Ramabai Ranade Information in Marathi रमाबाई रानडे यांच्या विषयी माहिती रमाबाई रानडे एक ज्येष्ठ समाजसुधारक आणि स्त्री शिक्षण, स्त्री हक्क चळवळीमध्ये यांचं मोठं योगदान आहे. रमाबाई यांनी सामाजिक कार्यामध्ये जी प्रगती केली त्याचं श्रेय त्यांचे पती महादेव रानडे यांना जात. पती मुळे त्यांनी शैक्षणिक शिक्षण घेतलं आणि पुढे जाऊन या स्त्रियांचा आवाज बनल्या. स्त्री हक्कासाठी त्या अगदी शेवटपर्यंत लढत राहिल्या. आजच्या ब्लॉग मध्ये आपण याच महान स्त्री ची कथा जाणून घेणार आहोत.

रमाबाई रानडे माहिती Ramabai Ranade Information in Marathi
नाव (Name) | रमाबाई रानडे |
जन्म (Birthday) | २५ जानेवारी इसवीसन १८५२ |
जन्मस्थान (Birthplace) | साताऱ्यातील छोट्याशा खेड्यामध्ये |
वडील (Father Name) | अनंतशास्त्री डोंगरे |
मुले | मनोरमा |
मृत्यू (Death) | २६ एप्रिल १९२४ |
इतिहास – Ramabai Ranade History in Marathi
जन्म
अठराव्या शतकामध्ये अनेक महिला क्रांतिकारक उदयास आल्या. त्यातीलच एक आणि जेष्ठ म्हणजे रमाबाई रानडे. २५ जानेवारी इसवीसन १८५२ मध्ये यमुनाबाई यांचा जन्म झाला. रमाबाई रानडे या स्त्री शिक्षणाला पाठिंबा देणाऱ्या आणि एक समाज सुधारक होत्या. साताऱ्यातील छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. यमुनाबाई कुर्लेकर यांचा बालपण तसं सुखाचा गेलं.
यमुनाबाई कुर्लेकर म्हणजेच रमाबाई रानडे. यमुनाबाई कुर्लेकर हे रमाबाई रानडे यांचे माहेरचं नाव होतं. त्याकाळी महिलांना शिक्षण देण्याची परवानगी नव्हती त्यामुळे रमाबाई यांचे बालपण खेळण्यातच गेलं परंतु त्या अतिशय हुशार होत्या.
- नक्की वाचा: थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची माहिती
शिक्षण
रमाबाई यांच्या जीवनाची खरी सुरुवात त्यांच्या लग्नानंतर झाली. लग्नानंतर त्यांना त्यांच्या पतीने शिक्षण दिल. त्यांचे पती महादेव गोविंद रानडे हे शिक्षित होते. ते देखील एक समाज सुधारक होते. त्यांनी रमाबाई रानडे यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यांनी रमाबाई रानडे यांना आधी प्राथमिक शिक्षण दिलं.
त्यानंतर एक वर्षाच्या प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी रमाबाईंना इंग्रजी भाषेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी रमाबाई यांना मराठी, हिंदी, बंगाली या भाषांमध्ये पारंगत बनवलं. खरंतर रमाबाईंच्या कुटुंबीयांचा त्यांच्या शिक्षणासाठी नकार होता परंतु त्यांच्या पतींनी घरच्यांचा विरोध करत रमाबाई यांना शिक्षण दिलं.
कारण की त्यांच्यामध्ये स्त्रिला देखील शिक्षण मिळण्याचा हक्क आहे व तसेच तिला तिचे स्वतंत्र निर्णय घेता यावेत म्हणून शिक्षण गरजेचे आहे. रमाबाईंची शिकवणे रोज रात्री दोन तास चालायची. पण काही वर्षांनी रमाबाईंचे पत्ती त्यांच्या कामानिमित्त व्यस्त राहू लागले. रमाबाईंना शिकवण्यासाठी महीला प्रशिक्षण शाळेतून इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मिस हरफर्ड यांची नेमणूक केली.
ही शिकवणी जवळपास साडेतीन तास चालायची. रमाबाई रानडे या इंग्रजी विषयाला दिवसातून साडेतीन तास द्यायची परिणामी त्या इंग्रजी विषयात फारच हुशार झाल्या.
वैयक्तिक आयुष्य:
रमाबाई रानडे यांचे वैयक्तिक आयुष्य तसं फारसं काही चांगलं नव्हतं. जीवनामध्ये सतत संघर्ष येत राहिले. त्या एक समाज सुधारक होत्या त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्याला समाजाचा तर विरोध होताच परंतु त्याच्या पल्याड त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांना विरोध केला होता. रमाबाई रानडे यांच्या शिक्षणास रमाबाई तिच्या घरच्यांचा विरोध होता परंतु रमाबाईचे पती महादेव रानडे हे वकील होते.
