चक्रवर्ती सम्राट अशोक माहिती Samrat Ashok Information in Marathi

Samrat Ashok Information in Marathi चक्रवर्ती सम्राट अशोक माहिती आपल्या भारतीय इतिहासातील तत्कालीन शासन काळात सत्ताधारी असलेले मगध राज्य म्हणजेच पाटलीपुत्र राज्य हे एक प्रभावी व समृद्धशाली असे राज्य होते; जिथे अनेक शूर राजांनी राज्य केले. त्याच पाटलीपुत्र राज्यामध्ये मौर्य शासक असलेल्या सम्राट अशोकच्या जीवनाविषयी आज आपण या लेखात माहिती घेणार आहोत. एक चक्रवर्ती सम्राट ते अहिंसा, दया, शांती व उदात्त अशा मुल्यवान मानवी मुल्यांचा जोपासक ठरलेल्या महान राजाचा परिचय आपणा सर्वांना या लेखातून होईल.

पाटलीपुत्र राज्यातील मौर्य शासन संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू अर्थात सम्राट अशोक ह्यांचा उल्लेख भारतीय इतिहासात केवळ एक महान राजा इतकाच नसून, एक सर्वगुणसंपन्न, प्रजा हितकारी आणि भारतीय स्थापत्य कला विकसित करणारा राजा म्हणून होतो.

सम्राट अशोकाची कीर्ती ही केवळ संपूर्ण भारतातच नव्हे, तर श्रीलंका, नेपाळ व मध्य आशिया खंडापर्यंत दूरवर पसरलेली होती.

samrat ashok information in marathi
samrat ashok information in marathi

चक्रवर्ती सम्राट अशोक यांची माहिती – Samrat Ashok Information in Marathi

पूर्ण नाव सम्राट अशोक
जन्मइ.स.पू. ३०४
राष्ट्रीयत्व भारतीय
वडीलबिंदुसार
आईधर्मा
जन्मगावपाटलीपुत्र, बिहार
मृत्यूइ.स.पू. २३२ (७२ वर्ष)

इतिहास

सम्राट अशोक हे राजाच्या सिंहासनावर विराजमान होण्याआधीच्या काळात नंद शासकाला पदच्युत करून आचार्य चाणक्य ह्यांनी चंद्रगुप्त मौर्याला राजा बनविले होते आणि खऱ्या अर्थाने या काळातच मौर्य शासनाचे पाटलीपुत्र येथे त्यांचे अधिराज्य निर्माण झाले होते.

सम्राटांच्या काळात पाटलीपुत्र साम्राज्याचा विस्तार हा उत्तरेस हिंदुकुश पर्वत श्रेणीपासून ते दक्षिणेस गोदावरी नदीला व्यापून कर्नाटक राज्यातील म्हैसूरपर्यंत पसरलेला होता आणि पूर्वेस बंगाल प्रांतापासून ते पश्चिमेस अफगाणिस्तानपर्यंत खूप दूरवर साम्राज्याचा विस्तार होता. शुर, महान आणि कलाप्रेमी सम्राट अशोक हे बिंदुसार ह्यांचे पुत्र होते.

सम्राट अशोकला इतरही काही सावत्र भाऊ होते ज्यामध्ये; सुशीम, तिष्य इत्यादींचा आपल्याला इतिहासात दाखला मिळतो. शिवाय, सम्राट अशोकच्या आईचे नाव ‘महाराणी धर्मा’ असे होते. खरंतर, बालपणापासूनच अशोक ह्यांच्यामध्ये साहसी वृत्ती, पराक्रम आणि शत्रू हन्ता (शत्रूचा समूळ नाश करणे) इत्यादी गुण स्पष्ट दिसून येत होते.   

