दूध डेअरी व्यवसाय माहिती Milk Dairy Information in Marathi

Milk Dairy Information in Marathi – Dudh Utpadan Information in Marathi दुध व्यवसाय माहिती मित्रहो, दुधाचे उत्पादन करणे आणि त्यावर योग्य पद्धतीने संस्करण करून दुधाची विक्री करणे  तसेच, दुधापासून अनेक गोड पदार्थ बनविणे व बाजारामध्ये किंवा बेकरीमध्ये या पदार्थांची विक्री करणे इत्यादी गोष्टींचा खासकरून दुग्ध व्यवसायामध्ये समावेश केला जातो. याशिवाय, दुधाचे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये दुधाळ जनावरांचे प्रजनन, खाद्य, दूध काढणे आणि जनावरांची योग्यरित्या देखभाल करणे हे ओघानेच येते.

आजकाल दूध आणि त्यापासून उत्पादित होणारे इतर पदार्थ व्यवस्थितरीत्या हाताळण्याच्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या विकासामुळे, तसेच औद्योगिकीकरणामुळे होणाऱ्या शहरांच्या वाढीमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुधाच्या वाढत्या मागणीमुळे, खरंतर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच दुग्धव्यवसायाला कृषि अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे.

आशिया खंडाच्या नैर्ऋत्य भागांमध्ये ख्रि. पू. ९००० च्या जवळपास अनेक पशुपक्षी माणसाळविण्यात आले होते आणि याच काळात गाय सुद्धा माणसाळविण्यात आली असावी, असे संशोधकांच्या मते मानले जाते.

milk dairy information in marathi
milk dairy information in marathi

दूध डेअरी व्यवसाय माहिती – Milk Dairy Information in Marathi

दुध व्यवसाय माहिती – Dugdh Vyavsay Information in Marathi

याखेरीज गाय, शेळी आणि मेंढी या दुधाळ प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधाचा अन्न म्हणून उपयोग करण्याच्या पद्धतीचा प्रसार या प्रदेशातून दुसऱ्या राष्ट्रांत झाला असावा. मेसोपोटेमियातील म्हणजे आजच्या इराक, पूर्व सिरिया व दक्षिण–पूर्व तुर्कस्तान या प्रदेशांतील ख्रि. पू. ६००० वर्षांपूर्वीच्या सुमेरियन संस्कृतीच्या कालखंडामध्ये उदयास आलेल्या लेणी व कोरीव चित्रकलेच्या अभ्यासावरून त्या काळातील लोकांची दूध काढण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांच्या संबंधीचा उल्लेख होतो.

खरंतर दूध विरजणे, लोणी काढणे यांसारख्या अन्य क्रिया देखील सुमेरियन प्रजेने पहिल्यांदा केल्या असाव्यात असे मानले जाते. शिवाय, वैदिक ऋचा व संस्कृत वाङ्‌मयातील लिखित साधनांवरून दूध व त्यापासून उत्पादित होणाऱ्या लोणी, दही यांसारख्या इतर पदार्थांचा उपयोग भारतामध्ये ख्रि. पू. ६००० वर्षांपासून केला जात होता असेल, असे आपल्याला  दिसून येते.

त्याचबरोबर, महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि गवळणी यांच्या अनेक पारंपारिक कथा पूर्वीपासून भारतभर प्रचलित झालेल्या आहेत. अशा अनेक कथांमधून गाय, तिचे दूध व त्यापासून तयार करण्यात आलेले दही, ताक व लोणी यांसारखे पदार्थ भारतीय जीवनाशी संबंधीत असल्याचे आपल्याला दिसून येते.

शिवाय, ईजिप्शियन संस्कृतीमधील लोक म्हणजे ख्रि. पू. ३००० वर्षांपूर्वीचे अनेक लोक दूध, लोणी व चीज या पदार्थांचा त्यांच्या दैनंदिन जीवनात वापर करीत असत आणि हे लोक गायीच्या मागच्या बाजूने दूध न काढता त्यांना सोयीस्कर असलेल्या एका बाजूने दूध काढीत तसेच, दूध काढताना गायीच्या वासराचे पुढचे पाय बांधून ते गायीपुढे धरीत असतं.

या काळातील लोकांचा असाही समज होता की, भगवान ‘ताह’ वळूच्या रूपामध्ये प्रकट झाला होता. रोमन व ग्रीक लोक त्यांच्या रोजच्या आहारामध्ये दूध आणि चीज या पदार्थांचा अन्न म्हणून वापर करीत असतं.

