Rose Information In Marathi गुलाब फुलांची माहिती मराठी सुंदर सुंगंध कोणाला नाही आवडत ? चला तर मग आज आपण फुलांचा राजा गुलाब या विषयावर चर्चा करणार आहोत. (Rose) हा फुलांचा ‘राजा’ आहे हे आपल्या सगळ्यांना महित आहे. गुलाब हे पाहताच क्षणी सर्वांना मोहून टाकणारे अतिशय सुंदर आणि सुंगंधी फुल आहे. गुलाबाचे भारतामध्ये तीन प्रकार आढळतात रानटी, देशी आणि कलमी त्याचप्रमाणे रानटी रोपावर कलम करून विदेशी जातीचे गुलाब तयार केले जाते. गुलाबांच्या झाडाला बारा महिने फुले लागतात त्यांचा असा विशिष्ठ हंगाम नसतो पण गुलाबाच्या झाडाला अतिथंड हवा मानवत नाही.
गुलाबाची माहिती मराठीमध्ये: गुलाबाचे झाड काही ठिकाणी रोपट्या सारखे असते तर काही ठिकाणी वेलीसारखे असते. या फुलांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्याचे उत्पादन हि मोठ्या प्रमाणात होते व त्याचा व्यापार हि मोठ्या प्रमाणात होतो तसेच भारतातील गुलाबांच्या फुलांची निर्यात हि मोठ्या प्रमाणात होते. गुलाब हे विविध प्रकारचे व रंगांचे असतात. गुलाब हे मैत्रीचे, प्रेमाचे आणि शांततेचे प्रतिक आहे असे म्हटले जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगांचे गुलाब वेगवेगळ्या भावना दर्शविते असेही म्हटले जाते.
गुलाब फुलांची माहिती मराठी – Rose Information In Marathi
गुलाबाची माहिती मराठीमध्ये Information About Rose Flower In Marathi
गुलाब या फुला बद्दलची काही मनोरंजक तथ्ये – Some Interesting Facts About roses
- गुलाब हा व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे त्याचबरोबर त्यामध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि बी हि असते.
- बायबलमध्ये तीन फुलांचा उल्लेख केला आहे त्यातील एक म्हणजे गुलाब.
- गुलाबांच्या १०० विविध प्रजाती आहे.
- गुलाब हा एक फुलांचा झुडूप आहे जो रोझासी नावाच्या वनस्पतींच्या कुटूंबाशी संबंधित आहे.
- ५००० वर्षांपूर्वी गुलाबाची लागवड आशिया मध्ये सुरु केली होती.
- रोज बुश हा सर्वात उंच गुलाब आहे याची उंची २३ फुट इतकी आहे.
- जगभरात अंदाजे 13,000 गुलाबांच्या वाण आहेत.
- इंद्रधनुष्य गुलाब अत्यंत आकर्षक रंगांचा एक अस्सल गुलाब आहे.
- ज्युलियट गुलाब जगातील सर्वात महाग गुलाब आहे.
tulip flower information in marathi
गुलाबाचे विविध प्रकार – Different types of Roses
गुलाबाचे मुख्यता तीन प्रकार आहेत ते म्हणजे जुने बाग गुलाब (old garden rose) , संकरीत गुलाब ( hybrid rose) आणि आधुनिक गुलाब (modern rose).
जुने बाग गुलाब – Information about old garden rose in Marathi
जुने बाग गुलाब हे १८६७ च्या अगोदर पासून अस्तित्वात असलेले गुलाब आहे. १९ व्या शतकात जुने बाग गुलाबांची लोकप्रियता कमी झाली व हायब्रीड टी गुलाबांनी त्याची जागा घेतली. हि फुलांची जात संपूर्णपणे नाश पावण्या अगोदरच संग्रहकांनी त्या जातीची फुले आपल्या बागेमध्ये जतन केली म्हणूनच हा गुलाब आपल्याला आजून हि पाहायला मिळतो. काही जुन्या बाग गुलाबाचे प्रकार खाली दिले आहेत.
गॅलिकस (gallicas), ब्लश नॉईझेट (blush noisette), मॉस (Moss), सेन्टीफोलिया (centifolia), डामास्क (damask), अल्बस (albas), ऑस्टीन (austin), आर्शीयर (ayrshire), बोर्बोन (bourbon), बोअरसौल्ट (boursault) हे काही जुने बाग गुलाब आहेत.
१. गॅलिकस – Gallicas
हे एक दाट आणि सुवासिक युरोपीअन गुलाबाचे फुल आहे तसेच हे गुलाब लाल, गुलाबी किवा किरमिजी रंगामध्ये असते. गॅलिकस हा सर्वात जुना प्रकार आहे जो ग्रीक व रोमन यांनी वाढवला. काही ठिकाणी रंग उत्तम असतोच पण पट्टेदार बहार लोकांचे लक्ष वेधून घेते. गॅलिकस चे घनदाट व जाड झुडूप असते व ५ फुट उंचीपर्यंत वाढू शकतात.
२. ब्लश नॉईझेट (Blush noisette)
ब्लश नॉईझेट हा गुलाब फिकट गुलाबी आणि फिकट गुलाबी पांढर्या रंगात आपल्याला पाहायला मिळतो. या फुलाला रोजा-नोएस्टीटियाना किवा ब्लश क्लस्टर असेही ओळखले जाते. ब्लश नॉईझेट चे झाड २.५ मीटर पसरते तर त्याची उंची ७ ते ८ फुट वाढते तसेच या फुलाच्या झाडाला तकतकनारी हिरवी पणे असतात व किरमिजी रंगाच्या फांद्या असतात.
३. मॉस – Moss
विक्टोरीयन इंग्लंड चा गुलाब म्हणून ओळखला जाणारा मॉस गुलाब कमी उंचीचा असतो परंतु हा गुलाब कार एक्झॉस्टमधून कार्बन डाय ऑक्साईड चांगल्या प्रकारे शोषून घेण्याची क्षमता असते. मॉस गुलाबाला ज्याला पिगवेड, पोर्तुलाका किंवा सन प्लांट म्हणून सुद्धा ओळखले जाते.
४. सेन्टीफोलिया – Centifolia
सेन्टीफोलिया यागुलाबाच्या फुलाला १०० किवा त्यापेक्षा जास्ती पाकळ्या असतात. हा गुलाब आकाराने व त्याची घडण कोबी सारखी दिसते म्हणून त्याला कोबी गुलाब असेही म्हणतात. हे गुलाब खूप सुवासिक असतात आणि ते गुलाबी किवा पांढऱ्या रंगामध्ये आढळतात. त्या फुलांची वाढ उष्ण आणि दमट वातावरणात होते.
५. डामास्क – Damask
डामास्क हे फुल पांढरे, गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात व ते झुडुपात ७ फुट उंचीचे असतात. डामास्क या गुलाबाची ओळख १६ शतकात युरोप मध्ये झाली. हे हिवाळ्यात वाढणारे सुगंधित, उंच आणि काटेरी पाने असणारे फुल आहे. डामास्क या फुलाचा उपयोग तेल किवा परफ्यूम बनवण्यासाठी होतो.
६. अल्बस – Albas
अल्बस हे एक भारतीय गुलाब आहे व हे गुलाबाचे फुल कदाचित पहिल्या शतकापूर्वी चे फुल आहे. हे फुल सावलीत वाढतात व ते उन्हाळ्याच्या शेवटी एकदाच फुलतात. अल्बस हे फुल निळसर गुलाबी, पांढरे किवा हलके गुलाबी रंगाचे असतात.
७. ऑस्टीन – Austin
१९६० मध्ये डेव्हिड ऑस्टीन प्रजनकाने ऑस्टीन या इग्रज फुलाची निर्मिती केली. ऑस्टीन ह्या फुलाची वाढ खूप चांगल्याप्रकारे होते.
८. आर्शीयर – Ayrshire
आर्शीयर हे गुलाब जुने बाग गुलाब आहे आणि याची उत्पती कशी झाली हे माहित नाही कदाचित वन्य प्रजाती गुलाबापासून उद्भवली कि र्शीयर स्कॉटलंडमध्ये एका अज्ञात बीजातून वाढविला गेली. या फुलाचे झाड खूप उंच होवू शकते कदाचित २५ ते ३० फुट पर्यंत वाढू शकते तसेच या झाडाला फुलेही खूप लागतात ( फुलांनी झाड झाकले जाते). उन्हाळ्याच्या शेवटी हि फुले लागतात.
