मेतकूट रेसिपी मराठी Metkut Recipe in Marathi

Metkut Recipe in Marathi मेतकूट रेसिपी मराठी आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाळलेले आणि कोरडे पदार्थ बनवून ठेवतो जे जास्त दिवस टिकतात जसे कि पापड, काही प्रकारच्या चटण्या, गरम मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, लोणची अश्या अनेक रेसिपी आपण बनवून ठेवतो आणि त्यामधील एक लोकप्रिय रेसिपी म्हणजे मेतकुट. मेतकुट हा आपण २ ते ३ प्रकारच्या डाळी आणि तांदूळ या पासून बनवला जातो आणि हा आपण तोंडी लावून, भातासोबत किंवा भाकरीसोबत खावू शकतो. मेतकुट हि रेसिपी भारतीय रेसिपी असून हि रेसिपी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते.

मेतकुट बनवताना २ ते ३ प्रकारच्या डाळी आणि तांदूळ कोरडे भाजा तसेच जिरे, धने, मोहरी हे कोरडे भाजून घेवून ते एकत्र करून ते दळून आणले जाते आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि सुंठ पावडर घालून ते चांगले एकजीव केले जाते आणि डब्यामध्ये घालून ठेवले जाते आणि आपल्याला हवे त्यावेळी आपण हे गरम भातावर तूप आणि मेतकुट घेवून खावू शकतो.

तसेच मेतकुट दह्यामध्ये मिक्स करून तो आपण भाकरी सोबत खावू शकतो. मेतकुट हि रेसिपी महाराष्ट्रातील बहुतेक मराठी घरांमध्ये बनवला जातो. मेतकुट घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनू शकतो. चला तर आता आपण मेतकुट रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

metkut recipe in marathi
metkut recipe in marathi

मेतकूट रेसिपी मराठी – Metkut Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( भारतीय )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

मेतकुट कसा बनवला जातो – metkut meaning in marathi 

मेतकुट बनवताना २ ते ३ प्रकारच्या डाळी आणि तांदूळ कोरडे भाजा तसेच जिरे, धने, मोहरी हे कोरडे भाजून घेवून ते एकत्र करून ते दळून आणले जाते आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, हिंग आणि सुंठ पावडर घालून ते चांगले एकजीव केले जाते.

मेतकुट रेसिपी – metkut recipe 

मेतकुट हि एक पारंपारिक रेसिपी आहे म्हणजेच हि रेसिपी खूप पूर्वीपासून बनवली जाते आणि आज देखी हि रेसिपी खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली देखील जाते. मेतकुट हि रेसिपी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि हि रेसिपी आपण गरम भात आणि तुपा सोबत खावू शकतो. मेतकुट घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर आता पण मेतकुट कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( भारतीय )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

मेतकुट बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make metkut recipe 

मेतकुट बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते बहुतेक आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर काही साहित्य घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बराजातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग मेतकुट बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी हरभरा / चणा डाळ.
  • अर्धा मोठा चमचा उडीद डाळ.
  • २ ते ३ चमचे मुग डाळ.
  • २ ते ३ चमचे तांदूळ.
  • १ चमचा धणे.
  • १/२ चमचा जिरे.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/४ चमचा हळद.
  • १/२ चमचा हिंग.
  • १/२ चमचा सुंठ.

मेतकुट बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make metkut recipe 

मेतकुट हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते तसेच हा पदार्थ आपण खूप दिवस टिकवून देखील ठेवू शकतो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मेतकुट कसा बनवायचा ते पाहूया.

  • सर्वप्रथम हरभरा डाळ, मुग डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ चांगले निवडून घ्या.
  • आणि मग गॅसवरमध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये हरभरा डाळ घाला आणि त्याचा चांगला खमंग वास येईपर्यंत भाजा आणि मग ती बाजूला काढून ठेवा.
  • मग त्यामध्ये उडीद डाळ घाला आणि ती देखील चांगली भाजा आणि मग त्यामध्ये मुग डाळ आणि तांदूळ देखील वेगवेगळे भाजून घ्या ( वेगवेगळे भाजून घेण्याचे कारण ते चांगले भाजते आणि लगेच भाजतात ).
  • मग त्यामध्ये धने आणि जिरे देखील भाजून घ्या आणि ते कढईतून बाहेर काढून ठेवा आणि थोडे गार होऊ द्या .
  • हे सर्व भाजलेले जिन्नस थोडे गार झाले कि ते सर्व एकर करा आणि ते घरगुती चक्की मधून दळून आणा.
  • आणि मग त्यामध्ये लाल तिखट, हळद, सुंठ, हिंग घाला आणि चांगले एकत्र करा.
  • मेतकुट तयार झाला आता तो डब्यामध्ये घालून ठेवा आणि तुम्हला जेंव्हा खावू वाटतो त्यावेळी भात किंवा भाकरी सोबत खा. मेतकुट २५ ते ३० दिवस चांगला टिकू शकतो.

मेतकुट कश्यासोबत खातात – serving suggestions

  • मेतकुट आपण दह्यामध्ये मिक्स करून भाजरी सोबत खावू शकतो तसेच गरम भातामध्ये तूप आणि मेतकुट घेवून खावू शकतो तसेच उत्तप्पा वर टाकून खावू शकतो तसेच मेतकुट मध्ये तूप मिक्स करून भाकरी सोबत खावू शकतो.

आम्ही दिलेल्या metkut recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मेतकूट रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या metkut powder recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि metkut bhat recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये metkut recipe marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!