पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी Paneer Tikka Masala Recipe in Marathi

Paneer Tikka Masala Recipe in Marathi पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी टिक्का मसाला रेसिपी मराठी पनीर म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी येत आणि डोळ्यासमोर पनीरपासून बनवलेल्या भाज्या आणि रेसिपीज येतात आणि त्या म्हणजे पनीर मसाला, पनीर कुर्मा, पनीर टिक्का, पनीर पसंदा, पनीर कोफ्ता, यासारख्या अनेक तिखट आणि गोड पदार्थ पनीर पासून बनवले जातात आणि यामधील एक लोकप्रिय आणि खूप स्वादिष्ट लागणारा पदार्थ म्हणजे पनीर टिक्का मसाला. आज आपण या लेखामध्ये पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा ? ते पाहणार आहोत.

पनीर टिक्का मसाला या डिशला भारतीय रेस्टॉरंट मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे हॉटेलमध्ये जाणारा लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत कोणीही असो सर्वजण हा पदार्थ हॉटेलमध्ये गेल्यानंतर हमखास मागवला जातो. पनीर टिक्का मसाला बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, टोमॅटो, कांदा, खोबरे हे सर्व भाजून घेवून त्याची पेस्ट बनवली जाते आणि त्याला लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि काही इतर साहित्य घालून फोडणी देवून त्याची ग्रेव्ही बनवली जाते.

आणि त्या ग्रेव्ही मध्ये तेलामध्ये लालसर भाजलेले पनीर तुकडे घातले जातात. पनीर टिक्का मसाला हि भारतीय डिश आहे आणि हि भारतातामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते आणि आवडीने चपाती, रोटी किंवा नान सोबत खाल्ली जाते.

पनीर टिक्का मसाला हि रेसिपी घरी अगदी सोप्या पध्दतीने बनवता येते आणि आपण हि रेसिपी  ३० ते ३५ मिनिटामध्ये बनवू शकतो. चला तर आता आपण रेस्टॉरंट सारखी पनीर टिक्का रेसिपी घरी कशी बनवायची ते पाहूयात.

Paneer Tikka Masala Recipe in Marathi
Paneer Tikka Masala Recipe in Marathi

पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी – Paneer Tikka Masala Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पनीर टिक्का कसा बनवला जातो – how to make paneer tikka masala

पनीर टिक्का मसाला बनवताना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, टोमॅटो, कांदा, खोबरे हे सर्व भाजून घेवून त्याची पेस्ट बनवली जाते आणि त्याला लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि काही इतर साहित्य घालून फोडणी देवून त्याची ग्रेव्ही बनवली जाते आणि त्या ग्रेव्ही मध्ये तेलामध्ये लालसर भाजलेले पनीर तुकडे घातले जातात.

पनीर टिक्का रेसिपी – paneer tikka recipe in marathi

पनीर टिक्का रेसिपी हि एक भारतीय तिखट रेसिपी आहे जिला रेस्टॉरंट मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि हि रेचीपे अनेक लोकांना खूप आवडते म्हणजेच हॉटेलमध्ये जाणारा लहानांपासून मोठ्यांच्यापर्यंत कोणीही असो सर्वजण हा पदार्थ हॉटेलमध्ये गेल्यानंतर हमखास मागवला जातो. परंतु असे काही लोक आहेत. जे हा पदार्थ घरी ट्राय करतात त्यांच्यासाठी आज आपण हि रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पनीर टिक्का रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make paneer tikka recipe 

पनीर टिक्का बनवण्यासाठी पनीर तुकडे, तंदुरी मसाला, कांदा, टोमॅटो, काजू आणि गरम मसाला हे मुख्य साहित्य लागते तर हि रेसिपी बनवण्यासाठी इतर साहित्य देखील लागते. पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण पनीर टिक्का बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • २ वाटी पनीर क्युब्स / तुकडे.
  • १ वाटी फेटलेले दही ( मॅरीनेशनसाठी ).
  • १ चमचा तंदुरी मसाला ( मॅरीनेशनसाठी ).
  • १ चमचा लिंबू रस ( मॅरीनेशनसाठी ).
  • २ मोठे कांदे.
  • २ टोमॅटो.
  • १ चमचा आले लसून पेस्ट.
  • १ वाटी काजू आणि मगज पेस्ट.
  • दीड चमचा गरम मसाला पावडर.
  • १/२ चमचा धने पावडर.
  • १/४ चमचा हळद.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • २ मोठे चमचे तेल.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( गरजेनुसार ).

पनीर टिक्का बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make paneer tikka recipe 

पनीर टिक्का हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि ३० ते ३५ मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून पनीर टिक्का कसा बनवायचा ते पाहूयात.

  • पनीर टिक्का बनवताना सर्वप्रथम एका बावूल मध्ये फेटलेले दही घ्या आणि त्यामध्ये तंदुरी मसाला, लिंबू रस आणि चवीपुरते मीठ घाला आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये पनीर तुकडे घालून ते या दह्यामध्ये चांगले मिक्स करा म्हणजे दही सर्व पनीरच्या तुकड्यांना लागू द्या.
  • हे मिश्रण कमी कमी १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • आता या वेळेमध्ये एक कांदा मोठा चिरून कच्च्या कांद्याची पेस्ट करून घ्या आणि दुसरा आणखीन एक कांदा चिरून तो तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत भाजून त्याची देखील पेस्ट करून घ्या आणि ती बाजूला ठेवा.
  • टोमॅटो देखील चिरून त्यामधील बी काढा आणि त्याची देखील बारीक प्युरी करून घ्या.
  • तसेच काजू आणि मगज मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून त्याची देखील पेस्ट बनवून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर नॉन स्टिक पॅन ठेवा आणि त्यामध्ये अर्धा मोठा चमचा तेल घाला आणि त्यामध्ये मॅरीनेट केलेले पनीर घाला आणि ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि ते पॅन मधून बाजूला काढून घ्या.
  • आता परत गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा कढई गरम झाली कि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये आले लसून पेस्ट घाला आणि २ सेकंदासाठी तेलामध्ये परता आणि मग त्यामध्ये कच्च्या कांद्याची केलेली पेस्ट घाला आणि ती चांगली भाजा मग त्यामध्ये टोमॅटो प्युरी आणि भाजलेल्या कांद्याची पेस्ट घाला आणि टोमॅटो आणि कांदा पेस्ट ४ मिनिटे भाजा आता यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि गरम मसाला घाला आणि हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • आता यामध्ये काजू मगज पेस्ट घाला आणि ती देखील या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करा आता हे मिश्रण जास्त घट्ट होईल.
  • यामध्ये आपल्याला थोडे पाणी घालून हे मिश्रण थोडे सरसरीत करावे लागेल.
  • मग यामध्ये चवीनुसार मीठ आणि लालसर भाजलेले पनीर घाला आणि ते मिक्स करा आणि ५ मिनिटे ग्रेव्ही झाकण लावून वाफवा.
  • पनीर टिक्का सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

पनीर टिक्का कश्या सोबत सर्व्ह केला जातो – serving suggestion

  • पनीर टिक्का रेसिपी आपण तंदुरी रोटी, साधी रोटी, नान, चपाती, जीरा राईस किंवा पांढऱ्या भातासोबत खावू शकतो.

आम्ही दिलेल्या paneer tikka masala recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पनीर टिक्का मसाला रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paneer tikka masala recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि paneer tikka masala recipe video in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये paneer tikka masala recipe in marathi pdf Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!