नथुराम गोडसे यांची माहिती Nathuram Godse Biography in Marathi

Nathuram Godse Biography in Marathi – Nathuram Godse Information in Marathi नथुराम गोडसे यांची माहिती आजच्या लेखामध्ये आपण नथुराम गोडसे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नथुराम गोडसे हे हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांचे सदस्य होते. ते महात्मा गांधी यांचे मारेकरी होते त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती. या लेखामध्ये आपण नथुराम गोडसे यांच्या जीवनाविषयी एकूण माहिती जाणून घेणार आहोत व सोबतच त्यांनी गांधीजींची हत्या का केली असावी याचे कारण देखील बघणार आहोत.

nathuram godse biography in marathi
nathuram godse biography in marathi

नथुराम गोडसे यांची माहिती – Nathuram Godse Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)नथुराम गोडसे
जन्म (Birthday)१९ मे १९१०
जन्म गाव (Birth Place)बारामती पुणे
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांचे सदस्य
मृत्यू१५ नोव्हेंबर १९४९

जन्म

नथुराम गोडसे यांचा जन्म १९ मे १९१० रोजी बारामती पुणे येथील एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. नथुराम यांच संपूर्ण नाव नथुराम विनायक गोडसे होय. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे टपाल कर्मचारी होते आणि आई लक्ष्मी या गृहिणी होत्या. त्यांचं खरं नाव रामचंद्र होतं परंतु काही कारणास्तव त्यांचं नाव नथुराम असं ठेवण्यात आलं. नथुराम यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या पालकांना तीन मुलगे व एक मुलगी होती परंतु दुर्दैवाने त्यांचे तिन्ही मुलं बालपणातच मरण पावले.

हा त्यांच्यासाठी एक वाईट अपशकून होता म्हणूनच पुढील काही वर्षे त्यांनी नथुराम यांना मुली सारखी वागणूक दिली त्यांना लहानपणी मुलींसारखे कपडे घातले जायचे त्यांचे मुलींसारखे नाक देखील टोचले गेले होते. ज्यावरुन त्यांना नथुराम असं नाव पडलं. पुढे त्यांचा धाकटा भाऊ जन्माला येईपर्यंत त्यांना मुलींसारखं वागणूक देण्यात आली. नथुराम गोडसे यांचे प्राथमिक शिक्षण बारामती येथील स्थानिक शाळेत झालं पुढे त्यांच्या पालकांनी त्यांना इंग्रजी भाषेच्या शाळेत शिकता यावे म्हणून पुण्यात मावशीकडे राहायला पाठवले.

नथुराम गोडसे यांचा मित्रपरिवार त्यांना पंडित या नावाने हाक मारायचे. ही गोष्ट क्वचित लोकांनाच माहीत होती. नथुराम गोडसे यांनी त्यांचे हायस्कूलचे शिक्षण अर्धवट सोडलं त्यानंतर त्यांनी कोणतेही शिक्षण घेतले नाही परंतु, ते अधिक धार्मिक पुस्तकांमध्ये रस घेऊ लागले त्यांनी रामायण-महाभारत, गीता, पुराण, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास गांधी यांच्या साहित्याचा खोलवर अभ्यास केलेला होता.

राजकीय कारकीर्द

मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये नापास झाल्यावर नथुराम गोडसे यांनी कालांतराने शिक्षण सोडलं आणि सुतार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि कालांतराने ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदू राष्ट्रवादी संघटनेत सामील झाले. १९३२ मध्ये नथुराम गोडसे सांगली येथे बौद्धिक कार्यवाह म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये सामील झाले आणि त्याच दरम्यान ते हिंदुमहासभेचे सदस्य देखील होते या दोन्ही उजव्या विचारसरणीच्या संघटना होत्या. नथुराम गोडसे भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांच्या कडून अत्यंत प्रेरित होते.

नथुराम गोडसे हे लहानपणापासूनच महात्मा गांधी यांना आदर्श मानायचे. त्यांनी गांधीजींच्या अनेक कार्यक्रमांना पाठिंबा दिला होता. परंतु नथुराम गोडसे यांच्यामते जेव्हा गांधीजींनी‌ मुस्लिमांची बाजू घेतली तेव्हा त्यांची विचारधारा बदलली. आणि ते गांधीविरोधी झाले. याआधी नथुराम गोडसे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या विरुद्ध संघर्षही केला होता. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी अनेक वेळा वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिण्याचा प्रयत्न केले.

यादरम्यान नथुराम गोडसे यांचा परिचय एम एस गोळवळकर यांच्याशी झाला आणि या दोघांनी अनेकदा एकत्र काम देखील केले. या दोघांनी मिळून बाबाराव सावरकर यांच्या राष्ट्र मीमांसा या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर केले. हिंदू महासभेत सामील झाल्यावर नथुराम गोडसे यांनी अग्रणी नावाचे मराठी वृत्तपत्र सुरू केलं ज्याचे काही वर्षांनी नाव बदलून हिंदुराष्ट्र असं ठेवण्यात आलं. सन १९४२ मध्ये नथुराम गोडसे यांनी विजयादशमीच्या दिवशी स्वतःची स्वतंत्र अशी हिंदु राष्ट्र दल संघटना स्थापन केली.

सन १९०६ मध्ये नथुराम गोडसे हे राष्ट्रीय सेवा संघ आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटने मधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्त्यांशी असलेले संबंध बिघडले. नथुराम गोडसे यांचा हैदराबाद आंदोलनामध्ये सहभागी होता. १९४० मधील हैद्राबादच्या शासक निझामाने राज्यात राहणाऱ्या हिंदुंवर जिझिया कर लावला. त्यावेळी नथुराम हे हिंदुमहासभेचे सदस्य होते हिंदू महासभेने या निर्णयाचा निषेध केला होता आणि म्हणूनच हिंदुमहासभेचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर यांच्या आदेशावरून हिंदू महासभेचा पहिला गट नथुराम गोडसे यांचा नेतृत्वाखाली हैद्राबादला पाठवण्यात आला.

या संपूर्ण गटाला निजामाने बंदिस्त करून ठेवलं परंतु कालांतराने त्याने कर लावण्याचा निर्णय मागे घेतला. १९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणी मुळे वेगवेगळ्या धार्मिक दंगली घडून आल्या व निर्णयानुसार भारताने पाकिस्तानला ७५ कोटी रुपये द्यायचे असं ठरलं होतं त्यातील २० कोटी भारताने पाकिस्तानला दिले होते परंतु त्याच वेळी पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलं आणि त्यासाठी भारत सरकारने उरलेले ५५ कोटी पाकिस्तान यांना देण्याचा निर्णय घेतला परंतु महात्मा गांधी भारत सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात होते

आणि म्हणूनच त्यांनी उपोषण केलं गांधीजी यांचे हे वागणं नथुराम गोडसे यांना अजिबात पटलं नाही आणि यामुळे नथुराम गोडसे अत्यंत दुःखी होते आणि या सगळ्या परिस्थितीसाठी त्यांनी मोहनदास गांधी यांना जबाबदार ठरवले. आणि म्हणूनच त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करण्याचा निश्चय केला. नथुराम गोडसे हे महात्मा गांधीजी यांचे मारेकरी होते त्यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली. १९४७ च्या भारताच्या फाळणीच्या वेळी गांधीजींनी ब्रिटिश भारतातील मुस्लिमांचे राजकीय मागण्यांना अनुकुलता दर्शवली असे त्यांचे मत होते.

२० जानेवारी १०४८ रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी सभेसाठी आले होते. त्यादिवशी त्यांच्यासाठी तिथे एक व्यासपीठ आयोजित केलं गेलं होतं आणि ते व्यासपीठच्यावर एक माईक ठेवण्यात आला होता नेहमीप्रमाणे महात्मा गांधीनी आपलं भाषण देण्यास सुरुवात केली.

महात्मा गांधीजींचे भाषण सुरू होतं. आणि इतक्यातच तिथे बॉम्ब स्पोट झाला हा बॉम्बस्फोट नथुराम गोडसे आणि त्यांचे साथीदार यांनी घडवून आणला होता त्यांच्या साथीदारांपैकी मदनलाल यांनी गांधीजींच्या प्रार्थनासभेत बॉम्ब टाकला होता. खरं तर बॉम्ब टाकल्यावर गोंधळ निर्माण होईल त्याचा फायदा घेऊन गांधींवर गोळ्या झाडण्याची योजना होती परंतु त्या वेळी नेमकी त्यांची पिस्तूल चालली नाही आणि नथुराम गोडसे आणि त्यांचे बाकी मित्र पळून गेले परंतु मदनलाल यांना पोलिसांनी अटक केली.

नथुराम गोडसे यांचा गांधीजींची हत्या करण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला म्हणून दहा दिवसांनी ते पुन्हा दिल्लीमध्ये आले. तो दिवस होता ३० जानेवारी १९४८ रोजी त्या दिवशी पुन्हा महात्मा गांधी दिल्लीतील बिर्ला येथे प्रार्थना सभेमध्ये भाषण देणार होते. ज्या वेळी महात्मा गांधी सभेसाठी बिर्ला भवनात जात होते त्याच वेळी नथुराम गोडसे यांनी पिस्तूलितून तीन गोळ्या झाडल्या ज्या महात्मा गांधी यांच्या छातीवर धडकल्या आणि अशाप्रकारे त्यांनी महात्मा गांधी यांचा खून केला.

या घटनेनंतर नथुराम गोडसे यांनी पळून न जाता ते तिथेच थांबले कारण त्यांना गांधींना नाही तर त्यांच्या आक्षेपार्ह विचारांची हत्या केल्याचं एक वेगळं समाधान मिळालं होतं इतकच नव्हे तर त्यांनी स्वतःच आपल्या गुन्ह्याची कबुली देखील केली. नथुराम गोडसे यांच्या वर पुढे या गांधी हत्येसाठी खटला दाखल करण्यात आला याशिवाय नथुराम गोडसे यांच्यावर अवैद्य शस्त्र बाळगणे यांसारखे अजून १७ आरोप ठेवून खटला चालविण्यात आला.

हा खटला पंजाब येथील उच्च न्यायालयात चालू होता हा खटला साधारण एक वर्षभर चालला आणि त्यानंतर ८ नोव्हेंबर १९४९ रोजी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. गांधीजींना मरण्यासाठी नथुराम गोडसे यांनी बरेटा मॉडेलच पिस्तूल वापरलं होतं. नथुराम गोडसे यांच्यासोबत त्यांच्या इतर साथीदारांना देखील अटक करण्यात आली व त्यांच्यावर देखील खटला चालविण्यात आला त्यातील एक म्हणजे त्यांचे भाऊ गोपाळ गोडसे होते.

मृत्यू

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली होती या घटनेनंतर नथुराम गोडसे यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आणि १५ नोव्हेंबर १९४९ रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात नथुराम गोडसे यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. “जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो” हे काही शब्द नथुराम गोडसे यांनी फाशीवर जाण्याआधी उच्चारले होते.

आम्ही दिलेल्या nathuram godse biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नथुराम गोडसे यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nathuram godse information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of nathuram godse in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!