या काळातील लोक गायीपेक्षा शेळ्या व मेंढ्या या दुधाळ प्राण्यांच्या दुधाचा उपयोग जास्त प्रमाणात करीत होते. शिवाय, दुधापासून तयार होणाऱ्या लोण्याचा वापर आपल्या कातडीवरील जखमांसाठी मलम म्हणून केला जात होता.

दुग्धोत्पादन व दुधाळ जनावरे

आज एकविसाव्या शतकात झालेल्या अनेक सुधारणांमुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे  दुग्धव्यवसायाच्या तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असे अनेक  बदल होत आहेत. तसेही, मुळात दुधाचे उत्पादन वाढविणे भारतीय व्यवसायांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते. याशिवाय, अठराव्या शतकाच्या मधल्या काळाच्या सुमारास दुधाळ गायींच्या पैदाशीच्या बाबतीत देखील अनेक महत्वाचे क्रांतिकारी बदल होत गेले.

यामध्ये इंग्लंडमधील ग्रामीण भागांत बऱ्याच शेतकऱ्यांनी गायींची दुग्धोत्पादक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने आनुवंशिकी सिद्धांतावर आधारित असे प्रजननाचे अनेक प्रयास केले आहेत. यासोबतच कळपामध्ये असणाऱ्या एकान-एक गायीच्या दररोजच्या दुग्धोत्पादनाची नोंद देखील होऊ लागली आहे आणि इतर गायींपेक्षा जास्त दुग्धोत्पादन करणाऱ्या गायींच्या वासरांची काळजी व्यवस्थितरीत्या  घेतली जाऊ लागली आहे.

तसेच, पैदाशीसाठी कळपांमध्ये अधिक दूध देणाऱ्या गायींच्या प्रजातीचा अधिकाधिक उपयोग केला जात आहे आणि यासोबतच निकृष्ट दर्जाचे दुग्धोत्पादन करणाऱ्या गायींच्या प्रजातीचा वापर कमी करण्यात येत आहे. खरंतर, दुसऱ्या एखाद्या कळपातील सिद्ध वळूचा उपयोग करून स्वतःच्या कळपातील पुढील पिढी दुग्धोत्पादन क्षमतेमध्ये परिपूर्ण ठरावी यासाठी प्रजननाचे नवीन धोरण ठरवण्यात येत आहे.

अशा प्रकारच्या यशस्वी ठरत असणाऱ्या विविध धोरणांसोबतच, उत्तम दर्जाचे दुग्धोत्पादन करणाऱ्या गायींची नोंद करण्यासाठी दर्जेदार संघटना देखील स्थापन झाल्या आहेत आणि गोपालक अशा संघटनांचे अथवा संस्थांचे सभासद होत आहेत, शिवाय एकत्रितरित्या काम केल्यामुळे या सभासदांमध्ये आपुलकीची व सहकाराची भावना निर्माण झाली आहे.

या सभासदांचे स्वभाव इतके जुळून येत आहेत की अशा बऱ्याच संघटनांनी वार्षिक दुग्धोत्पादन मोजण्याच्या पद्धतींसंबंधीचे अनेक नियम देखील तयार केले आहेत. या कामासोबतच त्यांनी दुग्धोत्पादनाच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याखेरीज, या सभासदांनी दुधाळ गायींच्या नोंदणी वह्या, त्यांचा वंशवृक्ष इत्यादी गोष्टींबद्दल माहिती नोंद करण्यासाठी अधिकृत अशा वंशावळी तयार केल्या आहेत.

यूरोपातील अनेक देशांमध्ये सुद्धा गरजेचे असणारे सर्व प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, अनेक देशांमध्ये गायींच्या जातीनुसार जातवार संघटना स्थापन झाल्या आहेत आणि अशा पद्धतीची पहिली संघटना इसवी सन १८९५ मध्ये डेन्मार्क या प्रदेशामध्ये स्थापन झाली आहे. मित्रहो, अमेरिकेमध्ये ‘स्टँडर्ड डेअरी हर्ड इम्प्रूव्हमेंट ॲसोसिएशन’ ही अशाच प्रकारची एक नामांकित संस्था आहे.

