ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGC Information in Marathi

ongc information in marathi ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, आज आपण या लेखामध्ये ओएनजीसी या विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच ते काय आहे, त्याचे पूर्ण स्वरूप काय आहे आणि ते कसे काम करते त्याचा इतिहास काय आहे या सर्व गोष्टींच्याविषयी खाली आपण सविस्तर माहिती घेवूया. ओएनजीसी हि एक कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी आहे आणि हि भारतातील एक सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आलेली कंपनी आह. ओएनजीसी चे पूर्ण स्वरूप ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असे आहे आणि जी भारतीय देशांतर्गत उत्पादनामध्ये ७५ टक्के योगदान दिलेले आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसी हि कंपनी भारतातील तर सर्वात मोठी कंपनी आहेच, परंतु हि कंपनी जागतिक उर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्यामध्ये ११ व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ओएनजीसी हि कंपनी तेल आणि वायू ऑपरेशन्स मध्ये १८ व्या स्थानावर आहे तर हि फोर्ब्स ग्लोबल २००० मध्ये हि कंपनी २२० व्या स्थानावर आहे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना हि भारतातामध्ये १४ ऑगस्ट १९५६ मध्ये भारत सरकारने केली होती आणि सध्या त्या कंपनीने चांगलीच उंची गाठलेली आहे आणि हि कंपनी जगातील २००० मोठ्या कंपन्यांमधील एक मानली जाते.

ongc information in marathi
ongc information in marathi

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGC Information in Marathi

कंपनीचे नावओएनजीसी कंपनी
पूर्ण स्वरूपऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
स्थापना१४ ऑगस्ट १९५६
संस्थापकभारत सरकार
मुख्यालय डेहराडून

ओएनजीसी कंपनीचा इतिहास – ONGC History in Marathi

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच १४ ऑगस्ट १९५६ झाली. प्रथम १९५५ मध्ये तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी सर्वप्रथम नैसर्गिक संसाधने आणि वैज्ञानिक संशोधन विभागाची स्थापन केली आणि मग त्यानंतर अधिकृतपणे १९५६ ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

नंतर काही काळाने या कंपनीची पुनर्रचना करण्यात आली आणि या कंपनीची पुनर्रचना मर्यादित उपक्रम म्हणून करण्यात आली आणि सध्या हि कंपनी सार्वजनिक सेवा उपक्रम बनला आहे. २००२ मध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करणाच्या हेतूने कंपनीने विदेशी लिमिटेड (ovl) या उपकंपनीची देखील स्थापना केली.

ओएनजीसी कंपनी विषयी विशेष तथ्ये – facts

 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजेच ओएनजीसी हि एक भारतीय बहुराष्ट्रीय तेल आणि वायू कंपनी आहे आणि या भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या मुख्यालय नवी दिल्ली, डेहराडून आणि उत्तराखंड या ठिकाणी आहे.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये एकूण ३१ हजार पेक्षा अधिक कामगार काम करतात.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीचे विदेशी लिमिटेडचे जगभरामध्ये १७ देशांच्यामध्ये प्रकल्प आहेत.
 • जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करणाच्या हेतूने कंपनीने विदेशी लिमिटेड (ovl) या उपकंपनीची देखील स्थापना करण्यात आली.
 • ओएनजीसी हि कंपनी तेल आणि नैसर्गिक वायू तर उत्पादन करतेच परंतु हि कंपनी इतर काही उत्पादने देखील घेते.
 • १९५५ मध्ये तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी सर्वप्रथम नैसर्गिक संसाधने आणि वैज्ञानिक संशोधन विभाग सुरु केला होता.
 • या कंपनीने भारतीय देशांतर्गत उत्पादनामध्ये ७५ टक्के योगदान दिलेले आहे.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना भारत सरकारने १४ ऑगस्ट १९५६ मध्ये केली.
 • ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीचे इक्विटी शेअर्स हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सूची बद्ध आहेत आणि २०१३ या वर्षामध्ये ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन मध्ये भारत सरकारचे सुमारे ६९ टक्के इक्विटी शेअर्स होते.
 • २०२२ मध्ये ओएनजीसी या कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक संचालक पदी अलका मित्तल यांची नियुक्ती झालेली आहे आणि या कंपनीच्या पहिला महिला व्यवस्थापिका आहेत.
 • ओएनजीसी हि कंपनी तेल आणि वायू या कार्या मध्ये १८ व्या स्थानावर आहे.
 • या कंपनीमध्ये ३० हजारपेक्षा अधिक कामगार काम करतात आणि यामध्ये २ हजार पेक्षा अधिक महिला कामगार आहेत आणि यामध्ये २०० कामगार हे अपंग कामगार आहेत.

ओएनजीसी कंपनीची विविध उत्पादने – products

ओएनजीसी हि एक बहुराष्ट्रीय आणि वायू कंपनी आहे आणि हि आपल्या भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे ज्याची वेगवेगळी उत्पादने आहेत. खाली आपण आता या कंपनीची वेगवेगळी उत्पादने पाहणार आहोत.

 • क्रूड तेल आणि नैसर्गिक वायू हे या कंपनीचे मुख्य उत्पादने आहेत.
 • त्याचबरोबर हि कंपनी सुगंधी नाफ्था, केरोसीन तेल, लीक्विफाइड पेट्रोलियम गॅस ( एलपीजी ) याचे उत्पादन घेतात.

ओएनजीसी कामापानीला मिळालेले पुरस्कार – awards

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीने स्थापनेनंतर चांगल्या प्रकारे काम करून भारतातील एक मोठी कंपनी बनली आणि या कंपनीला अनेक वेगवेगळ्या प्रकारे सन्मान झाला. खाली आपण कंपनीला मिळालेली काही पुरस्कार पाहणार आहोत.

 • ओएनजीसी हि कंपनी २०१३ मध्ये गोल्डन पिकॉक जिंकणारी २४ वी कंपनी होती तर हि कंपनी २०१४ मध्ये गोल्डन पिकॉक जिंकणारी १२ वी विजेती होती.
 • भारत सरकारने ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीला २०१० मध्ये महारत्न असा दर्जा देऊन सन्मानित केले.
 • त्याचबरोबर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीने २०१३ मध्ये ग्रीनटेक एक्सलन्स हा पुरस्कार जिंकला.

आम्ही दिलेल्या ongc information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ongc company information in marathi या ongc symbol information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ongc in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ONGC History in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!