एमपीएससी टिप्स MPSC Study Tips in Marathi

mpsc study tips in marathi – mpsc preparation tips in marathi एमपीएससी टिप्स, आज आपण या लेखामध्ये एमपीएससी  काय आहे आणि एमपीएससी करण्यासाठी आणि या परीक्षेमध्ये आपण उतीर्ण होण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास करावा या बद्दल अनेक वेगवेगळ्या टिप्स पाहणार आहोत. एमपीएससी हि एक स्पर्धा परीक्षा आहे जी अनेक विद्यार्थ्यांच्या मार्फत दर वर्षी दिली जाते. एमपीएससी हा महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला एक आयोग आहे आणि या आयोगा मार्फत परीक्षा घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड केली जाते. एमपीएससी या आयोगाला मराठीमध्ये ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ म्हणून ओळखले जाते आणि या आयोगाचे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप ‘maharashtra public service commission’ असे आहे.

महाराष्ट्र सरकार दरवर्षी एमपीएससी मार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षा घेते. एमपीएससी हा आयोग अनेक परीक्षा घेतो म्हणजेच या आयोगा मार्फत वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्याआठी परीक्षा घेऊन त्यांची निवड त्या संबधित कामासाठी केली जाते आणि हि निवड सरकारी असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी हे पोलीस, वन, प्रशासन आणि अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांच्यासाठी परीक्षा घेते आणि त्यामधून पात्र विद्यार्थ्यांना भरती करून घेते.

एमपीएससी हि अशी परीक्षा आहे ज्यामध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी परीक्षा देतात आणि ह्या परीक्षेला स्पर्धात्मक रूप खूप आहे त्यामुळे हि परीक्षा उतीर्ण करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात तसेच अभ्यास देखील करावा लागतो परंतु हा अभ्यास आपण घरी बसून आणि काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून केला तर खूप फायद्याचे ठरते.

mpsc study tips in marathi
mpsc study tips in marathi

एमपीएससी टिप्स – MPSC Study Tips in Marathi

एमपीएससी विषयी माहिती 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी आयोगाची निर्मिती हि १५ नोव्हेंबर १९५६ रोजी झाली होती आणि या आयोगाचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे. एमपीएससी हा आयोग भारतीय राज्यघटनेने कलम ३१५ अन्वये चालवला जातो. एमपीएससी हा एक आयोग आहे ज्याच्या मार्फत महाराष्ट्र मध्ये स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक म्हणजे नागरी सेवा, संघ लोकसेवा आयोग आणि भारताची प्रमुख नियामक संस्था एमपीएससी द्वारे आयोजित केले जाते.

एमपीएससी म्हणजे काय ? 

एमपीएससी हि एक स्पर्धा परीक्षा आहे जी अनेक विद्यार्थ्यांच्या मार्फत दर वर्षी दिली जाते. एमपीएससी हा महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला एक आयोग आहे आणि या आयोगा मार्फत परीक्षा घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी युपीएससी आयोगा सारख्याच दर वर्षी परीक्षा घेते आणि एमपीएससी कोणकोणत्या आहेत त्या खाली आता आपण पाहूयात.

अ.     क्रपरीक्षा
१.        महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
२.        महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
३.        महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
४.        राज्य कर निरीक्षक परीक्षा
५.        दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ट न्यायालयीन परीक्षा
६.        महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
७.        महाराष्ट्र अधिनस्थ सेवा परीक्षा
८.        महाराष्ट्र प्रशासनातील पोलीस कर्मचारी गट अ आणि गट ब परीक्षा
९.        महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा
१०.    सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
११.    सहाय्यक परीक्षा
१२.    लिपिक टंकलेखन परीक्षा

एमपीएससी चा अभ्यासक्रम – mpsc syllabus in marathi

एमपीएससी हि एक महत्वाची नागरी सेवा परीक्षा आहे आणि हि परीक्षा घेण्यासाठी या परीक्षेचा अभ्यासक्रम हा ठरलेला आहे. चला तर मग आता आपण अभ्यासक्रम पाहूया.

 • भारताचा इतिहास ( history of india )
 • भारताची आणि महाराष्ट्र राज्याची राज्यव्यवस्था
 • भारतामधील आर्थिक आणि सामाजिक विकास ( economic and social development of India )
 • भारत आणि महाराष्ट्र राज्यातील सध्या चालू असणाऱ्या महत्वाच्या घडामोडी.
 • पर्यावरण आणि सामान्य विज्ञान
 • मुलभूत संख्याशास्त्र
 • तार्किक आणि विश्लेषण क्षमता.
 • इंग्रजी आणि मराठी भाषेसंबधी प्रश्न.

एमपीएससी साठी टिप्स आणि ट्रिक्स – mpsc preparation tips in marathi

mpsc crack tips in marathi

एमपीएससी  हि अशी परीक्षा आहे ज्यामध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी परीक्षा देतात आणि ह्या परीक्षेला स्पर्धात्मक रूप खूप आहे त्यामुळे हि परीक्षा उतीर्ण करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात तसेच अभ्यास देखील करावा लागतो. चला तर आपण आता पाहूया कि एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने कश्या प्रकारे टिप्स वापरून अभ्यास करावा.

 • या परीक्षेमध्ये सध्या देशामध्ये चालू असणाऱ्या महत्वाच्या घडामोडीवर खूप प्रश्न विचारले जातात त्यामुळे जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देणार आहे अश्या विद्यार्थ्याने देशामध्ये चालू असणाऱ्या सर्व घडामोडी जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी त्याने रोज बातम्या पहिल्या पाहिजेत तसेच त्या विद्यार्थ्याने रोज वर्तमानपत्र देखील वाचले पाहिजे कारण यामुळे सध्या चालणाऱ्या अनेक गोष्टी समजतात.
 • जर आपल्याला एमपीएससी चा अभ्यासक्रम आपण प्रथम समजावून घेतला तर आपल्याला अभ्यास करणे सोपे जाऊ शकतो आणि आपण अभ्यास करण्याची पध्दत ठरवू शकतो आणि त्यासाठी एक पॅटर्न ठरवता येतो आणि असे केल्याने आपल्याला अभ्यास करण्यासाठी सोपे जाऊ शकते.
 • अभ्यास करताना लक्ष देऊन आणि तुमचा आत्मविश्वास ठेऊन अभ्यास करा त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल.
 • एमपीएससी चा अभ्यास करत असताना तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवत रहा त्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते समजेल तसेच आपला अभ्यास देखील होईल.
 • ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी ची परीक्षा द्यायची आहे अश्या विद्यार्थ्यांनी रोज ९ ते १० तास अभ्यास केला पाहिजे तरच त्याच्या एमपीएससी  पूर्णपणे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो.
 • एमपीएससी  ची परीक्षा उतीर्ण होण्यासाठी भारतीय इतिहास, भारताची आणि महाराष्ट्र राज्याची राज्यव्यवस्था, देशातील महत्वाच्या चाली घडामोडी , अर्थीक आणि सामाजिक विकास या सारख्या विशायान्च्यावर भरपूर अभ्यास करा.
 • तसेच तुम्ही केलेल्या अभ्यासाचे सतत रिविझन करत रहा.
 • अभ्यास करत असताना तसेच जर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे जे प्रश्न सतत विचारले आहेत त्याचे नोट्स काढा तसेच महत्वाच्या विषयांच्यावर देखील नोट्स काढा.
 • यामध्ये परीक्षेचे तीन प्रकार असतात ते म्हणजे प्राथमिक परीक्षा ( preliminery ), मुख्य परीक्षा ( mains ) आणि मुलाखत. या मध्ये प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा हि लेखी असते त्यासाठी आपल्याला भारतीय इतिहास, भारताची आणि महाराष्ट्र राज्याची राज्यव्यवस्था, देशातील महत्वाच्या चाली घडामोडी , अर्थीक आणि सामाजिक विकास विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि मग या दोन्ही परीक्षेमध्ये उतीर्ण झाल्यानंतर मुलाखत असते त्यासाठी देखील तुम्ही तयारी करा यासाठी एमपीएससी ( MPSC ) च्या मागील मुलाखतीचे व्हिडीओ देखील ऑनलाईन असतात.

आम्ही दिलेल्या mpsc study tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एमपीएससी टिप्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mpsc syllabus in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि mpsc crack tips in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mpsc tips in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!