माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee Information in Marathi

Pranab Mukherjee Information in Marathi – Pranav Da प्रणव मुखर्जी माहिती प्रणव मुखर्जी हे भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित आहेत. तसेच भारताचे तेरावे राष्ट्रपती देखील म्हणून ओळखले जातात. भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील वीरभूम जिल्ह्यातील मीराती गावामध्ये बंगाली कुळाच्या परिवारात झाला. प्रणव मुखर्जी हे बंगाल मध्ये जन्मलेले एक सर्वसामान्य माणूस पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती कसे बनले याची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

pranab mukherjee information in marathi
pranab mukherjee information in marathi

प्रणव मुखर्जी माहिती – Pranab Mukherjee Information in Marathi

नाव(Name)प्रणब मुखर्जी
जन्म (Birthday)११ डिसेंबर १९३५
जन्मस्थान (Birthplace)मिरती (मिरिटी)
वडील (Father Name)किंकर मुखोपाध्याय सरानी
पत्नी (Wife Name)शुभ्र मुखर्जीं
आईचे नाव (Mother Name)राजलक्ष्मी मुखर्जी
मुले (Children)अभिजित मुखर्जी, इंद्रजित मुखर्जीशर्मिष्ठा मुखर्जी
मृत्यू (Death)३१ ऑगस्ट २०२०

जन्म

भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील वीरभूम जिल्ह्यातील मीराती गावामध्ये बंगाली कुळाच्या परिवारात झाला. ११ डिसेंबर १९३५ अशी प्रणव मुखर्जी यांची जन्मतारीख आहे. प्रणव मुखर्जी यांच्या घरामध्ये राजनैतिक माहोल होता. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी देखील राजकारणात होते. ते बंगालच्या विधानसभेत एक सदस्य म्हणून कार्यरत होते. ते ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते त्यासाठी त्यांना दहा वर्षाची सजा देखील झाली होती.

त्यांचे वडील १९२० मध्ये काँग्रेस मध्ये कार्यरत होते. त्यांची आई देखील एका गृहिणी सोबतच एक भारतीय स्वतंत्रता सैनिक होत्या. त्यामुळे प्रणव यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू पाजले गेले. आई-वडिलांच राजकारणात असल्यामुळे कदाचित प्रणव मुखर्जी यांना देखील राजकारणात जाण्याची आवड निर्माण झाली असावी.

शिक्षण

प्रणव मुखर्जी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याजवळील स्थानिक विद्यालयातूनच पार पडले. परंतु पुढचं शिक्षण प्रणव जी यांनी वीरभूमी येथील सुरी महाविद्यालय कॉलेज येथून पूर्ण केलं. त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्र मध्ये उच्च पदवी देखील मिळवली. प्रणव मुखर्जी यांनी वकिलीचा अभ्यास अध्ययन करण्यासाठी कोलकत्ता इथे प्रवेश केला. त्याच्या पुढचं शिक्षण देखील त्यांनी कोलकाता युनिव्हर्सिटी मधूनच पूर्ण केलं.

वैयक्तिक आयुष्य

प्रणव मुखर्जी यांचा जन्म एका राजकीय घराण्यात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आई-वडील त्यांना राजकारणाचे धडे द्यायचे त्यामुळे लहानपणापासूनच मुखर्जी यांच्या मनामध्ये राजकारणाविषयी आवड निर्माण झाली असावी. राजकारणात जाण्यासाठी गरजेचे असलेले शिक्षण देखील प्रणव मुखर्जी यांनी घेतलं पुढे त्यांनी वकील आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून काम करायचे.

त्यांची सुरुवात एक प्राध्यापक म्हणून झाली आणि पुढे जाऊन ते पत्रकार क्षेत्रात आले. प्रणव मुखर्जी यांना मानद डिलीट ही पदवी देखील मिळाली आहे. राजकारणात येण्याआधी प्रणव मुखर्जी पोस्ट अँड टेलिग्राफ या ऑफिस मध्ये एक क्लर्क च्या पदवी वर होते. १९६३ मध्ये विद्यानगर कॉलेजमध्ये ते राजनीती-शास्त्राचे प्रोफेसर बनून मुलांची शिकवणी घ्यायचे.

इतकेच नव्हे तर त्यांनी बांगला प्रकाशन संस्थान देशर डाक या ठिकाणीही काम केले आहे. २१ जुलै १९५७ मध्ये प्रणव मुखर्जी २२ वर्षांचे असताना त्यांचा विवाह सोहळा शुभ्र मुखर्जींशी पार पडला. या दोघांना दोन मुले आणि एक मुलगी देखील झाली.

राजकीय आयुष्य

प्रणव मुखर्जी यांचे राजकीय आयुष्य १९६९ मधे सुरू झालं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे तिकीट मिळवून राज्यसभेचे सदस्य बनले. त्यांनी खूप मेहनत करून चार वेळा हे पद मिळवलं. त्यांची कामगिरी बघून इंदिरा गांधींच्या डोळ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढत गेला. १९७३ मध्ये प्रणव जी औद्योगिक विकासामध्ये उपमंत्री होते.

पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांनी उप मंत्री बनून नौकावाहन आणि परिवहन ही दोन खाती सांभाळली. १९७४ मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत ते अर्थ राज्यमंत्री होते. १९७५ – १९७७ या काळामध्ये झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रणव मुखर्जी यांच्या वरती काही आरोप लावण्यात आले त्यावरून वादविवाद चालू होते.

परंतु इंदिरा गांधींचे प्रणव मुखर्जी यांच्याशी संबंध चांगले असल्यामुळे इंदिरा गांधी यांची यांची सत्ता आल्यावर प्रणव मुखर्जी या सगळ्या वादातून अगदी सुखरूपपणे बाहेर पडले. इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री होत्या त्यावेळी सन १९८२ – १९८४ मध्ये प्रणव मुखर्जी वित्त मंत्री होते. १९७५-१९७७ या दोन वर्षांच्या काळामध्ये ते महसूल आणि बँकिंग मंत्री देखील होते.

१९८०-१९८२ मध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले.‌ इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्यासोबत काही मतभेद झाले त्यानंतर प्रणव मुखर्जी हे वेगळे झाले. १९८५ मध्ये प्रणव मुखर्जी पश्चिम बंगाल काँग्रेस समितीचे अध्यक्ष पदावर होते. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पी व्ही नरसिम्हा राव यांची खूप साथ प्रणव मुखर्जी यांना मिळाली.

पी व्ही नरसिंह राव यांच्या पंतप्रधान कार्य काळामध्ये त्यांनी प्रणव मुखर्जी यांना योजना आयोग प्रमुख बनवलं होतं थोड्याच दिवसांनी त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि विदेश मंत्रालय देखील सांभाळायला दिलं. १९७९ मध्ये प्रणव मुखर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते होते. १९८० मध्ये राज्यसभा सभागृहनेते.

१९८६ मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९९५-१९९६ मध्ये त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रीपद आलं.१९८९-१९९० पश्चिम बंगालमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी होते.२००१-२०१० पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष होते. आणि २०१२-२०१७ आपल्या भारताचे १३ वे‌ राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते.

प्रणब मुखर्जी कधी पासून राष्ट्रपति आहेत 

प्रणव मुखर्जी यांच्या सारख थोर व्यक्तिमत्व भारताचे राष्ट्रपती होते ही गोष्ट खूपच गर्व वाटावी अशी आहे. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये फार चढ आणि उतार मिळाले त्यांनी त्यांच्या आयुष्यातील चाळीस वर्ष भारतासाठी एक राजकीय नेता म्हणून अर्पण केली. आणि त्याच प्रमाणे देशात विकास देखील घडवून आणला.

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती बनण्याचा प्रवास २५ जुलै २०१२ पासून ते २५ जुलै २०१७ पर्यंतचा होता. प्रणव मुखर्जी यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून एक एक गोष्ट अनुभवली आहे त्यामुळे त्यांचा अनुभव खूपच दांडगा आहे. एक सामान्य माणूस ते राष्ट्रपती असा प्रणव मुखर्जी यांचा प्रवास होता.

