Rava Idli Recipe in Marathi रवा इडली मराठी इडली हा पदार्थ एक दक्षिण भारतातील एक लोकप्रिय प्रकार आहे जो नाश्त्यामध्ये बनवला जातो आणि भारतामध्ये सर्व ठिकाणी हा पदार्थ अगदी आवडीने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. हा पदार्थ भारतामध्ये नाश्त्यासाठी किंवा काही ठिकाणी हा पदार्थ जेवणासाठी देखील बनवला जातो आणि हा भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकप्रिय देखील आहे. इडली हा पदार्थ सामन्यता तांदूळ भिजत घालून बनवला जातो आणि तांदूळ भिजत घालून इडल्या बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि यामध्ये खूप वेळ जातो.
त्यामुळे इडल्या झटपट बनवण्यासाठी आपल्याला एक पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे रवा इडली. रवा इडली हा पदार्थ आपण खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो. चला तर आज आपण या लेखामध्ये झटपट बनणारी रवा इडली पाहूयात.
रवा इडली रेसिपी मराठी – Rava Idli Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
उकडण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
रवा इडली म्हणजे काय ?
रवा इडली हि रवा आणि उडदाच्या डाळीची पेस्ट भिजत घातली जाते आणि त्याला आंबट पणा येण्यासाठी दही घातले जाते.
- रवा : रवा हा रवा इडली बनवण्यासाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. रवा आणि डाळीची पेस्ट करून ते दोन्ही घटक एकत्र भिजवून त्याच्या इडल्या बनवल्या जातात.
- उडदाची डाळ : उडदाची डाळ रवा इडलीमध्ये वापरली तर इडल्या चांगल्या हलक्या आणि इडलीला थोडा चिकटपणा येतो.
जर आपल्याला झटपट इडल्या बनवायच्या असतील तर आपण रव्याच्या इडल्या बनवू शकतो. इडलीचे पीठ थोडे फसफसण्यासाठी आपण त्यामध्ये आंबट दही किंवा खायचा सोडा घालू शकतो. रवा इडली हि बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर मग आपण रवा इडली कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
उकडण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककला | दक्षिण भारतीय |
रवा इडली बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते आणि आपल्याला बाजारातून खास काही विकत आणावे लागत नाही. चला तर मग पाहूयात रवा इडली बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- ३ वाटी रवा.
- १ वाटी उडीद डाळ.
- १/२ चमचा खायचा सोडा.
- १ वाटी दही.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( अवश्यातेनुसार ).
- पाणी ( गरजेनुसार ).
- सर्वप्रथम उडदाची डाळ स्वच्छ निवडून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मग त्यामध्ये गरम पाणी घाला आणि तो डाळ अर्धा तास किंवा एक तास भिजत ठेवावी.
- तसेच रवा देखील स्वच्छ निवडून तो देखील पाण्यामध्ये भिजत घाला.
- आता उडदाची डाळ भिजली कि ती त्या पाण्यासोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ती मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. अश्या प्रकारे मिक्सरमध्ये सर्व डाळीची बारीक पेस्ट करून घ्या.
- आमाग रव्यातील जादाचे पाणी काढून घ्या आणि त्यामध्ये वाटलेल्या उडदाच्या डाळीची पेस्ट, फेटलेले दही, सोडा आणि मीठ ( चवीनुसार ) मिक्स करून ते चांगले एकत्र करून घ्या आणि ते मिश्रण १५ ते २० मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवा.
- त्यानंतर इडली पात्र घेवून त्यामध्ये पाणी घाला आणि इडली पात्राच्या प्लेट्सला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये इडली बॅटर घाला आणि त्या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवून त्यावर पात्राचे झाकण घाला.
- आणि ते मोठ्या आचेवर उकडण्यासाठी ठेवा आणि ते ६ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. ६ ते ७ मिनिटांनी इडली पात्र उघडून इडलीमध्ये सुरी किंवा चमच्या घालून पहा जर सुरीला किंवा चमच्याला पीठ लागले तर ते आणि थोडा वेळ उकडा आणि जर पीठ लागले नसेल तर त्या चांगल्या उकडल्या असतील.
- इडल्या उकडल्या असतील तर गॅस बंद करा आणि त्यामधील इडलीच्या प्लेट्स काढून घ्या आणि त्यामधील इडल्या चमच्याने काढून घ्या.
- राहिलेल्या बॅटरच्या इडल्या वाफवण्यासाठी हीच प्रक्रिया वापरा.
- आपल्या रवा इडल्या खाण्यासाठी तयार झाल्या.
रवा इडली आपण कश्यासोबत सर्व्ह करू शकतो – serving suggestions for rava idli
इडली सर्व्ह करण्याची पध्दत हि त्या भागावर अवलंबून असते म्हणजेच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे इडली सर्व्ह केली जाते. पण सामान्यता इडली खोबऱ्याची चटणी किंवा सांबर सोबत सर्व्ह केली जाते.
टिप्स ( Tips )
- इडलीमध्ये सोड्या ऐवजी इनो देखील वापरले तरी चालते त्यामुळे देखील इडल्या हलक्या होतात.
- जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही उडदाची डाळ ३ ते ४ तास देखील भिजत घालू शकता.
- १ वाटी खोबरे.
- १ ते २ हिरव्या मिरच्या.
- १/४ चमचा जिरे.
- २ चमचा चिरलेली कोथिंबीर.
- १/२ चमचा मोहरी ( फोडणीसाठी ).
- ६ ते ७ पाने कडीपत्ता.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( फोडणीसाठी.
खोबऱ्याची चटणी करण्यासाठी करावी लागणारी कृती
- खोबऱ्याची चटणी करताना सर्वप्रथम खिसलेले किंवा खवलेले ओले खोबरे घ्या आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या.
- मग त्यामध्ये जिरे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला आणि ते सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्या त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते अनेक वेळा मिक्सरवर फिरवून घ्या.
- मग एक भांडे मध्यम आचेवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये २ चमचे तेल घाला आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घाला, मोहरी तडतडली कि लगेचच कडीपत्ता घाला आणि मग लगेच खोबऱ्याचे मिश्रण घालून ते एकत्र करा आणि शेवटी त्यामध्ये मीठ आणि साखर चवीनुसार घाला ते चांगले एकत्र करा तुमची आप्पे सोबत खाल्ली जाणारी चटणी तयार आहे.
आम्ही दिलेल्या rava idli recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर रवा इडली रेसिपी मराठी माहिती how to make idli from idli rava बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या zatpat rava idli recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि rice rava idli recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये rava idli recipe marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट