Mutton Recipe in Marathi झणझणीत मटण रेसिपी मटण म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण काही लोकांचे मटण हे खूप प्रिय असते. मटण हि रेसिपी नॉन व्हेजिटेरियन आहे आणि हि डिश नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या आवडत्या यादीतील एक आहे आणि मटण हि डिश खाल्ल्यामुळे अनेक नॉन व्हेजिटेरियन लोकांचे मन अगदी तृप्त होवून जाते. मटण हि रेसिपी जरी महाराष्ट्रीयन असली तरी हि रेसिपी भारतामध्ये अनेक ठिकाणी प्रेमाने बनवली जाते आणि आवडीने खाल्ली देखील जाते. मटण रेसिपी हि कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, लग्न आणि विशेषत: ईदच्या सणात दिल्या जाणार्या आश्चर्यकारक शाही भारतीय खाद्यपदार्थांपैकी एक आहे.
आणि हि डिश मेंढीच्या किंवा बकरीच्या मटणापासून बनवली जाते. मतान बनवण्याच्या दोन पध्दती आहेत त्या म्हणजे आपण मटण सर्व प्रथम पाण्यामध्ये शिजवून घ्यावे आणि मग त्यामधील पाणी काढून ते फोडणी द्यावे आणि दुसरी पध्दत म्हणजे एक भांड्यामध्ये मटणाच्या ग्रेविला फोडणी द्यायची.
आणि एक भांड्यामध्ये किंवा कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून त्याला कांद्याची फोडणी द्यायची आणि ते मटण त्या तेलामध्ये टाकून त्यामध्ये मीठ घालून ते थोडा वेळ भाजून ते तेलामध्येच शिजवून घ्यायचे. जर आपण तेलामध्येच मटण शिजवून घेतले तर ते खूप छान लागते म्हणून मटण बनवताना शक्यतो हीच पध्दत वापरण्याचा प्रयत्न करा. आता आपण या लेखामध्ये तिखट आणि मसालेदार मटण कसे बनवायचे आणि ते पाहूयात.
झणझणीत मटन रेसिपी मराठी – Mutton Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
मटण म्हणजे काय ?
मटण हे एक मेंढीचे किंवा बकरीचे मांस असते ज्याचे बारीक बारीक बारीक तुकडे केले जातात आणि त्याला तेलामध्ये अनेक मसाल्याची फोडणी देवून शिजवून मऊ बनवले जाते.
- नक्की वाचा: बटर चिकन रेसिपी मराठी
- मटण – मटण हे एक मेंढीचे किंवा बकरीचे मांस असते ज्याचे बारीक बारीक बारीक तुकडे असतात ते शिजवले जाते आणि त्याला तेलामध्ये कांदे, लाल तिखट, मटण मसाला याची फोडणी दिले जाते आणि त्यामध्ये खोबऱ्याचे वाटण घालून ग्रेवी बनवली जाते.
- मटण मसाला – मटण मसाला हा घटक देखील या पदार्थातील महत्वाचा घटक आहे कारण या मसाल्यामुळे मटणाला एक वेगळीच चव येते आणि आणि आपले मटण मसालेदार बनते.
- लाल मिरची पावडर – झणझणीतपणा हे या पदार्थाचे वैशिष्ट्य आहे आणि हा झणझणीतपणा लाल तिखट घातामुळे येतो म्हणून लाल मिरची पावडर देखील हा पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे.
मटण रेसिपी – mutton masala recipe marathi
मटण रेसिपी हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे आणि या डिशचा झणझणीतपणा अनेक लोकांना आकर्षित करतो. मटण रेसिपी हि कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, लग्न आणि विशेषत: ईदच्या सणात दिल्या जाणार्या आश्चर्यकारक शाही भारतीय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आता आपण मटण रेसिपी कशी बनवायची आणि मटण रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ४० मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
मटण बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरी उपलंध असते असे नाही. मटण बनवताना आपल्याला काही साहित्य बाजारातून विकत आणावे लागते जसे किं मटण, मटण मसाला आणि इतर काही साहित्य जे घरामध्ये उपलब्ध नाही. चला तर मग पाहूयात मटण बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- अर्धा किलो मटण ( मध्यम आकाराचे मटण तुकडे ).
