पेशवेकालीन इतिहास Peshwa History in Marathi

Peshwa History in Marathi – Peshwa Family Tree in Marathi पेशवे इतिहास मराठी भारतीय उपखंडातील मराठा साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पेशवे यांची नेमणूक करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं त्यातील पंतप्रधान म्हणजेच पेशवे होय. सुरवातीच्या काळामध्ये पेशवे उर्फ पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचे सल्लागार म्हणून काम करायचे. परंतु कालांतराने पेशव्यांनी मराठा साम्राज्य वरती राज्य करण्यास सुरुवात केली. पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. या लेखामध्ये आपण पेशव्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज,‌ छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम यांच्या राजवटीमध्ये सुरुवातीस पेशवे यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं ज्यामध्ये पहिले पेशवे होते मोरोपंत पिंगळे जे अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख म्हणजेच पंतप्रधान होते. सुरुवातीच्या काळामध्ये पेशवे हे सर्व मंत्री होते ज्यांनी राज्याचे प्रमुख अधिकारी म्हणून कार्य केल. येणाऱ्या काळामध्ये पेशव्यांनी सर्वोच्च प्रशासकीय पद भूषवले आणि मराठा साम्राज्यावर वर्चस्व गाजवले. चित्तपावन ब्राह्मण भट यांच्या घराण्या अंतर्गत पेशव्यांची कारकीर्द सुरू झाली इथूनच पेशवे हे मराठा साम्राज्याचे वास्तविक वंशपरंपरागत प्रशासक बनले.

peshwa history in marathi
peshwa history in marathi

पेशवेकालीन इतिहास – Peshwa History in Marathi

Peshwa Family Tree in Marathi

बालाजी विश्वनाथ

बालाजी विश्वनाथ यांच्यापासून पेशव्यांची कारकीर्द सुरू झाली ते सहावी पेशवे होते परंतु ते पेशवे राजवटीचे खरे संस्थापक होते. त्यांचा जन्म १९६२ साली झाला. रायगडमधील श्रीवर्धन हे त्यांचं मूळ गाव होतं. आपले मूळ गाव सोडून त्यांनी घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. १७१३ मध्ये छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवेपद दिले. कारण बालाजी विश्वनाथ यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी ताराबाई आणि मुख्य शत्रू चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण आणि दामाजी ओरड यांचा पराभव केला होता.

त्यांनी जहाजाचे नेते कान्होजी आंग्रे यांच्याशी करार करून छत्रपती शाहूंचे राज्य विस्तार वाढवला. मोगलांशी समझोता केला ज्यामुळे मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी चे अधिकार दख्खनमध्ये प्राप्त झाले. बालाजी विश्वनाथ यांना त्यांची पत्नी राधाबाई यांच्या पासून दोन मुले व दोन मुली अशी संताने झाली. त्यातील मुलांचे नाव बाजीराव आणि चिमाजी आप्पा होते आणि भय्यू बाईसाहेब अनुबाई साहेब या दोन मुली होत्या.

बाजीराव पहिले – Pahila Bajirao

१७१९ मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे पुत्र बाजीराव यांना महाराज शाहूंनी पेशवे पद दिलं. बाजीराव पहिला हे थोरले होते जे नऊ पेशव्यांपैकी सर्वात प्रभावशाली म्हणून ओळखले जायचे. जेव्हा त्यांच्याकडे पेशवेपद आलं तेव्हा जेमतेम ते एकोणीस वर्षाचे होते. परंतु अगदी लहान वयातच त्यांनी आपली‌ कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली होती. प्रभावी व्यक्तिमत्व, विलक्षण क्षमता, उत्तम नेतृत्वशक्ती,‌ त्यांचे चातुर्य या सगळ्या गोष्टींमुळे ते मराठा साम्राज्याचे भारतातील सर्वात शक्तिशाली शासक बनले. हिंदू पद पादशाही स्थापने साठी त्यांनी लढा दिल्याचे सांगितले जाते.

मध्य भारत आणि राजपुताना जिंकून त्यांनी वायव्येला गुजरात आणि दक्षिणेला दख्खन पर्यंत मराठा साम्राज्याचे वर्चस्व वाढवले. १७१३ मध्ये त्यांनी दिल्लीवर हल्ला केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लढलेली प्रत्येक लढाई जिंकली आहे. त्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये मराठ्यांसाठी मानाचे स्थान प्राप्त केले.

त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लढाई त्यांनी जिंकली आणि म्हणूनच त्यांना अखंड हिंदुस्थानात एक जाहला अशी उपमा दिली जाते. मोडकळीला आलेले मराठा साम्राज्य त्यांच्या कारकीर्दीमध्ये पुन्हा आकारास आले. २८ एप्रिल १७४० रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील शनिवार वाडा येथे उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या रूपात त्यांचे स्मरण केले जाते.

बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे – Nana Saheb Peshwa History in Marathi

१७२१ च्या सुमारास नानासाहेब पेशवे यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते पेशवे बनले. त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर पश्चिम पूर्व आणि मध्य भारतात केला. १७५८ च्या अट्टॉक लढाईत पेशवाई वर कब्जा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा विस्तार झाला परंतु १७६१ मध्ये अहमद शाह अबदाली यांच्याविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे सेनापती आणि चुलत भावाचा पराभव झाला.

पेशव्यांच्या काळामध्ये त्यांनी पुणे शहराचा विकास केला प्रसिद्ध पार्वती मंदिर येथील लकडी पूल बांधून त्यांनी पुण्यामध्ये नाना पेठ स्थापन केली. पुणे शहराला शुद्ध पाणी देण्यासाठी कात्रज जवळ जलसाठा बांधला इत्यादी गोष्टींमध्ये त्यांनी योगदान दिले. १७६१ मध्ये नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला.

माधवराव पहिला

माधवराव हे बालाजी बाजीराव यांचे मोठे चिरंजी होते ज्यांनी अवगी वयाच्या सोळाव्या वर्षी पेशवेपद स्वीकारले. ते अल्पायुषी ठरले. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. माधवराव पहिला यांच्या पासूनच वंशपरंपरागत पेशवाई सुरू झाली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेशवाई मध्ये अंतर्गत मतभेद वाढू लागले होते त्यांनी निजामाशी यशस्वी युद्ध केले.

पानिपतची तिसरी लढाई मध्ये मराठा साम्राज्याच भरपूर नुकसान झालं परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ही नुकसान भरपाई भरून काढली. मराठा साम्राज्याचे प्रशासन कमकुवत झाले होते त्यांनी मराठा साम्राज्याची तिजोरी व खाती दुरुस्त केली. १७७२ मध्ये त्यांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला. त्याच्या महानतेची साक्ष देणारे स्मारक पुण्यातील पेशवे पार्क येथे उभारण्यात आले आहे.

नारायणराव

नारायणराव यांचा जन्म १७५५ साली झाला. ते अस्थिर, विद्वान व विलासी होते. ते पुढील पेशवे बनले परंतु त्यांचे काका रघुनाथराव यांना हे मान्य नव्हतं. रघुनाथराव यांना पेशव्यांची गादी हवी होती परंतु इतर मंत्री नाते मान्य नव्हत. त्यांची पत्नी आनंदीबाई पेशवे यांची आई गोपिकाबाई यांच्यामध्ये वैर होते.

म्हणूनच त्यांच्या पत्नीने रघुनाथराव यांच्या साह्याने कट रचला रघुनाथराव त्यांचे फक्त अपहरण करणार होते परंतु त्यांची पत्नी आनंदीबाई यांच्या सांगण्यावरून नारायण राव यांची शनिवारवाड्यात हत्या करण्यात आली. पुढे ते स्वतः पेशव्यांच्या गादीवर बसले.

पेशवे रघुनाथराव पेशवे

रघुनाथराव हे बालाजी बाजीराव यांचे चुलत भाऊ होते. ते अतिशय महत्त्वकांक्षी व सत्तेच्या मोहापायी स्वार्थी, लोभी व गर्विष्ट बनले होते. त्यांनी माधवरावांच्या कारकीर्दीमध्ये देखील शत्रूंशी तडजोड केली होती माधवरावांचा मृत्यू मध्ये नारायणराव पेशवे जेव्हा पेशव्यांच्या गादीवर बसले तेव्हा त्यांनी कट कारस्थान रचले ज्यामुळे त्यांची हत्या झाली. त्यांनी मराठा साम्राज्याचा उत्तरेकडे विस्तार केला व उत्तर भारतामध्ये मराठा शक्तीचा ऱ्हासही पाहिला.

माधवराव दुसरे

माधवराव दुसरे हे ४० दिवसांचे असताना त्यांना पेशवेपद मिळाले माधवराव पेशवे यांच्या कारकीर्द मध्ये नाना फडणीस यांनी पेशव्यांचा राजकीय कारभार सांभाळला.

बाजीराव दुसरा

नाना फडणवीस यांनी दुसरे माधवराव यांचा मृत्यू झाल्यानंतर बाजीराव यांच्याऐवजी त्यांचे चुलत भाऊ चिमाजी अप्पा यांना पेशवा म्हणून नेमले.आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ तुरुंगात गेला होता. त्यांचे शिक्षणही अपूर्ण राहिले होते शिवाय ते अनुभवी देखील नव्हते. आपल्या आजोबांच्या विरुद्ध त्यांनी षड्यंत्र रचले होते ते स्वभावाने क्रूर व विश्वास घातकी होते. अठराशे‌ मध्ये त्यांच्या आजोबांचा मृत्यू झाला. पेशव्यांनी विठोजी होळकर यांच्या हत्येमुळे यशवंतराव होळकर यांना पेशवे करण्यास प्रवृत्त केले.

त्यांनी पुण्यातील पेशवे आणि सिंधीया यांचा पराभव केला. ब्रिटिशांशी बेसिन चा करार केला आणि इतर कोणत्याही शक्तीशी करार करण्यास नकार दिला आणि ते पुन्हा पुण्यात पोहोचले. दुसरे अँग्लो मराठा युद्ध सुरू झाले. इथूनच पेशवाई संपुष्टात येऊ लागली होती ज्यावेळी शेवटचे अँग्लो मराठा युद्ध घडले त्यावेळी इंग्रजांनी पुन्हा बाजीरावांना त्यांच्यावर जबरदस्ती करून एक करार केला.

ज्यामुळे बाजीरावांना आपले मराठा संघावरील राज्य सोडावे लागले. परंतु कालांतराने बाजीराव यांनी पुन्हा पुण्यावर वर आक्रमण केलं आणि १८१८ मध्ये भीमा गाव कोरेगाव युद्ध घडले ज्यामध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण पुण्यावर इंग्रजांनी वर्चस्व गाजवले. आणि संपूर्ण मराठा साम्राज्य ब्रिटीशांच्या नियंत्रणाखाली आले.

आम्ही दिलेल्या peshwa history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पेशवेकालीन इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या history of peshwa family in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि nana saheb peshwa history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pahila bajirao Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!