माझ्या स्वप्नातील भारत निबंध Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi माझ्या स्वप्नातील भारत… हे गीत ऐकले की आपल्या डोळ्यासमोर आपल्या प्रिय भारत देशाचा तिरंगा वाऱ्याच्या संगे लहरताना दिसतो. जगातील सर्वांत जास्त प्राचीन संस्कृती लाभलेला माझा भारत देश हा शेकडो भाषांनी, परंपरांनी नटलेला आहे. विविध जाती धर्माच, पंथाचे, सांप्रदायाचे लोक आपल्या देशात एकत्रितपणे नांदतात. याशिवाय, आपल्या भारत देशात सर्व जाती – धर्मातील सण, उत्सव, समारंभ मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि जल्लोषाने साजरे केले जातात. अनेक संत, महंत आणि महाराज आपल्या थोर भारत देशात होऊन गेले. त्यांच्या महान विचारांनी आपला भारत देश समृध्द आहे.

जहाँ डाल डालपर,

सोने की चिडिया करती है बसेरा.

वो भारत देश है मेरा,

ये भारत देश है मेरा!”

mazya swapnatil bharat essay in marathi
mazya swapnatil bharat essay in marathi

माझ्या स्वप्नातील भारत निबंध – Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi

Majhya Swapnatil Bharat Nibandh

जगामध्ये आपला भारत देश त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रसिध्द आणि नामांकित बनलेला आहे. भारतातील मसाले तर जगप्रसिध्द आहेत. अशा अनेक गोष्टींमध्ये आपला भारत देश सर्वश्रेष्ठ मानला जातो. परंतू, असे असले तरी आपण या प्रसिद्धीमध्ये एवढ्यात समाधान मानले नाही पाहिजे. आपल्या देशाची प्रगती करण्यापासून आपण थांबता कामा नये.

आपले थोर विचारवंत आणि समाजसुधारक आपल्याला सांगून गेलेत की ‘थांबलात तर संपलात’. त्यामुळे, आपल्याला इतक्या लवकर थांबून चालणार नाही. आपल्याला आपल्या महान भारत देशाला हिमालयाच्या टोकापर्यंत पोहचवण्यासाठी उंच उंच शिखरे पार करावी लागणार आहेत. आपली भारतीय संस्कृती जपून आपल्याला भारत देशाची प्रगती करायची आहे.

पण, त्यासाठी आपल्याला भारताचे एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागणार.

चला तर मग, आज आपण आपल्या स्वप्नातील भारत तयार करूयात! भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” अशी प्रतिज्ञा आपण लहानपणापासून शाळेत असताना करत आलो आहोत. या प्रतिज्ञेत आपण भारत आपला देश आहे असे सारे जगाला अभिमानाने सांगतो.

पण, इतके बोलुन फक्त जगाला आपल्या मनातील भारताबद्दलचा अभिमान दिसणार नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या भारत देशाचा जगातील दर्जा उंचवावा लागेल. त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आखून दिलेले अष्टप्रधान मंडळ आज कितीतरी दुसऱ्या देशांमध्ये पाळले जाते.

भारत देशाची प्रगती करण्यासाठी सर्वांत पहिल्यांदा आपल्याला हे अष्टप्रधान मंडळ तयार करता आले पाहिजेत. त्यानंतर व्यवस्थित नियोजन करून अष्टप्रधान मंडळ या प्रणालीच्या आदेशाप्रमाणे आपल्याला देशाच्या विकासासाठी काम करणे सोपे जाईल.

माझ्या स्वप्नातील भारत देश हा महम्मद पैगंबर यांच्यासारखा, महाविरांच्या अहिंसेच्या तत्वाचे पालन करणारा; संत नामदेव , संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या महान विचारांचा आदर करणारा, कुठल्याही प्रकारचा जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद तसेच लिंगभेद यांवरून आपापसात वाद न करणारा, कोणत्याही दगडधोंड्यांची पूजापाठ करण्यापेक्षा माणसांमध्ये देव पाहून माणुसकी जपणारा, गरजूंना मदत करणारा, मुक्या प्राणिमात्रांवर करुणा, दया आणि सहानुभूती व्यक्त करणारा..

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणुकीच्या तत्वांचा आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत पालन करणारा, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्यासारखा आपल्या अपत्यावर उच्च संस्कार करणारा, स्त्री – पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता दोघांनाही त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी देणारा, स्त्रीभ्रूणहत्या न करणारा, परस्त्रीला मातेसमान मानणारा , शेतकऱ्यांच्या काडीलाही त्यांच्या परवानगीशिवाय हात न लावणारा, इतका आपला भारत देश प्रामाणिक आहे.

माझ्या स्वप्नातील भारत हा राजा हरीचंद्र यांच्या सत्य वचनांवर विश्वास ठेवणारा, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या तत्वांनुसार चालणारा , साने गुरूजी यांच्यासारख्या आज्ञाधारक मुलासारखा, महात्मा गांधींच्या तीन माकडांसारखा म्हणजेच “वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये आणि वाईट पाहू नये” या तत्व प्रणालीचा अवलंब स्वतःच्या आयुष्यात करणारा, दुसऱ्यांना लगेच माफ करून शत्रुत्व कमी करणारा, कोणतीही समस्या आपल्यासमोर येऊन उभी राहिली तरी त्या समस्येला धीटपणे आणि एकत्रितपणे तोंड देणारा आहे.

