साक्षी मलिक मराठी माहिती Sakshi Malik Information in Marathi

Sakshi Malik Information in MarathiSakshi Malik Biography in Marathi साक्षी मलिक मराठी माहिती आज महिला फक्त स्वयंपाकघरा पर्यंतच मर्यादित नसून विविध क्षेत्रांमध्ये एक पाऊल पुढे टाकत आहे. अशीच आपली भारताची साक्षी मलिक ही एक फ्रीस्टाइल कुस्ती पटू आहे. सन २०१६ मध्ये ब्राझील मधील “रियो दि जानेरो” येथील घडलेल्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये साक्षी मलिक यांनी ब्राँझ मेडल पटकावलं होतं. भारताला ओलंपिक पदक मिळवून देणाऱ्या या पहिल्या महिला कुस्तीपटू आहेत. आजच्या लेखामध्ये आपण साक्षी मलिक यांचा एक सामान्य मुलगी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू पर्यंतचा प्रवास पाहणार होते.

sakshi malik information in marathi
sakshi malik information in marathi

साक्षी मलिक मराठी माहिती – Sakshi Malik Information in Marathi

पूर्ण नाव साक्षी मलिक
जन्म३ सप्टेंबर १९९२
जन्म गावहरियाणा येथील रोहतक या शहरांमध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू
राष्ट्रीय पुरस्कारपद्मश्री पुरस्कार

जन्म व शिक्षण

हरियाणा येथील रोहतक या शहरांमध्ये साक्षी मलिक यांचा जन्म ३ सप्टेंबर १९९२ मध्ये झाला. मध्यमवर्गीय घरांमध्ये साक्षी यांचे बालपण गेले. वडील शिक्षक होते त्यामुळे घरातील वातावरण थोडं शिस्तीचं होतं. परंतु साक्षीचे आजोबा एक कुस्तीपटू होते आणि त्यांच्यापासून साक्षी प्रोत्साहित झाली. साक्षी बारा वर्षाची होती जेव्हा तिने कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

रोहतक मधील छोटूराम स्टेडियम येथे साक्षी यांनी ईश्वर दहिया यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीचा श्रीगणेशा केला. भारत हा प्रगत देश आहे परंतु इथे काही वयस्कर लोकांचे विचार थोडे आजच्या काळातील मुला-मुलींना पटतीलच असे नाही. “कुस्ती हा खेळ मुलींसाठी नसतोच मुळी”. असे देखील काही लोकांचे विचार होते.

त्याचा प्रभाव साक्षीवर कधीच झाला नाही कारण तिच्या घरच्यांनी तिला भरपूर पाठिंबा दिला. रोहतक या शहरांमध्ये साक्षीने तिचं संपूर्ण शैक्षणिक आयुष्य काढलं. सर्वात प्रथम वैश पब्लिक स्कूलमध्ये तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. मग साक्षीने डीव्हीए पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला. साक्षीच महाविद्यालयीन शिक्षण दयानंद विद्यापीठातून पूर्ण झाला.

साक्षी मलिक एक कुस्तीपटू

बारा वर्षाच्या साक्षीने मनाशी घट्ट करून ठेवलं होतं की ती तिच्या आजोबांसारखी एक कुस्तीपटू होणार. परंतु हा प्रवास आणि तिचे स्वप्न पूर्ण करताना तिला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तिच्या समाजातील बऱ्याच लोकांचा साक्षी आखाड्यात उतरण्यासाठी विरोध होता. परंतु साक्षी जिद्दी होती तिने मनामध्ये बाळगलेले स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं.

यासाठी तिने लोकांना काय वाटेल याच्यापेक्षा आपल्या स्वप्नाचा विचार केला आणि ते पूर्ण करण्यासाठी ती सम दाम दंड भेद एक करुन आखाड्यात उतरली. ईश्वर दहिया यांच्या नेतृत्वाखाली साक्षी मलिक यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. आणि साक्षी मलिक यांच्या यशाचे पहिले पाऊल पडले ते २०१० मध्ये.

साक्षी मलिक याने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल कांस्यपदक पटकावले. याआधी देखील साक्षी मलिक यांनी कुस्तीपटू म्हणून अनेक स्पर्धा जिंकल्या आणि अनेक पदकं मिळवली. परंतु प्रत्येक खेळाडूचा एक स्वप्न असतं ते म्हणजे आपल्याला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये एक तरी पदक मिळाव. २०१६ च्या ऑलम्पिक मध्ये साक्षी पोहोचली. या सुवर्ण संधीचा साक्षीला सोन करून दाखवायचं होतं शिवाय तिला समाजाच्या बुरसटलेल्या विचारांना तोंड द्यायचं होतं.

त्यासाठी कसंही करून साक्षीला हार मानून माघारी परत जायचं नव्हतं तिला हा सामना कसही करून जिंकायचा होता. या सामन्यांमध्ये सुरुवातीला साक्षीचे ०-५ असे गुण होते. कुठे ना कुठे आता सर्वांना असं वाटायला लागलं होतं की साक्षी हा सामना हरेल परंतु साक्षीला तिच्या डोळ्यासमोर तिच स्वप्न दिसत होतं.

तिला डोळ्यासमोर तो मेडल दिसत होता. साक्षी जिद्दी आहे आणि तिने ठरवलं की ती करूनच दाखवले. जरी सगळ्यांनी आशा गमावली होती तरीही साक्षी काही हार मानायला तयार नाही आणि शेवटच्या मिनिटांमध्ये साक्षीने अशी काही जादू केली की तिच्या कुस्ती कौशल्याने आणि खेळ खेळण्यासाठी लागणाऱ्या चतुर बुद्धीने शेवटच्या सहा मिनिटांमध्ये ती ५-५ या गुणांवर आली. 

शेवटच्या काही शाळांमध्ये तिने दोन गुण मिळवले आणि हा सामना ती जिंकली. ८-५ असा सामना जिंकून साक्षी मलिक यांनी कांस्यपदक जिंकलं. साक्षी इथवरच थांबली नाही तर ‌२०१४ मध्ये साक्षी मलिक यांनी ग्लासगोचा राष्ट्रकुल खेळांमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. २०१५ च्या एशियन कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले.

मान्य आहे की मुलांचं शारीरिक बळ मुलींपेक्षा जास्त असत, परंतु साक्षी सारख्या आज अनेक स्त्रिया आहेत ज्या मुलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पेक्षा पुढे जात आहेत. आणि कुठलाही खेळ हा मुला मुलींचा खेळ नसतो. खेळ हा खेळ असतो. खेळामध्ये तोच जिंकतो जो बुद्धीने व जिद्दीने खेळतो. ऑलंपिक मध्ये पदक मिळवण इतका सहाजिक नाही आहे. साक्षीचा तिच्या घरच्यांना, तिच्या जिल्ह्याला आणि आज आपल्या संपूर्ण भारताला अभिमान आहे.

पुरस्कार

साक्षी मलिक या क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यातून त्यांनी दाखवून दिलं की महिला फक्त घरापुरती मर्यादित नसतात. तर त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या नाम कमावू शकतात. साक्षी मलिक ह्या भारताला ओलंपिक पदक मिळवून देणाऱ्या पहिल्या कुस्तीपटू ठरल्या त्यांच्या कौशल्याची दखल भारत सरकारने देखील घेतली. 

२०१७ साली आपल्या भारताचा सर्वोच्च मानला जाणारा “पद्मश्री” पुरस्काराने त्यांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वोच्च मानला जाणारा “राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार” २०१६ मध्ये साक्षी मलिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साक्षी मलिक यांच्या यशाने व त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराने त्यांच्यासोबत त्यांच्या जिल्ह्याचे नाव देखील मोठे झालं.

साक्षी मलिक ह्या हरियाणा येथील आहेत आणि त्यांच्या यशामुळे हरियाणा शहराचे नाव मोठे झाले. त्यामुळे हरियाणा सरकार तर्फे साक्षी मलिक यांना ५०० यार्ड जमिनीच अनुदान करण्यात आला. इतकच नव्हे तर हरियाणा सरकार तर्फे साक्षी मलिक यांना वर्ग – २ नोकरीच्या ऑफर देखील आल्या. आज भारत सरकार द्वारे भारतीय रेल्वे मार्फत राजपत्रित अधिकाराच्या पदावर साक्षी मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

साक्षी मलिक यांच्या अचीवमेंट

२०११ मध्ये जम्मू येथे घडलेल्या “ज्युनियर नॅशनल” स्पर्धेमध्ये साक्षी मलिक यांनी “सुवर्णपदक” जिंकलं. जकार्ता येथे झालेल्या “जूनियर एशियन” स्पर्धा २०११ मध्ये साक्षी मलिक “कांस्य” पदाच्या मानकरी ठरल्या. २०११ साली गोंडा येथील “ज्येष्ठ राष्ट्रीय” स्पर्धेत “रौप्यपदक” जिंकले. २०११ साली झालेल्या “अखिल भारतीय विद्यापीठ” स्पर्धेमध्ये “सुवर्णपदक” मिळवलं.

एका वर्षाच्या आत साक्षीने इतकी सगळी पदक मिळवली. २०१२ मध्ये “कनिष्ठ राष्ट्रीय” स्पर्धेमध्ये “सुवर्णपदक” तर याच वर्षी “कनिष्ठ आशियाई” स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा “सुवर्णपदक” मिळवलं. २०१२ च्या “ज्येष्ठ राष्ट्रीय” स्पर्धेमध्ये “कांस्य” पदक पटकावलं. तर “अखिल भारतीय विद्यापीठ”, अमरावती (२०१२) या स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” मिळवलं.

“ज्येष्ठ राष्ट्रीय”, कोलकत्ता(२०१२) या स्पर्धेमध्ये “सुवर्ण पदक” तर पुन्हा “अखिल भारतीय विद्यापीठ”, मेरट- “सुवर्णपदक”. २०१२ च्या ब्राझील येथील “रिओ ऑलिम्पिक” मध्ये “कांस्य” पदक पटकावलं. “कॉमन-वेल्थ कुस्ती” स्पर्धा (२०१७)- “सुवर्ण पदक”. साक्षीचे घर संपूर्ण पुरस्कारांनी भरुन गेलं होतं.

बारा वर्षाची साक्षी जिचा कुस्तीपटू बनण्याच्या स्वप्नानं तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्याच साक्षीने कमवलेली इतकी सगळे पुरस्कार बघून घरच्यांना साक्षीचा फार अभिमान वाटू लागला. कुस्ती हा खेळ जेव्हा साक्षीने निवडला तेव्हा तिला कुठल्या कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असेल हे तिचं तिलाच ठाऊक.

कुस्ती खेळताना मुलांसोबत तिला सराव करावा लागला असेल, त्यावेळेस समोर येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागली असेल. आज पर्यंत ऑलिम्पिक मध्ये फक्त चार भारतीय महिलांनी पदक मिळवलं आहे आणि त्यामध्ये साक्षीचे देखील नाव आहे. सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता परंतु साक्षीची जिद्द बघून घरच्यांनी तिला पाठिंबा दिला.

परंतु समाजाकडून येणारा विरोध शिवाय ती मुलगी कुस्ती खेळते म्हणून तिची निंदा करणे व समाजाकडून मिळालेली गलिच्छ वागणूक या सगळ्यांशी साक्षीचा लढा होता. आज साक्षीने पाहिलेली स्वप्न पूर्ण झाल आहे. शिवाय ती यशाच्या मार्गाने वाटचाल करत आहे. भरपूर स्त्रियांसाठी साक्षी मलिक‌ या एक ट्रू इन्स्पिरेशन ठरल्या आहेत.

मध्यमवर्गीय घरातून वर येऊन समाजाची हेळसांड सहन करत साक्षी आज आपल्या सर्वांसमोर मानाने उभी आहे. साक्षी मलिक यांच्यामते स्वप्न बघणं हे सोपं असतं, पण स्वप्नपूर्ती फारच अवघड असतं. एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समोर येणार्‍या अडचणींवर मात करत एखाद दिवशी आपली आशा गमावू शकतो परंतु न थांबता पुढे जात राहिल पाहिजे.

आम्ही दिलेल्या sakshi malik information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर साक्षी मलिक मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sakshi malik biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sakshi malik in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of sakshi malik in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!