Samrat Ashok History in Marathi – Samrat Ashok in Marathi सम्राट अशोक इतिहास मराठी सम्राट अशोक यांची कीर्ती फक्त भारतातच नव्हे तर श्रीलंका, नेपाळ व मध्य आशिया पर्यंत पोहोचली आहे. सम्राट अशोक हे मौर्य वंशाचे तिसरे शासक होते ज्यांची प्राचीन इतिहासात भारतातील सर्वात शक्तिशाली राज्यांपैकी एक अशी गणना केली जाते. त्यांची राजकीय कारकीर्द भारताच्या इतिहासातील सर्वात समृद्ध काळ म्हणून घोषित केली गेली आहे. त्यांच्या साम्राज्या मध्ये भारत, दक्षिण आशिया व त्यापलीकडील सध्याचे अफगाणिस्थान आणि पश्चिमेला पर्शिया चा काही भाग, पूर्वेला बंगाल, आसाम, दक्षिणेला म्हैसूर असे भाग समाविष्ट होते. या लेखामध्ये सम्राट अशोक यांचा इतिहास जाणून घेणार आहोत.
सम्राट अशोक इतिहास मराठी – Samrat Ashok History in Marathi
जन्म व सुरुवातीचे आयुष्य
सम्राट अशोक यांचा जन्म मौर्य राजवटीचे दुसरे शासक राजा बिंदुसर व त्यांची पत्नी महाराणी धर्मा यांच्या पोटी इसवी सन पूर्व ३०४ मध्ये झाला. मौर्य वंशाचे संस्थापक सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू सम्राट अशोक होय. अशोक यांना एक लहान धाकटा भाऊ होता आणि अनेक मोठे सावत्र भाऊ होते. त्यांच्या आईला तेथील राजकारणामुळे राजघराण्यामध्ये खालचे स्थान देण्यात आले आणि त्यांच्या आईच्या स्थानामुळे अशोक यांनादेखील राजपूत्रां मध्ये कमी स्थान मिळाले.
परंतु अतिशय लहानपणापासूनच सम्राट अशोक यांनी शस्त्र कौशल्य व शैक्षणिक क्षेत्रात देखील उत्तम प्रगती दाखवायला सुरुवात केली. अशोक यांचे वडील बिंदुसार यांनी सम्राट अशोक यांच्या मधील कौशल्य व त्यांचे ज्ञान जाणले आणि त्यांना अवंतीच राज्यपाल म्हणून नेमले.
ज्यावेळी अवंती राज्यांमध्ये बंड उसळलेले तेव्हा हे रोखण्याचे काम सम्राट अशोक यांनी उत्तमरित्या पार पाडले. त्यांचे नेतृत्व, कौशल्य व दूरदृष्टीचा उपयोग करून त्यांनी हे प्रकरण व्यवस्थित सोडवलं. त्यांच्याकडे असणारे हे कौशल्य पाहून राजा बिंदुसर यांनी सम्राट अशोक यांना राज्य शासन सोपविण्याचा निर्णय घेतला. ते एक उत्कृष्ट योद्धा ,सेनापती आणि चतुर राजकारणी होते आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये मौर्य सैन्यावर त्यांचा अधिकार वाढू लागला.
वडिलांच्या संमतीने व थोरल्या भावांना अशोक यांचा हेवा वाटू लागला आणि मौर्य राजवटीच्या सिंहासनाचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना पसंती मिळाली. सम्राट अशोक यांना राणी पद्मावती, तिश्यारक्षा, महाराणी देवी, व करुवकी इत्यादी राण्या होत्या. कुणाल, महेंद्र, संघमित्रा, जालूक, चारुमती, तीवाला, इत्यादी संताने होती.
सम्राट अशोक
सम्राट अशोक हे लहानपणापासूनच घोडेस्वारी, तिरंदाजी, शिकारी करणे शिवाय तलवारबाजी आणि इतर शस्त्रविद्या मध्ये प्रगती करत होते. पुढे त्यांच्याकडे मौर्य साम्राज्याच्या किल्ल्या देखील सोपवण्यात आल्या. त्यांची ही प्रगती त्यांचे सावत्र भाऊ सुशिम यांना आवडत नव्हती आणि म्हणूनच त्यांनी वडील बिंदुसार यांना सम्राट अशोक यांच्या विरुद्ध चुकीच्या गोष्टी सांगून भडकवले. परिणामी राजा बिंदुसार यांनी सम्राट अशोक यांना वनवासात पाठवले. अशोक कलिंग येथे गेले.
उज्जैन प्रांतामध्ये हिंसक उठाव सुरू झाला आणि सम्राट बिंदुसार यांनी सम्राट अशोक यांना वनवासातून परत बोलावून उज्जैन येथे पाठवले. तिथे सम्राट अशोक जखमी झाले. बौद्ध भिक्षू आणि त्यांच्या अनुयायांनी सम्राट अशोक यांच्या वर उपचार केले. त्यावेळी सम्राट अशोक यांना बौद्धांचे जीवन आणि शिकवण पहिल्यांदा कळाली. येणाऱ्या काळामध्ये सम्राट बिंदुसार यांची प्रकृती खालवली आणि त्यांनी राज्याचे उत्तराधिकारी म्हणून सुशिमा यांना नेमलं. परंतु सुशिमा यांच्या स्वभावामुळे राज्य दरबारातील मंत्र्यांना ते मान्य नव्हतं.
त्यांनी अशोक यांना पुन्हा बोलावून राधा गुप्ता च्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या गटाने अशोक यांना राजमुकुट दिले. अशोक यांनी पाटलीपुत्रावर हल्ला करून आपल्या सर्व भावांना पराभूत केलं आणि एक हाती संपूर्ण राज्य मिळवलं. मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावरती सम्राट अशोक आरूढ झाले परंतु त्यानंतर चार वर्षांनी त्यांचा राज्याभिषेक झाला. मौर्य साम्राज्याच्या सीमा फार पूर्वीच दूरपर्यंत विस्तारल्या गेल्या होत्या परंतु सम्राट अशोक यांनी त्यांच्या चातुर्याच्या जोरावर त्या आणखीन दूर पर्यंत पोहोचवल्या.
ते क्रूर व निर्दय आणि वाईट स्वभावाचे शासक म्हणून ओळखले जायचे कारण त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रांतांवर क्रूरपणे हल्ले करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचे राज्य पश्चिमेला इराण अफगाणिस्तान सीमेपासून ते पूर्वी पर्यंत बर्मा पर्यंत पसरवली. त्यांनी श्रीलंका वगळता संपूर्ण दक्षिण भारत आपल्या अधिपत्याखाली आणला. सम्राट अशोक यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीतील अतिशय महत्त्वपूर्ण अशी लढाई जी कलिंगची लढाई होती या लढाईनंतर सम्राट अशोक यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
या लढाईमध्ये सम्राट अशोक यांच्या नेतृत्वाखाली कलिंग प्रांतावर्ती आक्रमण केलं गेलं. यामध्ये जवळपास एक लाखाहून अधिक लोक मारले गेले. संपूर्ण प्रांत लुटलं गेलं संपूर्ण शहरे नष्ट झाली. या लढाईमध्ये सम्राट अशोक यांचा विजय झाल्या परंतु ज्यावेळी युद्धानंतर ते परिस्थितीचे सर्वेक्षण करण्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांना जळलेली घरे, विखुरलेले मृतदेह या व्यतिरिक्त काहीही दिसले नाही. सर्वत्र रक्त, आक्रोश आणि मृत शरीरे दिसत होती हे दृश्य पाहून सम्राट अशोक यांचे मन व्यथीत झाले.
हे दृश्य अतिशय घायाळ व हृदयद्रावक होतं. या दृश्याने नंतर त्यांना त्यांच्या क्रूर कृतीचा अनुभव आला. त्यांनी पुढे कधीही हिंसा न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या संपूर्ण राज्यामध्ये बौद्ध तत्वाचा प्रचार करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त प्रजेच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले. बौद्ध धर्माला आजीवन आपल्या जीवनामध्ये स्थान देत त्यांनी अहिंसा, शांती व मानवता या मानवी मूल्यांचा स्वीकार केला.
यापुढे त्यांनी कधीही युद्ध करणार नाही असे ठरवले सोबतच त्यांच्या राज्यांमध्ये प्राण्यांची कत्तल किंवा विच्छेदन देखील बंद करण्यात आले. त्यांनी जाती व्यवस्था संपुष्टात आणली आणि आपल्या प्रजेला समान वागणूक दिली त्यांनी आपल्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि समानतेचा अधिकार दिला. आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केलं. त्यांनी पुढे धर्म व मानव सेवा यासाठी अनेक कार्य केले. गरिबांना दान केलं, भोजन व शिक्षणासाठी विद्यालय स्थापन केले, दळणवळणासाठी नवीन रस्ते निर्माण केले व सर्वांसाठी भोजनालय, पाणी पिण्याची सोय उपलब्ध केली.
प्रजेच्या हितामध्ये आपले हित आहे हे स्वीकारून अशोक सम्राट यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केलं. इसवी सन पूर्व २६० मध्ये सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माला राज्यधर्म बनवले. त्यांनी वीस हजार विश्वविद्यालय स्थापन केली. ८४ हजार छोटे व मोठे स्तूप बांधले ज्यामध्ये मध्यप्रदेशातील सांचीचा स्तूप ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे. आणि सारनाथ येथील शिलालेख स्तंभ विश्व प्रसिद्ध आहे.
त्यांनी आपल्या राज्यांमध्ये अनेक शिलालेख कोरून घेतले वेगवेगळे शीला स्तंभ उभारले. यापैकी सारनाथ येथील त्रिमूर्ती शीलास्तंभ, अशोक चक्र या दोन वास्तू भारतातील प्रमुख ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जातात. सम्राट अशोक यांनी भारतीय उपखंडावर अंदाजे चाळीस वर्ष राज्य केलं म्हणूनच भारतीय झेंडातील अशोक चक्र महान सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीची साक्ष देतं.
जे आज भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून ओळखले जात. ते एक परोपकारी राजा होते ज्यांनी त्यांच्या प्रजेचे हित जाणलं. ते प्रजा हितकारी व उदार मनाचे राजा होते ज्यांनी अहिंसा, दया शांती व उद्दात मानवी मूल्यांची जोपासना केली. एक उदार शासक म्हणून त्यांना देवनामप्रिय प्रियदर्शी ही पदवी देण्यात आली होती. सम्राट अशोक आणि त्यांचं गौरवशाली शासन भारताच्या इतिहासातील समृद्ध काळापैकी एक आहे.
मृत्यू
सम्राट अशोक यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये चाळीस वर्षे राज्य केलं. इसवी सन पूर्व २३२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे राज्य सुमारे आणखी पन्नास वर्षे टिकले. अहिंसेच्या माध्यमातून देखील जीवन जगता येतं याची प्रेरणा सम्राट अशोक यांच्याकडून संपूर्ण जगाला मिळाली. एक उत्तम विचारसरणी, धार्मिक, उदार, सहिष्णू राजा म्हणून सम्राट अशोक यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी भारताचा इतिहास आणखी गौरवशाली बनवला. जेव्हा जेव्हा भारताच्या इतिहासाबद्दल बोलल जातं तेव्हा सम्राट अशोक यांचं नाव अगदी न चुकता घेतलं जातं.
आम्ही दिलेल्या samrat ashok history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सम्राट अशोक इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या samrat ashok history in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of samrat ashok in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ashok samrat wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट