माझी प्रिय मैत्रीण निबंध मराठी Mazi Maitrin Essay in Marathi

Mazi Maitrin Essay in Marathi माझी प्रिय मैत्रीण निबंध मराठी मैत्रीण म्हटलं कि डोळ्यासमोर अनेक मैत्रिणी येतात त्या लहानपणीच्या मैत्रीने असो, शाळेतील असो किंवा मग कॉलेज मधील असो पण त्यामधील एक खास असते जिने आपल्या मनामध्ये घर केलेले असते आणि इने आपल्या चांगल्या आणि वाईट प्रसंगामध्ये आपल्या सोबत उभी राहिलेली असते. आता आपण माझी मैत्रीण या विषयावर निबंध लिहणार आहोत. माझी मैत्रीण या विषयावर निबंध लिहिण्या अगोदर मला मैत्री म्हणजे काय सांगावेसे वाटते म्हणून खाली शब्द रचनेमध्ये मैत्रीची व्याख्या दिलेली आहे.

“मैत्री म्हणजे संकटांशी

झुंजणारा वारा.

मैत्री म्हणजे विश्वासाने वाहणारा

आपुलकीचा झरा,

आणि

मैत्री म्हणजे असा खेळ ज्यामध्ये

एक बाद झाला तरी

दुसऱ्याने खेळ सांभाळायचा असतो.”

mazi maitrin essay in marathi
mazi maitrin essay in marathi

माझी प्रिय मैत्रीण निबंध मराठी – Mazi Maitrin Essay in Marathi

Majhi Maitrin Essay in Marathi

आपल्याला मित्र मैत्रीण असणे आणि ते जर जीवाला जीव देणारे असतील तर तुमच्या सारखे भाग्यवान या जगामध्ये कोणीच नाही. कारण आपल्या कठीण क्षणांमध्ये चांगले मित्र किंवा मैत्रीण आपल्या पाठीशी खंबीर पाने उभे राहतात तसेच ते आपल्याला सगळ्या प्रकारे मदत करतात आणि अशीच एक मी शाळेमध्ये असताना माझी मैत्रीण होती आणि ती आमच्या गावामधील असल्यामुळे आम्ही शाळेला किंवा कुठेही दुसरीकडे काही काम असले कि आम्ही दोघी मिळून जात होतो.

आम्ही शाळेमध्ये देखील एक बेंचवर बसत होतो तसेच जेवणाच्या सुट्टी मध्ये जेवण देखील दोघी मिळून करायचो. जर एक दिवस आमच्यातील एकादी शाळेमध्ये गेली नाही तर आम्हाला गमायाचे नाही. माझी खूप जवळची मैत्रीण आमच्या गावामधीलच असल्यामुळे आम्ही शाळेतील दिलेला अभ्यास देखील मिळून करत होतो आणि अभ्यासासाठी ती आमच्या घरी यायची किंवा मग मी त्यांच्या घरी जात होते आणि विशेष म्हणजे आमच्या दोघींचे आवडते विषय हे वेगवेगळे होते म्हणजेच तिचा आवडता विषय हा गणित होता.

आणि माझा आवडता विषय विज्ञान होता त्यामुळे जर मला गणित मधील काही समजत नसले तर ती मला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगायची आणि मला तिने सांगितलेले लगेच समजायचे आणि माझा विज्ञान हा विषय चांगला असल्यामुळे मी तिला विज्ञान मधील काही व्याख्या समजल्या नाहीत तर मी तिला समजावत होते.

अश्या प्रकारे आम्ही जास्तीत जास्त वेळ एकमेकींच्या बरोबर वेळ घालवत होतो. एवढेच नाही तर माझी मैत्रीण आमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व कार्यक्रमांना हजार असायची आणि घरामध्ये कार्यक्रम म्हटले भरपूर कामे देखील असतात आणि माझी मैत्रीण घरामध्ये असणारी कामे देखील करू लागत होती तसेच मी देखील त्यांच्या घरातील कार्यक्रमांना हजेरी लावत होते तसेच त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईला काही मदत लागली तर मदत करत होते.

शाळेमध्ये ती माझ्यापेक्षा हुशार होती आणि अक्षरे देखील खूप छान होते त्यामुळे आमच्या शाळेतील सर्व सर व मॅडम तिचे खूप कौतुक करायचे. तसेच माझी मैत्रीण अभ्यासामध्येच हुशार होती असे नाही तर ती इतर गोष्टीमध्ये देखील अगदी सक्रियपणे भाग घेत होती. तालुका स्तरावर खेळणाऱ्या आमच्या शाळेतील खो खो या टीमची ती एक भाग होती तसेच ती ज्यावेळी आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्पोर्ट्स डे असायचा त्यावेळी ती गोळा फेक, थाळी फेक, १०० मीटर रनिंग किंवा २०० मीटर रनिंग यासारख्या वयक्तिक खेळामध्ये देखील ती भाग घ्यायची.

तसेच तिला गाणी म्हणायला आणि भाषण करायला देखील खूप आवडायचे. आम्ही रिकाम्या वेळेमध्ये दोघी बसलेलो असलो कि वेगवेगळी गाणी गुणगुणत होतो तसेच आमच्या मराठी पुस्तकामध्ये असणाऱ्या कवितांना चाल लावण्याचा प्रयत्न देखील करत होतो. तसेच ती हुशार आणि चालक होती त्यामुळे तिची सहजासहजी कोणी फसणूक करू शकत नव्हते आणि ती माझ्या बाबतीत देखील खूप काळजी घेणारी होती आणि तिची मला कायम साथ असायची जर माझे काही चुकले तर किंवा मी कोणत्याही कारणामुळे दुखी असले.

