पुदिना चटणी रेसिपी मराठी Pudina Chutney Recipe in Marathi

Pudina Chutney Recipe in Marathi पुदिना चटणी रेसिपी पुदिना चटणी हा एक साईड डिशचा प्रकार आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये बहुतेक स्वयंपाक घरामध्ये बनवला जातो कारण हा पुदिण्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात म्हणजेच पुदिण्यामध्ये अॅटीऑक्सीडंट्स असतात त्यामुळे पुदिना खाल्ल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते आणि म्हणून आपण पुदिना खाल्ला पाहिजे आणि पुदिना खाण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे पुदिन्याची चटणी. पुदिना जर आपण जेवणानंतर खाल्ला तर आपली पचनक्रिया चांगली होते म्हणजेच आपली पचनक्रिया सुधारते.

त्याचबरोबर जर पित्त झाले असल्यास आपण जर पुदिना खाल्ला तर आपल्या पोटाला आराम मिळतो. अश्या प्रकारे पुदिना ह्या औषधी वनस्पतीमुळे अनेक आरोग्य फायद्यांचा लाभ होतो. पुदिना हा लहान मुले किंवा काही मोठे लोक तसेच खाणे पसंत करत नाहीत त्यावेळी आपण पुदिन्याची चटणी बनवू त्यांना खायला देवू शकतो.

पुदिना हि चटणी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आणि हि चटणी अगदी सोप्या पध्दतीने बनवली जाते आणि हा पदार्थ कमी वेळेत आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. आता आपण या लेखामध्ये पुदिना चटणी कशी बनवतात ते पाहूयात.

pudina chutney recipe in marathi
pudina chutney recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 पुदिना चटणी रेसिपी मराठी – Pudina Chutney Recipe in Marathi

पुदिना चटणी रेसिपी मराठी – Pudina Chutney Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारे वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारे वेळ७ ते ८ मिनिटे
एकूण लागणारे वेळ१७ ते १८ मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पुदिना या वनस्पतीमध्ये असणारे पोषक घटक ?

पुदिना या वनस्पतीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम, जीवसत्व क, जीवान्साताव अ, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियाम यासारखे पोषक घटक असतात.

पोषक घटक प्रमाण ( ३.२ ग्रॅम )
कॅलरी२.२४
कार्बोहायड्रेट्स०.४८ ग्रॅम
फॅट०.०३ ग्रॅम
फायबर०.२६ ग्रॅम

पुदिना रेसिपी – how to make pudina chutney Recipe in Marathi

पुदिना रेसिपी हि एक पौष्टिक रेसिपी असून हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम रित्या बनते. आता आपण पुदिन्याची चटणी वेगवेगळ्या पध्दतीने कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारे वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारे वेळ७ ते ८ मिनिटे
एकूण लागणारे वेळ१७ ते १८ मिनिटे
बनवण्याची पध्दतखूप सोपी

पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून पुदिना चटणी कशी बनवायची 

पुदिना चटणी हि आपण वेगवेगळे साहित्य घालून बनवू शकतो आणि पुदिन्याची चटणी कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरून कशी बनवायची.

पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make pudina chutney

पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी पुदिना सोडला सर्व साहित्य घरामध्ये आधीपासून उपलब्ध असल्यामुळे आपल्याला बाजारातून आणावे लागत नाही. चला तर आता आपण पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ मोठा बाऊल ताजा पुदिना.
  • १ छोटा बाऊल ताजी कोथिंबीर ( निवडलेली ).
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या.
  • १ कांदा ( उभा चिरलेला ).
  • २ तुकडे आले.
  • १ छोटी वाटी लिंबू रस.
  • साखर ( चवीनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

पुदिना चटणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make pudina chutney 

  • पुदिना चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिना आणि कोथिंबीर चांगली निवडून घ्या आणि मग ते दोन्हीहि घटक पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या.
  • आता एक मोठे मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यामध्ये सर्वप्रथम पुदिना घाला आणि मग कोथिंबीर, हिरव्या मिरच्या मोडून, आले, कांदा, लिंबू रस, चवीनुसार मीठ आणि साखर आणि शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि ते मिक्सरवर चांगले फिरवून त्याची बारीक पेस्ट करा ( टीप : चटणी तुम्हाल पातळ हवी आहे कि घट्ट याच्यावर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता ).
  • पुदिना चटणी आता एका बाऊमध्ये काढून घ्या .
  • तुमची पुदिना चटणी तयार झाली.

पुदिना, टोमॅटो आणि लसून घालून पुदिना चटणी कशी बनवावी

पुदिना चटणी आपण टोमॅटो आणि लसून वापरून देखील बनवू शकतो आणि आपण या चटणीमध्ये कांदा आणि लिंबू रसाऐवजी तुम्ही त्यामध्ये टोमॅटो आणि लसून वापरला जातो. चला तर मग पाहूयात टोमॅटो आणि लसून वापरून पुदिना चटणी कशी बनवायची.

पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make pudina chutney 

  • १ मोठा बाऊल ताजा पुदिना.
  • १ छोटा बाऊल ताजी कोथिंबीर ( निवडलेली ).
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या.
  • १ टोमॅटो ( मोठा मोठा चिरलेला ).
  • १ चमचा लसून पाकळ्या.
  • साखर ( चवीनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

पुदिना चटणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make pudina chutney 

  • पुदिना चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिना चांगला निवडून घ्या आणि मग तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या.
  • आता एक मोठे मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यामध्ये सर्वप्रथम पुदिना घाला आणि मग त्यामध्ये टोमॅटो, लसून पाकळ्या, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि साखर आणि शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि ते मिक्सरवर चांगले फिरवून त्याची बारीक पेस्ट करा.
  • लसून आणि टोमॅटो घालून बनवलेली पुदिना चटणी तयार झाली.

कैरी घालून पुदिना चटणी कशी बनवावी

कैरी घालून बनवलेली चटणी हि खूप छान लागते कारण या आपण कैरी वापरल्यामुळे त्या चटणीला आंबटपणा आलेला असतो. आपण हि चटणी ज्यावेळी  कैरी मिळते त्या सीजनमध्ये बनवू शकतो.

पुदिना चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make pudina chutney 

ह्या प्रकारे पुदिना चटणी बनवण्यासाठी आपल्याला कैरीची आवश्यकता असते आणि आपण आंब्याच्या सिजनमध्येच आपल्याला कैरी उपलब्ध होऊ शकते.

  • १ मोठा बाऊल ताजा पुदिना.
  • १ वाटी चिरलेली कैरी.
  • २ ते ३ हिरव्या मिरच्या.
  • १ चमचा लसून पाकळ्या / १ कांदा ( उभा चिरलेला ).
  • साखर ( चवीनुसार ).
  • मीठ ( चवीनुसार ).
  • पाणी ( आवश्यकतेनुसार ).

पुदिना चटणी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make pudina chutney 

  • पुदिना चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिना आणि कोथिंबीर चांगली निवडून घ्या आणि मग ते दोन्हीहि घटक पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या.
  • आता एक मोठे मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यामध्ये सर्वप्रथम पुदिना घाला आणि मग हिरव्या मिरच्या मोडून, लसून, कैरी, चवीनुसार मीठ आणि साखर आणि शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि ते मिक्सरवर चांगले फिरवून त्याची बारीक पेस्ट करा.
  • कैरी घालून बनवलेली चटणी तयार झाली.

टिप्स ( Tips )

  • पुदिना चटणी आपण २ ते ३ दिवस फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो.
  • पुदिना चटणी मध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता आणि ओले खोबरे टाकले तरी चालते.
  • पुदिन्याची चटणी बनवताना त्याची फक्त पाने वापरा देठ वापरू नका.

आम्ही दिलेल्या pudina chutney recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर पुदिना चटणी रेसिपी मराठी माहिती pudina chatni recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pudina chutney recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pudina chutney recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये sandwich pudina chutney recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!