New Year Essay in Marathi नवीन वर्ष निबंध मराठी प्रत्येक पर्व कधी ना कधी संपत. प्रत्येक येणारं संकट नवीन सुरुवात घेऊन येतं. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित असतो. तसंच नवीन वर्षाचं देखील आहे. मागील वर्ष संपूर्ण पुढील वर्ष सुरू होतं. एक नवीन पर्व सुरू होतो. नवीन वर्ष या दोन शब्दांमध्ये एक नवीन सुरुवात दडलेली आहे. सुरुवात नव्या यशाची, सुरुवात नव्या जीवनाची, नव्या माणसांची, नव्या दुःखांची, नव्या सुखांची असं हे नवीन वर्ष येताच नवीन सुरुवात घेऊन येतं. नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे स्वप्न, नवे संकल्प, नवी ओळख, नवी भरारी घेण्याचे वर्ष म्हणजे नूतन वर्ष होय. प्रत्येक माणूस नवीन वर्षा कडून भरपूर अपेक्षा ठेवतं.
येणार नवीन वर्ष हे सर्वांच्या फायदाच असावं म्हणजेच सुख-समृद्धी लाभावी अशा काही अपेक्षा असतात. संपूर्ण वर्षभरात झालेल्या चुका दुरुस्त करण्याची एक नवीन संधी म्हणजे नवीन वर्ष होय. म्हणूनच नवीन वर्षाची प्रत्येकालाच आतुरता लागलेली असते. नवीन वर्ष येतंय हा विचार करताच लोकांमध्ये उत्साह येतो आणि सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतात. वेगवेगळे नवे संकल्प ठेवतात नवीन वर्षासाठी नवीन उद्दिष्टे आणि स्वतःकडून नवीन अपेक्षा ठेवतात.
जेणेकरून येणाऱ्या वर्षांमध्ये आपण यश मिळवून एक उत्तम व्यक्ती बनावं अशी इच्छा सर्व जण बाळगतात. येणार नवीन वर्ष हे सरत्या काळाची व आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात म्हणूनच प्रत्येक येणाऱ्या नवीन वर्षाकडून सगळ्यांच्या भरपूर अपेक्षा असतात. गेल्या वर्षामध्ये जी काही स्वप्न, इच्छा, आकांक्षा अपुऱ्या राहिल्या किंवा एखादं ध्येय गाठायचे राहून गेलं तर या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण वहाव्यात व आपण ठरवलेले ध्येय पूर्ण व्हावे ही उमेद नवीन वर्षा कढून ठेवली जाते.
म्हणजेच येणार नवीन वर्ष हे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतं. प्रत्येक जण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषात तयारी करत असतात म्हणूनच वर्षाचा पहिला दिवस हा सर्वांसाठी खास असतो. नवीन वर्ष येतय या कल्पनेनेच सर्वजण आनंदी असतात सर्वत्र आनंद पसरलेला असतो. नवीन वर्ष म्हटलं तर नवीन स्वप्न, नवीन इच्छा, नवीन माणसं, नवीन संधी, नव्या आठवणी, भरपूर आनंद अशा अनेक भावना नवीन वर्षाशी जोडल्या गेलेल्या असतात.
Happy New Year Essay in Marathi
नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदमय व यशाने भरलेला असावा अशी सर्वांची इच्छा असते आणि म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा असतो. संपूर्ण जगामध्ये नवीन वर्ष अगदी थाटामाटात साजरा केला जातो. नवीन वर्ष हे भरपूर आनंद घेऊन येतो म्हणूनच क्रिश्चन नवीन वर्षाप्रमाणे म्हणजेच ईसाई पद्धतीने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवीन वर्षाचं फटाके फोडून धुमधडाक्यात स्वागत केलं जातं. प्रामुख्याने संपूर्ण जगभरात ईसाई पद्धतीने नवीन वर्ष साजरं केलं जातं. ही रात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. प्रामुख्याने संपूर्ण जगामध्ये नवीन वर्ष हा एक जानेवारी दिवशी साजरा केला जातो.
परंतु भारतीय संस्कृती नुसार नवीन वर्ष हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून, सर्व घर स्वच्छ करून, घरापुढे रांगोळी काढून मग सूर्योदयानंतर गुढी उभारली जाते. महाराष्ट्रामध्ये घराच्या प्रवेशद्वाराच्या उंचिवर गुढी उभारली जाते.
गुढी म्हणजे एका उंच बांबूच्या काढीला कडुनिंबाची डहाळी, काडीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र म्हणजेच साडी गुंडाळतात आणि त्यानंतर त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या ठेवतात. गुढीचा बांबू पाटावर उभा करून ही तयार केलेली गुढी दारात उंच लावतात व पुढे गुढीला गंध फुले अक्षता वाहतात व निरंजन लावून उदबत्ती दाखवतात. या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये गोडाचा नैवेद्य दाखवला जातो व संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू आणि फूल वाहून गुढी उतरवली जाते.
दारात उभी असणारी ही गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानलं जातं. गुढीपाडवा हा दिवस मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या, नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा असंदेखील म्हटलं जातं. हा वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. नवीन व्यवसायचा प्रारंभ केला जातो. नवीन उपक्रमांचा प्रारंभ केला जातो तसेच सुवर्ण खरेदी केली जाते.
या दिवसाचे भारतीय संस्कृती मध्ये एक विशेष स्थान आहे असे म्हणतात या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मितीला सुरुवात केली. शिवाय श्रीराम चौदा वर्षांचा वनवास करून या दिवशी आयोध्या मध्ये परतले. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये नूतन वर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरा करतात. बंगाल प्रांतांमध्ये नवीन वर्ष हा नोब बोर्ष म्हणून १३ किंवा १४ एप्रिलला म्हणजेच सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी साजरा केला जातो. तर तमिळनाडूमध्ये पुंथंडु हा उत्सव साजरा करत नवीन वर्ष साजरा केला जातो.
आंध्रप्रदेश येथे उगादी या सणानिमित्त नवीन वर्ष साजरा केला जातो. तर आसाम मध्ये बिहू हा सण नवीन वर्षाची सुरुवात आहे. केरळमध्ये विशू तर पंजाब मध्ये बैशाखी म्हणजेच पंजाबी वर्षारंभ साजरा केला जातो. प्रामुख्याने हा सण एप्रिल महिन्यामध्ये येतो. चेटिचंड या उत्सवा पासून सिंध नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. चैत्र शुक्ल द्वितीयेला हा उत्सव साजरा केला जातो. तर जैन धर्मामध्ये नवीन वर्षाची सुरुवात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होते.
महावीर स्वामींच्या मोक्षप्राप्ती दिवसाच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते. तर पारशी धर्मात नवीन वर्षाची सुरुवात नवरोज या उत्सवाने केली जाते. नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दररोज असा या सणाचा अर्थ आहे. शाह जमशेदजी यांनी जवळपास तीन हजार वर्षांपूर्वी पारशी धर्मामध्ये हा सण साजरा करण्याची प्रथा सुरु केली. नवीन वर्षाच भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नवीन वर्ष ही एक नवीन संधी दिली जाते.
या वर्षामध्ये आनंद वाटायचा असतो. तसेच दुःख, निराशा, अडचणी विसरून जाऊन पुन्हा नव्याने एक सुरुवात करायची असते. आणि म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांना एक गोड संदेश देऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो. येणार नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी अपेक्षा नवीन वर्षा कडून ठेवली जाते. सरत्या वर्षाला निरोप देत लोक नवीन स्वप्न, नवीन आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच अगदी मनापासून उत्साहात स्वागत करतात.
तसंच देवाकडे आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत ही प्रार्थना करतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने वाईट सवयी सोडून नवीन विचाराने नवीन नियम ठेवण्याची प्रतिज्ञा केली जाते. येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये पुन्हा ३६५ दिवस जगायला मिळतात. ३६५ नवीन अनुभव नवीन संधी. नवीन वर्ष आयुष्याला एक नवीन दिशा देतं. म्हणून प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना हे नवीन वर्ष सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो आणि या येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये आपले आयुष्य अधिक सुखमय आनंदी होईल अशा शुभेच्छा देतात.
नवीन वर्षाचा हा पहिला दिवस इतर दिवसांसारखाच असतो परंतु या दिवशी उगवणारा सूर्य नवीन आशेचा किरण घेऊन येतो, नवीन वर्षाचा आरंभ आणि नव्या स्वप्नांचा प्रारंभ घेऊन येतो. नवीन वर्षाची चाहूल लागताच अनेक नवीन संकल्प केले जातात. काहींचे हे संकल्प दोन दिवसांनी गायब होतात तर काही जण हे संकल्प अगदी आयुष्यभर पाळतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणताही संकल्प केला नाही तरी चालेल परंतु येणाऱ्या वर्षांमध्ये स्वतःचं आरोग्य आणि स्वतः चे ध्येय नक्की जपा. रोजच्या ताणतणावातून ग्रासलेल्या जीवनातून स्वतःला थोडा वेळ द्या स्वताकडे थोडे लक्ष द्या व्यायाम करा तंदुरूस्त रहा.
येणार नवीन वर्ष हे सकारात्मक ऊर्जा घेऊन येतं त्यामुळे नवीन वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक सुखाकडे आणि दुःखाकडे सकारात्मक विचाराने पाहायला शिका. गेल्या वर्षामध्ये आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आपण जे काही गमावलं याच्याकडे बघत राहण्यापेक्षा या वर्षी आपण त्या चुका पुन्हा करणार नाही व अपयशावर मात करून पुढे जायचे हा जर दृष्टीकोण आपण बाळगला तर येणाऱ्या काळामध्ये आपला हा अनुभव आपला एक नवीन प्रेरणास्तोत्र बनेल. येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करूया, तुटलेली नाती पुन्हा जोडुया, वर्षात येणारा प्रत्येक सण अगदी आनंदात साजरा करत आपली संस्कृती जपूया. कुटुंबीयांसोबत, मित्र परिवारासोबत अविस्मरणीय क्षण साजरे करूया.
आम्ही दिलेल्या New Year Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर नवीन वर्ष निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या happy new year essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट