सांकशी किल्ला माहिती Sankshi Gad fort Information in Marathi

Sankshi Gad fort information in marathi सांकशी किल्ला माहिती, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मोठ मोठ्या राज्यकर्त्यांनी राज्य केले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक छोटे मोठे किल्ले देखील बांधले त्यामधील एक छोटासा किल्ला म्हणजे सांकशी किल्ला आणि आज आपण या लेखामध्ये सांकशी किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. सांकशी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यातील पेन या गावामध्ये १० किलो मीटर अंतरावर वसलेला आहे आणि संह्याद्रीची एक डोंगररांग हि खंडाळा घाटावर वसलेल्या माणिकगड या किल्ल्याच्या पश्चिम दिशेला पसरली आहे आणि पुढे हि रांग दक्षिणेला बाळगंगा आणि दक्षिण दिशेला पातळगंगा नदींच्या खोऱ्यामध्ये विभागते आणि या मधील बाळगंगा खोऱ्याच्या दक्षिणेला सांकशी डोंगररांग वसलेली आहे.

सांकशी हा किल्ला डोंगररांग किंवा गिरिदुर्ग प्रकारातील असून ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ८५० फुट इतकी आहे आणि हा किल्ला चढाईसाठी एक मध्यम दर्ज्याच किल्ला मनाला जातो. ह्या किल्ल्यावर चढण्यासाठी कातळ वाटा आहेत त्यामुळे ट्रेकर्सच्या दृष्टीने हा एक चांगला किल्ला आहे.

सांकशी या किल्ल्यावर अहमदनगरच्या घराण्याने सर्वप्रथम राज्य केले आणि हे १५ व्या दशकात या किल्ल्यावर राज्य करत होते त्यानंतर या किल्ल्यावर १५९४ मध्ये पोर्तुगीजांनी राज्य केला मग १७३९ ते १८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर राज्य केले. ज्यावेळी ब्रिटीश भारतामध्ये आले आणि त्यांनी अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये सांकशी हा किल्ला देखील होता त्यांनी हा १८१८ मध्ये हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला.

Sankshi Gad fort information in marathi
Sankshi Gad fort information in marathi

सांकशी किल्ला माहिती – Sankshi Gad fort Information in Marathi

किल्ल्याचे नावसांकशी
प्रकारडोंगर किल्ला किंवा गिरिदुर्ग
किल्ल्याची उंचीसमुद्रसपाटीपासून ८५० फुट
कोणी बांधलासांक राजाने
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यातील पेन या गावामध्ये १० किलो मीटर अंतरावर वसलेला आहे

सांकशी किल्ल्याचा इतिहास – Sankshi Gad fort History in Marathi

सांकशी हा किल्ला खूप प्राचीन किल्ला आहे आणि हा किल्ला सांक राजाने बांधला असे सांगितले जाते आणि या सांक राजाची एक मुलगी होती आणि ज्यावेळी सांक राजा कर्नाळाच्या लढाई मध्ये मारला गेला त्यावेळी त्या मुलीने देखील त्या किल्ल्यावर जीव दिला आहे म्हटले जाते. सांक राज्याच्या मृत्यूनंतर हा किल्ला गुजरातच्या सुलतानांच्याकडे होता पण ह्या किल्ल्यावर अहमदनगरच्या निजामांनी हल्ला करून हा किल्ला ताब्यात घेतला परंतु परत गुजरातच्या सुलतानांनी हा किल्ला पोर्तुगीजांच्या मदतीने आपल्या ताब्यात घेतला.

पण परत अहमदनगरचे निजाम हल्ला करतील या भीतीने त्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांच्या स्वाधीन केला. त्यानंतर १७३९ ते १८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर राज्य केले. ज्यावेळी ब्रिटीश भारतामध्ये आले आणि त्यांनी अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये सांकशी हा किल्ला देखील होता त्यांनी हा १८१८ मध्ये हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला.

सांकशी या किल्ल्यावर कोणकोणत्या घराण्यांनी राज्य केले ?

सांक या राजाने हा किल्ला बांधला आणि त्यानंतर या किल्ल्यावर गुजरातच्या सुलतानांनी, अहमदनगरच्या निजामांनी त्यानंतर या किल्ल्यावर १५९४ मध्ये पोर्तुगीजांनी राज्य केला मग १७३९ ते १८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर राज्य केले. ज्यावेळी ब्रिटीश भारतामध्ये आले आणि त्यांनी अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये सांकशी हा किल्ला देखील होता त्यांनी हा १८१८ मध्ये हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला.

सांकशी किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

सांकशी हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पेन या गावापासून  किलो मीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्याला भेट देण्यासाठी किंवा चढण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला दोन कातळ टप्पे पार पाडावे लागतात. आपण किल्ला चढण्याच्या वाटेने चालू लागल्यानंतर आपल्याला दहा मिनिटामध्ये कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्यांच्या बाजूला पाण्याचे खांब टाके देखील आहे.

तसेच पुढे चढत गेल्यानंतर आणखीन तीन पाण्याचे टाके आपल्याला पहायला मिळतात आणि त्या तीन टाक्यांच्या जवळ जगमातेचे मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढे चालत आलो कि खिंडीमध्ये पोहचतो आणि खिंडीतून किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट सुरु होते. वर चढताना कातळामध्ये बनवलेल्या पाण्याचे तीन टाके आहेत आणि या टाक्यांना गाजीशाह टाके म्हणून ओळखले जाते आणि यापैकी एक टाकीला आत जाण्यासाठी दरवाजा आहे तसेच त्याठिकाणी कातळामध्ये कोरलेली मारुतीची मूर्ती देखील आहे.

सांकशी किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about Sankshi Gad fort in Marathi

  • सांकशी हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यातील पेन या गावामध्ये १० किलो मीटर अंतरावर वसलेला आहे.
  • १७३९ ते १८१८ पर्यंत हा किल्ला मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर राज्य केले.
  • संह्याद्रीची एक डोंगररांग हि खंडाळा घाटावर वसलेल्या माणिकगड या किल्ल्याच्या पश्चिम दिशेला पसरली आहे आणि पुढे हि रांग दक्षिणेला बाळगंगा आणि दक्षिण दिशेला पातळगंगा नदींच्या खोऱ्यामध्ये विभागते आणि या मधील बाळगंगा खोऱ्याच्या दक्षिणेला सांकशी डोंगररांग वसलेली आहे.
  • ज्यावेळी ब्रिटीश भारतामध्ये आले आणि त्यांनी अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये सांकशी हा किल्ला देखील होता त्यांनी हा १८१८ मध्ये हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला.
  • सांकशी हा किल्ला डोंगररांग किंवा गिरिदुर्ग प्रकारातील असून ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ८५० फुट इतकी आहे आणि हा किल्ला चढाईसाठी एक मध्यम दर्ज्याच किल्ला मनाला जातो.

आम्ही दिलेल्या Sankshi Gad fort Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सांकशी किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Sankshi Gad fort History in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about Sankshi Gad fort in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!