ध्वनी प्रदूषण मराठी माहिती Noise Pollution Information in Marathi

Noise Pollution Information in Marathi – Dhwani Pradushan in Marathi – Sound Pollution in Marathi ध्वनि प्रदूषण मराठी माहिती प्रकल्प pdf आजकाल आपण सर्वांनी थोडंसं जरी बाहेर फिरायला जायचं ठरवलं तरी, आपल्याला नको वाटतं. कारण, आजच्या या २१ व्या शतकात दिवसेंदिवस वाढत जाणारं हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त प्रमाणात वाढत चाललेलं ध्वनी प्रदूषण आपल्याला असह्य होत. चला तर मग मित्रांनो, मानवाला असह्य आणि अस्वस्थ करणाऱ्या या ध्वनी प्रदूषणाची माहिती जाणून घेण्याअगोदर  आधी आपण जाणून घेऊया की नक्की हे ‘ध्वनी प्रदूषण’ म्हणजे काय?

तर मित्रांनो, मानव, प्राणीजात किंवा यांत्रिकी पर्यावरणामुळे उत्पादित झालेला क्षमते पलीकडील तीव्र ध्वनी म्हणजे ‘ध्वनी प्रदूषण’ होय. ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्यांच्या तसेच, प्राण्यांच्या जीवनाच्या कृती विस्कळीत होतात आणि कालांतराने त्यांचा समतोल देखील बिघडतो.

तस पहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल की, मानवी परिसरामध्ये निर्माण होणारा बहुतेक ध्वनी हा बांधकाम आणि वाहतूक (मोटारी, विमाने, रेल्वे इत्यादींचा आवाज) यांच्या आवाजामुळे उत्पादित होत असतो.

noise pollution information in marathi
noise pollution information in marathi

ध्वनी प्रदूषण मराठी माहिती – Noise Pollution Information in Marathi

Dhwani Pradushan in Marathi

ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत कोणते आहेत ते कमी करण्याचे उपाय स्पष्ट करा

शिवाय, शहरी नियोजनात त्रुटी असल्यास ध्वनी प्रदूषणात वाढ होते. त्याचबरोबर, औद्योगिक क्षेत्रे आणि निवासाची ठिकाणे एकमेकांना लागून असल्यास निवासी भागात देखील आपल्याला ध्वनी प्रदूषण जाणवते. ध्वनी प्रदूषणामुळे सगळ्यात जास्त मनुष्यांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर तसेच, त्यांच्या वर्तनावर सुद्धा परिणाम होतो.

परिसरातील ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण आणि तणाव वाढून त्यांच्या हृदयाची धडधड वाढून, रक्तदाब वाढतो आणि शेवटी त्या व्यक्तींना हृदयाचे विकार जडतात. त्याचबरोबर, ध्वनीची तीव्रता वाढल्यामुळे मानवाचे लक्ष विचलित होते, त्याची चिडचिड होते, कार्यक्षमता घटते आणि त्याच्या पचनक्रियेत देखील बदल होतो.

याशिवाय मित्रांनो, सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे, आपल्याकडील बसचालकांना ते चालवीत असलेल्या आणि आजूबाजूच्या अन्य वाहनांमुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण अनेक वर्षे सहन करावे लागते.

त्यामुळे, अशा वाहन चालकांना बहिरेपणा आल्याचे आपण दरवेळी पाहतो.’ ध्वनी प्रदूषणाचा विशेष अभ्यास करणाऱ्या संशोधकांकडून अशी माहिती समोर आली आहे की, वाढत्या साऊंडच्या तीव्रतेमुळे अन्न मिळविण्याच्या पद्धतीत बदल झाला त्यामुळे प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय, प्राण्यांतील प्रजननक्षमता व त्यांच्यातील दिशा ओळखण्याची क्षमता यांच्यात बदल झाल्यामुळे ते कायमचे बहिरे देखील झाले आहेत. मित्रहो, ध्वनीची पातळी अशीच वाढत राहिल्यास त्या त्या भागातील प्राणी आणि पक्षी स्वतःच्या अधिवासाची जागा बदलतात आणि यामुळे, असे आढळून आले आहे की, काही पक्षी दिवसाऐवजी रात्री गातात; कारण, यावेळी त्यांच्या आजूबाजूचा परिसर शांत असतो आणि त्यांचा आवाज जोडीदारापर्यंत पोहोचू शकतो.