याशिवाय, सम्राट अशोक यांना अनेक उपनावं देखील होती, ज्यामध्ये प्रियदर्शी व देवनावप्रिय इत्यादी नावांचा प्रामुख्याने समावेश होतो. सम्राट अशोक ह्यांचा जन्म इसवी सन पूर्व ३०४ साली झाला होता, अशी ऐतिहासिक नोंद आपल्या भारतीय इतिहासात केलेली आपल्याला दिसून येते. प्रत्यक्षात मात्र पाटलीपुत्र राज्याची सत्ता सूत्रे इसवी सन पूर्व २६९ ते २३२ ह्या काळात सम्राट अशोक यांच्याकडे आल्याचा उल्लेख आहे.

याच काळामध्ये अवंती राज्यात उसळलेले बंड व दंगा रोखण्याचे कार्य वडिल बिंदुसार ह्यांनी पुत्र अशोकाला सोपविले होते. वडिलांनी सोपवलेल्या या कार्यात आपले नेतृत्व, कौशल्य व दूरदृष्टीचा परिचय देत अशोकाने हे बंड अगदी सहजरीत्या मोडून काढले व शांत केले आणि पुढे ह्याच त्यांच्या कला गुणावर प्रभावित होवून त्यांना राज्य शासन सोपविण्याचा त्यांच्या वडिलांनी निर्णय घेतला. 

घोड्सवारी, तिरंदाजी आणि शिकार करणे या कौशल्यांव्यतिरिक्त, तलवारबाजी व इतर शस्त्र विद्येत सम्राट अशोक हे निपुण होते.

सम्राट अशोक पती/पत्न्या

सम्राट अशोक यांना राणी पद्मावती, तीश्यारक्षा, महाराणी देवी व करुवकी इत्यादी पत्नी होत्या.

कारुवाकी सम्राट अशोक

सम्राट अशोकाच्या पूर्व आयुष्यात आचार्य चाणक्य यांचा राज्य नीतिशास्त्र व व्यक्ती विकास या संदर्भात शिक्षण घेत असताना मोलाचा फायदा झाला. सम्राट अशोक यांना राणी पद्मावती, तीश्यारक्षा, महाराणी देवी व करुवकी इत्यादी पत्नी होत्या. तसेच, त्यांना कुणाल, महेंद्र, संघमित्रा, जालूक, चारुमती व तीवाला इत्यादी संताने देखील होती.

इसवी सन पूर्व २६९ ते इसवी सन पूर्व २३२ या काळामध्ये महान असे व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आलेले सम्राट अशोक हे एक चक्रवर्ती सम्राट म्हणून प्रसिद्ध झाले. राजाच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी सम्राट अशोक यांनी आपल्या सावत्र भावांच्या अंतर कलहाला पूर्णपणे मोडून काढले व त्यांचा पराभव केला आणि शेवटी अशा रीतीने, पाटलीपुत्र शासन एकहाती सम्राट अशोक यांच्याकडे आले.

भारतातील तमिळनाडू आणि केरळ राज्यापर्यंत तसेच, विदेशी भूमी श्रीलंका इथपर्यंत साम्राज्य विस्तार करण्याची अशोक ह्यांची महत्वाकांक्षा होती. परंतू, अनेक कारणास्तव सम्राट अशोकाची ही महत्त्वाकांक्षा पूर्णत्वास जावू शकली नाही.

सम्राट अशोकच्या शासन काळात आपल्या भारत देशात विज्ञान व तंत्रज्ञान यांच्यासोबतच आरोग्य शास्त्रात देखील खूप प्रगती झाली होती. याशिवाय चोरी, लुट यांसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी अशोकाने कडक शासन मार्गाचा अवलंब केला, ज्यामुळे ह्या सर्व चुकीच्या गोष्टींना आळा बसला.

त्याचबरोबर, दानधर्म व यात्रा ह्यासारख्या बाबींना सम्राट अशोकाने खुल्या हातानी मदत केली. खरंतर, इसवी सन पूर्व २६१ साली झालेले कलिंगचे युध्द म्हणजे सम्राट अशोकाच्या आयुष्यात एक निर्णायक व अभूतपूर्व बदल घडवून आणणारी घटना म्हणून ओळखली जाते.

तत्कालीन कलिंग (भारतातील ओडिसा राज्यातील ठिकाण) व सम्राट अशोक यांच्या राज्यामध्ये इसवी सन पूर्व २६१ साली एक मोठे युध्द झाले होते. सम्राट अशोक यांच्या  साम्राज्याच्या तुलनेत कलिंग हे राज्य फार छोटे व कमकुवत असे राज्य होते.

त्याचमुळे, या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला आणि कलिंगच्या या युद्धामध्ये जवळपास १ लाख मनुष्यहानी सुद्धा झाली. या जीवितहानीमध्ये सर्वांत जास्त सैन्य मारले गेले. तसेच, कलिंग येथील स्त्रिया आणि बालक यांच्या मृत्यूचा आकडा देखील या युद्धामध्ये खूप मोठा होता.

युध्दाच्या या पार्श्वभूमीवर सर्वदूर केवळ रक्त, आक्रोश व अस्ताव्यस्त मृत शरीरे असे भयाण व हृदयद्रावक दृष्य दिसत होते. असे दृश्य पाहून सम्राट अशोकाचे मन दुःखी आणि व्यथित झाले.

एक आत्मग्लानी सारखी अवस्था झालेला पाटलीपुत्र साम्राज्याचा महान सम्राट अशोक राजा या दृष्यासमोर खचून गेला आणि त्याने भविष्यात पुन्हा कधीही युध्द व रक्तपात न करता, केवळ शांती व अहिंसा या मार्गांचा आजीवन अवलंब करण्याचा दृढ संकल्प केला. सम्राट अशोकाच्या इतिहासकारांनुसार अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही.

परंतु, त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये आणि चोल साम्राज्य यांच्याशी त्यांना नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतू; सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करूनही त्याने त्याच्या पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे शेजारच्या राज्यांनी सम्राट अशोकाला छेडण्याचे अजिबात साहस केले नाही.

सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले आणि यासोबतच त्यांनी मगधचे सैनिकी सामर्थ्य देखील अबाधित ठेवले. सम्राट अशोकाने भारताला दिलेला सर्वांत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख होय.

सम्राटणी आपल्या राज्याच्या सीमेवरती अगदी महत्त्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले सर्व महान विचार प्रकट केलेले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर आपल्याला सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले असावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

शिवाय, यापुढील उत्खननांमध्ये सुद्धा स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे, असे पुरातत्वशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. काही शिलालेखांमधून अशी माहिती समोर आलेली आहे की अशोकाला मुख्यत्वे “देवानांपिय पियदसी” (पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला जात होता. खरंतर, याचा अर्थ “देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा” असा होतो.

त्याचबरोबर, सम्राट अशोकाच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता आपल्या समोर येते. सम्राटांनी हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यात मार्गांवर मुख्य चौकांमध्ये स्‍थापित केले होते, जेणेकरून प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्या विदेशींना आपल्या मगध राज्यातील आचारविचार कळावेत असा त्याचा मुख्य उद्देश होता.

अशा रीतीने, भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे खऱ्या अर्थाने मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.

“जगाच्या इतिहासात असे अनेक हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वत:ला ‘हिज हायनेस’, ‘हिज मॅजेस्टीज’, ‘हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज’ आणि अशा अजुन त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. खरंतर, हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले; पण सम्राट अशोक! हे व्यक्तिमत्त्व  मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपतच राहिले आणि ते पण अगदी आजपर्यंत.”

– तेजल तानाजी पाटील

बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये samrat ashok information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ashok samrat history in marathi म्हणजेच “चक्रवर्ती सम्राट अशोक यांची माहिती” यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about samrat ashok in marathi short या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि samrat ashok prathavana information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “चक्रवर्ती सम्राट अशोक माहिती Samrat Ashok Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!