piano information in marathi – piano meaning in marathi पियानो माहिती मराठी, सध्या संगीत क्षेत्र हे खूपच पुढे चालले आहे आणि संगीत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे आणि संगीत क्षेत्रातील एक महत्वाचा घटक म्हणजे वाद्य आणि त्यामधील पियानो हे देखील एक वाद्य आहे. जे संगीत बनवण्यासाठी वापरले जाते. पियानो हे एक वाद्ययंत्र आहे जे आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहे आणि या वाद्याचा शोध १० व्या शतकामध्ये लागला असे म्हटले जाते, पियानो हे कीबोर्ड असलेले एक वाद्य आहे आणि पियानो जो असतो त्यामध्ये एकूण ८८ कि असतात.
आणि पियानो हे वाद्य १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पियानो हे पाश्च्यात शास्त्रीय संगीतामधील अत्यंत लोकप्रिय वाद्य म्हणून ओळखले जाते. आज आपण या लेखामध्ये पियानो या वाद्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
पियानो माहिती मराठी – Piano Information in Marathi
वाद्याचे नाव | पियानो |
शोध | १७०० च्या सुमारास शोध लागला |
कोणी लावला | बार्टोलोमियो क्रिस्टोफोरी |
कोठे लागला | इटली |
मूळ नाव | ग्रेवीसेम्बोला कॉल पियानो ई फोर्टे |
पियानो बद्दल महत्वाची माहिती – piano musical instrument information in marathi
पियानो या संगीत वाद्याचा शोध बार्टोलोमियो क्रिस्टोफोरी यांनी १७०० च्या सुमारास लावला आणि इटली या देशामध्ये पियानोचा शोध लागला. पियानोचे मूळ नाव हे ग्रेवीसेम्बोला कॉल पियानो ई फोर्टे असे होते जे इटालियन मधून भाषांतरित केलेले होते. पियानो हे एक कीबोर्ड असलेले वाद्य आहे आणि हे वाद्य संगीत क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात आणि हे खूप पूर्वी पासून वापरले जाणारे वाद्य आहे.
जे सध्या नवीन स्वरूपामध्ये तयार केले आहे. सामान्य पियानो या वाद्यामध्ये एकूण ८८ कि असतात आणि त्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या अश्या कि असतात आणि त्यामध्ये काळ्या रंगाच्या कि ह्या एकूण ३६ असतात आणि ५२ पांढऱ्या रंगाच्या कि असतात.
त्याचबरोबर ध्वनिक पियानो मध्ये धातूच्या तारा असतात आणि जेंव्हा तुम्ही हातोडा स्ट्रिंगवर आदळतो त्यावेळी कंपन होते आणि त्यामधून आवाज येतो. बहुतेक पियानो कि मध्ये एकूण ३ तार असतात आणि आणि काही वेळा एक किंवा २ देखील असू शकतात आणि सरासरी पियानोमध्ये एकूण २३० तार असतात.
पियानो नोट्स ना काय म्हणतात ?
पियानो नोट्स ना वेगवेगळ्या देशांच्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते आणि हि नावे तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्यावर अवलंबून असतील. पांढऱ्या रंगाच्या किंना सोलफेज सिलॅबल्सची नावे दिली जातात आणि या किंना नसर्गिक कि म्हणून देखील ओळखले जाते आणि त्यांनी नावे ए ( A ) पासून जी ( G ) पर्यंत दिलेली असतात.
काळ्या कि सर्वात जवळ असलेल्या पांढऱ्या किला शार्प किंवा फ्लॅट असे नाव दिले आहे आणि त्यामुळे प्रत्येक काळ्या कि ला प्रत्यक्षात दोन नावे असतात. उदा : तुम्ही सी ( c ) वरून काळ्या कि वर गेल्यास ते सी ( c ) शार्प होते.
पियानो वाद्यांविषयी विशेष तथ्ये – how to play piano in marathi
- पियानो या संगीत वाद्याचा शोध बार्टोलोमियो क्रिस्टोफोरी यांनी १७०० च्या सुमारास लावला आणि इटली या देशामध्ये पियानोचा शोध लागला.
- पियानो हे वाद्य शिक्षण्यासाठी खूप सोपे आहे आणि कोणीही कि दाबून आवाज काढू शकतो आणि व्हिज्युअल लेआऊट कोणत्या नोट्स आहेत हे जाणून घेणे देखील खूप सोपे आहे. इतर साधनांना श्वासोच्छवास नियंत्रण आणि अचूक बोट प्लेसमेंट या सारखी कौशल्ये आवश्यक असतात.
- परंतु पियानो हे वाद्य वाजवण्यासाठी एक टीप योग्यरीत्या वापरली कि आपण पियानो लगेच वाजवू शकतो. तुम्ही पियानो या वाद्यावर जवळजवळ कोणतेही संगीत वाजवू शकता म्हणजेच दुसऱ्या वाद्यासाठी लिहिलेली संगीत देखील आपण पियानोवर वाजवू शकतो.
- पियानोमध्ये एकूण २२० ते २३० तार असतात ज्या स्टील पासून बनलेल्या असतात आणि पियानोमध्ये असणाऱ्या हातोड्याने मारल्यानंतर आवाज काढण्यासाठी अत्यंत घट्ट बांधलेल्या असतात. प्रत्येक स्ट्रिंग मध्ये साधारणता १६८ पौंड ताण असतो.
- जरी १७०० च्या दशकापासून ध्वनिक पियानो अस्तित्वात आला असला तरी १९८० पर्यंत डिजिटल पियानो बाजारात गेला नव्हता. इलेक्ट्रोनिक उपकरणांचा शोध १९२० दशकाच्या सुरुवातीस झाला होता आणि सुमारे ३० वर्षानंतर इलेक्ट्रिक पियानोचा शोध लागला.
- पियानो हे कीबोर्ड असलेले एक वाद्य आहे आणि पियानो जो असतो त्यामध्ये एकूण ८८ कि असतात.
- आतापर्यंतचा सर्वात मोठा पियानो बनवण्याचा विश्वविक्रम न्युझीलंड मधील पियानो ट्युनर एड्रियन मॅनच्या नावावर आहे. हा पियानो तयार करण्यासाठी ४ वर्ष लागली होती आणि याचे वजन १.४ टन इतके आहे.
- पियानो या वाद्याला संगीत साधनांचा राजा म्हणून ओळखले जाते कारण हे सर्वजन लगेच वाजवू शकणाऱ्या सर्वोत्कृष्ट वाद्यापैकी एक आहे.
- वाद्यामध्ये एकूण ८८ कि असतात आणि त्यामध्ये काळ्या आणि पांढऱ्या अश्या कि असतात आणि ३६ काळ्या रंगाच्या आणि ५२ पांढऱ्या रंगाच्या कि असतात.
- पियानो हे नवा इटालियन शब्द पियानो फोर्टेया वरून आला आहे. पियानोचे मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे सामान्य पियानो आणि भव्य पियानो.
- संगीय लिहिताना संगीतकार अनेकदा पियानो वापरतात.
- जेव्हा ठराविक पियानोच्या स्ट्रिंगमधून सर्व ताण जोडता तेंव्हा ते सुमारे १८ टन होते आणि भव्य मोठ्या पियानोमध्ये ३० टन इतका असू शकतो.
- सर्वात महान पियानो हा स्टीनवेने बनवलेला मानले जाते.
आम्ही दिलेल्या piano information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पियानो माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या piano meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about piano in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट