माझा आवडता विषय गणित मराठी निबंध My Favourite Subject Maths Essay in Marathi

My Favourite Subject Maths Essay in Marathi माझा आवडता विषय गणित निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता विषय गणित या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपण ज्यावेळी शिक्षण घेत असतो त्यावेळी आपण अनेक विषय शिकतो. शाळेमध्ये असताना ठरलेले विषय असतात जसे कि मराठी, विज्ञान, समाज शास्त्र, गणित आणि हिंदी यासारखे अनेक विषय असतात तसेच आपण कॉलेज मध्ये गेल्यानंतर आपण ज्या विभागातून शिक्षण घेणार आहोत जसे कि कला, वाणिज्य आणि विज्ञान आणि या प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे विषय असतात. उदाहरणार्थ वाणिज्य विभागामध्ये अर्थशास्त्र, व्यापार शास्त्र, अकाऊंट, व्यवस्थापन या सारखे अनेक विषय असतात.

पण शाळेमध्ये जे विषय असतात ते प्रत्येक शाळेमध्ये एकच असतात आणि ते ठरलेले विषय असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना कोणता ना कोणता तरी विषय शाळेमध्ये आवडता असतोच आणि माझा देखील एक आवडता विषय होता आणि तो म्हणजे गणित. गणित हा विषय शक्यतो सर्वांचा नावडता विषय किंवा खूप अवघड विषय म्हणून नावडता विषय असतो परंतु गणित हा विषय माझा खूप आवडता होता आणि शाळेमध्ये असताना मला गणिताच्या वेगवेगळ्या गणना सोडवण्यासाठी खूप आवडायचे.

my favourite subject maths essay in marathi
my favourite subject maths essay in marathi

माझा आवडता विषय गणित मराठी निबंध – My Favourite Subject Maths Essay in Marathi

Maza Avadta Vishay Marathi Nibandh

बहुतेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडत नाही कारण या विषयातील गणिते असतात ती अवघड असतात आणि अनेकांना हि गणिते सोडवणे अवघड वाटते आणि तसेच परीक्षा देखील असली कि त्यांना फक्त गणित या विषयाची काळजी असते परंतु माझे तसे नाही मला गणित हा विषय शाळेमध्ये असताना खूप आवडायचा आणि आजही आवडतो आणि मी शाळेमध्ये असताना गणिताचा तास असला कि खूप उत्साही व्हायचो तसेच गणिताच्या तासाला मी सर्व उत्तरे देत होतो किंवा जर मला काही समजले नाही तर मी लगेच माझ्या मनातील शंका सरांना विचारात होतो त्यामुळे मी सरांचा आवडता विध्यार्थी होतो.

गणित हा विषय जरी आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये महत्वाचा विषय असला तरी गणित या विषयापासून आपल्याला एक बोध मिळतो तो म्हणजे गणित म्हणजेच चुकत राहून प्रयत्न करणे आणि शेवटी उत्तर काढणे आणि या तून आपल्याला असे शिकायला मिळते कि सोडू नका, प्रयत्न करत रहा तुम्हाला तुमच्या समस्यावर उपाय नक्कीच मिळेल. गणित हा विषय माझा आवडता विषय आहे आणि मी सतत कोणत्या न कोणत्या प्रकारची गणिते सोडवत असते आणि त्यामुळे आणखीन गणितातील समस्या सोडवण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे.

तसेच गणिते सोडवताना माझ्या मेंदूचा देखील व्यायाम होते आणि तसेच गणिताचा सराव झाल्यामुळे गणित सुधारते आणि या सर्वामुळे मला गणित आणखीनच आवडायला लागते तसेच जर मला गणितामध्ये एकाधे अवघड गणित पहिल्या प्रयत्नामध्ये सोडवायला आले तर माझा आनंद गगनाला मावत नाही. गणिते सोडवल्यामुळे माझी उर्जा, माझा आत्मविश्वास आणि विचार करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे माझ्या इतर गोष्टीमध्ये देखील सुधारणा दिसून येते.

माझा गणित हा विषय आवडता असल्यामुळे मला कोणत्याही प्रकारचे गणित दिले तर मी लगेच आणि कोणतीही समस्या न येता सोडवू शकतो तसेच गणितामधील कोणतेही गणित न चुकता सोडवल्यामुळे माझे गणिताचे शिक्षक माझे कौतुक करतात आणि शाळेमध्ये मला गणिताचा एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जाते.

आमचे गणिताचे शिक्षक हे जगातील उत्तम शिक्षक आहेत असे मला वाटते कारण आमचे गणिताचे शिक्षक गणिताच्या तासामध्ये गणिते शिकवताना आम्हाला बोरिंग नको वाटायला म्हणून अंकावर आधारित मनोरंजक कोडी कशी सोडवायची तसेच विषयामध्ये असणारी गणिते मनोरंजकपणे आणि सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे सांगत होते त्यामुळे आम्हाला गणित हा विषय खूप अवघड वाटत नव्हता तर हा विषय आम्हाला सोपा वाटायचा.

