राहीबाई पोपेरे मराठी माहिती Rahibai Popere Information in Marathi

rahibai popere information in marathi राहीबाई पोपेरे मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये बियाणांच्या वाणांच्या संरक्षक आणि संवर्धक म्हणून काम करणाऱ्या राहीबाई पोपरे यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राहीबाई पोपरे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील कोंभाळणे या गावामध्ये १९६४ मध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला आणि त्यांच्या जन्म हा शेतकरी कुटुंबामध्ये झाल्या कारणाने त्यांना देखील शेती विषयक अनेक माहिती हि लहानपणी पासूनच होती आणि त्यांना सध्या बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक आणि संवर्धक म्हणून त्यांची ओळख आहे.

म्हणजेच त्यांनी आपल्या देशी बियांच्या वानानाची जपणूक केल्यामुळे त्यांना ओळखले जाते आणि त्यासाठी त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. राहीबाई यांचा विवाह हा त्यांच्या वयाच्या १२ व्या वर्षी झाला आणि त्यांच्या संपूर्ण नाव राहीबाई सोमा पोपरे असे आहे.

आणि त्यांनी मागील २० ते २२ वर्षापूर्वी पासून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया गोळा करण्यास सुरुवात केली होती आणि त्यांनी अनेक प्रकारच्या पिक बिया गोळा करून त्याची बँक बनवली आणि सध्या त्यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते.

rahibai popere information in marathi
rahibai popere information in marathi

राहीबाई पोपेरे मराठी माहिती – Rahibai Popere Information in Marathi

नावराहीबाई सोमा पोपरे
जन्मइ.स १९६४ मध्ये
जन्म ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील कोंभाळणे
ओळखबीजमाता (Seed Mother)

राहीबाई यांचा बीजमाता म्हणून कसा प्रवास सुरु झाला – started journey as seed mother

ज्यावेळी राहीबाई पोपरे यांचा नातू विषारी आणि खालच्या दर्ज्याच्या भाज्या खाऊन आजारी पडला त्यावेळी त्यांनी आपण स्वता सेंद्रिय पध्दतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी सेंद्रिय पध्दतीची शेती करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर त्यांनी शेती सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बियां देखील संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी आजपर्यंत ११४ वाणांचे आणि ५२ बियांचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे.

तसेच त्यांच्याकडे अंतरराष्ट्रीय सिद कंपनीकडे सुध्दा नाहीत असे बियाणे आहेत. त्यांनी सेंद्रिय शेती करत सेंद्रिय शेतीला एक नवीन ओळख देखील दिली तसेच त्या अडाणी जरी असल्या म्हणजेच त्यांनी कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण जरी घेतले नसले तरी अनेक शास्त्रज्ञ देखील त्यांचे शेती या क्षेत्रातील ज्ञान मानतात.

राहीबाई यांनी अशी बियांची बँक बनवण्यात यश मिळाले आहे, जे शेतकऱ्यांना खूप कमी सिंचानामध्ये चांगल्या प्रकारचे पिक काढण्यास मदत करतात. सध्या राहीबाई आणि त्यांचे काही सहकारी मिळून ५० एकर शेतीमध्ये १५ हून अधिक प्रकारचे पिक घेत आहेत. अश्या प्रकारे त्यांनी शेती या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम केले आहे.  

रराहीबाई पोपरे यांची कामगिरी

 • राहीबाई यांनी आपण वर सांगितल्या प्रकाने देशी बियांचे संवर्धन आणि संरक्षण करू ठेवले आहे आणि त्यांनी आज पर्यंत ११४ वाणांचे आणि ५२ बियांचे संरक्षण केले आहे.
 • राहीबाई यांच्या कडे असे बियाणे आहेत, जे अंतरराष्ट्रीय सिड कंपनीकडे नाहीत म्हणजेच त्यांच्या असे जुने आणि गावठी भाजांचे आणि वेलींचे बियाणे आहेत जे त्यांनी जपून ठेवले आहेत.
 • राहीबाई यांच्याकडे अश्या प्रकारचे बियाणे संग्रहित आहेत जे शेकडो वर्षापूर्वी आपले पूर्वज खात होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे खूप प्राचीन काळातील बियाणे देखील संग्रहित आहेत  
 • त्यांनी अनेक जुन्या बियांचे संरक्षण आणि संवर्धन केल्यामुळे त्यांना रघुनाथ माशेलकर यांनी बीजमाता (seed mother) असे नाव दिले आहे आणि आज संपूर्ण भारतामध्ये त्यांची ओळख बीजमाता (seed mother) अशी आहे.
 • तसेच त्यांनी त्यांच्या गावामध्ये तीन हजार स्त्रियांचा आणि शेतकरी यांचा एक बचत संघ देखील तयार केला आहे.
 • राहीबाई पोपरे यांनी कळसुबाई बीज संवर्धन आणि संरक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या या संस्थेच्या संस्थापक ठरल्या.
 • राहीबाई या कृषी विद्यार्थ्यांना पिक निवड, जमिनीची सुपीकता आणि कीटक व्यवस्थापन आणि इतर कृषी विषयक माहिती शिकवतात.

राहीबाई यांच्या बीज बँकेविषयी महिती – rahibai popere seed bank in marathi

राहीबाई यांच्या कडे एकूण २०० प्रकारचे बियाणे आहेत आणि त्यांच्या घराजवळ देशी बियाची बँक आहे जी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने विकसित केली आहे जी देशातील देशामधील नाविन्य पूर्ण विकास कार्यक्रम राबवते. या बँकेमध्ये ११४ वाणांचे आणि ५२ बियांचे आणि इतर बियाणे आहेत.

राहीबाई यांनी देशी बिया जतन करण्यासाठी राज्यभर प्रवास केला. तसेच त्यांनी लोकांना सेंद्रिय शेती, वन्य अन्न, कृषी जैव विविधता या प्रकारच्या संसाधनाबद्दल शिक्षित केले. तसेच त्यांनी शेततळे आणि पारंपारिक जलकुंड यासह स्वताचा जलसंचय संरचनांची रचना केली.

राहीबाई पोपरे यांना मिळालेले पुरस्कार – rahibai popere awards in Marathi

राहीबाई यांनी अनेक प्रकारचे प्राचीन आणि सध्या उगवले जाणारे देखील बियांचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे आणि त्याच्याकडे अश्या काही बिया आणि वाण आहेत जे अंतरराष्ट्रीय सिद कंपनीकडे देखील नाहीत आणि अश्या या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकार कडून तसेच इतर पुरस्कार मिळाले आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण खाली पाहूया.

 • राहीबाई पोपरे यांच्या विलक्षण अश्या कामगिरीसाठी २०२० या साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.
 • तसेच त्यांना २०१८ मध्ये बी.बी.सी १०० प्रभावशाली महिलांच्यामध्ये समावेश झाला होता.
 • त्याचबरोबर त्यांना २०१९ मध्ये नारीशक्ती हा पुरस्कार देऊन देखील गौरव करण्यात आला होता.
 • त्यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते.

राहीबाई पोपेरे यांचा जन्म कोणत्या गावी झाला?

राहीबाई पोपरे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील कोंभाळणे या गावामध्ये १९६४ मध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला.

आम्ही दिलेल्या rahibai popere information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राहीबाई पोपेरे मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rahibai popere awards in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rahibai popere in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rahibai popere information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!