- ३ मध्यम आकाराचे कांदे ( बारीक चिरलेले ).
- २ दालचिन तुकडे, १२ बदाम फुल आणि १ वेलदोडा.
- ५० ग्रॅम तीळ.
- १ मोठा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा आल्याचे तुकडे.
- १५ ते १६ लसून पाकळ्या ( सोललेल्या ).
- २ वाटी ओलं खोबरे ( किसलेले ).
- १/२ चमचा हळद.
- दीड चमचा गरम मसाला पावडर.
- १ चमचा मटण मसाला.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- कोथिंबीर ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- मटण बनवताना सर्वप्रथम बाजारातून विकत आणलेले मटण तुकडे प्रथम स्वच्छ धुवून घ्या आणि जर गरज असेल तर ते थोडे चिरून घ्या.
- आता गॅसवर कढई मध्यम आचेवर ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तीळ, २ दालचिन तुकडे, १२ बदाम फुल आणि १ वेलदोडा टाकून ते भाजून घ्या. मसाल्यांचा भाजताना थोडा वास सुटला की गॅस बंद करा आणि ते मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची बारीक पावडर करा. आणि ते मिश्रण एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवा.
- आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे, लसून, आलं आणि कोथिंबीर घ्या आणि त्याची देखील बारीक पेस्ट करा.
- आता त्यामध्ये बारीक केलेला वाटीतील मसाला घाला आणि थोडे पाणी घाला आणि ते दोन्ही मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आणि ते मिश्रण बाजूला ठेवा.
- आता एक कढई घ्या आणि त्यामध्ये २ मोठे चमचे तेल घाला आणि तेला गरम झाले कि त्यामध्ये थोडा कांदा टाका आणि तो चांगला भाजून घ्या. कांदा लालसर झाला कि त्यामध्ये मटण आणि चवीपुरते मीठ घाला आणि ते २ मिनिटे भाजा म्हणजे मिठामुळे मटणाला पाणी सुटेल. आता त्यावर झाकण ठेवा आणि ते मटण १० ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
- तोपर्यंत मटणाची ग्रेवी बनवून घ्या, ग्रेवी बनवण्यासाठी एक भांडे घ्या आणि त्यामध्ये अर्धा मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा घाला आणि त्याला लालसर रंग येईपर्यंत भाजा आणि मग त्यामध्ये टोमॅटो घाला आणि तो टोमॅटो तेलामध्ये थोडा मऊ होईपर्यंत शिजवा.
- आता त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, मटण मसाला घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- आता या मिश्रणामध्ये वाटलेला मसाला घाला आणि आणि तो चांगला एकजीव करून २ ते ३ मिनिटासाठी भाजा आणि मग त्यामध्ये तेलामध्ये शिजवलेले मटण कांदा आणि तेलासोबत घाला आणि ते मिक्स करा.
- आता या मिश्रणामध्ये थोडे पाणी आणि मीठ ( चवीनुसार ) घालण्याची गरज असेल तर त्यामध्ये थोडे पाणी आणि मीठ घाला आणि हे मटण ५ ते ६ मिनिटे मंद आचेवर झाकण लावून परत शिजवून घ्या.
- मटण शिजल्यानात्र गॅस बंद करा आणि त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर टाका.
- तुमचे झणझणीत आणि मसालेदार मटण तयार झाले.
मटण कश्या सोबत खातात – serving suggestion
मटण हि डिश आपण रोटी, चपाती, नान, भाकरी किंवा पांढऱ्या भातासोबत खावू शकतो परंतु मटण हा पदार्थ भाकरीसोबतच खूप छान लागतो.
आम्ही दिलेल्या mutton recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर झणझणीत मटण रेसिपी मराठी mutton masala recipe marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kolhapuri mutton rassa recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mutton curry recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mutton gravy recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
Can I have the latest information on your recipe
yes