रजनीकांत मराठी माहिती Rajinikanth Biography in Marathi

Rajinikanth Biography in Marathi – Rajinikanth Information in Marathi रजनीकांत मराठी माहिती सुपरस्टार रजनीकांत जे थलैवा या नावाने देखील सुप्रसिद्ध आहेत. सुपरस्टार रजनीकांत हे टॉलीवूड ऍक्टर आहेत अनेक चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी काम केल आहे. रजनीकांत हे बहुभाषिक अभिनेते आहेत जरी तमिळ चित्रपट त्यांचं प्रमुख क्षेत्र असलं तरी त्यांनी कन्नड, हिंदी, तेलगू, बंगाली, इंग्लिश इत्यादी चित्रपटांत अभिनय केला आहे. तमिळ चित्रपटांमध्ये काम करून टॉलीवूड मधले ते सुपरस्टार म्हणून नावाजले जाऊ लागले परंतु नंतर हिंदी चित्रपटांमध्ये व इतर भाषांमध्ये काम केल्यावर त्यांची प्रसिद्धी संपूर्ण भारतात व भारताबाहेर देखील पोहोचली. रजनीकांत यांचा चाहतावर्ग फारच मोठा आहे फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्ये देखील सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते आहेत.

rajinikanth biography in marathi
rajinikanth biography in marathi

रजनीकांत मराठी माहिती – Rajinikanth Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
जन्म (Birthday)१२ डिसेंबर १९५०
जन्म गाव (Birth Place)बंगळुरू
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)सुपरस्टार

जन्म व वैयक्तिक आयुष्य

रजनीकांत हे मूळचे महाराष्ट्राचे आहेत. संपूर्ण नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड. रजनीकांत यांच मुळगाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपाठर आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी रजनीकांत यांचा जन्म बंगळुरू येथे एका महाराष्ट्रीयन हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला.

रजनीकांत यांना दोन मोठे भाऊ व एक बहीण आहे. रजनीकांत घरातील सर्वात धाकटे आहेत. रजनीकांत यांचं गरीब कुटुंब होतं त्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. दारिद्र्यामुळे बऱ्याच कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावं लागलं होतं. बंगळूर येथील आचार्य पाठशाला या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं.

बंगळूर येथील रामकृष्ण मिशन या महाविद्यालयातून रजनीकांत यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव आहे. शिक्षणानंतर रजनीकांत घराची परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करू लागले. १९६८ ते १९७३ या कालावधीत रजनीकांत यांनी पेंटर किंवा कुली अशी वेगवेगळी मिळेल ती छोटीमोठी कामं केली.

पुढे त्यांना बंगळूर ट्रान्सपोर्ट बस सर्विस मध्ये बस वाहक म्हणजेच कंडक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रजनीकांत यांच लता रंगाचारी यांच्याशी विवाह झाला आहे. सौंदर्या व ऐश्वर्या ही रजनीकांत यांच्या दोन मुलींची नाव आहेत. रजनी, थलैवा, सुपरस्टार, बॉस हे रजनीकांत यांची त्यांच्या चाहत्यांन कडून मिळालेली इतर नावे आहेत.

एक्टिंग करिअर

रजनीकांत यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि अभिनयाच्या इच्छेने ते त्यांच्या एका मित्राच्या मदतीने चेन्नईला अभिनयाचं प्रशिक्षण करण्याकरता गेले शिक्षण पूर्ण झाल्यावर १९७४ ते १९७५ दरम्यान रजनीकांत यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला त्यांना सह अभिनेत्याच्या भूमिका मिळाल्या व कालांतराने त्यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रमुख भूमिका देखील मिळाल्या.

सुरुवातीला त्यांनी तमिळ चित्रपटात काम केलं. अपूर्व रागंगळ, मूंद्रम‌ मुडीचु, सोळा वयत्तिनीले, भुवन ओरु केळ्विकुरि, मुळळुम मलरुम, निनैतले इनिक्कुम, आरिलिरुन्दु अरुबदु वरै, बिल्ला, मुरट्टु कालै, मून्ड् मुगम हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत यांनी जी भूमिका साकारली त्यामुळे त्यांना तमिळ तामिळनाड राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.

नल्लवनुक्क नल्लवन या चित्रपटासाठी रजनीकांत यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा तमिळ चित्रपटसृष्टीतील बेस्ट अवॉर्ड मानला जातो. श्री राघवेंद्र, तळपती, अणणामालै, येजमान, बाद्षा, मुत्तु या चित्रपटासाठी रजनीकांत यांना तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

अरुणाचलम, पडयप्पा या चित्रपटासाठी तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता म्हणून, चंद्रमुखी हा रजनीकांत यांचा चित्रपट फारच गाजला या चित्रपटाला तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. शिवाजी द बॉस हा देखील रजनीकांत यांचा सुपर डुपर हिट सिनेमा होता. एंदिरन इत्यादी तमिळ चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी काम केले आहे.

रजनीकांत हे खरे महाराष्ट्रीयन आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत एकही मराठी चित्रपट सिनेमा केला नाही आहे. तमिळ, कन्नड, तेलुगू, हिंदी, बंगाली चित्रपटात काम केलं आहे त्यांची अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. २००७ मध्ये शिवाजी द बॉस हा रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानंतर संपूर्ण भारतातील व आशिया खंडातील रजनीकांत हे सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले या चित्रपटासाठी तब्बल २६ कोटी रुपये मानधन रजनीकांत यांना देण्यात आला.

रजनीकांत यांचे चित्रपट भारताशिवाय देखील इतर देशांमध्ये सुप्रसिद्ध आहेत भारतामध्ये रजनीकांत यांचे बरेच चाहते आहेत पण भारताबाहेर देखील त्यांचे अनेक चाहते आहेत. जपान येथे रजनीकांत यांचे बरेच चित्रपट प्रदर्शित होतात व त्यांना भरपूर प्रतिसाद देखील मिळतो. इतकंच नव्हे तर रजनीकांत यांचे नाव गिनीज बुक मध्ये देखील नोंदवल गेल आहे.

त्याचं कारण म्हणजे रजनीकांत यांचा जगातील सर्वात मोठा चाहता वर्ग आहे. जगातील सर्वात मोठा चाहतावर्ग असणारा अभिनेता म्हणून त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. रजनीकांत हे एक उत्तम अभिनेता आहेत. त्याच त्यासोबतच ते उत्तम नागरिक देखील आहेत तमिळ मधील शोषित वर्गासाठी त्यांनी बऱ्याच वेळा आंदोलनं उपोषणं केली आहेत. रजनीकांत यांनी प्रत्येक वेळी शासनाविरुद्ध अन्यायावर आवाज उठवला आहे रजनीकांत हे दानशूर व्यक्ती म्हणून देखील ओळखली जाते.

सन्मान व पुरस्कार

रजनीकांत एक उत्कृष्ट अभिनेता आहेत त्यांनी आजपर्यंत विविध तमिळ चित्रपटांमध्ये व विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी भारतातच नव्हे तर भारताबाहेरही देखील ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी रजनीकांत यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

२००० मध्ये रजनीकांत यांना भारत शासना तर्फे दिला जाणारा “पद्मभूषण” पुरस्कार मिळाला. रजनीकांत यांना जर्मनीच्या सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्काराने म्हणजेच “द फ्यूरियर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रजनीकांत यांचे चित्रपट देशाबाहेर देखील प्रसिद्ध आहे त्यामुळे जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.

टाइम्स मॅगझिन तर्फे त्यांना जगातील शंभर प्रभावी लोकांचे यादीमध्ये स्थान दिले आहे. जॅकी चॅन यांच्यानंतर आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळवणारे रजनीकांत हे दुसरे अभिनेते ठरले आहेत. चित्रपट सृष्टीतील सर्वश्रेष्ठ दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

रजनीकांत यांना २०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. रजनीकांत हे भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा शेव्हलियर शिवाजी गणेश पुरस्काराचे विजेते ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील रजनीकांत यांनी सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली आहे व त्यांचा चाहता वर्ग सगळ्यात मोठा आहे म्हणून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आल आहे.

रजनीकांत यांना तब्बल सहा वेळा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार मधील उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना नऊ वेळा सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार मधील उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. रजनीकांत यांना तब्बल दहा वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला आहे.

रजनीकांत यांना २००७ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राज कपूर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इसवी सन १९९५ मध्ये रजनीकांत यांना अध्यात्मिकतेकरता ओशोबिस्मित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राजकीय आयुष्य

रजनीकांत हे सर्वोत्कृष्ट अभिनेते आहेत अभिनयासोबतच ते तमिळ मधील लोकांकरिता त्यांच्या विकासाकरिता आवाज उठवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक उत्कृष्ट नेता होण्याची क्षमता आहे. अभिनयासोबतच त्यांनी याआधीही अनेक वेळा शासनाविरुद्ध प्रश्न उठवले व वेळोवेळी उपोषण आंदोलने देखील केली.

समाजातील गरजू लोकांना त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. आता अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय केला आहे.

३१ डिसेंबर २०१७ मध्ये रजनीकांत यांनी चेन्नई मधल्या श्री राघवेंद्र मंडप या ठिकाणी पत्रकार परिषद भरवून संपूर्ण प्रेक्षकांसमोर व त्यांच्या चाहत्यांसमोर ते राजकारणात प्रवेश करत आहेत अशी घोषणा केली आणि २०१८ मध्ये कायदेशीर पक्ष स्थापन करणार आहेत असं सांगितलं. तमिळनाडू राज्यातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचा सहभाग असेल असं अधिकृतपणे घोषित केलं.

आम्ही दिलेल्या rajinikanth biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रजनीकांत मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rajinikanth information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of rajinikanth in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about rajinikanth in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!