९. बोर्बोन – Bourbon
बोर्बोन हि गुलाबाची फुले मोठ्या प्रमाणात लागतात आणि हे अतिशय सुगंधित असते त्यामुळे त्या फुलाचा उपयोग परफ्यूम बनवण्यासाठी होतो. हि फुले दिसायला हि खूप आकर्षक व मनाला भुरळ पाडणारी असतात. बोर्बोन हे गुलाब सुवासिक, दाट पाकळ्या असलेले आणि गडद गुलाबी-लाल किवा हलका पिंक रंगाचे असते. हे एक भारतीय बेटावर वाढणारे गुलाबाचे फुल आहे.
१०. बोअरसौल्ट – Boursault
बोअरसौल्ट हा जुना बाग गुलाब आहे व तो वेली सारखे वरती चढणारे असते. हा गुलाब उन्हाळ्याच्या सुरवातीस लागतो. बोअरसौल्ट सुगंधित, लाल जांभळा आणि बहरलेला असतो.
हायब्रीड टी गुलाब – information about hybrid tea rose in Marathi
हायब्रीड टी गुलाब हा संकरित चिरस्थायी आणि जुन्या पद्धतीचा टी गुलाब हे दोन प्रकार एकत्र करून बनवला आहे. हायब्रीड टीचे गुलाब त्यांच्या बळकट देठ, लांब, उत्तम आकाराचे फुले आणि अतुलनीय सुगंधासाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी या गुलाबाची नवी जात सादर केली जाते. त्यामधील काही जाती खाली दिल्या आहेत.
१. ब्लॅक मॅजिक गुलाब – black magic rose information in marathi
हा गुलाब गडद लाल , मखमली असतो तसेच हा गुलाब अत्यंत सुवासिक आणि दिसायला हि खूप आकर्षक असतो. ब्लॅक मॅजिक हा गुलाब लोकांना आवडणारा गुलाब आहे त्याचा वापर पुष्प गुच्छा मध्ये तसेच सजावटीसाठी हि केला जातो. या गुलाबाच्या वासामुळे हृदयाचे कार्य सुधारते त्याच बरोबर चैतन्य वाढते.
२. ट्रॉपिकाना ऑरेंज गुलाब – Tropicana orange
ट्रॉपिकाना ऑरेंज गुलाब हा एक सुंदर हायब्रिड टी गुलाब आहे. ट्रॉपिकाना हा गुलाब कोरल केशरी असून त्या फुलाला ३० ते ३५ पाकळ्या असतात. या फुलाचे झुडूप सरळ असल्यामुळे लांब देठांवर हे गुलाब कापण्यासाठी उत्कृष्ट असतात. ट्रॉपिकाना या गुलाब फुलाला १९६३ मध्ये All-America Rose Selection award मिळाला आहे आणि तेव्हापासून हि फुले बागेमध्ये प्रसिध्द आहेत.
३. इडन गुलाब – Eden Rose
इडन गुलाब हा अतिशय लोकप्रिय गुलाब आहे व हा एक हायब्रीड टी चा प्रकार आहे. तजेला, मोहक , सुवासिक आणि खोल रंगाची पाकळ्या असणारा गुलाब आहे. हा गुलाब शक्यतो हलक्या गुलाबी रंगा मध्येच असतो. पण हा गुलाब जास्त प्रमाणात तयार होत नाही.
४. वेस्टमिन्स्टर गुलाब – Westminster rose
वेस्टमिन्स्टर गुलाब हे एक चमकदार दोन रंगांचा समावेश असणारे गुलाब आहे. या मध्ये deep cherry red व yellow हे दोन रंग असतात. व हि फुले अतिशय सुगंधित असतात.