हिंदू असो अथवा मुसलमान, शिख असो वा ईसाई, मंदिर असो वा मशीद, चर्च असो अथवा गुरुद्वार, अशा सर्व धर्मांचा आणि प्राथनास्थळांचा मनापासून आदर करणारा आहे. असे अनेक थोर विचार जर आपण सर्वांनी आपल्या व्यक्तीमत्वात आणले तर हा स्वप्नातील भारत एक दिवस खरोखर जन्माला येईल हे मात्र खरं!

मी माझ्या भारताला एका अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छिते जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महिला सशक्तिकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जरी मोठ्या प्रमाणात महिला घरातून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करीत असल्या तरी आजही आपल्या समाजात महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात भेदभाव सुरू आहे.

आई – वडिलांकडे असताना,  स्त्रीभ्रूण हत्येपासून ते लग्नानंतर सासरी गेल्यावर देखील स्त्रियांवर होत असलेले घरेलू अत्याचार आपण थांबवणे गरजेचे आहे. अश्या अनेक गोष्टींवर कार्य करणे आवश्यक आहे.

भारतातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षण होय. आज जरी भारत सरकार शिक्षण खात्यासाठी जास्त पैसे खर्च करत असला, शिक्षणावर अधिक भर देत असला तरीही म्हणावी तेवढी प्रगती आपल्याला शिक्षण क्षेत्रात दिसत नाही.

आपले भारत सरकार लोकांना शिक्षणाविषयी जागृत करीत आहे तरीही, देशातील काही भाग असे आहेत जेथे अजुनही शिक्षण पोहोचलेले नाही. यासाठी शासनाला आणखी एक पाऊल पुढे टाकून देशातील कोणताही व्यक्ती अशिक्षित राहता कामा नये याची खात्री करून घ्यायला हवी.

याशिवाय शाळा, विद्यालये आणि महाविद्यालये यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली शिक्षण पद्धत आपण कुठंतरी बदलली पाहिजेत. आजची शिक्षण व्यवस्था आज आपल्याला परीक्षा व्यवस्थेचे रुप धारण करताना दिसत आहे. खरतर, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे यासाठी शाळा, महाविद्यालये असतात.

पण, आजचे विद्यार्थी फक्त जास्त गुण मिळवण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी खूप कमी मुल ज्ञान मंदिरात जातात, नाहीतर जास्तीत जास्त विद्यार्थी हे फक्त परीक्षा देण्यासाठी या पवित्र ज्ञान मंदिरात जाताना आपल्याला दिसतात.

त्यामुळे, ही शिक्षण पद्धत बदलणं आपल्या देशाच्या विकासासाठी खूप गरजेचं आहे. कारण, विद्यार्थी हे देशाचे भवितव्य ठरवतात. देशाची प्रगती ही विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.

देशातील तिसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी होय. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित युवा रोजगारापासून वंचित आहेत. त्यांची  योग्यता असतानाही त्यांना योग्य रोजगाराची संधी मिळत नाही. त्यामुळे यासाठी भारत शासनाने देशात उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात.

माझ्या स्वप्नातील भारतात प्रत्येक नागरिकाला काही न काही काम करण्याची संधी उपलब्ध राहील. आपल्या देशातील चौथी समस्या म्हणजे धर्म, जात-पात इत्यादी गोष्टींवरून होणारे आपापसातील भेदभाव होय. अनेक लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी कट्टरतेचा आधार घेतात.

मी स्वप्न पाहते कि एक दिवस आपला भारत देश हा सर्व प्रकारच्या जातीपातींपासून मुक्त होऊन सशक्त राष्ट्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण करेल. भारतातील पाचवी समस्या म्हणजे भ्रष्टाचार होय. शिक्षणामुळे आज देशातील नागरिक समजदार झाले आहेत, म्हणून देशात पूर्वीपेक्षा भ्रष्टाचार कमी आहे.

परंतु आजही अनेक नेता, राजनेता स्वतःचे खिसे भरण्यात लागलेले आहेत. त्यांना आता यातून जागृत करण्यासाठी आपल्यालाच पावले उचलावी लागणार आहेत.

मी अश्या भारताचे स्वप्न पाहते आहे जेथील सर्व मंत्री पूर्णपणे देशाला समर्पित राहून, भारतातील देशवासीयांच्या विकासासाठी कार्य करतील . माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुखशांती व प्रेमाने राहतील. आपला भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. आधीच्या काळात भारताला ‘सोन्याची चिमणी असे म्हटले जायचे.

परंतु, आज वर्तमानकाळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. आज आपला भारत देश बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. मी अश्या भारताची कल्पना करत आहे की जो पूर्णपणे संपन्न असेल. भारत देश फार पूर्वीपासून सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण जगाचा मार्गदर्शक आहे.

पूर्वीच्या काळी आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला या विश्वविद्यालयात जगभरातून चीनसारख्या देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. परंतु आज आपल्या देशातील तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, हे कुठंतरी आपण थांबवल पाहिजेत.

माझ्या स्वप्नातील भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. आपल्या देशाची संस्कृती पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल .

शेवटी मी माझ्या भारत देशासाठी प्रार्थना करते की, “बलसागर भारत होवो , विश्वात शोभुनी राहो ||”

 – तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या mazya swapnatil bharat essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझ्या स्वप्नातील भारत निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mazya swapnatil bharat essay in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि majhya swapnatil bharat essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण majhya swapnatil bharat nibandh या लेखाचा वापर mazya swapnatil bharat essay in marathi wikipedia असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!