तसेच परीक्षा सुरु झाल्यानंतर ज्या दिवशी गणित विषय असायचा त्यावेळी माझ्या वर्गातील इतर मुले खूप काळजीत आणि गोंधलेले असायचे परंतु मी गणिताच्या पेपरच्या दिवशी खूप बिनधास्त असायचो कारण मी वर्षभर गणित विषयाचा खूप अभ्यास केलेला असायचा आणि माझा गणित हा विषय आवडत असल्यामुळे मला गणितामध्ये अवघड असे काही वाटायचे नाही. त्यामुळे मी गणिताच्या पेपरच्या दिवशी खूप आनंदी असायचो आणि पेपर देखी चांगल्या प्रकारे लिहायचो आणि गणितामध्ये मला चांगले गुण देखील मिळायचे.

गणित हा विषय आपल्यासाठी फक्त शाळेमध्ये उपयुक्त असतो असे नाही तर गणित ह आपल्या आणि सर्वांच्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगाचा आहे कारण सध्याच्या जगामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेगवेगळे पैश्याचे तसेच अनेक व्यवहार करतो आणि त्यासाठी गणित करणे हे महत्वाचे असते त्यामुळे चांगले गणित हे आपल्या आयुष्याची शिदोरी आहे असे आपण जर म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही.

शाळेमध्ये असताना आपल्याला अधिक. वजाबाकी, भागाकार, गुणाकार आणि टक्केवारी काढणे यासारखी गणिते सोडवण्यासाठी असतात तसेच बीजगणित, व्यापाराविषयी आणि व्यवहार विषयी गणिते देखील आपल्या शाळेमध्ये शिकण्यासाठी असतात आणि याप्रकारची गणिते हि आपल्याला आपल्या आयुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील उपयुक्त ठरतात आणि त्यामुळे मला आनंदच आहे कि माझा आवडता विषय हा गणित आहे. गणित हा विषय मला इतका आवडतो कि मी आता देखील मोबाईल मध्ये गणिताविषयक गेम्स डाऊनलोड करून रिकाम्या वेळी खेळत बसतो तसेच मी शाळेमध्ये असताना देखील तासंतास गणिते सोडवत होते.

आणि त्यामुळे मला सध्या माझ्या आयुष्यामध्ये खूप मदत झाली आहे. कॉलेज मध्ये गेल्यानंतर मी माझा गणित हा विषय चांगला असल्यामुळे वाणिज्य ( commerce ) हा विषय घेवून त्यामध्ये ग्रॅज्युयेशन पूर्ण करून सी ए ( C.A ) करण्याचे ठरवले. वाणिज्य विषयामध्ये शाळेप्रमाणे मला अंक आणि अंकांच्या सोबत खेळायला खूप आवडते त्यामुळे मला कॉलेज मध्ये देखील मला अकाऊंट हा विषय खूप आवडायला लागला आणि मी या विषयामध्ये मी गुंतता गेलो तसेच मला अकाऊंट हा विषय देखील खूप आवडायला लागला आणि मी रोज अकाऊंट चे वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवायला लागले.

अशा प्रकारे मी माझे ग्रॅज्युयेशन वाणिज्य ( commerce ) मधून पूर्ण केले आणि मग मी सी ए ( C.A ) करण्याचा जो निश्चय होता तो थोडे दिवस स्थगित ठेवला आणि फायनान्स हा विषय घेऊन एम. बी. ए ( MBA ) केले आणि मग थोड्या दिवसांनी जॉब लागल्यानंतर जॉब करता करता सी ए ( C.A ) केले आणि थोड्या दिवसांनी मला सी ए ( C.A ) बनण्यास देखील यश आले आणि हे सर्व शक्य झाले.

कारण मला लहानपणी गणिताची आवड असल्यामुळे आणि मी गणिते लक्ष देवून शिकल्यामुळे मला नंतर देखील गणिता संबधित विषय सोपे गेले आणि मी माझ्या आयुष्यामध्ये माझे स्वप्न पूर्ण करू शकले आणि म्हणून मला ज्यांना गणित विषय आवडत नाही तसेच गणित कंटाळवाणे वाटते  त्यांना मला असे सांगायचे आहे कि गणित हा विषय खूप सोपा आहे आणि या विषयामध्ये आपण थोडे प्रामाणिक प्रयत्न घेतले तर गणित हा विषय कोणालाही सोपा जाईल.

आम्ही दिलेल्या My Favourite Subject Maths Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता विषय गणित मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on my favourite subject maths in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Maza Avadta Vishay Marathi Nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!