५. हियारलूम गुलाब – heirloom
हियारलूम गुलाब हा नर्सरीच्या अगोदर अस्तित्वात असणारा गुलाब आहे व त्याचा सुगंध आणि त्याच्या रंगामुळे तो प्रसिध्द आहे. हा गुलाब पुन्हा पुन्हा फुलतो तसेच फुले हि मोठ्या प्रमाणात लागतात. हा गुलाब २० ते २५ पाकळ्या असणारा लीलाक जांभळ्या रंगाचा असतो.
6. इंक स्पॉट्स गुलाब – Ink spots rose
इंक स्पॉट्स काळा-लाल गुलाब आहे तो तजेलदार, मखमली आणि मध्यम आकाराचा आहे. गरम हवामानात या फुलाचा आकार कमी होतो.
आधुनिक गुलाब – information about modern rose in Marathi
आधुनिक गुलाबामधील प्रथम गुलाब हा ‘ला फ्रान्स’ हा मनाला जातो आणि तो १८६७ मध्ये अस्तित्वात आला होता. आधुनिक गुलाब हे ओल्ड गार्डेन गुलाब किवा हियरलूम या गुलाबापासून बनलेले असतात. सर्वात लोकप्रिय आणि खास आधुनिक गुलाबाच्या जाती खाली दिल्या आहेत.
१. मल्टीफ्लोरा – multiflora
मल्टीफ्लोरा हा प्रजाती गुलाब आहे. मल्टीफ्लोरा हा गुलाब शरद ऋतू मध्ये बहरतो आणि त्यांचा सुगंध मधासारखा असतो. मल्टीफ्लोरा या फुलांचे लागण्याचे प्रमाण हि कमी असते. शक्यतो या फुलांच्या फांद्यांचा वापर कलम केलेल्या गुलाबांसाठी रूटस्टॉक म्हणून केला.
२. पॉलिंथा – polyantha
पहिले पॉलिंथा फुल १८७५ मध्ये सादर झाले. या फुलाची निर्मिती china rose आणि multiflora या फुलांना एकत्र करून केली आहे. या फुलाची उत्कृष्ठ उदाहरणे म्हणजे सेसिल ब्रुणर आणि द फेयरी.
३. ग्रॅ्डीफ्लोरा – grandiflora
ग्रॅ्डीफ्लोरा हा गुलाब हायब्रीड टी व फ्लोरीबुंडा चा क्रॉस आहे त्याचबरोबर हा गुलाब हायब्रीड टी सारखाच उंच असतो. १९५५ मध्ये या फुलाची प्रनेते एलिझाबेथ हि राणी होती.
४. मिनीएचर – miniature
मिनीएचर हे गुलाब १९३० दशकाच्या सुरवातीस अस्तित्वात आले. या गुलाबांची रोज काळजी घेतली पाहीजे जसे कि रोज पाणि घालणे किवा खात घालणे आणि सूर्यप्रकाशात या फुलांची चांगली वाढ होते. या फुलांच्या झाडाला अतिथंड हवा सोसत नाही.
५. क्लाइंबिंग – climbing
क्लाइंबिंग गुलाब हे अधिक शोभिवंत असतात त्याचबरोबर या चढत्या क्लाइंबिंग गुलाबाच्या वेलीना वर्षातून एकदातरी cut केले पाहिजे. क्लाइंबिंग गुलाबावर फुलणारी फुले चांगल्या दर्जाची आणि मोठ्या प्रमाणात असतात. क्लाइंबिंग हा भारतीय जातीचा गुलाब आहे.
भारतीय गुलाबाच्या जाती – Indian Roses varieties
१. रॅम्बलर गुलाब – rambler rose
रॅम्बलर हा भारतीय गुलाब असून त्याची वैशिष्ट्ये क्लाइंबिंग गुलाबासारखेच असतात त्याचबरोबर हे आधुनिक जातीचे फुल आहे. रॅम्बलर हा गुलाब मोहक, सुगंधित आणि आकाराने लहान असतो. पण तो मोठ्या प्रमाणात लागतो.
२. टू-टोन लाल गुलाब – Two-Tone Red Rose
टू-टोन लाल गुलाब हा ग्रँडिफ्लोरा प्रकारचा गुलाब असून त्यात गुलाबाच्या अर्धा वरचा भाग गडद लाल असतो खालचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो म्हणजेच हे गुलाब दोन रंगामध्ये असते म्हणून याला टू-टोन लाल गुलाब म्हणतात.
३. पीच गुलाब – peach rose
पीच गुलाब हे केशरी, गुलाबी आणि जर्दाळू या फुलांचे एकत्रीकरण करून तयार झालेले फुल आहे आणि त्यामध्ये गुलाबी रंग जास्त दिसतो . या फुलाचा सुगंध सौम्य असतो.
४. अप्रिकॉट गुलाब – apricot rose
वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आपल्या आजूबाजूचे सौंदर्य वाढवितात त्यात ह्या गुलाबाची हि भर पडते. हे गुलाब सुगंधित असते व याचा उपयोग रस तयार करण्यासाठी होतो. हा गुलाबाला टीझिंग जॉर्जिया असेही म्हंटले जाते.
५. लाल गुलाब – Red Rose information in Marathi
हे फुल सामान्यत: क्लासिक लाल लुकसह सरासरी आकारात असते. गुलाबाचा जास्तीत जास्त व्यास 3 इंच असू शकतो. हा फ्लोरिबुंडाचा एक प्रकार असून लाल गुलाबाला ‘इंट्राममा’ असेही म्हणतात. काही विशिष्ट प्रसंगी एखाद्याला गिफ्ट करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
६. बहु-रंगी गुलाब – Multi-Color Rose
हे गुलाब ३ किवा त्यापेक्षा जास्त रंगाचे असते. मल्टीकलर गुलाबाला ‘मर्डी ग्रास’ असेही म्हणतात. या गुलाबाचा सुगंध मिरपूड सारखा असतो व हा गुलन दिसायला खूप आकर्षक असतो.
गुलाबांचे वेगवेगळे रंग आणि त्यांचे अर्थ – Different colors of roses and their meanings
गुलाब हे मैत्रीचे, प्रेमाचे आणि शांततेचे प्रतिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. गुलाबाच्या प्रत्येक रंगाच्या फुलाला काहीतरी अर्थ आहे जो आपल्याला जाणून घेणे अवश्यक आहे जर आपल्याला आपल्या मित्राला, कुटूंबातील सदस्याला किंवा विशेष एखाद्या व्यक्तीला हार्दिक संदेश पाठवयाचा असेल तर वेगवेगळ्या रंगांच्या फुलांमार्फत तो पढवू शकतो.
१. लाल गुलाब – Red Rose information in Marathi
लाल गुलाब बहुतेक वेळा प्रेमाचे सार्वत्रिक प्रतीक मानले जातात. जगभरातील, प्रत्येकाला हे माहिती. लाल गुलाब कौतुक आणि खरा आदर दर्शवतात.
२. गुलाबी गुलाब – Pink Rose information in Marathi
गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या शेड्समध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. फिकट गुलाबी गुलाब सभ्यता दर्शविते, गडद गुलाबी रंग कृतज्ञता व धन्यवाद दर्शवितो तर मध्यम गुलाबी गुलाब दुखं दर्शवितो.
३. पिवळा गुलाब – Yellow Rose information in Marathi
पिवळा गुलाब हा मैत्री आणि काळजीचे प्रतीक आहे. हा गुलाब मैत्रीचे प्रतिनिधित्व करतो.
४. पांढरा गुलाब – White Rose information in Marathi
पांढरा गुलाब शुद्धता, निरागसतेचे, पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. हा गुलाब आदर दर्शवतो.
५. केशरी गुलाब – Orange Rose information in Marathi
केशरी गुलाब उत्साह, उत्कटता, कृतज्ञतेचे प्रतिक आहे केशरी गुलाब मोह आणि अभिमान दर्शवते.
६. जांभळा गुलाब – Purple Rose information in Marathi
जांभळा गुलाब हा बहुतेकदा रॉयल्टी आणि वैभवाशी संबंधित असतो त्याचबरोबर हे गुलाब मोह किंवा पूजा दर्शवतात असे म्हटले जाते .
गुलाबाचा वापर – Uses Of Roses
- गुलाबाचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे तेल, साबण, body lotion,लीप बाम, face cream आणि body cream बनवण्यासाठी केला जातो.
- गुलाबाच्या फुलापासून सुगंधित अत्तरे बनवली जातात.
- गुलाबापासून गुलकंद तसेच rose honey हि बनवले जाते.
- गुलाबापासून औषधे बनवली जातात.
- गुलाबाचा वापर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सजावट करण्यासाठी हि होतो.
भारतातील काही प्रसिध्द गुलाबाच्या बागा
१. नेहरू रोज गार्डन – Nehru rose garden
नेहरू रोज गार्डन हे पंजाब मध्ये लुधियानाच्या मध्यभागी असलेले गार्डन आहे. १९६७ मध्ये ह्या बागेची सुरूवात केली आहे व २ acres क्षेत्रामध्ये हि बाग पसरली आहे. ह्या बागेमध्ये जवळ जवळ १६०० प्रकारचे गुलाब आहेत आणि हि आशियातील सर्वात मोठी गुलाब बाग आहे.
२. नॅशनल रोज गार्डन – National Rose Garden
नॅशनल रोज गार्डन हे दिल्लीतील प्प्रसिध्द आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. या बागेत जगभरातील काही दुर्मिळ जातीचे गुलाब आहेत. या बागेत हिरवा आणि काळा गुलाब देखील पाहू शकता, जे कोठेही सापडणे अशक्य आहे. या बागांची देखभाल दिल्ली सरकारकडून केली जाते.
३. झाकीर हुसेन रोज गार्डन – Zakir Hussain Rose Garden
झाकीर हुसेन रोज गार्डन हे भारताच्या चंदीगड शहरात आहे. हि बाग 30 एकर क्षेत्रामध्ये पसरलेली असून त्यामध्ये १६०० वेगवेगळ्या प्रजाती व 50,000 गुलाब-झुडुपे आहेत. हि बागेला भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांचे नाव देण्यात आले असून ते डॉ. एम. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली १९६७ मध्ये तयार झाले.
गुलाब रोप लावने, वाढवणे आणि छाटणी कशी करायची – How to plant grow & Plunt Roses
गुलाबाचे झाड कसे लावतात ?
गुलाबाचे रोप लावण्या पूर्वी त्याचे मूळ एका बादलीत पाण्यामध्ये कमीतकमी १५ मिनीटे भिजत ठेवावीत आणि त्यानंतर एक खड्डा खणा ज्यामध्ये रोपाची मुळे सहजपणे बसतील.
त्यानंतर खणलेल्या खड्यामध्ये झाड असे घाला जेणेकरून त्या रोपाची पाने मातीच्या पातळीवर असतील थोडे पाणि घाला व त्यावर माती घालून खड्डा मुजवून घ्या व रोपाच्या सभोवतालच्या मातीमध्ये एक चांगले मल्टिपॉज कंपोस्ट वापरा.
गुलाबाचे रोप चांगल्या प्रकारे कसे वाढवावे?
रोप लावाल्यानंतर पहिल्या 2 वर्षात नियमितपणे गुलाबांना पाणी द्यावे लागेल. उन्हाळ्यामध्ये गुलाब गार राहण्यासाठी हिरव्या आणि ओल्या गवताचा वापर खत म्हणून करावा त्यामुळे ते झाड ओले राहील. गुलाबाला पंधरवड्यातून एकदा लागवड द्या यामुळे तुमचे गुलाब चांगले फुलून राहतील.
गुलाबाच्या झाडांची छाटणी कशी करावी?
- छाटणी करायचे shears वापरण्यापूर्वी स्वच्छ करा त्याचबरोबर ते धारदार आहेत याची खात्री करा.
- खराब झालेल्या फांद्या व मध्यभागी जास्त जमाव टाळण्यासाठी जुने तण काढा.
- नवीन वाढ कमीतकमी 25% कमी करा व त्यानंतर त्या झाडाला लगेच खत घाला
- झाडाला फुले येताना त्याची छाटणी करू नका.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा सुंदर असा गुलाब राजा व त्याचे प्रकार किती आहेत तो कसा लावावा व तोडावा. Rose information in Marathi/rose flower information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही गुलाब या फुलाबद्दल राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट