Rava Dosa Recipe in Marathi रवा डोसा रेसिपी मराठी रवा डोसा हा दक्षिण भारतीय पदार्थ असून हा पदार्थ लगेच बनतो आणि खूप लोकप्रिय देखील आहे. त्या ठिकाणी हा पदार्थ वारंवार बनवला जाणारा पदार्थ आहे तसेच हा पदार्थ भारतामध्ये काही ठिकाणी आवडीने बनवला जातो तसेच खाल्ला देखील जातो. आपण रोज रोज नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा बनवतो आणि हे रोज खाण्यासाठी कंटाळवाणे वाटते त्यावेळी तुम्ही झटपट बनणारा रवा डोसा हि रेसिपी नाश्त्यासाठी बनवू शकता. रवा डोसा बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत कारण डोसा बनवणे अगदी सोपे आहे.
आणि कमी वेळेमध्ये घरामध्ये उपलब्ध असलेल्या मोजक्याच साहित्यामध्ये आपण अगदी उत्तम आणि झटपट रवा डोसा बनवू शकतो. आपण केंव्हातरी झटपट नाश्ता बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण रवा डोसा बनवू शकतो कारण तो झटपट बनतो. आज या लेखामध्ये आपण झटपट बनणारा रवा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
रवा डोसा रेसिपी मराठी – Rava Dosa Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
उकडण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती |
रवा डोसा म्हणजे काय ?
रवा डोसा म्हणजे रवा, ताक तांदळाचे पीठ, मिरची आणि मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ते चांगले मिक्स करा आणि ते १० ते १५ मिनिटे भिजवून त्याचा डोसा तव्यावर डोसा बनवला जातो आणि हा रवा डोसा आपण बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी, किंवा सांबर सोबत आपण डोसा खावू शकतो.
- नक्की वाचा: डोसा रेसिपी मराठी माहिती
रवा डोसा रेसिपी – how to make rava dosa recipe in marathi
रवा डोसा हा दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो बहुतेक लोक नाश्त्यामध्ये बनवतात आणि हा नाश्त्यासाठी झटपट बनणारा पदार्थ आहे. हा पदार्थ खूप सोपा आहे आणि कमी वेळेत आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनणारा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. चला तर मग पाहूयात रवा डोसा कसा बनवायचा आणि हा पदार्थ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
उकडण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती |
रवा डोसा हा एक भारतीय पाककलेमध्ये नाश्त्यासाठी बनवला जाणारा एक पदार्थ असून हा पदार्थ खूप सोपा आहे आणि घरामध्ये असण्याऱ्या साहित्यापासून अगदी सहज बनवता येतो. चला तर मग रवा डोसा बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहूयात.
- १ वाटी रवा.
- २ वाटी ताक.
- १/२ तांदळाचे पीठ.
- १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची.
- १/२ चमचा सोडा.
- १/२ छोटा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
आता आपण वर दिलेल्या साहित्यापासून स्वादिष्ट आणि झटपट डोसा कसा बनवायचा याबद्दल पाहूयात.
- सर्वप्रथम एक मिक्सिंग बाऊल घ्या त्यामध्ये रवा आणि ताक घाला आणि ते चांगले एकत्र करून त्यावर झाकण घालून ते १० ते १५ मिनिटे भिजत घाला.
- १० ते १५ मिनिटांनी ते भिजले कि त्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून ते चांगले एकत्र करून घ्या.
- आता या बॅटरमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोडा घालून ते बॅटर चांगले एकत्र करून घ्या. या बॅटर मध्ये सोडा घातला तर आपले बॅटर चांगले फुगेल आणि त्यामुळे आपला डोसा मऊ बनण्यासाठी मदत होईल.
- आता गॅसवर डोसा तवा ठेवून तो मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि मग त्या तव्याला तेल लावून त्यावर वाटीने डोस्याचे बॅटर पसरावा आणि मध्यम आकाराचा गोल डोसा बनवा आणि त्याच्याबाजूने तेल सोडून तो डोसा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि भाजल्यानंतर तो तव्यातून काढा आणि तुसरा डोसा बनवा. ( टीप : डोसा दोन्ही बाजूनी चांगला बाजून घ्या ).
- अश्या प्रकारे सर्व बॅटरचे अशे डोसे बबनवून घ्या.
- गरमागरम डोसा खोबऱ्याची चटणी, सांबर किंवा बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करा.
रवा डोसा कश्यासोबत खाल्ला जातो – serving suggestions
रवा डोसा हा एक असा पदार्थ आहे जो आपण तसाच खाऊ शकतो किंवा त्याच्या सोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सोबत आपण खाऊ शकतो.
- डोसे भाजते वेळी जर तुम्ही तेला ऐवजी डोस्याला तेल किंवा तूप वापरू शकता.
- डोस्याच्या बॅटर मध्ये थोड्या प्रमाणात मैदा देखील वापरला तर चालतो.
- जर तुम्हाला वेळ असेल तर तांदळाचे पीठ मिक्स केल्यानंतर ते बॅटर ८ ते १० मिनिटे भिजवू शकता.
- १ वाटी खोबरे.
- १ ते २ हिरव्या मिरच्या.
- १/४ चमचा जिरे.
- २ चमचा चिरलेली कोथिंबीर.
- १/२ चमचा मोहरी ( फोडणीसाठी ).
- ६ ते ७ पाने कडीपत्ता.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( फोडणीसाठी.
खोबऱ्याची चटणी करण्यासाठी करावी लागणारी कृती
- खोबऱ्याची चटणी करताना सर्वप्रथम खिसलेले किंवा खवलेले ओले खोबरे घ्या आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या.
- मग त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला आणि ते सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्या त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते अनेक वेळा मिक्सरवर फिरवून घ्या.
- मग एक भांडे मध्यम आचेवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी तडतडली कि लगेचच कडीपत्ता घाला आणि मग लगेच खोबऱ्याचे मिश्रण घालून ते एकत्र करा आणि शेवटी त्यामध्ये मीठ आणि साखर चवीनुसार घाला ते चांगले एकत्र करा तुमची आप्पे सोबत खाल्ली जाणारी चटणी तयार आहे.
आम्ही दिलेल्या rava dosa recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रवा डोसा रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या idli rava dosa recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि instant rava dosa recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to prepare rava dosa Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट