Pasta Recipe in Marathi – Pasta Kasa Banvaycha पास्ता रेसिपी मराठी पास्ता हि अशी रेसिपी आहे कि हि रेसिपी सर्वांच्या आवडत्या डिशपैकी एक आहे कारण यामध्ये सॉस, चीज किंवा मसाले वापरून बनवली जाते. पास्ता हि अशी रेसिपी आहे जी आपण खूप कमी वेळेमध्ये बनवू शकतो आणि हि डिश बनवण्यासाठी देखील सोपी आहे. पास्ता रेसिपी हि लहान मुलांच्यासाठी, तरुणांच्यासाठी आणि प्रौढांच्यासाठी देखील एक उत्तम रेसिपी आणि हि रेसिपी वेगवेगळ्या प्रकारच्या पास्त्यापासून बनवली जाते जसे कि अल्फ्रेडो, फेटुसिन, स्पॅगेटी आणि पेने पास्ता असे विविध प्रकारचे पास्ता आहेत.
पास्ता हि रेसिपी जगभरामध्ये बनवली जाते आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये हा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आज या लेखामध्ये आपण पास्ता बनवण्याचे काही प्रकार पाहणार आहोत.
पास्ता रेसिपी मराठी – Pasta Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | ८ ते ९ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १८ मिनिटे |
मसाला पास्ता आणि मसाला नूडल्स हे लहान मुलांसह अनेक लोकांचे आवडते आहेत. मसाला पास्ता रेसिपीचा प्रकार हा अत्यंत चवदार, झटपट आणि कौटुंबिक आवडती रेसिपी. आपण हि रेसिपी आठवड्याच्या शेवटच्या रात्री दिनार म्हणून खाऊ शकतो तसेच जेव्हा तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये कोणतीतरी डिश बनवायची असल्यास हि डिश आपण सहजपणे बनवू शकतो.
- नक्की वाचा: दही वडा रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | ८ ते ९ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | १८ मिनिटे |
- २ कप शिजवलेला पास्ता (तुम्हाला आवडणारा कोणताही प्रकारचा किंवा साधा पास्ता वापरा)
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ वाटी मटार.
- २ मध्यम टोमॅटो ( एकदम बारीक चिरलेले ).
- ४ चमचे मसालेदार टोमॅटो केचप.
- १ चमचा गरम मसाला.
- १/४ हळद
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- ३ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- सर्व प्रथम कढई किंवा पॅन गॅसवर मध्यम आचेवर आचेवर ठेवून त्यामध्ये तेल घाला.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये आल लसू पेस्ट आणि कांदा घालून कांदा लालसर किंवा पारदर्शी होईपर्यंत चांगला भाजून घ्या.
- आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि मटार घालून ते चांगले मिक्स करून ते काही वेळासाठी भाजून चांगले शिजवून घ्या.
- मग त्यामध्ये थोडीसी हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता यामध्ये उकडून घेतलेला पास्ता घाला आणि तो चांगला मिक्स करून घ्या आणि पॅनला किंवा कढईला झाकण लावून ते ४ ते ५ मिनिटे चांगले शिजवून घ्या.
- गॅस बंद करून सर्व्ह करा.
मसाला पसंत कश्या सोबत खावा – serving suggestion
मसाला पास्ता आपण तसाच खाल्ला तर खूप छान लागतो कारण हा मसालेदार आणि थोडा तिखट असतो. त्याचबरोबर हा पास्ता आपण कोशिंबीर किंवा सूप सोबत खाऊ शकतो.
चीज पास्ता ही एक स्वादिष्ट डिश आहे आणि ही चविष्ट मसाले आणि इतर घटकांसह बनविली जाते आणि आपल्याला चीज पास्ता बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होते. भरपूर वितळलेले चीज आणि टोमॅटो प्युरी पास्त्याला स्वादिष्ट आणि समाधानकारक चव देता. चला तर मग पाहूयात चीज पास्ता कसा बनवायचा असतो.
- नक्की वाचा: शाबूदाणा वडा रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
- २५० ग्रॅम पेने पास्ता.
- १ वाटी चिरलेली सिमला मिरची (लाल, पिवळा आणि हिरवा)
- १ चमचा आले-लसूण पेस्ट.
- १ कांदा ( चिरलेला ).
- १/२ वाटी टोमॅटो प्युरी.
- १ चमचा लाल मिरची.
- २ चमचे पास्ता मसाला.
- २ वाटी मोझारेला चीज.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( पास्ता उकळण्यासाठी ).
- एक भांडे घ्या आणि त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा.
- पाणी उकळले की त्यात पेन पास्ता टाका आणि ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- नंतर लगेच पास्त्यातील पाणी काढून टाका.
- शिजवलेला पास्ता बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या, त्यानंतर चिरलेला कांदा आणि चिरलेली सिमला मिरची घालून ५ मिनिटे परतून घ्या.
- त्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी, लाल तिखट, पास्ता मसाला घालून मिक्स करा.
- आता त्यामध्ये शिजवलेला पास्ता आणि चवीनुसार मीठ घालून ते चांगले मिक्स करा.
- पास्त्यावर चीज पसरावा आणि चीज वितळेपर्यंत झाकून ठेवा.
- तुमचा चीज पास्ता खाण्यासाठी तयार आहे.
- २५० ग्रॅम पेने पास्ता.
- १ वाटी चिरलेली सिमला मिरची (लाल, पिवळा आणि हिरवा)
- १ चमचा आले-लसूण पेस्ट.
- १ कांदा ( चिरलेला ).
- १ वाटी मटार.
- अर्धा वाटी चीज.
- १ वाटी दुध.
- १/२ छोटी वाटी कॉर्नफ्लोवर.
- मीठ ( चवीनुसार ).
- २ चमचे तेल
- एक भांडे घ्या आणि त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवा.
- पाणी उकळले की त्यात पेन पास्ता टाका आणि ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर शिजवा.
- नंतर लगेच पास्त्यातील पाणी काढून टाका.
- शिजवलेला पास्ता बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या, त्यानंतर चिरलेला कांदा आणि चिरलेली सिमला मिरची आणि मटार घालून ५ मिनिटे परतून घ्या किंवा भाज्या चांगल्या भाजून घ्या.
- आता या पास्ता आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि पास्त्यामध्ये भाज्या चांगल्या मिक्स करा.
- मग त्यामध्ये कॉर्नफ्लोवर दुधामध्ये मिक्स करून ते पास्त्यामध्ये घालून ते चांगले मिक्स करा आणि पास्ता थोडा वेळ शिजवा आणि गॅस बंद करा.
- तुमचा व्हाईट सॉस पास्ता तयार झाला.
आम्ही दिलेल्या homemade pasta recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चटपटीत पास्ता रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या macaroni pasta recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि madhuras pasta recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये masala macaroni recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट