एनटीएसई परीक्षेची माहिती Ntse Exam Information in Marathi

ntse exam information in marathi एनटीएसई परीक्षेची माहिती, आजच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे बदल घडून आले आहेत तसेच सुधारणा देखील झाल्या आहेत त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना कोणत्याही शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये प्रवेश देताना परीक्षा घेतल्या जातात तसेच शाळेमध्ये किंवा कॉलेजमधील गरजू आणि योग्य व्यक्तीला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून देखील अनेक वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि एनटीएसइ हि देखील अश्याच प्रकारची परीक्षा आहे जी विद्यार्थ्याने पात्र झाल्या नंतर त्याला शिष्यवृत्ती मिळते आणि आज आपण या लेखामध्ये एनटीएसइ (ntse) विषयी माहिती घेणार आहोत.

एनटीएसई चे इंग्रजी मधील पूर्ण स्वरूप नॅशणल टॅलेंट सर्च एक्झाम (national talent search exam) असे आहे आणि या परीक्षेला मराठीमध्ये राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा हि एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी राष्ट्रीय स्तरावर कौशल्ये, तार्किक तर्क आणि मानसिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घेतली जाते.

एनटीएसइ हि परीक्षा इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्यासाठी दोन टप्प्यामध्ये घेतली जाते आणि हे २ टप्पे म्हणजे राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर आणि विद्यार्थ्याला दोन्हीहि टप्प्यामध्ये पात्र व्हावे लागते. हि परीक्षा हि भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये घेतली जाते आणि राष्ट्रीय स्तर परीक्षा हि संपूर्ण राष्ट्राशी संबधित असते.

ntse exam information in marathi
ntse exam information in marathi

एनटीएसई परीक्षेची माहिती – Ntse Exam Information in Marathi

परीक्षेचे नावएनटीएसइ
मराठी नावराष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
पूर्ण स्वरूपनॅशणल टॅलेंट सर्च एक्झाम (national talent search exam)
परीक्षेस पात्रइयत्ता १० वीचे विद्यार्थी
परीक्षेचे स्तरराज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तर
शिष्यवृत्ती२००० रुपये

एनटीएसई परीक्षा म्हणजे काय ?

एनटीएसई या परीक्षेला राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा म्हणून ओळखले जाते आणि हि एक शिष्यवृत्तीची परीक्षा आहे आणि यामध्ये इयत्ता दहावीच्या मुलांची कौशल्ये, तार्किक तर्क आणि मानसिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घेतली जाते.

एनटीएसई परीक्षेसाठी पात्रता निकष – eiligibility criteria 

जी विद्यार्थ्यांना एनटीएसइ परीक्षा पत्र होऊन शिष्यवृत्ती घ्यायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांनी काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. तसेच यामध्ये राज्य स्तराचे आणि केंद्र स्तराचे देखील पात्रता निकष असतात ते काय काय असतात ते आता आपण खाली पाहूया.

राज्य स्तर परीक्षा पात्रता निकष

  • केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळांच्यासह कोणत्याही मान्यता प्राप्त खाजगी किंवा सरकारी शाळेमध्ये सध्या इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अराज करू शकतो.
  • शिष्यवृत्ती परीक्षेला बसण्यासाठी खुल्या आणि दुरुस्थ शिक्षणातून शिकणाऱ्या उमेदवारांचे वय हे १८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि तो संबधित विद्यार्थी कोठेही कामाला नसावा.
  • त्या संबधित विद्यार्थ्याला मागील वर्गामध्ये किमान पात्रता गुण असले पाहिजेत.

राष्ट्रीय स्तर परीक्षा पात्रता निकष

भारतामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी :

  • ते भारताचे नागरिक असले पाहिजेत जरी ते इयत्ता दहावीची परीक्षा कुठेही ( भारतामध्ये किंवा परदेशात ) देत असतील.
  • जर ते राज्य स्तरीय परीक्षा उतीर्ण झाली असेल तर ते राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी पात्र ठरतात.

भारताबाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी :

  • परदेशामध्ये शिकणारे भारतीय राष्ट्री विद्यार्थी हे भारतीय राष्ट्रीय परीक्षेसाठी थेट बसू शकतात त्यांना राज्य स्तरीय परीक्षा द्यावी लागत नाही.
  • या विद्यार्थ्यांना मागील वर्गामध्ये म्हणजेच ९ वीच्या वर्गामध्ये त्या संबधित विद्यार्थ्याला ६० टक्के गुण मिळाले पाहिजेत.
  • त्या विद्यार्थ्याने शिष्यवृत्ती प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षण हे भारतामध्ये घेण्याचे नियोजन केले पाहिजे.

परीक्षेदिवशीचे मार्गदर्शक तत्वे

  • परीक्षेदिवशी विद्यार्थ्याने त्याचे आवश्यक ते प्रवेशपत्र, पेन, पेन्सिल आणि फोटो असणारे ओळखपत्र परीक्षा हॉल मध्ये घेऊन जाणे आवश्यक असते.
  • परीक्षा हॉलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेटला परवानगी नाही.
  • परीक्षा सुरु होण्याच्या अगोदर १५ मिनिटापेक्षा जास्त उशीर झालेल्या कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • सर्व उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या किमान ४५ मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचावे.

राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा अभ्यासक्रम – ntse exam syllabus

राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा हि दोन टप्प्यामध्ये विभागलेली असते आणि प्रत्येक विभागामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. हि परीक्षा मॅट (MAT) आणि सॅट (SAT) या दोन विभागामध्ये विभागलेले आहेत.

मानसिक क्षमता चाचणी (MAT) चा वापर हा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या आणि तार्किक तर्क क्षमतांच्या एकूण क्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी केला जातो. हे त्याच्या मानसिक सुक्षमतेच्या अल्पावधीत मुल्यांकन करते. या क्षमतांचे मूल्यमापन हे विविध प्रश्नाच्याद्वारे केले ज्यामध्ये माहिती, विशेल्षण, मौखिक आणि गैर मौखिक तर्क, आकृती समस्या इत्यादींचा समावेश असतो. हे सर्वसाधारणपणे मॅपिंग आणि समस्या सोडवण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोणाचे परीक्षण करते आणि त्यांच्या विचार प्रक्रियेची चाचणी करते.

राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षेचा नमुना – ntse exam question paper in marathi

राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा हि इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची घेतली जाते आणि हि परीक्षा दोन स्तरामध्ये घेतली जाते ते म्हणजे राज्य स्तरीय परीक्षा आणि राष्ट्रीय स्तर परीक्षा. या दोन्ही टप्प्यामध्ये पात्र होणार्या विद्यार्थ्याला पुढील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. या परीक्षेमध्ये पहिला टप्पा पार पडल्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच राष्ट्रीय स्तर परीक्षेला बसता येते.

पहिला टप्पा : राज्य स्तर परीक्षा

राज्य स्तर परीक्षा हि उतीर्ण झाल्यानंतरच त्या संबधीत विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्तर परीक्षेला बसता येते त्यामुळे राज्य स्तराची परीक्षा देखील पत्र होणे खूप महत्वाचे आहे. हि परीक्षा भारतातील विविध राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेतली जाते म्हणजेच हि राज्यव्यापी परीक्षा आहे.

दुसरा टप्पा : राष्ट्रीय स्तर परीक्षा

राज्य स्तर परीक्षा पात्र झाल्यानंतर हि परीक्षा देता येते आणि या परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश असतात हे प्रश्न दोन विभागामध्ये विभागलेले असतात.

  • मानसिक क्षमता चाचणी ( MAT ) : यामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या आणि तर्क करण्याच्या क्षमतेचे मुल्यांकन केले जाते.
  • स्कॉलस्टिक अॅप्टीट्युड टेस्ट ( SAT ) : यामध्ये गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या सारख्या विभागातील प्रश्नाचा समावेश या विभागामध्ये असतो.

आम्ही दिलेल्या ntse exam information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर एनटीएसई परीक्षेची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ntse exam question paper in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि ntse exam sample paper in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!