Narali Bhat Recipe in Marathi नारळी भात मराठी रेसिपी आपल्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे संस्कृती जपली जाते आणि सणांना विशेष पदार्थ बनवणे हा देखील एक संस्कृतीचा भाग आहे कारण आपण वेगवेगळ्या सणांना विशेष पदार्थ बनवतो जसे कि पाडव्याला, बैल पोळ्याला, विजयादशमीला आपण पुरण पोळ्या बनवतो, गणपतीला सणाला खीर आणि मोदक, दिवाळीच्या सणाला फराळ बनवतो तसेच नारळी भात हा नारळी पोर्णिमेच्या दिवशी बनवला जाणारा पदार्थ आहे. नारळी पौर्णिमा हा एक श्रावणातला सन आहे जो रक्षाबंधन आणि हा सन एकत्र येतो.
आणि हा सन कोळी लोक साजरा करतात आणि या सणामध्ये ते समुद्राची आणि वरुणदेवतेची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात त्याचबरोबर नैवैद्य म्हणून नारळी भात देखील बनवतात. म्हणून आज आपण या लेखामध्ये नारळी पौर्णिमेला बनवला जाणारा नारळी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नारळी भात हा घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनतो.
नारळी भात मराठी रेसिपी – Narali Bhat Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
नारळी भात म्हणजे काय ?
नारळी भात हा नारळी पौर्णिमेला बनवला जातो आणि हा वासाचे तांदूळ वापरून तुपामध्ये फोडणी टाकून त्यामध्ये गुळ, खोबरे आणि पाणी घालून शिजवलेला एक गोड भात आहे.
- तांदूळ : नारळी भात बनवण्यासाठी तांदूळ हा एक महत्वाचा घटक आहे आणि हा भात बनवण्यासाठी वासाचे आणि गल्या प्रतीचे तांदूळ वापरले तर भात एकदम उत्तम बनतो.
- ओले खोबरे : या रेसिपीचे नावच नारळी भात आहे त्यामुळे यामध्ये खिसलेले ओले खोबरे वापरणे आवश्यक असते आणि हे खिसलेले खोबरे आपण भात शिजवताना भातामध्ये घालतो.
- गुळ : नारळी भात बनवण्यासाठी खिसलेला गुळ वापरला जातो ज्यामुळे भाताला गोडपणा येतो.
नारळी भात हि एक पारंपारिक महाराष्ट्रीयन डिश आहे जी नारळी पौर्णिमेला किंवा राखी पौर्णिमेला बनवली जाते. नारळी भात हा जरी महाराष्ट्रामध्ये बनत असला तरी देशाच्या काही इतर भागामध्ये देखील हा भात आवडीने बनवला जातो. नारळी भात बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्या साहित्यामध्ये बनतो.
नारळी भात हा बासमती तांदूळ किंवा इतर कोणत्याही वासाच्या तांदळा पासून बनवला जातो आणि त्यामध्ये गुळ आणि खिसलेले खोबरे वापरले जाते. चला तर मग पाहियात नारळी भात कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: मसाले भात रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
नारळी भात बनवण्यासाठी तांदूळ, गुळ, आणि खिसलेले ओले खोबरे हे मुख्य साहित्य लागते आणि हे साहित्य घरामध्ये काही वेळेला उपलब्ध असते आणि काही वेळेला ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते तसेच हा भात बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते आणि ते आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असू शकते. चला तर मग पाहूयात नारळी भात बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- १ वाटी बासमती तांदूळ.
- १/२ वाटी खिसलेला गुळ किंवा अर्ध्यापेक्षा थोडा जास्त ( आवडीनुसार ).
- अर्धी वाटी खिसलेले ओले खोबरे.
- १ मोठा चमचा तूप किंवा तेल.
- ५ ते ६ लवंग.
- २ छोटे दालचिन तुकडे.
- १ छोटा चमचा वेलची पावडर.
- १ छोटी वाटी काजू
- २ ते अडीच वाटी गरम पाणी.
- मीठ ( चवीनुसार ).
- आता आपण वर दिलेले साहित्य वापरून नारळी भात कसा बनवायचा ते पाहूयात.
- नारळी भात बनवताना सर्वप्रथम तांदूळ चांगले निवडून घ्या आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्याचबरोबर गुळ आणि खोबरे खिसून घ्या.
- आणि एका भांड्यामध्ये २ वाटी पाणी गरम करून घ्या.
- आता आपण नारळी भात कसा बनवायचा ते पाहूयात, नारळी भात बनवताना तुम्ही तो भांड्यामध्ये बनवणार आहात कि कुकरमध्ये ते ठरवा ( टीप : नारळी भात कुकरमध्ये बनवणे सोपे कारण यामध्ये भात लगेच शिजेल ).
- कुकर गॅसवर मध्यम आचेवर गरम करायला ठेवा आणि मग त्यामध्ये तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये लवंग, दालचिन घाला आणि ते काही सेकंद भाजा मग त्यामध्ये काजू घाला आणि ते देखील चांगले भाजून घ्या.
- काजू खूप लालसर होऊ देवू नका आता त्यामध्ये लगेच धुतलेले तांदूळ घाला आणि ते तुपामध्ये चांगले ५ ते ६ मिनिटे भाजून घ्या.
- मग तांदूळ चांगले भाजले कि त्यामध्ये खिसलेला गुळ आणि खिसलेले खोबरे घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि गुळ विरघळे पर्यंत हलवत रहा.
- आता गुळ विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण गरम केलेले पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करा आणि कुकरला झाकण लावून त्या भाताला मध्यम आचेवर २ शिट्या येवू द्या. २ शिट्या झाल्या की गॅस बंद करा.
- तुमचा नारळी पौर्णिमेला बनवला जाणारा नारळी भात तयार झाला.
नारळी भात कश्यासोबत खातात – serving suggestion
नारळी पौर्णिमेला केला जाणारा हा नारळी भाताचा अस्वाद आपण तसाच घेवू शकतो किंवा त्यावर थोडे तूप घेवून नारळी भाताजी मजा घेवू शकतो.
- तुम्हाला भात जर सुट्टा हवा असेल तर त्यामध्ये दीड वाटी किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पाणी घाला.
- नारळी भातामध्ये आपण पिवळ्या रंगाचा फूड कलर देखील वापरू शकतो.
आम्ही दिलेल्या narali bhat recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नारळी भात मराठी रेसिपी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या narali bhat recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि narali bhat recipe madhura in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये narali bhat in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट