Nana Fadnavis Biography in Marathi – Nana Fadnavis Information in Marathi नाना फडणवीस यांची माहिती नाना फडणवीस पुण्यातील पेशवे प्रशासनाच्या काळात मराठी साम्राज्याचे एक प्रभावशाली मंत्री व राजकारणी होते. पेशव्यांच्या कारकिर्दीतील ते मराठा साम्राज्याचे प्रमुख मंत्रींपैकी एक होते. त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग घडले हे सगळे प्रसंग एकत्रित केले तर एखादा चित्रपट बघितल्या सारखं वाटते. नाना फडणवीस यांनी मराठा साम्राज्य मध्ये महत्त्वाचं स्थान कस प्राप्त केलं हे आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासातील साडेतीन शहाणे पैकी अर्धे शहाणे म्हणून त्यांची ओळख आहे.
पूर्ण नाव (Name) | नाना फडणवीस |
जन्म (Birthday) | १७४२ |
जन्म गाव (Birth Place) | सातारा |
राष्ट्रीयत्व (Citizenship) | भारतीय |
ओळख (Identity) | प्रभावशाली मंत्री व राजकारणी |
मृत्यू | १३ मार्च १८०० |
जन्म
नाना फडणवीस यांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथील चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण नाव बालाजी जनार्दन भानू आहे. ते खरं तर मूळचे रायगड येथील श्रीवर्धनचे आहेत. परंतु त्यांचे आजोबा बाळाजी महादाजी भानू हे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या काळात स्थलांतरित झाले.
नाना फडणवीस यांचे बालपण नानासाहेब पेशवे यांच्या सान्निध्यात गेलं त्यामुळे नकळत त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळालं. नाना वीस वर्षाचे असताना त्यांना थोरल्या माधवराव कडून फडणीशीची वस्त्रे मिळाली. नाना हे लहानपणापासूनच कर्तृत्ववान होते. त्यांच्या चातुर्या यामुळे त्यांना चाणक्य असे देखील संबोधले जाते.
कारकीर्द
नाना फडणवीस यांच्या शिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास अपूर्ण आहे. नाना फडणवीस यांचे पूर्ण नाव बालाजी जनार्दन भानू आहे त्यांना लाडाने नाना असे नाव देण्यात आले होते. आणि फडणवीस हि पेशवेकालीन एक पदवी आहे. ते बाळाजी महादजी भानू यांचे नातू होते आणि त्यांना ही पदवी परंपरागत प्राप्त झाली होती. भट कुटुंब आणि भानू कुटुंब यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती कारण बाळाजी महादजी यांनी एकदा पेशव्यांना मोगलांच्या खुनाच्या कटातून वाचवले होते.
तेव्हा पेशव्यांनी भानू कुटुंबाला वचन दिल की आमच्या प्रत्येक भाकरीतील चतकोर आम्ही तुम्हाला देऊ. म्हणून पेशव्यांनी छत्रपती शाहू कडे बाळाजी महादजी यांना फडणवीस ही पदवी द्यावी म्हणून शिफारस केली. ज्यावेळी पेशवे राज्याचे वास्तविक प्रमुख बनले तेव्हा फडणवीस ही पदवी त्यांनी भानु यांना दिली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर नाना फडणवीस मंत्री म्हणून नावारूपास आले. नाना फडणवीस यांनी मराठ्यांना त्यांची प्रतिष्ठा आणि सत्ता परत मिळवून देण्यामध्ये मोलाची भर घातली.
त्यावेळी नाना फडणवीस यांनी आपल्या तीव्र राजकीय बुद्धीच्या जोरावर मराठा सुस्थितीत आणू शकले. नाना फडणवीस वीस वर्षाचे असताना त्यांना फडणवीस ही पदवी देण्यात आली. पुढे नाना फडणवीस यांनी आपल्या चातुर्याने पेशव्यांच्या राजवटीत मराठा साम्राज्यासाठी प्रशासन आणि वित्त ही महत्त्वाची खाती सांभाळली. पेशव्यांनी नाना फडणवीस यांची आपल्या कुटुंबाप्रमाणेच देखभाल केली व त्यांना तशीच वागणूक दिली त्यांचे पुत्र विश्वासराव, माधवराव व नारायणराव यांच्या प्रमाणे नाना फडणवीस यांनादेखील शिक्षण आणि मुत्सद्दी प्रशिक्षणाच्या सुविधा पुरवल्या.
चौथे पेशवा माधवराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव पेशव्यांच्या गादीवर बसले परंतु नारायणरावांचे काका रघुनाथराव यांना ते मान्य नव्हतं त्यांना स्वतः गादीवर यायचं होतं म्हणून त्यांनी भावाची हत्या केली त्यानंतर रघुनाथराव स्वतः काही काळ पेशवे झाले. परंतु हे कोणाला मान्य नव्हतं नारायणरावांची हत्या झाली तेव्हा त्यांची पत्नी गरोदर होती तिने सवाई माधवराव नावाच्या मुलाला जन्म दिला. त्या वेळी नाना फडणवीस यांनी १२ सदस्यीय रीजन्सी कौन्सिल स्थापन केली. ४१ दिवसाच्या माधवरावांना पेशवा म्हणून घोषित केले आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यकारभार सुरू झाला.
हा अस्थिरतेचा काळ होता आणि त्या काळामध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशव्यांची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने नाना फडणवीस यांनी पुन्हा रुळावर आणली आपल्या मराठा सत्तेचे वर्चस्व कायम टिकवून ठेवले. अंतर्गत मतभेद आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या सामर्थ्याच्या दरम्यान मराठा महासंघाला एकत्र ठेवण्यासाठी नाना फडणवीस यांनी भरपूर मोलाची भूमिका बजावली आहे.
नाना फडणवीस अतिशय हुशार मनुष्य होते त्यांनी आपले प्रशासकीय मुत्सद्दी आणि आर्थिक कौशल्य वापरून मराठा साम्राज्यात भरभराट केली आणि त्यांच्या बाह्य व्यवहाराचे व्यवस्थापन आणि मराठा साम्राज्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दोरा पासून दूर ठेवले. हैदराबादचा निजाम हैदर अली आणि मैसूरचा टिपू सुलतान आणि इंग्रज सैन्याविरुद्ध मराठा सैन्याने जिंकलेल्या विविध लढायांमध्ये नाना फडणवीस यांनी सर्वोत्तम युद्ध कौशल्य प्रदर्शित केलेली आहेत.
या काळामध्ये मराठा साम्राज्याचा आकार लक्षणीय होता. पेशव्यांना सर्वोच्च सत्ता म्हणून मान्यता देण्यात आली. फडणवीस यांच्याकडे दूरदृष्टी होती त्यांना ठाऊक होतं की जर मराठे इंग्रजांना बळी पडले तर संपूर्ण प्रदेश ब्रिटिश साम्राज्य मध्ये समाविष्ट होईल म्हणून त्यांनी आपल्या चातुर्याने आपल्या हितासाठी अधिक सक्षम समूहासोबत मैत्री करण्याचा निर्णय घेतला १७७७ मध्ये नाना फडणवीस यांनी फ्रेंच ना पश्चिम किनारपट्टीवर एक बंद दिला त्यामुळे इंग्रजांनी पुन्या कडे आगेकूच केली आणि वडगाव येथे लढाई झाली या लढाईत मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि वडगावचा तहावर स्वाक्षरी करण्यास त्यांना भाग पाडले.
या तहानुसार इंग्रजांनी १७७३ पासून त्यांच्या ताब्यात घेतलेला सर्व प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात द्यावा लागला. फडणवीस यांनी हैदराबादचा निजाम अकोटचा नवाब आणि मुगल सम्राट यांच्यासोबत इंग्रजांविरुद्ध करार केले. नाना फडणवीस यांनी पानिपत प्रत्यक्षात बघितलं होतं पानिपत मध्ये बातम्या वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते आणि ही चुक नाना फडणीस यांना पुन्हा होऊ द्यायची नव्हती म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस व नजरबाज यांची मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आणि या कारणास्तव नानांना फक्त हिंदुस्थानात तिलच नाही तर परदेशातील बातम्या देखील चुटकीसरशी कळायच्या.
कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, गोसावी अशी अनेक अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे बातम्या मिळवण्यासाठी नेमली होती. ही सर्व मंडळी आपल्या कामामध्ये इतकी उत्तम होती की ते नाना फडणवीस यांना कित्येक लोकांच्या रोजकिर्दी च्या बातम्या देखील सांगत असत. नाना फडणवीस यांचे विश्वासू मंत्री होते म्हणूनच त्यांच्यावर संपूर्ण पेशव्यांची जबाबदारी होती त्यांनी राज्यकारभारात वेगवेगळ्या सुधारणा घडवून आणल्या पडत जमिनी लागवडीखाली आणल्या नवीन वसाहतींची निर्मिती केली. सरकारी कामांमध्ये दक्षता आणि टापटीप पणा आणला. गावातून पिकाऊ जमिनीचाच सारा गोळा करावा आणि दरवर्षी मामलेदार बदललेच पाहिजेत हे काही नियम त्यांनी लागू केले.
नाना फडणीस
यांच्या वर आधारित पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून सुरू झालेला स्वराज्य विस्तार पुढे अनेक पिढ्या वेगवेगळ्या वीरांनी जपण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक म्हणजे नाना फडणीस होते त्यांनी मराठा साम्राज्य अगदी दुरपर्यंत पोहोचवलं. मराठा साम्राज्याची विस्कटलेली घडी त्यांनी आपल्या कुशल बुद्धिमता च्या जोरावर पुन्हा बसवली. ते त्यांच्या चातुर्या साठी नावाजले जायचे. मराठ्यांचा इतिहास नाना फडणीस त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच हा इतिहास पानावर उतरवण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी केला.
नाना फडणीस यांच्या कारकिर्दीचे दाखले देणारे अनेक पुस्तके उपलब्ध आहेत त्यातीलच काही पुस्तके खालील प्रमाणे. नाना आणि महादजी ही कादंबरी लेखिका कुंदन तांबे यांनी लिहिलेली आहे. नाना फडणवीस यांचे आत्मचरित्र (लेखिका सुहासिनी इरलेकर) , नाना फडणवीस य.ना. देवधर, नाना फडणवीस यांचे चरित्र – वासुदेव वामनशास्त्री खरे, नाना फडणीस आणि मराठी राज्य प्रशासन – डॉ. मी. रा कुलकर्णी, पेशवाईतील साडेतीन शहाणे – शं. रा. देवळे , बुद्धीसागर नाना फडणीस- पंडित कृष्णकांत नाईक, शर्थीने राज्य राखिलं- वासुदेव बेलवळकर.
मृत्यू
१३ मार्च १८०० रोजी नाना फडणीस यांचा मृत्यू झाला. पुणे येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे जो नाना वाडा या नावाने प्रसिद्ध आहे. नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची घडी पुन्हा विस्कळीला आली. नाना फडणवीस यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये जेवढं कमावलं ते त्यांच्या मृत्यूनंतर सगळं पाण्यात गेलं असं म्हटलं जातं. नाना फडणवीस यांचे नाव आजही विविध कारणांसाठी वापरलं जातं. इतिहास त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे.
आम्ही दिलेल्या nana fadnavis biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नाना फडणवीस यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nana fadnavis information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of nana fadnavis in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट