मैसूर पाक रेसिपी Mysore Pak Recipe in Marathi

Mysore Pak Recipe in Marathi मैसूर पाक रेसिपी मैसूर पाक हि रेसिपी एक गोड मिठाई आहे जी कर्नाटक राज्यातील म्हैसूर या शहरामध्ये सर्वप्रथम बनवण्यात आली होती आणि या रेसिपीचा मोठा इतिहास देखील आहे. मैसूर पाक हि मिठाई कोणाला माहित नाही? हि मिठाई सर्वांना माहित आहे आणि लहान मुलांची तर आवडत्या मिठाई पैकी एक आहे. मैसूर पाक हि बर्फी जरी कर्नाटकातील खासियत असली तरी हि मिठाई भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते आणि आवडीने खाल्ली जाते तसेच मैसूर पाक कर्नाटक तसेच इतर राज्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही बेकरीमध्ये हमखास असते.

मैसूर पाक हा तोंडामध्ये टाकताच विरघळणारा पदार्थ असून हा पदार्थ साखरचा पाक, हरभरा डाळीचे पीठ / बेसन आणि तूप या पासून बनवला जातो. काही लोक असा विचार करतात कि मैसूर पाक घरामध्ये करणे अवघड आहे आणि म्हणून ते त्यांना खावू वाटल्यास किंवा एकाद्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी मैसूर पाक बाजारातून किंवा बेकरीतून विकत आणतात.

परंतु मैसूर पाक बर्फी घरामध्ये बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कानी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनते. चला तर आज आपण मैसूर पाक बनवायचा या बद्दल पाहणार आहोत.

 mysore pak recipe in marathi
mysore pak recipe in marathi

मैसूर पाक रेसिपी – Mysore Pak Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाकर्नाटक ( म्हैसूर )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

मैसूर पाक बर्फीचा शोध कसा लागला आणि या बर्फीला मैसूर पाक असे नाव कसे मिळाले ?

२० व्या शतकामध्ये ज्यावेळी म्हैसूर पॅलेस मध्ये सहावा कृष्ण राजा वाडियार याचे राज्य होते त्यावेळी तेथे असणाऱ्या स्वयंपाकिंच नाव काकसूर मडप्पा असे होते आणि तिने एके दिवशी राजासाठी जेवण बनवले होते आणि ते ताटामध्ये वाढले देखील होते पण ताटामध्ये तिला काही तर कमी वाटत होते.

म्हणजेच ती ताटामधील रोज बनवत असलेला गोडाचा पदार्थ विसरली होती म्हणून तिने गडबडीने साखरेच्या पाकामध्ये डाळीचे पीठ घालून एक बर्फी बनवली आणि ती जेवणाच्या शेवटी राज्याला खायला दिली. ती बर्फी राजाने खाल्ली आणि ती राजाला खूप आवडली आणि म्हणून राजाने स्वयंपाकिनला बोलावले आणि तिला त्या पदार्थाचे नाव विचारले परंतु तिने हा पदार्थ गडबडीने बनवला होता.

आणि पहिल्यांदाच बनवला होता त्यामुळे तिला या पदार्थाचे नाक काय संगाचे ते सुचे म्हणून तिने मैसूर पाक असे नाव सांगितले. मैसूर हे  पॅलेसचे नाव होते पाक ( कन्नड ) या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये मिठाई असा होतो. राजाला हा पदार्थ खातच असे वाटले कि हि सुंदर मिठाई लोकांना देखील खाता यावी म्हणून त्यांनी हि मिठाई पॅलेसच्या बाहेर विक्रीसाठी ठेवली. अश्या प्रकारे हि बर्फी आता देशभरामध्ये लोकप्रिय मिठाई म्हणून ओळखली जाते.

मैसूर पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – key ingredients

  • साखर : साखर हा मैसूर पाक बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे कारण यापासून बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पाक बनवला जातो आणि यामध्ये डाळीचे पीठ मिक्स केले जाते तसेच साखरेच्या प्रमाणावर आपली मिठाई कमी गोड किंवा जास्त गोड करता येते.
  • बेसन / डाळीचे पीठ : बेसन देखील मैसूर पाक बनवण्यासाठी लागणारा एक मुख्य घटक आहे जो बनवलेल्या साखरेच्या पाकामध्ये घातला जातो आणि शिजवला जातो.

मैसूर पाक रेसिपी – how to make mysore pak recipe in marathi

मैसूर पाक हि एक प्रकारची गोड मिठाई आहे जी कर्नाटक राज्यासोबत भारतामध्ये इतर ठिकाणी देखील बनवली जाते आणि हि भारतामधील एक लोकप्रिय मिठाई आहे. कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनणारी हि सोपी रेसिपी कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात मैसूर पाक कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४५ मिनिटे
पाककलाकर्नाटक ( म्हैसूर )
बनवण्याची पध्दतखूप सोपी

मैसूर पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mysore pak recipe 

मैसूर पाक बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते बहुतेक वेळा घरामध्ये उपलब्ध असते त्यामुळे आपल्याला बाजारातून काही विकत आणून मग मिठाई करावी लागत नाही. चला तर मग मैसूर पाक बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी डाळीचे पीठ.
  • २ वाटी साखर
  • १ वाटीला थोडे कमी पाणी.
  • २ वाटी तूप किंवा डालडा.
  • १ चमचा बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा.

मैसूर पाक बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make mysore pak recipe 

  • सर्व प्रथम बेसनाचे पीठ एका चाळणीने चाळून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये २ वाटी साखर आणि १ वाटीला थोडे कमी पाणी घाला आणि त्याचा मध्यम आचेवर पाक बनवून घ्या. मैसूर पाक बनवण्यासाठी आपल्याला एक तारी पाक बनवावा लागतो त्यामुळे पाक थोडा घट्ट झाला कि चमच्याने थोडासा पाक एका वाटीमध्ये काढा आणि दोन बोटांच्या मधी धरून पहा जर त्याची एक तार झाली तर तो पाक झालेला असतो.
  • आता या पाकमध्ये आपण चाळून ठेवलेले पीठ घाला आणि ते चांगले हलवा आणि पीठ घातल्या नंतर गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
  • मग दुसरीकडे गॅसवर तूप ठेवा आणि ते गरम करून घ्या.
  • आता चमच्याने २ ते ३ चमचे तूप साखरेच्या पाकाच्या आणि पिठाच्या मिश्रणामध्ये घाला आणि ते सतत हलवत रहा आणि तूप चांगले पिठामध्ये मिक्स झाले कि त्यामध्ये परत २ चमचे तूप घालून परत ते सतत हलवत रहा जोपर्यंत तूप पिठामध्ये चांगले मिक्स होणार नाही. अशी प्रक्रिया ३ ते ४ वेळा करा आणि मग त्यामध्ये खायचा सोडा घाला आणि पीठ चांगले हलवून ते घट्ट होईपर्यंत शिजवा आणि मग ते एक तूप लावलेल्या ताटामध्ये काढून ते पसरा आणि ते वरून थोडे सपाट करा आणि ते थोडे गार होऊ द्या.
  • ते थोडे गार झाले कि त्याच्या वड्या पाडून ते आणखीन थोडे गार होऊ द्या.
  • ह्या वड्या पूर्णपणे गार झाल्या कि त्या एक डब्यामध्ये काढून त्या आपण ४ ते ५ दिवस ठेवू कधी हव्या तेंव्हा खावू शकतो.

टिप्स (Tips)

  • मैसूर पाकला थोडा रंग येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडा केसरी किंवा पिवळा तुम्हाला आवडेल तो रंग घालू शकतो.
  • मैसूर पाक बनवताना पाक हा महत्वाचा भाग असतो कारण पाक बिघडला कि आपली संपूर्ण रेसिपी बिघडते त्यामुळे पाक बनवताना लक्षपूर्वक बनवा.
  • मैसूर पाकमध्ये खायचा सोडा वापरण्याचे एकमेव कारण म्हणजे तो सोडा घातल्यामुळे जाळीदार बनतो.

आम्ही दिलेल्या mysore pak recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मैसूर पाक रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mysore pak recipe in marathi madhurasrecipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mysore pak recipe in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mysore pak recipe in marathi chakli Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!