प्रणब मुखर्जीचा भारत रत्न

प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे आज पर्यंत अनेक अवॉर्ड मिळाले. त्यातील दोन असे मुख्य अवॉर्ड जे खूप कमी लोकांना मिळतात ते म्हणजेच “भारतरत्न” आणि पद्म भूषण अवॉर्ड. भारत रत्न हा अवॉर्ड २०१९ मध्ये प्रणव मुखर्जी यांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये त्यांना “पद्मश्री” हा पुरस्कार देखील मिळाला.

२०१० मध्ये प्रणव मुखर्जी यांना त्यांनी वित्तमंत्री हे पद अतिशय उत्तम प्रकारे सांभाळले त्यामुळे त्यांना “फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर फॉर एशिया” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रणव यांनी फक्त भारतातच नाही तर विदेशामध्ये देखील त्यांची ख्याती पसरवली. बांगलादेशातील सरकारनेदेखील प्रणव मुखर्जी यांना बांगलादेशात सर्वोच्च असणारा “बांगलादेश लिब्रेशन वॉर ओनर” हा पुरस्कार देऊन प्रणव मुखर्जी यांचा सन्मान केला.

द टर्बुलेंट इयर्स 

1980 -1996 प्रणब मुखर्जी: प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा राजकीय सफर एका पुस्तकांमध्ये उतरवून काढला. या पुस्तकाला त्यांनी द टर्बुलेंट इयर्स: 1980 -1996‌ असे नाव दिले. या पुस्तकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत घडलेल्या खूप काही गोष्टींचा खुलासा केला. ज्यामध्ये त्यांनी त्यांचे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याशी असलेले संबंध यांच्यावर देखील लेखन केलं आहे.

प्रणव मुखर्जी यांनी या पुस्तकामध्ये त्यांच्यात आणि राजीव गांधी यांच्यामध्ये झालेला गैरसमज देखील स्पष्ट करून दाखवला आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार झाला होता त्यावेळी प्रणव मुखर्जी आणि राजीव गांधी हे एका रॅलीचे नेतृत्व करत होते. तेव्हा राजीव गांधी यांना इंदिरा गांधी यांच्या हत्येच बद्दल कळालं तेव्हा ते लगेच दिल्लीला रवाना झाले.

त्यानंतर सगळ्यांनी राजीव गांधी यांना पीएम या पदावर बसण्यासाठी सांगितलं त्यावेळी राजीव गांधींनी आधी प्रणव मुखर्जी यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं? मी हे पद सांभाळू शकेल का? त्या वेळी प्रणव मुखर्जी म्हणाले की हो आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण काही लोकांनी प्रणव मुखर्जी यांच्या काही गोष्टी राजीव गांधी यांच्यासमोर अशाप्रकारे दर्शवल्या की राजीव गांधी यांना वाटला प्रणव मुखर्जी यांना त्यांचे नेतृत्व पसंत नाही.

त्यावरून काही गैरसमज निर्माण झाले आणि प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेस पक्ष सोडला. परंतु दोन वर्षांनी प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांचा आणि राजीव गांधी यांच्या मधील वाद मिटले होते. गैरसमजुत दूर झाली होती. या पुस्तकांमध्ये प्रणव मुखर्जी यांनी असेच त्यांच्याबद्दल होणाऱ्या अफवा तसेच काही तथ्य देखील सांगितले आहेत. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर प्रणव मुखर्जी यांना पीएम बनायचं होतं ह्या अफवेवर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

मृत्यू

प्रणव मुखर्जी यांची तब्येत काही दिवस झाले बिघडली होती. दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. प्रणव मुखर्जी यांच्यावर सर्जरी देखील झाली होती. त्यासोबतच कोरोना ने देखील त्यांच्या शरीरात शिरकाव केला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तब्येत दिवसेंदिवस खराब होत चाललेली आणि शेवटी ३१ ऑगस्ट २०२० या दिवशी त्यांचं निधन झालं.

आम्ही दिलेल्या dr pranab mukherjee information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “प्रणव मुखर्जी” यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about pranab mukherjee in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pranab kumar mukherjee information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये pranab mukherjee in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!