पफ्फिन पक्षाबद्दल माहिती Puffin Bird Information in Marathi

नमस्कार मित्र परिवार आज आपण या लेखामध्ये puffin bird information in Marathi म्हणजेच पफ्फिन या पक्षाविषयी माहिती मराठी language मध्ये जाणून घेणार आहोत. हा पक्षी कसा आहे? कोठे राहतो? काय करतो? काय खातो ? व मानव व त्याचे नाते कसे आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत.

puffin-information-in-marathi
पफ्फिन पक्षाबद्दल माहिती

पफ्फिन पक्षाबद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये (Puffin Bird Information in Marathi)

आपल्या सभोवती म्हणजेच पर्यावरणात निसर्गाच्या सानिध्यात बरेचशे पक्षी आहेत पण आपण त्यांना ओळखत नाही. या निसर्गामध्ये खूप असे सुंदर पक्षी प्राणी आहेत त्यांच्यामुळे निसर्गाचा समतोल राखून आहे. अशाच एका  पक्षाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला ऐकून माहित नसेल असा पण पहिल्यासारखा वाटणारा अटलांटिक पफ्फिन इतका गोंडस दिसतो कि तो जणू एखाद्या खेळण्यासार्खाच दिसतो. त्याचे सुंदर असे डोळे व चोच पाहून आपल्याला आपल्या भागातील पोपटच आठवेल. तस पहायला गेल तर त्याच हाव भाव आणि आकार बघितला तर तो समुद्री पोपटच होय. हा अटलांटिक पफ्फिन कॅनडाच्या न्यूफाउंडलँड आणि लॅब्राडोर प्रांताचा प्रांतीय पक्षी आहे. जादातर हा गोंडस असा पफ्फिन पक्षी अटलांटिक महासागराच्या तटावर पाहायला मिळतो. याच्या व्यतिरिक्त पफ्फिन ग्रीनलँड, आईसलँड व नौर्वे या देशात देखील पाहायला मिळतो.

पफ्फिन पक्षाचे वर्णन (Describe Puffin Bird)

सुंदर दिसणारा हा पफ्फिन सामान्यत: काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा पिसारा घेऊन जन्माला येतात. त्याला एक पोपटा सारखी चोच व लहान शेपूट देखील असते. या चोचीचे वयस्ठीठ म्हणजे चोचीचा रंग वर्षातून अधून मधून बदलत असतो. हिवाळ्यामध्ये चोचीचा रंग राखेसारखा (करडा) होतो तर वसंत ऋतूमध्ये चोचेचा रंग नारंगी होतो. या पक्षाची लांबी सरासरी 28 सेमी ते 38 सेमी इतकी असते यामध्ये 4 पोटजाती देखील समाविष्ट आहेत त्या एकमेकांपेक्षा थोड्या विभिंन्न दिसतात, आणि त्यावरून त्यांचे आकारही बदलतात.

पफ्फिन पक्षाचा आहार (What Puffin Bird Eats?)

बऱ्याच समुद्री पक्षाप्रमाने पफ्फिनही मासेच खातात. त्यांच्या विशेष अशा चोचेमुळे ते एकावेळी बरेच छोटे मासे खाऊ शकतात. हा पक्षी त्यांच्या लहान पिलांना देखील शिकार करून आणलेले लहान मासेच खाऊ घालतात. मासे हा त्यांचा आवडता पदार्थ आहे.

पफ्फिन पक्षाचे जीवन (Lifestyle Of Puffin Bird)

पफ्फिन हा आपला जास्तीत जास्त वेळ समुद्री बेटावर घालवतात. हा पफ्फिन समुद्राच्या खाली 60 मीटर पर्यंत जाऊ शकतो. तसेच हा पक्षी 85 किमी ताशी या वेगाने उडतो यावरून आपल्याला कळते कि हा कि चपळ आणि वेगवान आहे. या चिमुकल्या पक्षाचे वय सरासरी 20 वर्षापेक्षा जास्त असते. हे पक्षी उन्हाळ्याच्या दिवसात हजारोंच्या संखेने अटलांटिक महासागर व द्वीपसमूह मध्ये एकत्रित येतात आणि तेथे प्रजनन करतात. यांची महत्वाचे म्हणजे ते आपल्या साथीदाराला आयुष्य भारासाठी बदलत नाहीत. मादा पफ्फिन वर्षातून एकदा 1 अंडे देते व ते दोघे मिळून आपल्या पिलांची खूप चांगली काळजी घेतात.

मानव व पफ्फिन पक्षी (Relation between Men & Puffin Bird)

मानव हा असा प्राणी आहे तो काहीही सोडत नाही, तर हो बरोबर आहे. माणूस अंडी, पिसे आणि मासं यासाठी पफ्फिन या पक्षाची शिकार करतो. आईसलँडमध्ये अटलांटिक पफ्फिन हा त्यांच्या राष्ट्रीय आहाराचा एक भाग आहे. तिथे या प्रजातींना कायदेशीर संरक्षण मुळीच नाही. जेव्हा पफ्फिन समुद्रात डुबकी मारतो त्याच वेळी तेथे या पक्षाची शिकार “स्काय फिशिंग” नावाच्या तंत्राने केली जाते व मोठ्या प्रमाणात पफ्फिन या पक्षाची शिकार केली जाते. याचे मासं म्हणून हॉटेलच्या मेनू कार्ड वर विशेष असा उल्लेख केला जातो.  

आज अखेर या संपूर्ण जगामध्ये 8 असे द्वीप आहेत कि ते या पफ्फिन पक्षांच्या नावाने ओळखले जातात. यामुळेच त्या बेटांना पफ्फिन बेट म्हणून नाव ठेवण्यात आले आहे, कारण एकेकाळी या द्विपांवरती हजारोंच्या संखेने पफ्फिनचे अस्तित्व होते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुंदर असा पक्षी पफ्फिन व त्याचे जीवन कसे आहे. puffin bird information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही पफ्फिन या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पफ्फिन पक्षाबद्दल माहिती Puffin Bird Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!