शिवाय मित्रांनो, आजकालच्या वाढत्या नागरीकरणामुळे आणि औद्योगिकिकरणामुळे ध्वनी प्रदूषणात देखील वाढ होत आहे. परंतू, काही ठिकाणी आपल्याला असे दिसून येते की, रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण  होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते.

त्याच पद्धतीने विमानांमुळे निर्माण होणारा ध्वनी सुद्धा सुधारित आणि विकसित प्रकारचे इंजिन बदलून तसेच, त्यांच्या मार्गात बदल करून कमी करता येतो. याचबरोबर, आपण देखील दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून, संगीत ऐकताना सभोवतालच्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणे तसेच वाहने यांची नियमित देखभाल करून, गरज असेल तेव्हाच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करू शकतो.

खरंतर मित्रहो, ‘ध्वनिप्रदूषण’ म्हणजे प्राणीजात, मानव आणि यंत्राच्या अमर्यादित ध्वनीमुळे सभोवतालच्या वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मानव किंवा प्राणी यांना विनाकारण बाधा पोहोचविणाऱ्या असह्य आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती असते हे आपण पाहिलं.

ध्वनी प्रदूषण कारणे

म्हणजेच, आतापर्यंत आपण ध्वनी प्रदूषणाबाबत माहिती जाणून घेतली. आता मित्रांनो, आपण या ध्वनी प्रदूषणाचे काही मुख्य स्रोत पुढीलप्रमाणे पाहुयात….

  • परिवहन प्रणाली.
  • उद्योगधंद्याच्या ठिकाणी काम चालू असताना आवाज करणारी यंत्रसामग्री.
  • लोकांचा गोंगाट, वाद्यांचे आवाज, सायरन, तसेच  फटाक्यांचा आवाज इत्यादी.

ध्वनी प्रदूषणाचे माहितीचे विश्लेषण – Sound Pollution in Marathi

या स्त्रोतांव्यतिरीक्त गाड्यांचे हॉर्न, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे आवाज, रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांच्या संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी ध्वनिप्रदूषण वाढवण्यास मुख्य कारणीभूत ठरतात. याशिवाय, आजकाल विविध मीडियांमुळे सुद्धा आवाजाचा गोंगाट मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि त्यामुळे होणारा विपरित परिणाम देखील आपल्याला दिसून येतो.

तसेच, सातत्याने होणाऱ्या अशा प्रकारच्या ध्वनिप्रदूषणामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यांवर परिणाम होतो. शिवाय, आपला शारीरिक व मानसिक ताण देखील वाढतो आणि मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक बनतो. या सर्व परिणामांमुळे मनुष्याला व्यवस्थित झोप लागत नाही आणि त्यामुळे, त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. याशिवाय, ध्वनिप्रदूषणामुळे आपला रक्तदाब वाढतो व हृदय रोगाला आमंत्रण सुद्धा  मिळते.

कारखान्यांमध्ये किंवा मोठमोठ्या कंपनीच्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना काही कालावधीनंतर किंवा त्यांच्या म्हातारपणी बहिरेपणा येतो. अर्थात, ध्वनिप्रदूषणामुळे मनुष्याला हळूहळू बहिरेपणा देखील येतो. त्याचबरोबर, जर एखाद्या व्यक्तीला हृदयरोग असेल तर, ती व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते.

याशिवाय, गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते आणि त्यामुळे कालांतराने गर्भपात होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते. गावाकडच्या ठिकाणी तसेच, शहरी भागांमध्ये सणांच्या, उत्सवांच्या किंवा अन्य कार्यक्रमांच्या वेळी लावण्यात येणाऱ्या साऊंडच्या आवाजामुळे प्रचंड प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते.

शिवाय, विमानतळाजवळ किंवा रेल्वे स्थानकांजवळ रहिवासी असलेल्या घरांच्या भिंतींना विमानाच्या आवाजाने किंवा रेल्वेच्या आवाजाने तडे पडतात.

ध्वनी प्रदूषणाचे परिणाम

मित्रांनो, या ध्वनी प्रदूषणाचा दुष्परिणाम फक्त मानवाला भोगावा लागत नाही, तर निष्पाप असलेल्या जनावरांना सुद्धा मानवामूळे या परिणामांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे, ध्वनी प्रदूषणाचा जनावरांवरसुद्धा हानिकारक प्रभाव पडतो. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे, सैन्याच्या पाणबुडीत वापरल्या जाणाऱ्या सोनार (sonar) या ध्वनिप्रदूषणामुळे व्हेल ह्या जातीच्या काही जातींचे मासे अनेकवेळा मृत्युमुखी पडलेले आढळतात.

