पॅटीस रेसिपी मराठी Patties Recipe in Marathi

Patties Recipe in Marathi पॅटीस रेसिपी मराठी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्ता रेसिपी बनवल्या जातात आणि त्यामधील एक वेगळा, झटपट बनणारा, स्वादिष्ट आणि मॉडर्ण नाश्ता म्हणजे पॅटीस. पॅटीस हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा आपण घरामध्ये वेगवेगळ्या पध्दतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो जसे कि बटाट पॅटीस, व्हेज पॅटीस, कॉर्ण पॅटीस इत्यादी. पॅटीस हि रेसिपी भारतामध्ये बहुतेक ठिकाणी बनवली जाते आणि हि आवडीने खाल्ली जाते. हि रेसिपी लहानांच्यापासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे.

पॅटीस हि रेसिपी आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अगदी सोप्या पध्दतीने बनवू शकतो आणि हि रेसिपी बनवण्यासाठी खूप कमी वेळ म्हणजे २० ते २५ मिनिटे लागतात आणि हि बनवण्यासाठी खूप साहित्य देखील लागत नाही. चाल तर मग आपण वेगवेगळ्या प्रकारची पॅटीस रेसिपी कशी बनवायची ते पाहुयात.

patties recipe in marathi
patties recipe in marathi

पॅटीस रेसिपी मराठी – Patties Recipe in Marathi

पॅटीस रेसीपीज – patties recipe 

पॅटीस हि एक नाश्ता रेसिपी आहे जी आपण खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतो. चला तर मग वेगवेगळ्या प्रकारे पॅटीस कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

बटाटा पॅटीस रेसिपी – batata pattice recipe in marathi 

बटाटा पॅटीस रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make batata pattice recipe 

बटाटा पॅटीस बनवण्यसाठी जे साहित्य लागते. ते आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते आणि जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करू शकतो. चला तर मग बटाटा पॅटीस  बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

 • ३ ते ४ मोठे बटाटे ( उकडलेले ).
 • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
 • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.
 • मीठ ( चवीनुसार ).
 • मैदा किंवा कॉर्णफ्लोवर.

बटाटा पॅटीस  बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make batata pattice recipe 

 • पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून ते कुकरमध्ये पाणी घालून उकडून घ्या.
 • मग बटाटे थोडे गार झाले कि कुकर मधून काढा आणि त्याची साल काढून ते कुस्करून एक मिक्सिंग बाऊलमध्ये घाला आणि त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि मीठ घाला आणि ते मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवा
 • आणि मग ह्या टिक्क्या मैद्याच्या किंवा कॉर्णफ्लोवर च्या पिठामध्ये घोळून घ्या.
 • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करा आणि त्यामध्ये पॅटीस तळण्यासाठी तेल घाला आणि तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये आपण बनवून ठेवलेल्या पॅटीस  घाला आणि लालसर रंग येईपर्यंत आणि पॅटीस  कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
 • कढईतील तेलामध्ये जितक्या पॅटीस मावतील तितक्या पॅटीस  घालून तळून घ्या म्हणजेच पॅटीस  २ बॅच मध्ये तळून घ्यावे.
 • बटाटा पॅटीस रेसिपी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

व्हेज पॅटीस रेसिपी – veg patties recipe in marathi

व्हेज पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make veg patties recipe 

 • २ मोठे बटाट ( चिरलेला ).
 • १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
 • १ शिमला मिरची ( बिया काढून चिरलेली ).
 • ३ चमचे मटार.
 • १ चमचा लाल मिरची पावडर.
 • १/२ चमचा धने पावडर.
 • १ ते २ चमचा मैदा.
 • मीठ ( चवीनुसार ).

व्हेज पॅटीस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make veg patties recipe 

 • व्हेज पॅटीस बनवताना प्रथम चिरलेल्या भाज्या जसे कि बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची आणि मटार कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घालून भाज्या कुकरचे झाकण लावा आणि कुकरला मध्यम आचेवर एक शिट्टी द्या आणि भाज्या वाफवून घ्या त्यामुळे भाज्या मऊ होतील.
 • भाज्यांच्या मध्ये शक्यतो पाणी राहणार नाही आणि जर राहिले असेल तर ते चांगले गळून घ्या.
 • आता ह्या भाज्या मॅश करा आणि एका बाऊल मध्ये घ्या आणि मग त्यामध्ये मैदा, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून ते घट्ट माळून घ्या.
 • आता हाताला तेल लावून त्याच्या छोट्या छोट्या टिक्क्या बनवा
 • आणि मग ह्या टिक्क्या मैद्याच्या किंवा कॉर्णफ्लोवर च्या पिठामध्ये घोळून घ्या.
 • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करा आणि त्यामध्ये पॅटीस तळण्यासाठी तेल घाला आणि तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये आपण बनवून ठेवलेल्या पॅटीस  घाला आणि लालसर रंग येईपर्यंत आणि पॅटीस  कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
 • कढईतील तेलामध्ये जितक्या पॅटीस मावतील तितक्या पॅटीस घालून तळून घ्या म्हणजेच पॅटीस २ बॅच मध्ये तळून घ्यावे.
 • व्हेज पॅटीस रेसिपी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.

कॉर्ण पॅटीस रेसिपी – corn pattice recipe in marathi 

कॉर्ण पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make corn tikki recipe 

 • १ वाटी कॉर्ण पेस्ट.
 • २ उकडलेले बटाटे.
 • २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या.
 • कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
 • १ चमचा मैदा.
 • २ मोठे चमचे ब्रेड क्रम्प्स
 • मीठ ( चवीनुसार ).
 • तेल ( आवश्यकतेनुसार ).

कॉर्ण पॅटीस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make corn tikki recipe 

 • कॉर्ण पॅटीस बनवताना प्रथम उकडलेले बटाटे सोलून ते मॅश करून घ्या.
 • आता एका मिक्सिंग बाऊल मध्ये कॉर्ण, मॅश केलेला बटाटा, हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या, मीठ, मैदा आणि कोथिंबीर घाला आणि मिक्स करा आणि त्याची कानीन मळल्या सारखे पीठ माळून गोळा बनवून ठेवा.
 • आता ब्रेड क्रम्प्स एका प्लेटमध्ये काढून घ्या.
 • आता आपण बनवून ठेवलेल्या मिश्रणाच्या टिक्क्या बनवून घ्या आणि त्या ब्रेड क्रम्प्स मध्ये घोळून घ्या.
 • आता तवा गरम करा आणि त्यावर तेल टाकून मावतील तेवड्या पॅटीस घाला आणि त्याला तेल सोडून ते लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्या. ह्या सर्व पॅटीस दोन्ही बाजूने तेल सोडून भाजून घ्या.
 • अश्या प्रकारे सर्व टिक्क्या भाजून घ्या.
 • आणि गरमागरम पॅटीस टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

आम्ही दिलेल्या Patties Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पॅटीस रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!