तर ती मला समजावून सांगायची. अश्या प्रकारे आमच्या दोघींची मैत्री दिवसेंदिवस घट्ट बनत गेले आणि आम्ही मग १० वी नंतरचे पुढचे कॉलेज चे ११ वी आणि १२ वी चे शिक्षण देखील एकत्र केले आणि त्यावेळी देखील आम्ही कॉलेजला एकत्र जात होतो. कॉलेजमध्ये आम्ही दोघीही देवाच्या कृपेने एकाच वर्गामध्ये आलो आणि मग आम्ही शाळेमध्ये जसा अभ्यास केला तसाच कॉलेजमध्ये असताना देखील करू लागलो काही वेळेला अभ्यासाठी ती माझ्या घरी यायची.

आणि काही वेळेला अभ्यासासाठी मी तिच्या घरी जायचो तसेच आम्ही कॉलेजमध्ये मध्ये असताना एक्स्ट्रा ट्युशन लावलेली होती परंतु आमच्या ट्युशनच्या सरांनी आम्हाला दोघींना वेगवेगळ्या बॅचमध्ये घातले होते परंतु आम्ही ट्युशनच्या सरांना सांगून दोघीही एकाच बॅचमध्ये ट्युशनला जात होतो. अश्या प्रकारे आम्ही दोघी एकमेकिंशिवाय काही करत नव्हतो.

काही नवीन करायचे असल्यास किंवा कोणताही क्लास जसे कि गाण्याचा, चित्रकलेचा किंवा इतर कोणताही असो आम्ही एकमेकींना विचारणार आणि आम्ही दोघीही त्यासाठी तयार झालो तर ठीक नाही तर आमच्यातील एकटीने जर नाही म्हटले किंवा एकटीला कोणत्याही कारणामुळे नाही जमले तर आम्ही दोघीही क्लास करत नव्हतो इतकी आमची घट्ट मैत्री होती. आमच्या घरातील लोकांना देखील आमच्या मैत्रीवर खूप विश्वास होता त्यामुळे जर आम्हाला कुठे बाहेर जायचे असले कि तुम्ही दोघी मिळून जा असा सल्ला द्यायचे.

ज्यावेळी आमची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळीची गंमतीदार गोष्ट म्हणजे मी शाळेमध्ये पहिली पासूनच होते परंतु माझी खास मैत्रीण ५ वी पासून आमच्या शाळेमध्ये आली आणि शाळेच्या पहिल्या दिवशी आमची ओळख झाली परंतु माझ्या शाळेतील जुन्या मैत्रिणी असल्यामुळे मी तिच्याशी खूप बोलत नव्हते, त्यामुळे आमची इतकी मैत्री नव्हती आणि आमचे एक वर्ष असेच गेले आणि मला माहित देखील नव्हते कि ती आमच्या गावातील आहे.

थोड्या दिवसाने मला माहित झाले कि ती आमच्या गावातील आहे आणि त्यानंतर आमची थोडी जास्त ओळख झाली मग आम्ही एकत्र शाळेला जावू लागलो एकत्र अभ्यास करू लागलो. आज जरी आम्ही आमच्या आमच्या कामामध्ये व्यस्त झालो असलो तरी तिला केंव्हा वेळ असेल त्यावेळी ती आमच्या घरी येते आणि जर मला वेळ असेल तर मी त्यांच्या घरी जातो.

आणि गप्पा मारतो तसेच एकमेकींची जातीने सर्व विचारपूस करतो तसेच आज देखील तिला काही मदत लागली किंवा मला मदत लागली तर आम्ही दोघी एकमेकींना फोन करून विचारतो किंवा बोलावून घेतो. असे ह्या शाळेतील मैत्रिणीची आणि माझू दिवसेंदिवस मैत्री वाढत गेली आणि ती माझी आयुष्यभरासाठी मैत्रीण झाली.

जीवन जगताना आपले जीवन आनंदी ठेवण्यासाठी आणि जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी एक चांगल्या मित्र किंवा मैत्रिणीची गरज असते तसेच मला हि शाळेतील मैत्रीण लाभली जिने माझे शालेय जीवन खूप स्मरणीय बनवले. तिने माझ्या सर्व संकटांमध्ये साथ दिली, मला शाळेमध्ये प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन दिले, मला हसवले आणि दुःखाच्या वेळी मला समजावले.

अशी मैत्रीण आपल्याला लाभणे म्हणजे आपले भाग्याच म्हणून आपल्या चांगल्या मित्र मैत्रिणीचा हात कधीच सोडू नका आणि मला अशी चांगली, हुशार, प्रेमळ, सर्वांशी गोड बोलणारी, माझ्या कठीण वेळेला मला साथ देणारी, मला हसवणारी आणि मला मदत करणारी मैत्रीण लाभली म्हणून मला असे म्हणावेसे वाटते कि

“ये दोस्ती हम नाही छोडेंगे,

तोडेंगे दम मगर,

तेरा साथ ना छोडेंगे.”

आम्ही दिलेल्या mazi maitrin essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझी मैत्रीण निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my friend essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on mazi maitrin in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mazi maitrin in marathi essay Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!