संभाजी महाराज निबंध मराठी Sambhaji Maharaj Essay in Marathi

Sambhaji Maharaj Essay in Marathi संभाजी महाराज निबंध मराठी भारताच्या इतिहासामध्ये अनेक शूरवीर आणि इतिहासामध्ये आपला ठसा उमटवणारे आणि आजही लोकांच्यामध्ये घर करून बसलेले राजे – महाराजे होवून गेले आणि त्यामधील एक महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण देशामध्ये लोकप्रीय झालेले आणि इतिहासामध्ये आपली शूरवीरता ज्यांनी गाजवली आहे. तसेच आजही लोकांच्या मनामध्ये तेवढाच आदर असणारे आणि लोकांच्या मनामध्ये घर केलेलं राजे म्हणजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवाचे राण करून स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपले स्वराज्य शत्रूंच्यापासून टिकवून ठेवण्यासाठी आपला जीव पणाला लावला. आज आपण या लेखामध्ये अश्याच स्वराज्यासाठी आपल्या जीवाचा आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी आज आपण निबंध लिहिणार आहोत. आता मी या निबंधाची सुरुवात एका शब्द रचनेपासून करत आहे.

sambhaji maharaj essay in marathi
sambhaji maharaj essay in marathi

संभाजी महाराज निबंध मराठी – Sambhaji Maharaj Essay in Marathi

Sambhaji Maharaj Marathi Nibandh

“जंगलामध्ये सिंहा समोर जाणारे अनेक असतात

परंतु

जो सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालून

सिंहाचा जबडा फाडतो

ते म्हणजे स्वराज्याचे

धाकलं धनी

शंभूराजे.”

शब्द रचनेमध्ये असे म्हणायचे कारण सिंहासमोर कोणीही जाईल परंतु त्याच्याशी लढण्याची ताकद हि काही खास लोकांच्यामधेच असते आणि अशी ताकद छत्रपती संभाजी महाराज्यांमध्ये होती आणि त्यांनी सिंहाशी लढतांना सिन्हाहाचा जबडा फाडला होता आणि एका सिंहाला हरवले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जीवन स्वराज्य स्थापनेसाठी आणि स्वराज्य विस्तारित करण्यासाठी घालवले आणि त्यांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते.

त्यानंतर स्वराज्याचे धाकलं धनी, स्वराज्याचे दुसरे मालक किंवा स्वराज्याचे दुसरे महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या नंतर स्वराज्याची सर्व धुरा सांभाळली आणि त्यांनी स्वराज्याच्या विस्तार केला आणि त्यांनी स्वराज्य टिकवून ठेवले आणि म्हणून त्यांना स्वराज्य रक्षक शंभू राजे म्हणून ओळखले जाते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजूबाजूचे वातावरण हे राजकी आणि राजकीय समस्या, गनिमी कावे यासारखे होते त्यामुळे ते लहानपणी पासूनच राजकीय क्षेत्रामध्ये निपुण झाले आणि म्हणूनच त्यांनी मोठे झाल्यानंतर आणि खूप कमी वयामध्ये स्वराज्याची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर १४ मे १६६५ मध्ये झाला.

जन्मापासूनच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. छत्रपती संभाजी महाराज फक्त २ ते ३ वर्षाचे असतांना त्यांची आई महाराणी सईबाई यांचे निधन झाले. संभाजी महाराजांची ओळख स्वराज्याचे दुसरे राजे, स्वराज्याचे धाकलं धनी किंवा स्वराज्य रक्षक म्हणून केली जायची आणि छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते आणि त्यांना छावा म्हणून ओळखत होते.

कारण एका वाघाच्या पिल्लाला आपण छावाच म्हणून शकतो. छत्रपती संभाजी महाराज यांची आई त्यांच्या जन्मानंतर लगेच २ वर्षानंतर मरण पावल्या त्यामुळे त्यांचे पालन पोषण स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांनी केले ज्या त्यांच्या आजी होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असे होते आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई असे होते आणि त्यांचे वडील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे होते.

छत्रपती संभाजी महाराजांना छावा किंवा शंभूराजे या नावांनी ओळखले जात होते आणि आजही त्याच नावांनी ओळखले जाते. छत्रपती संभाजी महाराजांना एक भाऊ देखील होते, जे सोयराबाई यांचे पुत्र होते आणि त्यांचे नाव राजाराम महाराज असे होते तसेच त्यांना राणूबाई, अंबिकाबाई, दीपाबाई, शकूबाई कमलाबाई ह्या बाही होत्या आणि महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई से होते. छत्रपती संभाजी महाराजांना साहित्याची खूप आवड होती. तसेच त्यांना संस्कृत सोबत आणखीन आठ भाषा येत होत्या.

छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या खूप कमी जीवन काळामध्ये अनेक शूरवीरता गाजवली. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेल्यानंतर महाराजांना आणि शंभूराजेंना औरंगजेबाने नजर कैदेत ठेवले होते परंतु महाराजांनी आणि शंभूराजे यांनी तेथून सुटका करून घेतली होते आणि ते एक ते दीड वर्ष एका ब्राहानांच्या घरी अज्ञात वासात राहिले होते.

आणि त्यावेळी त्यांची भेट कवी कलश्याशी झाली होती. ज्यावेळी ते अज्ञातवासात होते त्यावेळी गडावर त्यांचा उपनयन कार्यक्रम देखील केला होता. तसेच छत्रपती संभाजी महाराज पुरंदरच्या तहासाठी ते मिर्झाराजेंच्या छावणीत देखील काही दिवस राहिले होते तसेच त्यांनी सिंहाशी लढताना त्या सिंहाचा जबडा फाडला होता.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला करायला सुरुवात केली आणि त्याने स्वराज्यातील काही किल्ले आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला काही यश मुळले नाही कारण त्यांच्या पुढे संभाजी महाराज होते औरंगजेबाच्या आठ लाख पेक्षा जास्त फौजेशी लढून त्यांना हरवली. छत्रपती संभाजी महाराजांनी ३० जुलै १६८० मध्ये स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्याचा संपूर्ण नाश करण्याच्या हेतूने महाराष्ट्रात आला. नाशिक मोगलांच्या ताब्यात होता. रामशेज नाशिक जवळ असल्याने मोगलांना वाटले की ते जिंकणे सर्वात सोपा असेल पण संभाजी महाराजांच्या समोर ते इतके सोपे नव्हते. औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी शाहबुद्दीन गझियुद्दीन फिरोजेजुंगला याला ४०००० हजार सैनिकांसोबत पाठवले.

ज्यावेळी औरंजेबाच्या सैनिकांनी किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी रामशेज या किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. मोगलांनी पहिला हल्ला केले पण मराठा सैनिकांनी त्यांना दगडफेक करून उत्तर दिले आणि त्यामुळे मोगलांनी वेढा तात्पुरता मागे घेतला. त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा आणखी घट्ट केला आणि त्याच्या जिंकण्याच्या तीव्र इच्छेमुळे त्याने काळजीपूर्वक विचार करण्यास प्रवृत्त केले.

त्याने एक लाकडी बुरुज तयार केला ज्यामध्ये ५०० माणसे आणि ५० तोफांची जागा उपलब्ध होती. त्यानुसार लाकडी बुरुज बांधण्यासाठी आजूबाजूचे जंगल मोकळे केले होते आणि त्यानंतर मोगलांनी बुरुजावरुन किल्ल्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मे १६६२ मध्ये संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि मनाजी मोरे यांना ७००० च्या सैन्यासह घेराव मोर्चासाठी पाठवले.

त्याचवेळी शाहबुद्दीनने गणेशगाव जवळील ठिकाणी मराठ्यांची तपासणी सुरु केली. दोन्ही सैन्याने जोरदार लढाई केली ज्यात मोगलांनी त्यांचे ५०० घोडे गमवावे लागले आणि ते मराठ्यांच्या ताब्यात आले या मुळे मराठा सैनिकांच्या मध्ये लढण्यासाठी उत्साह वाढला पण तिकडे या माघारमुळे औरंगजेब चिडला आणि बहादूर खानला रामशेजच्या दिशेने जाण्याची आज्ञा केली.

शहाबुद्दीनने वेढा आणखी घट्ट केला आणि किल्ल्यावर पुन्हा हल्ला करण्यास सुरवात केली आणि त्यावर मावळ्यांनी जोरदार दगड हल्ला केला. या हल्ल्यात राजा दलापतराय जखमी झाले ज्या मुघलांना पुन्हा माघार घ्यावी लागली. यानंतर औरंगजेबाने काशिमखान किरामनी यांना रामशेजच्या दिशेने कूच करायला पाठवले पण तोही किल्ला मिळविण्यात अपयशी ठरला. या वरून असे समजते कि संभाजी महाराज हे हार मानणारे नव्हते.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला कब्जा मिळत नव्हता त्यामुळे तो चिडला आणि त्याने संभाजी महाराजांना पकडून आणण्याची आज्ञा दिली त्यावेळी औरंगजेबाच्या माणसांनी स्वराज्यातील काही लोकांना हाती धरून छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलश पकडले आणि औरंगजेबाच्या समोर नेले त्यावेळी औरंजेबाने स्वराज्याला त्याच्या मुगल साम्राराज्यामध्ये सामील करण्यास सांगितले परंतु संभाजी महाराज कोणासमोर झुकणारे नव्हते.

त्यावेळी औरंगजेबाने वेगवेगळ्या शिक्ष्या सुनावल्या आणि संभाजी महाराज्यांच्या वर ४० दिवस अत्याचार म्हणजेच त्यांचे हात कापले, जीभ कापली, पायाची नखे काढली आणि बिते देखील कापून काढली होती आणि डोळ्यामध्ये सळी घालून डोळे काढले. ४० दिवसाच्या अत्याचारानंतर छत्रपती संभाजी महाराजांची प्राणज्योत मावळली.

आम्ही दिलेल्या sambhaji maharaj essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संभाजी महाराज निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि sambhaji maharaj marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on Sambhaji Maharaj In Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!