राणी दुर्गावती यांची माहिती Rani Durgavati Information in Marathi

rani durgavati information in marathi राणी दुर्गावती यांची माहिती, आज आपण या लेखामध्ये १५ व्या शतकातील काळामधील गोंड वंशातील प्रसिध्द राणी दुर्गावती ह्यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. राणी दुर्गावती यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील बांदा या ठिकाणी कलंजर या किल्ल्यावर ५ ऑक्टोबर १५२४ मध्ये राजपूत चंदेल सम्राट कीरत राय यांच्या कुटुंबामध्ये झाला. राणी दुर्गावती यांचा विवाह हा १५४२ मध्ये गोंड वंशाचा राजा संग्राम शाह यांचा जेष्ठ मुलगा दलपत शाह यांच्याशी झाला आणि चंदेल आणि गोंड घराणे जवळ आले.

राणी दुर्गावती यांना एक मुलगा झाल्यानंतर लगेचच त्यांच्या पतींचा मृत्यू झाला आणि मृत्यू नंतर गोंड वंशाची जबाबदारी हि त्यांच्यावर आली त्या गोंड जिल्ह्याच्या शासक तर बनल्याच परंतु त्यांनी १५ वर्ष आदर्श राज्य देखील केले आणि हा काळ गोंड वंशासाठी सुवर्णकाळच होता. राणी दुर्गावती यांचे व्यक्तिमत्व हे विविध पैलूंनी युक्त होते. ती सुंदर आणि धाडसी तर होती आणि प्रशसकीय कौशल्याने एक उत्तम नेता देखील होती.

rani durgavati information in marathi
rani durgavati information in marathi

राणी दुर्गावती यांची माहिती – Rani Durgavati Information in Marathi

नावराणी दुर्गावती
जन्म५ ऑक्टोबर १५२४
जन्म ठिकाणउत्तर प्रदेश मधील बांदा या ठिकाणी कलंजर किल्ला
वडिलाचे नावकीरत राय
पतीचे नावदलपत शाह
मृत्यू२४ जून १५६४

राणी दुर्गावती यांचे गोंड वंशातील कारकीर्द आणि काम – rani durgavati history in marathi

राणी दुर्गावती यांनी १५४५ मध्ये एका मुलाला जन्म दिला आणि त्यांचे नाव वीर नारायण असे ठेवले लगेचच म्हणजे १५५० मध्ये दलपत शाह म्हणजेच राणी दुर्गावती यांचे पती मरण पावले त्यामुळे राणी दुर्गावती यांनी गोंड राज्याचा सर्व राजकारभार हा आपल्या हातामध्ये घेतला कारण त्यावेळी त्यांचा मुला खूपच लहान म्हणजे तो फक्त ५ वर्षाचा होता.

ज्यावेळी त्यांनी गोंड वंशाचा सर्व राजकारभार आपल्या हाती घेतला त्यावेळी मान ठाकूर आणि आधार कायस्थ या दोन मंत्र्यांनी राणी दुर्गावती यांना सुलभ आणि यशस्वी प्रशासन आणि राज्यकारभार चालवण्यासाठी मदत केली. राणीने त्यांच्या काळामध्ये सिंगौरगडाच्या जागी आपली राजधानी बदलून चौरागड या ठिकाणी राजधानी बदलली.

असे देखील म्हणतात कि राणी दुर्गावातीच्या काळामध्ये व्यापाराची भरभराट देखील झाली होती म्हणजेच तिने आपल्या पतीच्या पूर्ववर्ती प्रमाणेच आपला प्रदेश वाढवला तसेच गोंडवाणांचे राष्ट्रीय एकीकरण केले ज्याला गार्हा कटंगा म्हणून देखील ओळखले जाते.

राणी दुर्गावती देवीच्या राज्यातील २३ हजार गावांपैकी १२ हजार गावे थेट तिच्या सरकारद्वारे व्यवस्थापित केली जात होती आणि तिच्या मोठ्या सुसज्ज सैन्यामध्ये २०००० घोडदळ आणि १००० युध्द हत्ती शिवाय मोठ्या संखेने पायदळ होते असे म्हटले जाते तसेच तिने जबलपूर या ठिकाणी मोठा जलाशय बांधला आहे ज्याला राणीताला म्हणून ओळखले जाते आणि तिने तिच्या कारकीर्दीमध्ये अनेक सार्वजनिक कामे देखील केली.

.राणी दुर्गावती योध्दा म्हणून कश्या लोकप्रिय झाल्या ?

