माझी मातृभाषा मराठी निबंध Mazi Matrubhasha Marathi Essay in Marathi

Mazi Matrubhasha Marathi Essay in Marathi माझी मातृभाषा मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये आपण माझी मातृभाषा मराठी या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे कि भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या भाष्य बोलल्या जातात आणि प्रत्येक राज्याची एक ठरलेली भाषा आहे जसे कि कन्नड हि भाषा कर्नाटकामध्ये, गुजरात मध्ये गुजराती, तामिळनाडू मध्ये तमिळ तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी बोली जाते. मी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यामुळे मला माझ्या भाषेचा खूप गर्व आहे आणि म्हणूनच म्हणतात कि “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” अशी हि मराठी भाष बोलण्यास खूप सोपी आहे आणि हि बोलली कि समोरच्याला देखील आपुलकी वाटण्यासारखी भाषा आहे.

महाराष्ट्रामध्ये मराठी हि महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी ती महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली जाते जसे कि पुणेरी मराठी भाषा, कोल्हापुरी मराठी भाषा, कोकणी मराठी भाषा, घाटी मराठी भाषा अश्या प्रकारे मराठीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे मराठी भाषा बोलल्या जातात. तात्यासाहेब केळकर, सरदेसाई, शेजवलकर आणि राजवाडे यांनी मराठी भाषा घडवली आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेखनासोबत त्यांनी मराठी भाषेमध्ये अनेक वेगवेगळे अलंकार जोडले.

mazi matrubhasha marathi essay in marathi
mazi matrubhasha marathi essay in marathi

माझी मातृभाषा मराठी निबंध – Mazi Matrubhasha Marathi Essay in Marathi

मातृभाषेचे महत्त्व निबंध – Mazi Matrubhasha Marathi Nibandh

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये मराठी भाषा हि दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाते तसेच सध्या मराठी भाषेचे स्वरूप खूप बदलले आहे आणि सध्या मराठी भाषा हि महाराष्ट्रामध्ये बोलली जातेच परंतु हि भाषा महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेर देखील बोलली जाते. संत ज्ञानेश्वर यांना देखील मराठी भाषेबद्दल खूप ओढ होती आणि ते देखील म्हणायचे माझ्या मराठीचा बोलू कौतुके I परी अमृतातेही पैजा जिंके तसेच त्यांनी मराठी लेखनामध्ये अनेक अभंग आणि इतर अभंग लिहून मराठी साहित्यात भर पडली तसेच मराठी भाषेचे साहित्य देखील खूप मोठे आहे.

कारण त्यामध्ये अनेक महान लोकांनी त्यामध्ये भर टाकली आहे. पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये संतांनी वेगवेगळ्या प्रकारचे मराठी भाषेतील ग्रंथ लिहिले आणि मग त्यानंतर अनेक लेखकांनी आणि संतांनी अनेक पुस्तके, ग्रंथ, काव्य, कादंबऱ्या लिहिल्या आणि अश्या या समृध्द साहित्यामुळे आपली मराठी भाषा देखील समृध्द झाली आहे.

पूर्वी मराठी भाषेला खूप महत्व होते आणि मराठी भाषेला एक मनाचे स्थान होते तसेच पूर्वीच्या काळी शाळेमध्ये देखील मराठी भाषा हि अधिकृत भाषा होती आणि मराठी भाषा हि शाळेतील मुख्य भाषा होती. पण सध्या इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये सर्व मुलांना घालत आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेला महत्व दिले जाते आणि इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जाते त्यामुळे सध्या मराठी भाषेचे महत्व कमी झाले आहे.

म्हणजेच सध्याच्या आधुनिक काळातील मुले इंग्रजी मिडीयम मध्ये शिकून त्यांना इंग्रजी बोलता येते परंतु त्यांना त्यांची मराठी भाषा बोलता येत नाही आणि हे आपल्यासाठी खूप लाजिरवाणे आहे आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागाची मातृभाषा येणे खूप महत्वाचे आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मातृभाषा येणे खूप महत्वाचे आणि आपणच आहोत जे आपली भाषा बोलून आपली संस्कृती राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये टिकवू शकतो.

मराठी भाषा हि बोलण्यास, वाचण्यास आणि लिहिण्यास देखील खूप सोपी आहे त्यामुळे हि भाषा कोणत्याही व्यक्तीला शिकण्यास अवघड आणि आणि जर एकाद्या मराठी न येणाऱ्या व्यक्तीने जर हि भाषा शिकायची आणि बोलायची ठरवली तर हि भाषा ते पटकन शिकू शकतात कारण हि भाषा शिकण्यास आणि बोलण्यास खूप सोपी आहे आणि मनोरंजक देखील आहे. मराठी भाषा हि बोलण्यासाठी खूप सोपी असल्यामुळे मी हि भाषा आवडते आणि हि भाषा अमृताहुनी गोड किंवा जगातील गोड भाषा आहे असे मला वाटते.

तसे बघायला गेले तर महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचा अभिमान असतोच त्यांना मराठी भाषा हि प्रिय वाटते तसेच महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेबद्दल आपुलकी वाटते तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा हि आपल्या आईप्रमाणे जवळची आहे.

अनेक मराठी माणसांना वाटते कि मराठी भाषा हि महाराष्ट्राची शान आहे आणि मराठी लोक म्हणतात कि मराठी भाषा हि जगात भारी असणारी भाषा आहे. मराठी भाषा हि आपली मायबोली आहे मराठी भाषा हि आपली संस्कृती आहे तसेच मराठी भाषेला महाराष्ट्र राज्यामध्ये तेसेच महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या लोकांमध्ये तसेच भारतामध्ये असणाऱ्या मराठी लोकांच्या लेखिल खूप महत्व आहे. मराठी भाषेमध्ये अनेक साहित्य आहेत जसे कि मोठ मोठे ग्रंथ, काव्ये, कथा, महाकाव्ये आहेत आणि आपण जर हि आयुष्यभर वाचली तरी पुरणार नाहीत.

मराठी भाषा कशी तयार झाली आणि तिचा उगम कसा झाला हे पाहायचे म्हटले तर या भाषेचा उगम हा भारताच्या उत्तरेकडे झाला आणि हि मूळ आयांची भाषा असते. मराठी भाषा हि एक २२ भाषांपैकी एक प्रमुख भाषा आहे आणि आणि भाषा महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहेच पण हि भाषा गोवा राज्याची देखील अधिकृत भाषा आहे.

पाहायला गेले तर मराठी भाषा हि देशातील ४ थ्या क्रमांकावराची भाषा आहे आणि जगातील मराठी भाषा हि १५ नंबरची भ्सह आहे आणि ह्या गोष्टीचा प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांना अभिमान असावा. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेबद्दल लोकांच्या मनामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २७ फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो आणि मराठी साहित्यातील प्रसिध्द कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस देखील २७ फेब्रुवारी दिवशी असतो.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,

एवढ्या जगात माय मानतो मराठी.”

आम्ही दिलेल्या Mazi Matrubhasha Marathi Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझी मातृभाषा मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mazi matrubhasha marathi nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Mazi Matrubhasha Marathi Nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्य Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!