे आणि मतदान करून आपण आपल्या भागाचे, तालुक्याचे, राज्याचे आणि देशाचे योग्य प्रकारे नेतृत्व करणारा उमेदवार निवडला पाहिजे.

मतदान हा असा हक्क आहे कि आपण किंवा सर्व लोकांनी निवडून दिलेल्या एका स्वार्थी आणि बेजबाबदार नेत्याला त्याची जागा दाखवून देण्याची शक्ती त्यांच्या हातामध्ये असते तसेच स्वार्थी प्रशासक मोडून काढण्याची शक्ती देखील असते आणि हे मतदार जेंव्हा करू शकतात तेव्हा ते आपला मतदानाचा हक्क बजावतात.

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जर योग्य, कर्तव्य दक्ष आणि देशाच्या विकासाच्या वाटेवर जो व्यक्ती नेण्यासाठी मदत करेल अश्या व्यक्तीसाठी बजावला तर त्यांचे मतदान सार्थक ठरेल. ज्यावेळी निवडणुकीची घोषणा होते त्यावेळी जे उमेदवार निवडणुकीसाठी उभारणार आहेत ते आपल्या प्रचारासाठी सुरुवात करतात आणि लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात कि आपण देशासाठी कसे योग्य आहोत, तसेच आपण आपल्या भागाच्या, तालुक्याच्या, राज्याच्या आणि विकासासाठी कसा हातभार लावू शकतो,

त्याचबरोर आपण त्या भागातील किंवा देशातील वेगवेगळ्या समस्या कसे सोडवू शकतो, शेतकऱ्यांना आणि व्यवसाय दारांना कसे मदत करू शकतो अश्या प्रकारची भाषणे देऊन लोकांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असतात पण काही नेते किंवा उमेदवार फक्त आश्वासन देतात आणि निवडून आल्यानंतर भागाच्या किंवा देशाच्या विकासासाठी काहीच काम करत नाहीत आपण यामध्ये आपला स्वार्थीपणा फक्त साधून घेतात.

परंतु मतदारांनी जागृतपणे आणि उमेदवाराची क्षमता, गुणवत्ता आणि जर उमेदवार जुना असेल आणि त्याने काही विकासाची कामे केली असतील तर हे सर्व मुद्दे लक्षात घेवून मतदान करा. तसेच जात धर्म या गोष्टींच्या आधारावर मतदान करू नये. कारण तुमच्या मतदानाच्या जोरावर कोणतेही सरकार निवडून येते आणि ते पाच वर्षासाठी आपल्या देशाचे सर्व निर्णय घेते.

मतदान निबंध – matdan essay in marathi

मतदान हे आपल्या देशासाठी खूप महत्वाचे आणि हितकारक आहे त्यामुळे जे लोक मतदान करण्यासाठी पात्र म्हणजेच ज्यांचे वय मतदान करण्यासाठी बसते त्या सर्व लोकांनी हक्काने मतदान केले पाहिजे. लोकांना मतदानाचे महत्व पटावे तसेच त्यांनी मतदान काय आहे आणि आपण मतदान केल्यामुळे काय होते याची जाणीव व्हावी म्हणून सरकार अनेक प्रयात करते तसेच योजना राबवते तसेच सरकारने मतदान जागृतीसाठी वेगवेगळ्या मोहिमादेखील सुरु केल्या आहेत.

मतदान जागृतीमुळे जर लोकांनी चांगल्या आणि यीग्या नेत्याला निवडून दिले तर आपल्या देशाला तसेच समाज्याला एक चांगला नेता मिळेल आणि देशामध्ये वेगवेगळी विकासकामे होतील, अनेकांना रोजगार मिळतील, रस्ते चांगले बनतील, पाण्याची व्यवस्था चांगली होईल, अश्या प्रकारे आपल्याला अनेक फायदे होतील आणि देशाबरोबर आपली देखील प्रगती होईल.

भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस हा २५ जानेवारी १९५० मध्ये अस्तित्वात आला आणि हा दिवस २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारीला मतदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी केला जातो.

तसेच मतदारांना सुविधा देणे किंवा जास्तीत जास्त नावनोंदणी करणे हा मुख्य हेतू असतो. मतदान दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो आणि हा दरवर्षी एका विशिष्ट थीमसह साजरा केला जातो आणि यामध्ये मतदारांना मदतन हा त्यांचा मुलभूत हक्क आहे हे पटवून दिले जाते. मतदान करण्याचे पात्रता वय हे १९८८ मध्ये १८ वर्ष होते पण सध्या ते २१ वर्ष झाले आहे.

अश्या प्रकारे सर्व मतदारांनी जागृत होवून आणि मतदानासाठी अनेक लोकांना जागृत केले पाहिजे आणि मतदानाचे महत्व पटवून दिले पाहिजे आणि आपला मतदानाचा हक्क बजावून आपल्या भागाच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडला पाहिजे.

आम्ही दिलेल्या matdan jagruti essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मतदान जागृती निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या
matdan jagrukta essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि matdan adhikar ki kartavya essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये matdan in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!