श्री क्षेत्र पिठापूर माहिती मराठी Pithapuram Information in Marathi

pithapuram information in marathi – pithapuram history in marathi श्री क्षेत्र पिठापूर माहिती मराठी, पिठापूर या ठिकाणाविषयी कोणाला माहित नाही तर या ठिकाण विषयी सर्वांना माहित आहे, कारण हे दत्तप्रभूंच्या तीर्थक्षेत्रापैकी एक आहे आणि आज आपण या लेखामध्ये पिठापूर या ठिकाणा विषयी माहिती घेणार आहोत. पिठापूर हे ठिकाण भारतातील आंध्रप्रदेश या राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे आणि हे ठिकाण श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते. पिठापूर हे ठिकाण जगातील महान पीठ म्हणून ओळखले जाते. तर हे आपल्या भारत देशातील ५१ शक्तीपिठांच्यापैकी एक मानले जाते आणि याच ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंचा मनुष्य रूपातील पहिला जन्म होता आणि त्या जन्मातील त्यांचे नाव श्रीपाद श्री वल्लभ असे होते.

हे दत्तात्रेय प्रभूंचे पहिले मानवी रूपातील जन्म ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी रोज भाविकांची गर्दी असते आणि या ठिकाणी एक तलाव देखील आहे ज्यामध्ये भाविक स्नान करतात आणि मग दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी जातात. या ठिकाणी एक मोठे दत्त मंदिर आहे आणि या ठिकाणी दत्तात्रेय प्रभू आणि नृसिंहसरस्वती यांच्या सुंदर आणि अप्रतिम मूर्ती आहेत.

तसेच या मंदिरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांच्या काळ्या रंगाच्या पादुका आणि सुंदर अशी मूर्ती देखील आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या अवरमध्ये अवदुंबराचे झाड देखील आहे त्यामुळे या सर्व पवित्र गोष्टींच्यामुळे मनाला प्रसन्नता वाटते.

pithapuram information in marathi
pithapuram information in marathi

श्री क्षेत्र पिठापूर माहिती मराठी – Pithapuram Information in Marathi

पिठापूर विषयी महत्वाची माहिती – information about pithapuram in marathi

पिठापुरम हे पूर्वीच्या काळामध्ये पिठीकापुरम किंवा पीठा पूरम या नावाने ओळखले जाते होते आणि या शब्दाचा अर्थ असा होतो कि पीठा म्हणजे आसन किंवा स्थान असणारी जागा. भारतीय पुराणामध्ये असे सांगितले जाते कि दक्ष यज्ञ केल्यानंतर सतीदेवीचे अवयव या ठिकाणी पडले होतो आणि शरीर भगवान शिवांनी वाहून नेले होते म्हणून याला पुरुहुतिका पुरम म्हणून ओळखले जाते.

तसेच दुसरी अशी देखील पौराणिक कथा आहे कि दत्तात्रेय प्रभू यांनी मनुष्य रुपामध्ये अनेक जन्म घेतले होते परंतु मनुष्य रूपातील पहिला जन्म जा पिठापूर मध्ये घेतला होता आणि मनुष्य रूपातील पहिला जन्म हा श्रीपद श्री वल्लभ या नावाने घेतला होता आणि म्हणून पिठापूर या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ यांच्या पादुका आणि मूर्ती देखील आहे. पिठापूर हा ठिकाणी अनेक मंदिरे आहेत परंतु त्या ठिकाणी दोन प्रसिध्द मंदिरे आहेत ज्या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते ती मंदिरे म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ मंदिर आणि कुक्टेश्वर मंदिर.

मंदिर उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ – opening and closing time 

पिठापुरचे श्रीपाद श्री वल्लभ मंदिराचा मुख्य दरवाजा हा सकाळी ५ वाजता उघडला जातो परंतु ७ नंतर श्री पाद श्री वल्लभ यांच्या पादुकांची पूजा तसेच तिन्ही मुर्त्यांची पूजा सुरु होते आणि ७ वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी देखील सुरु होते.  हे मंदिर भाविकांच्यासाठी दिवसभर खुले असते आणि या मंदिराचा मुख्य दरवाजा हा रात्री ९ वाजता बंद केला जातो म्हणजेच भाविक सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत केव्हाही दर्शन घेऊ शकतात.

श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म – pithapuram history in marathi

श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म इ. स १३२० मध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा भारताच्या आंध्रप्रदेश राज्यातील गोदावरी या गावामध्ये झाला होता आणि असे म्हणतात कि श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म हा दत्तात्रेय प्रभूंचा मानव रूपातील पहिला जन्म आहे. १९८५ मध्ये रामस्वामी यांनी एक जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी औदुंबराचे रोपटे लावले मग त्यांनी भक्तांच्या देणगीतून मिळालेल्या रक्कमेतून सुंदर असे मंदिर १९८७ मध्ये बांधले ज्याला महासंस्थान म्हणून ओळखले जाते.

नंतर लगेचच १८८८ मध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जन्मठिकाणी श्री गणेश आणि श्रीपद श्री वल्लभ यांची पादुकांची स्थापना देखील झाली. श्रीपाद श्री वल्लभ यांचे मंदिर आणि पादुका स्थापन होणार हे त्यांनी भविष्यामध्ये चरित्रामृत ग्रंथामध्ये सांगितले होते आणि तसे घडले.

पिठापूर विषयी विशेष तथ्ये – facts 

  • पिठापूर हे भारताच्या आंध्रप्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे आणि हे भारताची राजधानी असलेल्या दिल्ली या शहरापासून अंदाजे १४०० किलो मीटर लांब आहे.
  • पिठापूर हे ठिकाण जगातील महान पीठ म्हणून ओळखले जाते तर हे आपल्या भारत देशातील ५१ शक्तीपिठांच्यापैकी एक मानले जाते आणि याच ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंचा मनुष्य रूपातील पहिला जन्म होता.
  • दत्त मंदिर मध्ये दत्तात्रेय प्रभू आणि नृसिंहसरस्वती यांच्या सुंदर आणि अप्रतिम मूर्ती आहेत तसेच या मंदिरामध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांच्या काळ्या रंगाच्या पादुका आणि सुंदर अशी मूर्ती देखील आहे.
  • श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म इ. स १३२० मध्ये गणेश चतुर्थी दिवशी झाला.
  • १८८८ मध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जन्मठिकाणी ( पिठापुरम ) श्री गणेश आणि श्रीपद श्री वल्लभ यांची पादुकांची स्थापना देखील झाली.
  • पिठापूर या शहराची लोकसंख्या हि ५२७०० इतकी आहे.
  • पिठापूर हे ठिकाण जगातील महान पीठ म्हणून ओळखले जाते तर हे आपल्या भारत देशातील ५१ शक्तीपिठांच्यापैकी एक मानले जाते.

पीठापुरम मध्ये कसे पोहचायाचे – how to reach 

सामलकोट हे शहर पिठापूर या शहरापासून १२ किलो मीटर अंतरावर आहे आणि या शहराला मुंबई, भुवनेश्वर मधून रेल्वे आहेत. आपण या रेल्वे मार्गातून सामलकोट या ठिकाणी येऊ शकतो आणि मग सामलकोट रेल्वे स्थाकावर उतरून तेथू रिक्षा पकडून आपण पिठापूरला पोहचता येते.

आम्ही दिलेल्या pithapuram information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्री क्षेत्र पिठापूर माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pithapuram history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about pithapuram in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pithapuram story in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!