नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा NDPS Act in Marathi

NDPS Act in Marathi – NDPS Act 1985 in Marathi नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा (ndps) या विषयावर माहिती घेणार आहोत. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स हा एक कायदा आहे ज्यामध्ये या कायद्या अंतर्गत अमली पदार्थ म्हणजेच अफू, कोकेन, कॅनॅबीस आणि अनेक प्रकारचे ड्रग्स यावर प्रतिबंध घालणे तसेच अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपीक पदार्थांचे उत्पादन आणि व्यापार थांबवणे हे या कायद्याचे काम आहे.

या कायद्याअंतर्गत गांजाचे उतपादन करणे, किंवा खरेदी विक्री करणे किंवा ताबा मिळवणे आणि जप्त करणे अश्या प्रकारची कृत्ये करणाऱ्या लोकांना या कायद्यानुसार शिक्षा केली जाते आणि हि शिक्षा गांजा किंवा कोणत्याही अमली पदार्थाच्या जप्तीवर अवलंबून केली जाते आणि शिक्षेमध्ये कारावास आणि दंडाचा समावेश असू शकतो.

सध्याच्या काळामध्ये तरुण पिढी हि कितीही हुशार असली तरी ती व्यसनाच्या अधीन जातातच आणि आताच्या तरुण पिढीला वेगवेगळ्या व्यसनाची सवय आहे आणि अश्याच प्रकारे ड्रग्स घेणे हा देखील एक गंभीर गुन्हा आहे आणि यासाठी गंभीर शिक्षा देखील आहे आणि नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा हा त्यासाठी बनवला आहे ज्यामध्ये ड्रग्स घेणाऱ्याला, खरेदी किंवा विक्री करणाऱ्याला, जप्त करणाऱ्याला किंवा ताबा मिळवणाऱ्याला गंभीर शिक्षा केली जाते किंवा त्या संबधित व्यक्तीवर खूप दिवस कारवाई सुरु असते आणि कोणताही व्यक्ती या प्रकारच्या खटल्यामध्ये किंवा गुन्ह्यामध्ये सापडला असेल तर सहजा सहजी सुटणे खूप अवघड असते.

जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा पहिला केला असेल आणि त्याची त्यातून सुटका झाली असेल आणि त्याने परत जर तो गुन्हा केला तर त्या व्यक्तीवर गंभीर कारवाई केली जाते किंवा गंभीर गुन्हा दाखल केला जातो. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स या कायद्या अंतर्गत देशामध्ये ७० हजार हून जास्त प्रकारने नोंदवली आहेत. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा हा भारतामध्ये इ.स १९८५ मध्ये सर्वत्र लागू करण्यात आला.

 ndps act in marathi
ndps act in marathi
अनुक्रमणिका hide

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा – NDPS Act in Marathi

कायद्याचे नावनार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा ( एनडीपीएस )
केंव्हा लागू केलाइ.स १९८५
कोणी लागू केलाकेंद्र सरकार
मुख्य उद्देशअमली पदार्थ आणि सायकोट्रॉपीक पदार्थांचे उत्पादन आणि व्यापार थांबवणे

NDPS चे पूर्ण स्वरूप काय आहे ?

NDPS चे पूर्ण स्वरूप नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा (narcotic drugs and psychotropic substances act 1985) असा आहे.

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा काय आहे ?

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स हा एक कायदा आहे ज्यामध्ये या कायद्या अंतर्गत अमली पदार्थ म्हणजेच अफू, कोकेन, कॅनॅबीस आणि अनेक प्रकारचे ड्रग्स यावर प्रतिबंध घालणे तसेच अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपीक पदार्थांचे उत्पादन आणि व्यापार थांबवणे हे या कायद्याचे काम आहे.

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा केंव्हा सुरु झाला ?

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा (एनडीपीएस) हा इ.स १९८५ मध्ये लागू करण्यात आला.

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायद्यानुसार कोण कोणत्या औषधावर बंदी आहे ?

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायद्यानुसार अमली पदार्थ म्हणजे अफू, कोकेन, कॅनॅबीस या सारखी सर्व उत्पादित औषधे समाविष्ट आहेत आणि या पदार्थांच्यावर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायद्यानुसार बंदी आहे.

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा १९८५ कायदा लागू करण्याअगोदर भारतामध्ये अमली पदार्थावर वैधानिक नियंत्रण तीन केंद्रीय कायद्यांद्वारे वापरले जात होते म्हणजेच अफू कायदा १८५७ कायदा ( ८ ), अफू कायदा १८७८ कायदा ( १ ) आणि धोकादायक औषधे कायदा १९३० कायदा ( २ ).

अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा १९८५ कायदा कलम ४७ अंतर्गत भारताच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन लागू करण्यात आला. हा कायदा एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय किंवा वैज्ञानिक हेतूंशिवाय कोणत्याही अंमली पदार्थाचे उत्पादन, शेती, ताबा, विक्री, खरेदी, वाहतूक,  साठवण आणि सेवन करण्यास प्रतिबंधित करतो.

NDPS कायद्यात १९८८, २००१ आणि २०१४ मध्ये तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत. हा कायदा संपूर्ण भारतात लागू होतो आणि तो भारताबाहेरील सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतात नोंदणीकृत जहाजे आणि विमानावरील सर्व व्यक्तींना देखील लागू होतो.

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायद्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिक्षा किंवा दंड

अमली पदार्थाचे सेवन करणे आणि त्याची खरेदी विक्रीचे होणारे परिणाम लक्षात घेऊन या वर निर्बंध घालण्यासाठी यामध्ये काही शिक्षा आणि दंड ठरवलेले आहेत ते आपण खाली पाहूयात.

  • या कायद्या अंतर्गत जर गुन्ह्याची पुनरावृत्ती केली असेल तर त्या संबंधित व्यक्तीची शिक्षा दीडपट वाढू शकते किंवा मग काही प्रकरणामध्ये संबधित गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देखील होऊ शकते.
  • तसेच हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तिला कायद्यानुसार आणि त्याने केलेल्या गुन्ह्यानुसार १ वर्ष ते २० वर्षा पर्यंत तुरुंगवास भोगावा लागतो किंवा त्या व्यक्तीकडून दंड आकाराला जातो आणि काही वेळा या दोन्ही शिक्षा अवलंबल्या जातात.
  • एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे किंवा गुन्हेगारीचा कट रचणे या प्रकारचे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीकडून अर्धा दंड आकाराला जातो.
  • काही केसेस मध्ये कारावास आणि दंड दोन्हीही आकारले जातात.

कायद्याचे उद्दिष्ट किंवा हेतू

खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विधिमंडळाने नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा लागू केला आहे:

  • अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या बेकायदेशीर वाहतुकीतून मिळवलेल्या किंवा वापरलेल्या मालमत्तेच्या जप्तीची तरतूद करण्यासाठी
  • अंमली पदार्थांशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणे
  • अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशनांच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी.
  • अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांशी संबंधित ऑपरेशन्सचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी कठोर तरतुदी करणे.

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायद्याच्या अंतर्गत गुन्हे

  • कलम ८ नुसार कोणत्याही व्यक्तीला कोका प्लांटची लागवड करण्यास किंवा कोका प्लांटचा कोणताही भाग गोळा करण्यास मनाई आहे आणि एखाद्या व्यक्तीने असे केले तर हा गुन्हा ठरू शकतो.
  • अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री,  खरेदी,  वाहतूक,  गोदाम,  वापर,  उपभोग, आंतर-राज्य आयात, आंतर-राज्य निर्यात,  भारतात आयात किंवा भारतातून निर्यात करणे हे कायद्याने गुन्हा आहे.
  • अफू ​​किंवा गांजाच्या कोणत्याही वनस्पतीची लागवड करणे देखील गुन्हा मनाला जातो.

आम्ही दिलेल्या ndps act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपीक सबटंन्स कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ndps act 1985 in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि full form of ndps माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!