प्रजननातील संघटनेच्या या प्रयत्नांना जनावरांच्या खाद्यातील आणि व्यवस्थापनातील संशोधनाचा आधार मिळाल्यामुळे दुग्धोत्पादन अजुन किफायतशीर होऊ लागले आहे. पूर्णपणे नैसर्गिक असलेल्या हिरव्या चाऱ्यापासून अथवा गवतापासून मूरघास तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे, गुरांच्या चाऱ्याचा कस वाढला आहे.

दुग्धोत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पोषक अशा आहाराचा अभ्यास पशूंचे शरीरक्रियात्मक काम लक्षात घेऊन झाल्यामुळे संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व सर्वांना कळून आले आहे. शिवाय, दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये असलेल्या विविध पदार्थांच्या अन्नघटकांचे पोषणमूल्य काळजीपूर्वक अभ्यासण्यात आले आहे आणि अगदी त्या पद्धतीनेच पशूंचे पशुखाद्य उत्पादित करण्याचे कारखाने अस्तित्वात आले आहेत.

शिवाय, जास्तीत जास्त अर्थोत्पादनासाठी व्यवस्थापनामधील अत्यंत बारीकसारीक बाबींकडे व्यवस्थित लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर, दुधाळ पशूंच्या बाबतीत सर्वांत अधिक प्रमाणात आढळणारा लाळ रोग आणि अन्य संसर्गजन्य रोग यांचे निर्मूलन करण्यासाठी अनेक  प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत आणि या उपायांच्या सहाय्याने रोगराईला देखील पळवून लावले आहे.

भारतातील दुग्धव्यवसाय – Milk business information in Marathi

दूध आणि त्यापासून बनवण्यात आलेले विविध पदार्थ आपल्या भारत देशामध्ये फार प्राचीन काळापासून जरी वापरण्यात येत असले, तरीदेखील आपल्या देशातील दुग्धव्यवसाय मात्र मोठ्या प्रमाणात मोडकळीस आला होता आणि पूर्वी ज्याठिकाणी दुग्धव्यवसाय चालू होता तो केवळ आपल्या कौटुंबिक पातळीवरच चालला होता. त्याकाळी दुग्धव्यवसायाला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप फारसे काही नव्हते.

पूर्वीच्या काळी केवळ पावसावर अवलंबून असणारी  शेती करणारे अनेक लोक मुख्यत्वे शेतकामासाठी लागणाऱ्या बैलांच्या निपजीसाठी गायी आणि घरातील लोकांची दुधाची गरज भागविण्यासाठी जास्तीत जास्त एक किंवा दोन म्हशी पाळत असत. एकंदरीत, दुग्धोत्पादन आणि दुग्धव्यवसाय हा त्यांचा दुय्यम हेतू होता.

खरंतर, हेच लोक आपल्या भारत देशातील मुख्य दुग्धोत्पादक होते आणि ते अद्यापही आहेत. वर्षातील केवळ थोडेसेच महिने उपलब्ध होणारा, जनावरांना अपुरा पडणारा चारा, वाळके गवत आणि निकृष्ट दर्जाचे खुराक या गोष्टींमुळे दूध देणारी जनावरे देखील  निकृष्ट प्रतीची बनली गेली.

मित्रांनो, आपला भारत देश हा एक खंडप्राय देश आहे. दळणवळणाची साधने जास्त उपलब्ध नसल्यामुळे आणि दूध हा पदार्थ नाशवंत पदार्थ असल्यामुळे पूर्वीच्या अशिक्षीत लोकांनी आपल्या रस्त्यापासून जास्त लांबवर असलेल्या अन्य ग्रामीण भागांमधून दूध जमा करण्याचा म्हणावा तितका प्रयत्न केला नाही. त्यामुळे, शहरी भागांमध्ये दुधाचा पुरवठा खूपच अपुरा पडू लागला.

मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि मद्रास यांसारख्या अन्य शहरांमध्ये देखील बरेच लोक म्हशी पाळून दुधाचा व्यवसाय करत होते. सुरुवातीच्या काळात हे लोक ग्रामीण भागांमधून म्हशींची आयात करीत असतं आणि या म्हशी दूध देण्यासाठी असक्षम बनल्या की त्यांना शहरातील खाटिकखान्यात पाठवत असत. खरंतर मित्रहो, या कारणामुळे आपल्या देशातील दुधाळ म्हशींची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या milk dairy information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर दूध डेअरी व्यवसाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dudh utpadan information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि milk dairy business information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dugdh vyavsay information in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!