राणी दुर्गावती हि एक योध्दा होती म्हणजेच तिने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अनेक लढाया करून अनेक प्रदेश आपल्या राज्यामध्ये समाविष्ट केले होते. ज्यावेळी बाज बहादूर यांने मावळा प्रदेश ताब्यात घेऊन सिंहासनावर बसला त्यावेळी त्यांने राणी दुर्गावातीवर हल्ला करण्यासाठी सैनिक पाठवले परंतु हा हल्ला त्याला खूप महागात पडला आणि त्यामध्ये बाज बहादूर याचा पराभव झाला अनिरानी दुर्गावती यांनी चांगले नाव मिळाले तसेच त्यांची प्रचीती वाढली.

१५६२ च्या सुमारास अकबराने मावळा प्रांत हा आपल्या ताब्यात घेतला आणि मावळ्याला मुघल साम्राज्याशी जोडले आणि त्यामुळे मुघल साम्राज्य हे राणी दुर्गावती यांच्या राज्याच्या खूपच जवळ आले. अब्दुल मजीद खान हा मुघल साम्राज्याचा सुभेदार होता आणि त्याने राणी दुर्गावती यांच्या साम्राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले आणि त्याने हल्ला देखील केला त्यावेळी मुघलांचे सैनीक हे प्रशिक्षित होते.

आणि राणीच्या सैनिकांच्याकडे कोणतेही प्रशिक्षण नव्हते तरी देखील राणीचे सैनिक लढत होते यामध्ये राणीचा फौजदार अर्जुन दासवास मारला गेला परंतु पुढे आपल्या सैन्याचे नेतृत्व तिनेच केले आणि ती लढू लागली आणि त्यामध्ये तिचा विजय झाला.

राणी दुर्गावती यांचा मृत्यू – death

राणी दुर्गावती यांच्या राज्यावर परत असफ खानाने हल्ला करण्याचे ठरवले होते आणि त्यांनी हल्ला करण्यासाठी योजना देखील आखली होती परंतु हि गोष्ट राणीला देखील कळाली होती म्हणून तिने रात्रीचा हल्ला करण्याचे ठरवले होते परंतु तसे झाले नाही आणि सकाळी असफ खानने अनेक सैनिक घेऊन तसेच मोठ मोठ्या तोफा घेवून त्यांच्या राज्यावर हल्ला केला तरी देखील ती लढत होती.

या युध्दामध्ये लढताना तिने शत्रूच्या हातून मरण्यापेक्षा स्वताचा आपला जीव संपवणे चांगले असे समजून खंजीरने आपले प्राण संपवले. राणी दुर्गावती ह्यांचा मृत्यू हा २४ जून १५६४ मध्ये जबलपूर या ठिकाणी झाला.

राणी दुर्गावती यांच्याविषयी विशेष तथ्ये – facts

  • २४ जून १५६४ या दिवशी राणी दुर्गावती मृत्यू पावल्या आणि हा दिवस आजही हुतात्मा दिवस किंवा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. राणी दुर्गावती यांची समाधी हि बहुतेक जबलपूर आणि मांडला या सीमेवर असणारे बारेला या ठिकाणी वासालेलेई आहे.
  • मध्य प्रदेश मध्ये असणारे जबलपूर विद्यापीठाचे नाव १९८३ मध्ये दुर्गावती विद्यापीठ असे देण्यात आले आहे. 
  • राणी दुर्गावती ह्या १८ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह दलपत शाह यांच्याशी झाला होता.
  • राणी दुर्गावती देवीच्या राज्यातील २३ हजार गावांपैकी १२ हजार गावे थेट तिच्या सरकारद्वारे व्यवस्थापित केली जात होती आणि तिच्या मोठ्या सुसज्ज सैन्यामध्ये २०००० घोडदळ आणि १००० युध्द हत्ती शिवाय मोठ्या संखेने पायदळ होते असे म्हटले जाते.
  • त्यांनी त्यांच्या बालपणीच तलवारबाजी, धनुर्विद्या आणि घोडेस्वारी या कला अवगत केल्या होत्या.
  • राणी दुर्गावती यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील बांदा या ठिकाणी कलंजर या किल्ल्यावर ५ ऑक्टोबर १५२४ मध्ये राजपूत चंदेल सम्राट कीरत राय यांच्या कुटुंबामध्ये झाला.
  • दुर्गावती हिचा विवाह हा गोंड वंशातील दलपत शाह यांच्याशी झाला होता आणि त्यांना एक मुला देखील होता ज्याचे नाव वीर नारायण असे होते.
  • राणी दुर्गावती ह्यांचा मृत्यू हा २४ जून १५६४ मध्ये जबलपूर या ठिकाणी झाला.

आम्ही दिलेल्या rani durgavati information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर राणी दुर्गावती यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या rani durgavati mahiti in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about rani durgavati in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rani durgavati history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!