प्रधानमंत्री आवास योजना Pradhan Mantri Awas Yojana Information in Marathi Pdf

pradhan mantri awas yojana information in marathi pdf प्रधानमंत्री आवास योजना आज आपण या लेखामध्ये प्रधान मंत्री आवास योजना या विषयी माहिती घेणार आहोत. सरकार मार्फत योजना ह्या सतत राबवल्या जात असतात आणि त्यामधील हि एक महत्वाची योजना म्हणजे प्रधान मंत्री आवास योजना आणि या योजने मार्फत ज्या लोकांना घरे नाहीत किंवा ज्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे नाहीत अशा लोकांना या योजनेमार्फत घरे पुरवली जातात. प्रधान मंत्री आवास योजनेचे (PMAY) लक्ष हे सर्वांच्यासाठी घरे पुरवणे आणि हे भारत सरकारने घराच्या मालकी वाढवण्याच्या उद्देशाने केले आहे.

भारतामध्ये आपण जर पहिले तर लोकांच्या राहण्याच्या खूप अडचणी आहेत आणि ह्याच अडचणी लक्षात घेवून गृह निर्माण खात्याने लोकांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले म्हणजेच १९९० मध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांनी लोकांना चांगली मजबूत आणि पक्की घरे देण्यासाठी एक योजना राबवली होती आणि ती म्हणजे इंदिरा आवास योजना त्याच प्रमाणे आपल्या देशातील घरे नसलेल्या लोकांची किंवा जे लोक चांगल्या घरामध्ये राहत नाहीत.

अशा लोकांची अडचण लक्षण घेवून आपले सध्याचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी एक योजना सुरु केली आणि त्या योजनेचे नाव म्हणजे प्रधान मंत्री आवास योजना (PMAY). या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील घरांची कमतरता दूर करून लोकांना राहण्यासाठी चांगली घरे पुरवणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट होते.

 pradhan mantri awas yojana information in marathi pdf
pradhan mantri awas yojana information in marathi pdf

प्रधानमंत्री आवास योजना – Pradhan Mantri Awas Yojana Information in Marathi Pdf

प्रधान मंत्री आवास योजना कोणी आणि केंव्हा सुरु केली ?

आपल्या देहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पडणाऱ्या घरांच्या कमतरता लक्षात घेवून त्यांनी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांना घरे पुरवण्यासाठी प्रधान मंत्री आवास योजना १ जून २०१५ रोजी सुरु केली होती.

प्रधान मंत्री आवास योजना म्हणजे काय ?

प्रधान मंत्री आवास (PMAY) योजने मार्फत ज्या लोकांना घरे नाहीत किंवा ज्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे नाहीत अश्या लोकांना या योजनेमार्फत सरकार कडून घरे पुरवली जातात.

प्रधान मंत्री आवास योजने विषयी माहिती – Information about PMAY 

ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील घरांची कमतरता लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये प्रधान मंत्री आवास योजना (PMAY) सुरु केली परंतु हि योजना ग्रामीण भागामध्ये १ एप्रिल २०१६ पासून सुरु झाली आणि याला (PMAY-G) असे म्हणतात. PMAY-G या योजने अंतर्गत सरकारने ग्रामीण भागातील जी मातीपासून बनलेली किंवा पाल्यापासून बनलेली घरे जी राहण्यासाठी योग्य नाहीत आणि अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना या योजनेमार्फत लाभ मिळवून दिला आणि त्यांना सिमेंट, वीट आणि लोखंड या पासून बनवलेली मजबूत घरे राहण्यासाठी पुरवण्याचे काम सरकारने या योजने मार्फत केले.

तसेच शहरी भागामध्ये देखील जे लोक चांगल्या घरात राहत नाहीत किंवा जे झोपडपट्टी भागात राहतात अश्या लोकांच्यासाठी देखील घरे पुरवण्याचे काम या योजने अंतर्गत करण्यात आले. ग्रामीण भागामध्ये या योजनेमार्फत घरे बांधण्यासाठी ११४ दिवसचा कालावधी असतो आणि या योजनेमार्फत सरकारने ग्रामीण भागामध्ये २०१९ पर्यंत १ कोटीच्या वरती घरे बांधण्याचा विक्रमी विजय मिळवला आणि या योजनेमध्ये घरे बांधण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना १ लाख २० हजार ते १ लाख ३० हजार पर्यंत निधी दिला जातो.

निधी मिळाल्या नंतर ११४ दिवसामध्ये घर पूर्ण करावे लागते. तसेच शहरी भागामध्ये ज्या लोकांना घरे नाहीत किंवा राहण्यासाठी घरे चांगली नाहीत अश्या लोकांना या योजने अंतर्गत घरे पुरवली जातात आणि अश्या प्रकारे शहरी भागातील घरे पुरवण्याच्या योजनेला ( PMAY–U ) असे म्हणतात. ( PMAY–U ) या योजने मार्फत सरकारने २०२१ मध्ये शहरी भागामध्ये ८२ लाख घरे पुरवली होती.

प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत मिळणारे फायदे – benefits of PMAY 

 • खाजगी किंवा सार्वजनिक विकासाच्या भागीदारीमध्ये राज्य सरकार लाभार्थ्यांच्यासाठी परवडणारी घरे बांधतील.
 • तसेच जे लोक या योजनेसाठी पात्र आहेत अश्या लोकांना राहण्यासाठी चांगली घरे मिळतील.
 • जे लोक आपली घरे सुधारण्यास पात्र आहेत अश्या लोकांना १ लाख रुपयांचा निधी पुरवला जाईल.
 • सरकारच्या एकाधिक बँका आणि वित्तीय संस्थेद्वारे दिल्या जाणार्या गृह कर्जावर ६.५० टक्के पर्यंत व्याज अनुदान दिले जाईल.
 • झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांना योग्य सुविधा असणारी उत्तम घरे पुरवली जातील.
 • सध्याचे घर पुन्हा बांधणीसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख पर्यंत निधी पुरवला जातो.

प्रधान मंत्री आवास योजनेसाठी पात्रता – eligibility 

प्रधान मंत्री आवास योजनेसाठी पत्र असणारे लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतात म्हणून आम्ही खाली या योजनेविषयी खाली काही पात्रता निकष दिले आहेत.

 • प्रधान मंत्री आवास योजनेसाठी निम्म उत्पन्न गट ( LIG ) म्हणजे ज्यांचे वार्षिक घरगुती उत्पन्न ३ लाख ते ६ लाख पर्यंत आहे.
 • एससी, एसटी आणि ओबीसी या विभागातील लोक देखील प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ घेवू शकतात.
 • या योजनेसाठी ते लोक पात्र आहेत जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागामध्ये ( EWS ) मोडतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल हे ते लोक असतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाख पेक्षा देखील कमी आहे.
 • जर तुमचे वार्षिक उत्पन्न ६ ते १२ पर्यंत आहे तर तुम्ही मध्यम उत्पन्न गट ( MIG ) यातून तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता.
 • पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले असे कुटुंब ज्यांना घराची अडचण आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे खूप कमी आहे असे कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरू शकते.

प्रधान मंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा – how to apply online for PMAY 

प्रधान मंत्री आवास योजनेसाठी अनेक लोक पात्र असतात आणि त्यांना हि योजना मिळवण्यासाठी अर्ज भरायचा असतो आणि हा अर्ज ऑनलाईन भरायचा असतो आणि हा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा ते आपण पाहूयात.

 • प्रधान मंत्री आवास योजनेसाठी अर्ज करताना आपण प्रथम वर दिलेल्या पात्रता निकष्या प्रमाणे आपण कोणत्या श्रेणीमध्ये बसतो या बद्दल प्रथम ओळखा.
 • मग त्यानंतर प्रधान मंत्री आवास योजनेच्या ( PMAY ) अधिकृत वेबसाईट वर जा.
 • आता या योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या पानावर गेल्यानंतर तुम्हाला त्या पानावर मुख्य मेनूवर अंतर्गत नागरिक मुल्यांकन वर क्लिक करून त्यानंतर तुमची अर्जदार श्रेणी निवडा.
 • आता हे तुम्हाला वेगळ्या पेजवर रीडायरेक्ट करेल ज्याठिकाणी तुमचा आधार तपशील भरा.
 • तसेच तुमच्या वैयक्तिक, उत्पन्न आणि बँक खाते आणि सध्याचा निवासी पत्ता यासह सर्व आवश्यक माहिती PMAY च्या अर्जामध्ये भरा.
 • आता शेवटी कॅप्चा कोड पूर्ण करा आणि आणि तुम्ही भरलेला तपशील पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.

आम्ही दिलेल्या pradhan mantri awas yojana information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रधानमंत्री आवास योजना माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pm awas yojana information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pradhan mantri awas yojana information in marathi pdf free download माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!