एका आरोग्य सर्वेनुसार तर आपल्यासमोर असं सत्य उभं राहिलं आहे की, अधिक ध्वनिच्या ठिकाणी काम करणारी माणसे ही सामान्य माणसांपेक्षा अधिक चिडचिड करणारी असतात. त्यामुळे, अशा माणसांची डोकेदुखी वाढते. शिवाय, बहिरेपणा येऊन त्यांना कानाचे विविध प्रकारचे आजार देखील होतात. मित्रांनो, अमर्यादित ध्वनि प्रदूषणामुळे आपल्याला “निरोसिस” हा रोग होण्याची देखील संभवता असते.

आज महाराष्ट्रातील मुंबई हे शहर संपुर्ण जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले आहे. 

ही बाब अनंत चतुर्दशी निमित्ताने निघालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने २ पटीने वाढलेल्या ध्वनिप्रदूषणामुळे स्पष्ट झाली आहे. तसेच, गणेश उत्सवाप्रमाणेच दहीहंडीमध्येही ढोल-ताशांचा ढणढणाट, डॉल्बी, डीजे आणि बेंजोच्या कर्ण कर्कश आवाजाने संपूर्ण ठाणे शहरात बेलगाम धिंगाणा सुरू असतो. 

त्यावेळी, रस्त्यांवर डीजेवर वाजणारे लुंगी डान्स, बत्तमीझ दिल, पिंकी, मुन्नी, कॅरेक्टर ढिला है अशा प्रकारच्या हिंदी गाण्यांचा धिंगाणा सुरू होता. शिवाय; शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय आणि सरकारी कार्यालय परिसर अशा शांतताप्रिय क्षेत्रांतही आवाजाची मर्यादा अजिबात पाळली जात नव्हती.

शांतता क्षेत्रात झालेल्या आवाजाच्या नोंदणीवरून अशी गोष्ट समोर आली की, आवाजाची पातळी सुमारे दीडपटीने ते दुपटीने वाढलेली होती.

त्याचबरोबर, ८० डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजाची नोंद समर्थ भंडार, गोडबोले हॉस्पिटल आणि पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाली. परंतू मित्रहो, त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.

ध्वनी प्रदूषण उपाय

खरंतर, ध्वनीप्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासोबतच, ध्वनिप्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांकडे देण्यात आलेले आहेत. मात्र, स्वयंसेवी संस्थेच्या निरीक्षणावरून असं लक्षात येतं की, असे नियम तोडले जात असतानाही ठाणे शहरातील पोलिस मात्र कानाडोळा करून काम करत आहेत.

पण मित्रांनो, ठाणे शहराच्या अगदी विरुद्ध ध्वनिप्रदूषण रोखण्याची कार्यवाही मुंबई या शहरामध्ये कार्यरत आहे. मुंबईतील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावण्यात आलेली आहेत. तसेच जर, पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले तर आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते.

त्याच पद्धतीने जर इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर, फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जाऊ शकतात.

ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम 2000

त्याचबरोबर, आपल्या भारत देशात उच्च न्यायालयाने बसवलेला १२५ डेसिबल्स पेक्षा मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर सुद्धा बंदी घातली आहे आणि राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी वाहनांमध्ये लावण्यात येणाऱ्या हॉर्न्स, सायरन्स यासाठीची योग्य ती मानके अधिसूचित करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

पण मित्रांनो, आपण सर्वांनी देखील ध्वनीप्रदूषण होऊ नये यासाठीची दक्षता घेतली पाहिजेत. तरच, ध्वनी प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या घातक परिणामांना आपणा कुणालाही सामोरे जावे लागणार नाही.

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

noise pollution information in marathi language वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि ध्वनी प्रदूषण कशामुळे व का होते ? व त्याचे दुष्परिणाम काय आहेत त्याच बरोबर ते रोखण्याचे उपाय देखील आपण या लेखात पाहिले आहेत. information about noise pollution in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही ध्वनी प्रदूषण विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या dhwani pradushan marathi mahiti project माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!