लग्नानंतरच त्यांनी रमाबाई यांच्यातील चातुर्य बघून त्यांना शिक्षण देण्याचं ठरवलं. रमाबाईंना त्यांनी प्राथमिक शिक्षण देण्यास सुरुवात केली पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी रमाबाईंना दिलं. रमाबाईंना त्यांनी वाचायला शिकवले, लिहायला शिकवलं, त्यानंतर रोजच्या जीवनात लागणारे छोटी-मोठी आकडे वारी देखील शिकवली, गणिते शिकवली, कोडी शिकवली परंतु त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे काही कालांतराने त्यांना रमाबाईंची शिकवणी घेणे जड जाऊ लागलं.
परंतु इतकं होऊन सुद्धा ते थांबले नाहीत त्यांनी रमाबाई साठी दुसऱ्या महिला शिक्षिका तयार ठेवल्या. रमाबाईंचे पती स्वत: आपण एक समाज सुधारक होते त्या मुळे रमाबाई त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये मदत करत असत. परंतु कालांतराने त्यांच्या पतीचे निधन झालं आणि रमाबाई रानडे एकट्या पडलेल्या होत्या.
त्यांचं मन हलकं करण्यासाठी त्या पुण्यातील येरवडा मधील एका मानसिक रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना भेटायच्या इतकेच नव्हे तर आपल्या सोबतच्या सहकार्यांसोबत आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला भेट देखील घेऊन यायच्या. इतकेच नव्हे तर त्यांनी रुग्णालयातल्या रुग्णांना फळे फुले अशा भेटी देखील दिल्या होत्या. पतीच्या निधनानंतर रमाबाई रानडे यांनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये पूर्ण झोकून दिलं.
अखिल भारतीय महिला परिषद स्थापना:
रमाबाईंचा मोठा आधार असणारे त्यांचे पती महादेव रानडे यांचे निधन झाल्यानंतर रमाबाई खरच एकटा पडल्या होत्या. सामाजिक कार्य आणि स्त्रियांच्या हक्कासाठी लढा या सगळ्या चळवळींसाठी रमाबाई ज्यांच्या कडून प्रोत्साहित झाल्या होत्या ते म्हणजे त्यांचे पत्ती महादेव रानडे, त्यामुळे महादेव रानडे यांच्या जाण्यानंतर रमाबाई यांच्यावर खूप मोठा फरक जाणवला.
परंतु त्यांनी त्यांच्या पतींची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं आणि त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. हाच जोश मनात ठेवून त्यांनी अखिल भारतीय महिला परिषदेची देखील स्थापना केली.
सेवासदन संस्था स्थापना:
तेव्हाच १९०८ मध्ये श्री बी एम मलबारी व श्री दयाराम गिडूमल हे दोघे जण रमाबाई रानडे यांच्याकडे एक वेगळी कल्पना घेऊन आले. ही कल्पना अशी होती की, या योजनेअंतर्गत एक विद्यापीठ स्थापन करता येईल याच्या मध्ये महिलांना रुग्णसेवेचे शिक्षण दिले जाईल. रमाबाई रानडे एक स्त्रीवादी, एक समाज सुधारक स्त्रियांनी आपल्या पायावर उभे रहा व आपल्या हक्काचे निर्णय स्वतः घ्यावे व आर्थिक परिस्थिती स्वतः सुधारावी असे त्यांना वाटायचे त्यामुळे रमाबाई रानडे यांना ही कल्पना अतिशय आवडली.
त्यांनी सेवासदन या नावाची संस्था स्थापन केली. या योजने अंतर्गत महिलांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या खंबीर बनवता येऊ शकते हे या कल्पनेचे उद्दिष्ट होतं. आधी ही संस्था मुंबई मध्ये स्थापन केली होती. त्यानंतर ही संस्था पुण्यामध्ये देखील स्थापन केली. अशाप्रकारे पुढे पुढे ही संस्थेच्या वेगवेगळ्या शाखा वेगवेगळ्या शहरांमध्ये वाढू लागली.
- नक्की वाचा: अहिल्याबाई होळकर यांची माहिती
रमाबाई रानडे कार्य:
रमाबाई रानडे ज्या स्त्री हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहिल्या. एका सामान्य घरामध्ये जन्मलेली एक साधारण मुलगी पुढे जाऊन अख्ख्या भारत भर तिची ओळख झाली. असं काय घडलं असेल रमाबाई रानडे यांच्या आयुष्यामध्ये? ज्या सर्व विश्वात प्रसिद्ध झाल्या. या कार्यामागे रमाबाई रानडे यांचे पती महादेव गोविंद रानडे यांचा हातभार आहे.
लहान वयामध्ये रमाबाई रानडे यांचं तीस वर्षाच्या महादेव गोविंद रानडे यांच्याशी लग्न झालं. लग्ना आधी रमाबाई यांना शिक्षण काय असतं हे माहित नव्हतं. त्यांना अक्षर ओळख देखील नव्हती. परंतु त्यांचे पती महादेव रानडे यांनी रमाबाई यांना शैक्षणिक शिक्षण देण्याचं ठरवलं आणि रमाबाई यांची शिकवणी सुरु झाली.
घर कामासोबतच रमाबाई त्यांच्या पतींच्या सामाजिक कामामध्ये त्यांना मदत करू लागल्या. महादेव गोविंद रानडे हे स्वता एक समाज सुधारक होते. त्याशिवाय विधवा महिलांना त्यांचा पाठिंबा होता. पतीची सामाजिक सेवा पाहून रमाबाई देखील या समाज सेवेकडे आकर्षित झाल्या. आणि त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची मुंबई मध्ये स्थापना केली.
या क्लबमध्ये महिलां बाबतीत घडणाऱ्या घटना व त्यांचे मूल्यमापन केलं जायचं. म्हणजेच प्रत्येक स्त्रीला कुठल्या कुठल्या परिस्थितीमधून जावं लागतं, त्यात त्या वेळी स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती तसेच त्यांचे बालविवाह देखील केलं जायचं त्यांच्या मनाविरुद्ध त्या काळच्या स्त्रियांना स्वतःचे निर्णय घेण्याचा काहीच हक्क नव्हता त्यांना त्यांचे मत विचारलं जायचं नाही ही सगळी स्त्रियांची व्यथा लोकांसमोर आणण्यासाठी रमाबाई रानडे यांनी अतोनात कष्ट घेतले आणि एका क्लबची स्थापना केली.
रमाबाई यांच्या पतींची त्यांना साथ होती घरच्यांची सोबत रमाबाईंना मिळाली नाही. घरचे या दोघांच्याही विरोधात होते परंतु रमाबाईंच्या पतीने त्यांना नेहमीच प्रोत्साहित केलं. दोघं मिळून सामाजिक चळवळींमध्ये सहभागी झाले होते. पुढे हळूहळू रमाबाई रानडे यांची सामाजिक चळवळीमध्ये कार्य वाढू लागले. पुढे जाऊन त्यांना सेवासदन या संस्थेचे अध्यक्षपद देखील मिळाले त्यांनी स्वतःची मुलींसाठी शाळा सुरू केली.
ही शाळा त्यांनी पुणे येथे स्थापन केली या शाळेचे नाव त्यांनी हुजूरपागा असे ठेवले. आतापर्यंत पतीचा खंबीर आधार असलेल्या रमाबाई समाजाशी आत्मविश्वासाने लढत होत्या. परंतु १९०१ मध्ये रमाबाई यांचे पती महादेव रानडे यांचे निधन झालं. रमाबाई रानडे एकट्या पडलेल्या होत्या. पुढे त्यांनी सामाजिक कार्यामध्ये खूप प्रगती केली.
पतीच्या निधनानंतर त्यांनी सर्व लक्ष सामाजिक कार्यामध्ये स्त्री हक्क आणि स्त्री शिक्षण याचा नारा संपूर्ण देशभर लावला. त्यांनी दुष्काळग्रस्त लोकांना देखील मदत केली. रमाबाई रानडे यांचे समाजकार्य चालुच होतं. ही संस्था कालांतराने खूप मोठी होऊ लागली एका वेळेला तिथे १००० महिला शिक्षण घेत होत्या. ही संस्था म्हणजे रमाबाई रानडे यांच्यासाठी खूप मोठी प्रगती होती.
मृत्यू :
२६ एप्रिल १९२४ हा दिवस महाराष्ट्र साठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी काळा दिवस ठरला. त्यादिवशी रमाबाई रानडे यांचे निधन झालं. हिंदू महिलांचा सर्वात मोठा आधार या दिवशी निघून गेला. रमाबाई रानडे यांचे स्त्री शिक्षणा मध्ये असलेला वाटा तसेच स्त्री ची व्यथा समाजासमोर आणण्याचे त्यांचे योगदान खूप ज्येष्ठ आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये खूप महिलांना रमाबाई रानडे यांनी स्वतःच्या पायावर जगणं शिकवल.
स्वतःच्या हक्काची स्त्रियांना जाणीव करून दिली त्यामुळे खुप महिला रमाबाई रानडे यांच्या द्वारे प्रोत्साहित होऊन या सामाजिक चळवळींमध्ये देखील भाग घेऊ लागल्या. इतकेच नव्हे तर महात्मा गांधी यांनीदेखील शोककळा व्यक्त केल्या. त्यांच्या शोकसंदेशमध्ये असं लिहिलं होतं की रमाबाई रानडे यांचा मृत्यू देशासाठी एक हानी आहे.
आम्ही दिलेल्या ramabai ranade information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pandita ramabai ranade या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ramabai ranade in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट